शिळफाटा दुर्घटनेनंतर
अनधिकृत बांधकामाच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईच्या मोहिमेत मुंब्रा
आणि दिव्याला पालिकेने आपले लक्ष केले असले, तरी गेल्या वर्षभरात मुंब्रा
आणि दिव्याच्या तुलनेत कळवा भागात जास्त प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली
असल्याचे पालिकेच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या अतिक्रमण
विभागाने मुंब्रा आणि दिव्यामध्ये ४४८ मोठ्या आणि छोट्या अनधिकृत
बांधकामांवर हातोडा चालवला. तर कळवा प्रभाग समितीमध्ये ६१२ बांधकामांवर
कारवाई करण्यात आली आहे.
शिळफाटा येथील लकी कंपाऊडच्या घटनेनंतर शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत दुर्लक्ष करणाऱ्या ठाणे महापालिकेने त्यानंतर मात्र विशेष पथके स्थापन करून अशा अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू केली. मुंब्रा आणि दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असल्याने या दोन प्रभाग समितीमध्ये विशेष कारवाई करण्यात आली. पालिकेचे सर्व लक्ष मुंब्रा आणि दिवा परिसराकडे असल्याची संधी साधत कळव्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये छोटी आणि मोठी बांधकामे मुंब्रा आणि दिव्यापेक्षा जास्त झाली असल्याचे कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मुंब्रा प्रभाग समितीमध्ये ४४८ बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. तर कळवा भागात ६१२ बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०१३ सालीदेखील कळव्यात ९९४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून मुंब्र्यात ३९९ आणि दिव्यामध्ये ४५७ बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सर्वात कमी कारवाई उथळसर प्रभाग समितीमध्ये करण्यात आली आहे. केवळ दोन बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून त्यापाठोपाठ वागळे प्रभाग समिती अंतर्गत ८, नौपाडा प्रभाग समिती १३, कोपरी २९, माजिवडा प्रभाग समिती ४८, तर वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये १०७ बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

No comments:
Post a Comment