Tuesday, September 30, 2014

गणपती बाप्पांच्या आरतीनंतर after Ganpati aarti

आरतीनंतर म्हणायचे मराठी श्लोक 



सदा सर्वदा योग तुझा घडावा । (Sada Sarvada Yog tuza ghadava)
तुझे कारणी देह माझा पडावा ।
उपेक्षु नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणॆ हेचि आता ॥

कैलासराणा शिव चंद्रामौळी ।(Kailasrana shiv chandramauli)
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधु भवदु:खहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

उडाला उडाला कपि तो उडाला(udala udala kapi to udala)
समुद्र उलटोनी लंकेशी गेला
लंकेशी जाऊनी चमत्कार केला
नमस्कार माझा त्या मारूतीला

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे।(jya jya thikani man jay maze)
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे॥
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी।
तेथें तुझे सदगुरू पाय दोन्ही॥

अलंकापुरी पुण्यभुमी पवित्र, (Alankapuri punyabhumi pavitra)
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, 

जया आठविता घडे पुण्यराशी, 
नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी.

मोरया मोरया मी बाळ तान्हे ।(Morya Morya Mee Bal Tahne)
तुझीच सेवा करु काय जाणे ॥
अपराध माझे कोट्यानु कोटी ।
मोरेश्र्वरा बा तू घाल पोटी ॥

स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्
बल्लाळम्  मुरुडम् विनायक मढम् चिंतामणींस्थेवरम्
लेण्याद्रिम् गिरिजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्
ग्रामो रांजणसंस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्


गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्‍वरः । 
गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ 

ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । 
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥

Click here for Ganapati Decoration Ideas 

3 comments: