अगदी छोटे उपाय केले किंवा काळजी घेतली तर गोड बातमीची शक्यता वाढते. मात्र, त्यासाठी आधी टाकून द्यायला हवे ते नैराश्य आणि वैफल्य...
सर्वसाधारण समजानुसार दांपत्य असे समजते की मासिक चक्रातील १४ व्या दिवशी बीजमोचन होते. परंतु प्रत्येक महिलेसाठी हे विधान सत्य नाही कारण प्रत्येकीचे मासिक चक्र वेगळे असते. आणि बीजमोचनाची तारीख बदलती असते. त्यामुळेच गोड बातमीची अपेक्षा करणाऱ्या दांपत्यासाठी स्वतःहून दिवस मोजणे हा चांगला पर्याय ठरू शकत नाही. इतर पद्धतींचा महिला अवलंब करतात. ते म्हणजे, शरीराच्या तापमानाचे निरीक्षण करणे, सर्व्हायकल फ्लुइडवर लक्ष ठेवणे पण तणाव, प्रवास आणि चुकीच्या आहारामुळे बीजमोचनाच्या तारखा बदलू शकतात.
स्त्रीचे मातृत्वाचे स्वप्न कुठल्याही नैराश्य आणि वैफल्याशिवाय पूर्ण करण्यासाठी काही कल्पक पर्यायांचा वापर करता येऊ शकतो त्यातील एक म्हणजे ओव्युलेशन डिटेक्शन स्ट्रिप. या स्ट्रिप गर्भाशयातून स्त्रीबीज बाहेर आणण्यासाठी जबाबदार असलेले ल्युटिनायझिंग हार्मोन(एलएच) शोधण्याचे काम करते. गर्भाशयातून बाहेर आलेले बीज दोन दिवस टिकते. त्या दरम्यान जर दांपत्याचे मीलन झाले तर गर्भधारणेची शक्यता वाढते.
या स्ट्रिपचा वापर करणे अतिशय सोपे आहे. दुपारच्या वेळेस लघवीच्या नमुन्यांद्वारे कोणत्या काळात गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक आहे हे कळू शकते. अशा पद्धतीच्या नियोजन केलेल्या मीलनाच्या माध्यमातून सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आयुष्याचा असणारा वेग, सातत्याने वाढत जाणाऱ्या अपेक्षा पाहता, या गोड बातमीची वाट का पाहावी? बीजमोचन ओळखण्यास मदत करणाऱ्या ओव्युलेशन डिटेक्शन स्ट्रीपच्या मदतीने गर्भधारणेच्या काळासाठी फार वाट पाहण्याची गरज नाही.
No comments:
Post a Comment