Sunday, January 18, 2015

दहा मुलांना जन्म द्याः शंकराचार्य

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदू जोडप्यांनी किती मुलांना जन्म द्यावा, चार पुरतील की पाच लागतील, हे सांगण्यासाठी विहिंपच्या नेत्यांमध्ये अहमहमिका सुरू असतानाच, हिंदूंनी दहा मुलांना जन्माला घालावं, असा सल्ला बद्रिकाश्रमचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी कळसच गाठला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल तर दहा मुलांना जन्म द्यावा लागेल, असं मत मांडून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय.

shankaracharya 
हिंदुत्व, 'घरवापसी'च्या मुद्द्यावर हिंदुत्ववादी नेते काही केल्या शांत बसायला तयार नाहीत. ते रोज नवनवी 'क्रांतिकारी' विधानं करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढवत आहेत. प्रत्येक हिंदू जोडप्यानं किमान चार मुलांना जन्म द्यावा, असं विधान करून खासदार साक्षी महाराज यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर साध्वी प्राची यांनी त्याचं जोरदार समर्थन केलं होतं. पश्चिम बंगालमधील भाजप नेते श्यामल गोस्वामी यांनी तर एक पाऊल पुढे टाकत, पाच मुलांची शिफारस केली होती. विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनीही अप्रत्यक्षपणे त्याला पाठिंबा दिला होता. लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी एकट्या हिंदूंवर कशासाठी?, असा सवाल करत त्यांनी मुस्लिमांना लक्ष्य केलं होतं.

या पार्श्वभूमीवर, बद्रिकाश्रमचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी कहरच केला आहे. अलाहाबादमधील माघ मेळ्यात बोलताना त्यांनी, दहा मुलं जन्माला घालण्याची गरज व्यक्त केली आहे. हिंदूंच्या ऐक्यामुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत. त्यांना यापुढेही बहुमत मिळावंसं वाटत असेल, तर प्रत्येक हिंदू कुटुंबात दहा मुलं जन्माला यायला हवीत, असा भन्नाट उपदेश त्यांनी केला आहे. त्यावरून मोठा गहजब होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment