Friday, January 23, 2015

रोज सेक्स करणं आरोग्यदायी

easj
सेक्स म्हणजे फक्त शरीर सुखाचा आनंद नव्हे. तर सेक्सकरणं प्रत्येक प्रौढासाठी चांगलं आहे आणि रोज सेक्स केला तर त्याचे फायदेच फायदे आहेत. सेक्स केल्याने तुम्हाला चांगली झोप तर येईलच त्याचबरोबर तुमचा ताण दूर होईल आणि कॅलरीजही बर्न होतील. एवढचं नव्हे तर आणखी अनेक कारणं आहेत सेक्स करण्याची...

> नियमित सेक्स केल्याने तुमचं ह्रदय ठणठणीत राहतं. महिन्यातून किमान एकदा सेक्स करणाऱ्या व्यक्ती पेक्षा आठवड्यातून किमान दोन वेळा सेक्स करणाऱ्याला ह्रदविकाराचा धोका कमी असतो, असं अलिकडेच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे. रोज सेक्स केल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढती राहते. यामुळे तुमचं शरीर कणखर होऊन सर्दी, ताप अशा सर्वसाधारण आजारांशी सहज लढू शकतं.

> घरगुती किंवा कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या ताणातूनही सेक्स केल्याने बहुतांश प्रमाणात मुक्ती मिळते. यामुळे तुमचा मूड बदलून कामाची उर्मी निर्माण होते. ज्यांचा नियमितरित्या सेक्स सुरू असतो ते तणावाला सहज सामोरे जातात आणि आनंदी असतात.

> तुमचं डोकं खूप दुखत असेल आणि त्यामुळे सेक्स करण्यास नकार देत असाल तर असं मुळीच करू नका. डोकेदुखीदरम्यान तुम्ही सेक्स केला तर तुम्हाला बरं वाटेल आणि डोकेदुखीही कमी होईल.

> सेक्सकरताना जोडीदाराचं स्खलन झाल्यावरही सेक्स सुरूच ठेवा जोपर्यंत तुमचं स्खलन होत नाही तोपर्यंत. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेलच शिवाय तुमची त्वचाही तुळतुळीत राहिल. काही आठवड्यांनी एकदा सेक्स करणाऱ्या पुरुषांपेक्षा आठवड्यात किमान दोन वेळा सेक्स करणाऱ्या पुरुषांचं जीवनमान अधिक असतं.

> तुम्ही सेक्स करता तेव्हा तुमच्या रक्ताभिसरणाची प्रक्रिया वाढते आणि ह्रदयाचे ठोकेही वाढतात. यामुळे तुमच्या शरीरातील अवयवांना आणि पेशींना नव्या रक्ताचा भरपूर पुरवठा होतो. तसंच वापरून झालेलं रक्त शरीर काढून टाकतं आणि तुम्हाला थकवा जाणवणारं टॉक्सीन आणि इतर पदार्थही बाहेर फेकतं.

> तुम्हाला शांत-निवांत झोप हवी असेल तर सेक्स करा आणि चिंता पळवून लावा. भरपूर झोप झाल्याने तुम्ही ताजे-तवाने व्हाल आणि तंदुरूस्ती अनुभवाल.

> रोज तुम्ही व्यायाम करण्यासाठी जिमला जात असाल किंवा घरीच एक्सरसाइज करत असाल तर तुमच्या तंदुरूस्तीसाठी सेक्स आणखी फायदेशीर ठरेल. नियमित सेक्स केल्याने तुमच्या कंबरेचा घेर शेपमध्ये राहतो. किमान अर्धातास सेक्समध्ये गुंतून राहिल्यास शरीरातील ८० कॅलरीज कमी होतात.

> सेक्समधील ओस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरोन वाढवल्यास तुम्हाला आणखी फायदा होईल. तुम्ही चांगलं फिल कराल, याबरोबरच तुमचे अवयव आणि हाडं बळकट होऊन कॅलोस्ट्रॉलची नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. हॉर्मोन ओस्ट्रोजेन पुरुषांना रोगांपासून वाचवतात आणि महिलांच्या शरीराचा गंध वाढवतात. 


=============


'सेक्स हा संततीप्राप्तीसाठी केला जाणारा यज्ञ आहे. पण हल्लीच्या जमान्यात लोकांनी त्याचा खेळ केला आहे. त्यांना माहीत नाही की वारंवार सेक्स करणं धोकादायक आहे. त्यामुळं आयुष्य कमी होतं.'

हे वक्तव्य आहे मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार अलोक संजर यांचं. धर्मांतर, भगवद्गीता, रामजादे-हरामजादे अशा काही मुद्द्यांवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला अडचणींचा सामना करावा लागत असतानाच संजर यांनी सेक्सविषयी जाहीर मत मांडून नव्या वादाला आमंत्रण दिलं आहे. भोपाळ येथील एका टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 'यज्ञाच्या भावनेनं केलेल्या सेक्समुळंच मुलांच्या रूपानं पवित्र आत्मा जन्म घेतो,' असं त्यांनी शास्त्राचा हवाला देत सांगितलं.

संजर इथवरच थांबले नाहीत, त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा एक संदेशही सांगितला. 'मुल हवे असेल तरच शरीर संबंध ठेवावा, असं श्रीकृष्णानं सांगितल्याचं ते म्हणाले. 'जास्त मुलं असतील तर १२ वर्षांतून एकदा संबंध ठेवावा, त्यानंतरही इच्छा झालीच तर वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यांतून एकदा आणि खूपच इच्छा झाल्यास महिन्यातून एकदा संबंध ठेवावा. यानंतरही समाधान होत नसल्यास कधीही मरणाची तयारी ठेवावी, असं भगवान श्रीकृष्णानं सांगितल्याचं संजर म्हणाले.

No comments:

Post a Comment