Sunday, January 18, 2015

Whatsappgroup cooled down


व्हॉट्सअॅप ग्रूप थंडावलेत

what's-app
नव्याचे नऊ दिवस...असं म्हणतात, तसंच काहीसं झालंय व्हॉटसअॅपवरील काही ग्रूप्सचं. सुरूवातीच्या तासन् तास चालणाऱ्या गप्पा, शेअरिंग आता थंडावलंय. अनेकांनी तर आपले सगळेच व्हॉट्सअॅप ग्रूप चक्क वर्षभरासाठी सायलेंटवर टाकले आहेत.

गुड मॉर्निंग ऑल, गुड नाइट दिवसभरात हे दोन मेसेज पडले तर पडले. बाकी फारसे काही मेसेज नाही किंवा शेअरिंग नाही. अनेकांना तर ग्रूपवर व्यक्त व्हावंसंही वाटत नाही. सध्या अनेकांच्या मोबाइल फोनमधले व्हॉट्सअॅप ग्रूप असेच थंडावलेत. ग्रुपवरील चर्चांना एक प्रकारची मरगळ आलीय, फॉर्वडेड मेसेजशिवाय ग्रुपवर काहीच दिसत नाही. असं भकास वातावरण सध्या व्हॉट्सअॅपवर दिसून येऊ लागलंय. सुरूवातीला उत्साहाने ग्रूप तयार केला जातो. काही दिवस सर्व मेंबर्सचा कलकलाट चालतो. गाणी, फोटो आणि व्हिडीओजची देवाणघेवाण होते. मात्र काही आठवड्यात हा ग्रूप हळूहळू थंडावतो.

काय आहेत कारणं?

रिप्लाय न येणं

अनेकदा उत्साही मेंबर्स बोलणं सुरू करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याला कोणी उत्तरच देत नाही. असा अनुभव चार-पाच वेळा आल्यानंतर हा अॅक्टिव्ह मेंबरही सायलेन्ट मोडवर जातो.

समान धागा नाही

अनेकदा अॅडमिनने तयार केलेल्या ग्रूपमध्ये त्याच्या दृष्टीने एका समान धाग्याने बांधले गेलेले मेंबर्स अॅड केले जातात. मात्र या सर्वांचीच एकमेकांशी ओळख नसते. त्यामुळे अशा ग्रुप्सवर अॅडमिनच जास्त अॅक्टिव्ह असतो.

त्रासदायक ग्रुप्स

अनेक ग्रुप्समध्ये दोघंचजण तासनतास गप्पा मारतात. त्यामुळे बाकी मेंबर्स ग्रुपवर सुरू असणाऱ्या पर्सनल चॅटला वैतागतात. ग्रूप सोडून जाण्याची इच्छा असली तरी सायलेन्टवर टाकून इनअॅक्टिव्ह मेंबर म्हणून ग्रुपमध्ये कायम राहतात. नातेवाईकांच्या ग्रुपमध्येही तरुण मंडळी अनेकदा सायलेन्टच असतात.

खूप सारे मेबर्स आणि खूप सारे ग्रुप्स

एखादा विशिष्ट ग्रूप मेंबर नको म्हणून दुसरा सब ग्रूप बनतो. तेच तेच मित्र असणारे अनेक ग्रूप्स असल्याने सगळ्याच ग्रुपच्या टचमध्ये राहणं शक्य नसतं. जास्त मेंबर्स असणारे ग्रूप कायमचे सायलेन्टवर टाकणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे जितके जास्त मेंबर्स तितक्या पटीत इनअॅक्टीव्ह मेंबर्सची संख्या वाढते.

तेच तेच

एखादा मेसेज व्हायरल झाला की तोच अनेक ग्रुपवर येऊन उगाच नोटिफिकेशन्सचा पाऊस पडतो. हे टाळण्यासाठी अनेकजण एका ग्रुपवर जास्त अॅक्टिव्ह आणि इतर ग्रुपवर नुसते Gm आणि Gnच्या माध्यमातून हजेरी लावत असतात. याशिवाय लांबलचक मेसेजेस, भरपूरसारे फोटोज आणि सततच्या व्हिडीओ पोस्टला कंटाळूनही अनेकजण 'सायलेन्ट फॉर वन इयर'चा पर्याय निवडतात.

या ग्रूप्सचं करायचं काय?

कॉलेज कट्ट्यापासून ते लोकलच्या डब्यातील चर्चेमध्ये असणा‍ऱ्या कंटाळवाण्या व्हॉट्सअॅप ग्रूपना थांबवण्यासाठी व्हॉट्सअॅपने काही पर्याय उलब्ध करुन द्यावेत असं तरुणाईला वाटतं.

एखाद्या व्यक्तीला एखाद्या ग्रूपमध्ये अॅड करताना तिच्या इच्छेचा विचार केला जावा. मेंबर अॅड करताना सरसकट अॅड करण्याऐवजी अॅडम‌निकडून त्या व्यक्तीला रिक्वेस्ट जावी की या ग्रूपमध्ये मी तुला अॅड करु इच्छ‌तिो. ती अॅक्सेप्ट केल्यावरच ती व्यक्ती त्या ग्रूपची मेंबर होईल.

एखादा ग्रूप सोडल्यावर सर्व ग्रूप मेंबर्सना ते कळू नये. ग्रूप सोडल्याचे दिसल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा ग्रूपमध्ये अॅड केले जाते. यावरुन अनेकदा वादही होतात.

एकच फॉर्वडेड मेसेज एका विशिष्ट डिव्हाइसमध्ये एकाहून अधिक ग्रूप्सवर येऊ नये.

अॅक्ट‌व्हि ग्रूपसाठी टिप्स

ग्रूप तयार करताना त्याची खरोखरच गरज आहे का तपासून पहा.

ग्रूप मेंबर्स निवडताना त्यातला समान धागा लक्षात घ्या.

एखाद्या विशिष्ट उद्देशाने तयार केलेले ग्रूप नंतर स्वत:हून डिलीट करा.

सतत वायफळ बडबड करण्यापेक्षा सर्वांच्या आवडीच्या विषयावर चर्चा करा.

फॉर्वडेड मेसेज बंदी लागू करा ज्यामुळे ग्रूपवर खरोखरचं बोलणं होईल.

३० पेक्षा जास्त मेंबर्स असणारा प्रत्येक ग्रूप मी वर्षभरासाठी सायलेन्टवर टाकते. इतक्या सगळ्या मेंबर्सचे नंबर सेव्ह असतातच असं नाही. त्यामुळे कोण काय आणि कशाबद्दल बोलतंय याबद्दल काहीच कळत नाही. उगाचच नोटिफिकेशन्स येत असतात. इतरांचं मन राखण्यासाठी ग्रूप सोडू शकत नाही म्हणून सायलेन्ट फॉर वन इयर हा पर्याय आजकाल अनेकजण वापरतात. - पूजा कासार

मी अनेक ग्रूप्स सायलेंटवर टाकलेत. आज आपण व्हॉट्सअॅप, फेसबुक, गुगल चॅट, हाइक या सा‍ऱ्या पर्यायांमुळे ओव्हर कनेक्टेड झालो आहोत. त्यामुळे मला एखाद्याशी बोलायचे असल्यास मी पर्सनल मेसेजवर बोलेन. त्यासाठी ग्रूपची गरज नाही. फक्त एखादा प्लॅन किंवा सहल वगैरे आयो‌जनासाठी या ग्रूपचॅटचा उपयोग होतो, असं मला वाटतं.

No comments:

Post a Comment