इंटरनेटरूपी माहितीच्या महाजालात चांगली-वाईट, मौल्यवान-फुटकळ, खरी-खोटी अशी सगळय़ा प्रकारची माहिती उपलब्ध असते. माहितीच्या अशा सागरातून आपल्याला हवी ती किंवा उपयुक्त असलेली माहिती शोधून काढणे, हे कठीण काम आहे. 'सर्च इंजिन'च्या माध्यमातून अशी माहिती मिळवता येते. पण बरीचशी (गुगलसकट) सर्च इंजिन्स वापरकर्त्यांला प्रामाणिकपणे माहिती देण्याऐवजी जाहिरातदारांच्या सोयीप्रमाणे माहितीची उतरंड रचताना दिसतात. साहजिकच 'सर्च रिझल्ट'च्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीतही पुन्हा शोधकाम करावे लागते. शिवाय हा सगळा उपक्रम वेळखाऊ ठरतो. याच पाश्र्वभूमीवर इंटरनेटवरील उपयुक्त आणि चांगल्या संकेतस्थळांची माहिती देणारी ही लेखमालिका या आठवडय़ापासून..
सध्या बाजारात परदेशी भाषांना मोठी मागणी आहे. या भाषा शिकवणाऱ्या अनेक नामांकित संस्था कार्यरत आहेत. नियमित वेळ उपलब्ध नसणाऱ्या लोकांसाठी इंटरनेटवरही अनेक ऑनलाइन कोस्रेस उपलब्ध आहेत. आज आपण www.duolingo.com या परदेशी भाषा शिकवणाऱ्या विनामूल्य साइटची माहिती करून घेणार आहोत.
Duolingo (डय़ुओिलगो) ही साइट सर्वसामान्यांसाठी इंटरनेटवर १९ जून २०१२ रोजी उपलब्ध झाली. दोनच वर्षांत जगभरातील अडीच कोटी लोकांनी या साइटचा लाभ घेतला. त्यापकी निम्मे लोक ही साइट सतत वापरत असतात. अॅपल कंपनीने त्यांच्या आयफोनसाठी या साइटचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक अॅप्लिकेशन ( iPhone App of the Year) असा गौरव केला आहे. सदर अॅप्लिकेशन डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टफोन (अँड्रॉईड तसेच आयफोन)वर विनामूल्य उपलब्ध आहे.
या साइटद्वारे तुम्ही जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज, डॅनिश, इटालियन, आयरिश, डच इत्यादी भाषा इंग्रजी वा इतर युरोपियन भाषांतून शिकू शकता. या साइटवर आपले नाव रजिस्टर करणे अनिवार्य नसले तरी एखादी भाषा नियमितपणे शिकण्यासाठी तसे करणे श्रेयस्कर ठरते. तुम्हाला जी नवी भाषा शिकायची आहे ती सांगून ज्या भाषेच्या माध्यमातून तुम्ही ती शिकणार आहात ती निवडता येते.
उदाहरणार्थ, तुम्ही इंग्रजीतून जर्मन शिकत असाल तर प्राथमिक स्तरावर साध्या व सोप्या इंग्रजी शब्दांना जर्मन प्रतिशब्द दिले जातात. त्यांचे उच्चार ऐकवले जातात. ते वापरून छोटी छोटी वाक्येही बनवायला सांगितली जातात. हे करताना तुम्हाला उपलब्ध पर्याय म्हणून चित्रेही दिली जातात. तुमचे उत्तर चुकले तर त्यातली चूक दाखवून व सुधारून दिली जाते. वाक्य किंवा शब्द जर्मनमध्ये ऐकवून तो टाइप करण्यास सांगितले जाते. त्यामुळे उच्चार, शब्दांचे स्पेिलग यांचा सराव होतो. हा पाठ सोडवताना एखाद्या स्तरावर तुम्ही ३ किंवा ४ पेक्षा अधिक चुका केल्या तर तुम्हाला सुरुवातीपासून पुन्हा खेळावे लागते. एकच स्तर तुम्ही पुन:पुन्हा सोडवून आपला पाया पक्का करू शकता.
अशा प्रकारे ७० पेक्षा अधिक पाठांद्वारे तुमचे कौशल्य तपासले जाते. एकेका पाठात रंग, प्राणी-पक्षी, आहार, काळ-वेळ, एकवचन-अनेकवचन यासारख्या एकेका संकल्पनेवर एकेक स्तर निर्माण केलेला आहे. प्रत्येक स्तरात अंदाजे २० प्रश्न असतात. प्रश्न सोडवताना तुम्हाला गुण देऊन प्रोत्साहित केले जाते. एकेका स्तरावर एकेक संकल्पना उदाहरणाद्वारे पक्की करीत तुम्ही शिकण्याची वाटचाल करीत जाता.
तुमच्याबरोबर स्पर्धा करण्यासाठी तुमच्या मित्र/ मत्रिणींना फेसबुकवर आमंत्रण पाठवू शकता. तसेच तुमचे गुण फेसबुक व ट्विटरवर दर्शवू शकता.
डय़ुओिलगोसारख्याच विनामूल्य असलेल्या आणखी दोन साइट्सची नावे सोबत दिली आहेत. त्यांचाही तुम्ही लाभ घेऊ शकता.
http://www.digitaldialects.com/
http://www.learnalanguage.com/
No comments:
Post a Comment