आंध्र प्रदेशात 20 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत 76 व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी छत्तीसगड महिला सबज्युनिअर संघही सहभागी झाला होता. या संघात 16 महिला खेळाडू होत्या.
हा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या हॉटेलमध्ये संघातील एक महिला खेळाडू आणि प्रशिक्षकाची ‘क्रीडा’ सीसीटीव्हीत कैद झाली. ही महिला खेळाडू आणि कोच मस्तीच्या मूडमध्ये होते. त्यामुळे हॉटेलमधील सीसीटीव्हीकडे त्यांचं लक्ष नव्हतं.
रात्री 11 ते दोन वाजेपर्यंत कोच आणि महिला खेळाडूची मस्ती रंगली होती. या दरम्यान दोघे एकमेकांच्या रुममध्ये जाताना सीसीटीव्हीत दिसले.
प्रकरण कसं समोर आलं?
हॉटेलमधील कोच आणि महिला खेळाडूचे गुलछर्रे रायपूरच्या एका डॉक्टरने सर्वांसमोर आणले. डॉक्टर स्वत:च्या मुलीला घेऊन या स्पर्धेसाठी आंध्र प्रदेशांत गेले होते.
डॉक्टरांच्या मुलीलाही या कोचने अनेकवेळा हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितलं होतं, मात्र तीने कधीही त्याला जुमानलं नव्हतं, असं डॉक्टरने सांगितलं.
“या कोचने सातत्याने याबाबतची विचारणा केल्यामुळे आपल्याला शंका आली. त्यामुळे मी अन्य खेळाडूंशी याबाबतची चौकशी केली. त्यानंतर हॉटेलमधील मॅनेजमेंटला विश्वासात घेऊन सीसीटीव्ही फुटेज मिळवलं” असं डॉक्टरने म्हटलं आहे.
दरम्यान या प्रकरणी संबंधित प्रशिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच छत्तीसगड असोसिएशनच्या सचिवांनीही या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. त्यांनी राजमुंदरीमध्ये सब ज्युनिअर चॅम्पियनशिपसाठी कोचला तिथे पाठवलं होतं.
No comments:
Post a Comment