Tuesday, January 13, 2015

गोदेत पायही बुड‌विणार नाही !



'नाशिकच्या गोदेमध्ये म‌सिळणारे नाले पहिल्यांदा तातडीने बंद करावेत. गोदावरी, नासर्डी आण‌ि कपाली या नद्यांना अल्पावध‌ीत प्रदूषणमुक्त करावे. या स्थितीत गोदास्नानाची कल्पना तर दूरच पण हे पाणी पाय बुडविण्यासही योग्य नाही', अशा परखड शब्दात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे मार्गदर्शक श्री श्रीरविशंकर  यांनी भूमिका मांडली. तपोवनात आयोजित  'वेणुनाद' या कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कुंभमेळ्याच्या धर्तीवर श्री श्री रव‌शिंकर यांनी नाश‌किमधील नदी प्रदुषणाच्या मुद्द्यावर प्राधान्याने बोट ठेवत स्थान‌कि प्रशासन, लोकप्रत‌‌नि‌धिी आण‌ि जनतेसही आवाहन केले. ते म्हणाले, 'कुंभमेळ्याच्या दृष्टीने आता नाश‌किच्या हाती असणारा वेळ अत्यल्प आहे. आता प्रशासन आण‌ि लोकप्रत‌नि‌धिींनीही युध्दपातळीवर गोदाप्रदूषण न‌र्मिूलनाचे काम हाती घ्यायला हवे. तरच हा सोहळा जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरेल. याच्याशी संबंध‌ति सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी स्वयंप्रेरणेने ओळखायला हवी', अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देशात आण‌ि राज्यातील सरकारकडूनही नदी स्वच्छतेच्या कार्यात व‌शिेष लक्ष घातले जाण्याची अपेक्षा आहे. मात्र या दोन्हीही सरकारला त्यासाठी थोडा वेळ देणेही गरजेचेच असल्याचेही त्यांनी यावेळी सांग‌तिले.

'जगाच्या पाठीवर दहशतवाद उखडून टाकण्यासाठी केवळ भारत आण‌ि इंडोनेश‌यिा या देशांमधील मुस्ल‌मिधर्मीय व‌शिेषत्वाने पुढाकार घेऊ शकतात', असा व‌श्विासही त्यांनी व्यक्त केला. या बरोबरीला

शालेय अभ्यासक्रमातही दहशतवाद व‌रिोधी मुद्द्यांचा समावेश करायला हवा. यातूनच नव्या प‌ढिीच्या मनाची दहशतवादाव‌रिोधात मशागत होईल, असेही ते म्हणाले.

भारत हा जगाच्या पाठीवरील एकमेव देश शांतीचा संदेश देणारा ठरेल. भारत हा शांतीचा स्त्रोत असून जगाला अध्यात्म‌कि मार्गदर्शन करण्याची क्षमता केवळ भारतात आहे, असाही व‌श्विास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपला देश इच्छशक्तीच्या जोरावर मंगळापर्यंत पोहचू शकतो तर याच देशातील इच्छाशक्ती नदी स्वच्छतेसारख्या प्रकल्पांना पुरेसी ठरणार नाही का ? आर्ट ऑफ ल‌व्हिींग परिवाराच्या पुढाकाराने मराठवाडा आण‌ि व‌दिर्भात पाच नद्यांचे पुनरूज्जीवन करण्यात आले आहे. आता कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाश‌किमधील गोदावरीचे म‌शिन आमच्या स्वयंसेवकांच्या दृष्टीक्षेपात आहे, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment