Saturday, December 20, 2014

How we can get prepared for Hindu Marathi Marriage or Lagna or Vivah Ceremony?

Wedding cards in marathi













Wedding cards in marathi
SAKHARPUDA

sakharpuda decoration

sakharpuda rituals

sakharpuda ukhane

sakharpuda nimantran

sakharpuda marathi songs

sakharpuda vidhi

sakharpuda ceremony

sakharpuda box
Sakharpuda is engagement ceremony, wherein marriage is confirmed.  Family members, relatives, friends & well wishers get together usually at brides place or at a place mutually agreed by both families & Sakharpuda vidhi is performed by Pandit on an auspicious day suitable to bride & groom.
Bride & the groom exchange rings as a token of the engagement.  In addition, clothes & jewelry are also presented by both families to each others.
It is the beginning of a new relationship between the two families.
हिंदू विवाह हा वेदकाळापासून चालत आलेला आहे. 'अनंता वै वेदाः' म्हणजे वेद अनादी आहेत. जी गोष्ट प्राचीन आहे , ती जगन्मान्य आहे. ब्रह्मदेवाने वेदाची रचना पुरूषसूक्तामध्ये केली आहे. वेदांमध्ये प्रत्येक मानवावर १६ संस्कार केले जावेत असे म्हटले आहे. त्यातील विवाह हा १५ वा संस्कार आहे. विवाह ह्या शब्दाची व्युत्पत्ती वि + वह् अशी आहे. विशिष्ट मार्गाचे जीवन, कुळ, समाज वाहून नेणे असा याचा अर्थ आहे. सहधर्माचरण, सहनशीलता, संयम, सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह. विवाह हा हिंदुंचा 'संस्कार' आहे, 'करार' नाही. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रध्देचेही बरेच वरचे स्थान आहे. सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक विधिंबरोबरच एक 'कार्य' या दृष्टीनेही समारंभप्रिय लोक लग्नाकडे खूप हौशीने पहातात. मराठी लग्नाचे मूळ महत्वाचे धार्मिक विधी व त्यामागची विचारपरंपरा यांची माहिती या विभागात दिलेली आहे.
भारतीय विवाहकायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच कायद्यानुसार विवाह संपन्न झाल्यानंतर विवाहनोंदणीही बंधनकारक आहे. विवाहनोंदणी कलेक्टर कचेरीत केली जाते. हल्ली मुले-मुली यांची मैत्री ब-याच अंशी समाजमान्य झाल्यामुळे ओळखीतून प्रेमविवाह होणे ही गोष्ट काही नवीन राहिली नाही. तरीही वडिलधा-यांनी पाहून पसंत केलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याची पध्दतच मोठया प्रमाणावर प्रचलित आहे. लग्न जुळविण्यासाठी वधू-वर-सूचक मंडळे व तत्संबंधीची मासिके, वृत्तपत्रातील जाहिराती यांनी 'स्थळ' संशोधनाचे काम पुष्कळ सोपे केले आहे. यासंबंधीच्या अनेक वेबसाइट्सही निघाल्या आहेत. आमच्या या साइटच्या 'वेबसूची' या विभागामध्ये या साइट्चे पत्ते मिळतील. लग्नविधींसाठी लागणारी 'मंगल कार्यालये' ही भटजींपासून ते जेवणावळींपर्यंतच्या सर्व सुविधा पुरवितात. पुणे शहर तर मंगल कार्यालयांसाठी फारच प्रसिध्द आहे.
लग्न ठरविताना 'पत्रिका' अथवा 'जन्मकुंडली' पाहून वर व वधू यांची पत्रिका जुळणे यावर लोकांचा कमी अधिक प्रमाणवर विश्वास असतो. पत्रिका जुळली की त्यांचे वैवाहिक जीवन सुखकर व संपन्न होईल असा विश्वास असतो. पत्रिका जुळली की तेथून लग्नाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. पत्रिका जुळल्यास 'मुलगी पहाण्याचा' कार्यक्रम होतो व मुलगा आणि मुलगी यांच्या पसंतीसंबंधीची एकवाक्यता झाल्यावर दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबियांकडून एकत्र येऊन 'साखरपुडा' हा विधी केला जातो.

कुर्यात सदा मंगलम् 


विवाह सोहळा’ हा भारतीयांच्या कौटुंबिक आणि सांस्कृतिक जीवनातला परमोच्च उत्सव व संस्कार आहे. पूर्वी आमचे रहाते घरी किंवा मंदिरात संपन्न होणारा हा सोहोळा आजकाल लॉनवर किंवा हॉलवर साजरा होतो. या होणार्‍या शुभमंगल कार्याचा सुगावा लागतो तो ‘लग्नपत्रिकां’मधून. पत्रिकेवरून विवाह सोहोळा किती भव्य होणार याची कल्पना येते. जेवढी पार्टी मोठी तेवढी पत्रिका मोठी. बडे अधिकारी, व्यापारी, मंत्री, आमदार यांच्याकडच्या पत्रिका नुसते निमंत्रण नसते, त्यात आग्रहाचा सुकामेवा असतो. कधी कधी अगत्याचे उपरणे असते, तर कधी पेटीबंद निमंत्रण असते. पत्रिकांमधला मसुदा म्हणजे वाङ्‌मयीन नमूना असतो, साहित्यकृती असते. कविमित्रांना अवाक् करणारे काव्य त्या पत्रिकेत सामावलेले असते. लग्न सोहोळ्यात आप्तेष्टांना आवाहन असते. आग्रहाने बोलविले असते. खेड्यांमधल्या पत्रिकांमध्ये एक नकाशा असतो. मालखेड हे गाव अमरावतीच्या पूर्वेस निंबाळा ओलांडल्यावर ५ किलोमीटर आहे, अशी तळटीप असते. एका पत्रिकेत मुलाचा परिचय दिला होता. त्यावरून तो काय धंदे करीत होता याचा अंदाज येत होता. त्याचे कुटुंबीय प्रतिष्ठा नसलेली प्रतिष्ठाने चालवीत होती. त्या सर्वांचा तपशील पत्रिकेत होता, त्यात बिछायत केंद्र, सायकल दुरुस्ती सेंटर, चिकनसेंटर व ज्यूस सेंटर ते चालवीत होते. त्या सर्वांची जाहिरात पत्रिकेत होती. एका पत्रिकेत वधू-पित्याच्या सहा काकांची नावे होती. त्या सर्वांच्या समोर रिटा रिटा असे लिहिले होते. हे सारे सहाही काका रिटायर्ड झाल्याचे लग्नमंडपातच कळले. वराचा परिचय मधुकर चिरंजीव भव स्वर्गीय जागेश्‍वरराव यांचे प्रपौत्र सदाशिवराव यांचे पौत्र व नारायणराव यांचे द्वितीय सुपुत्र एवढा लांबलचका होता. एका पत्रिकेत शेवंता बी. ए. पार्ट वन होती, तर एका पत्रिकेत बाजीराव गोल्ड मेडलिस्ट होता. टाकळीकर आडकीने यांचे कुटुंब किती विशाल असावे याची कल्पना पत्रिकेला जोडलेली विशेष पुरवणी वाचल्यावर कळली. त्यांच्याकडील बाल गोपाल मंडळी मंगल पत्रिकेवर उतरली होती. राजेश, प्रजेश, रितेश, नीलेश, लक्की, गोल्डी, पिंकी सारेच आपल्या ‘काकांच्या लग्नाला जलूल जलूल या हं!’ म्हणून विनवितात. जुन्या काळातल्या पत्रिका साध्या सरळ व कुलदेवतेला आवाहन करणार्‍या असायच्या. आमचे येथे श्री भवानी कृपेवरून वरील मंगल कार्य करण्याचे योजिले आहे. इ. इ. त्यात असायचं. त्यातली आद्याक्षरे कोड्यात टाकणारी असायची. त्यातली इं. स्टँ. टा., इ. घ. प. मला खूप दिवसपर्यंत कळली नव्हती. आमच्या काकांनी इंडियन स्टँडर्ड टाईम व इष्ट घटिका पळे असा त्या अक्षरांचा उलगडा केला. जुन्या पत्रिकामध्ये सर्वांनी येण्याचे आमंत्रण असायचं. इष्ट मित्र आप्तेष्ट व लेकी सुनांसह अवश्य येण्याचे करावे असे असायचे. खेड्यामधली लग्ने अघळपघळ असायची. मुलाचा जानोसा व मुलीचा जानोसा याचा उल्लेख असायचा व टिमटाला स्टेशनवर बैलबंडीची व्यवस्था केली असल्याची तळटीपही असायची. खेड्यातल्या पंगती म्हणजे सार्‍या गावालाच आमंत्रण असायचे व सार्‍या गैरसोयीवर मात करीत सारे आप्तेष्ट लग्नांना गर्दी करायचे. देवाब्राह्माणांच्या साक्षीने होणार्‍या लग्न समारंभात एका मुद्रा राक्षसाचाही समावेश असतो तो पत्रिका छापतानाच आपली छाप पाडून जातो. आमच्या शेजारच्या खेड्यात एक लग्न जुळले व अर्जंटली उरकायचे होते. सारी घाई. मोरेश्‍वर नावाचा नवरदेव आपल्या छापखानेवाल्या मित्राला २४ तासात पत्रिका पायजे म्हणून बजावून गेला. (पान १ वरून) त्याला छापखानेवाल्या मित्राला मायना काय लिहू. कोणाचं नाव टाकू विचारले. मोरेश्‍वर घाईत होता. त्याने शेजारी पडलेली पत्रिका उचलली व सांगितले, हे डिझाईन व हाच मायना ठीक आहे. फक्त नवरदेवाचे व नवरीचे नाव बदलायचे बाकी तुला माहीत आहेच सारे. लवकर तयार ठेव पत्रिका. उद्या मामाच्या गावी घेऊन जायच्या आहेत. प्रिंटिंग प्रेसने पत्रिका छापून तयार ठेवल्या. मोरेश्‍वर मोटर सायकलवर पत्रिका घेऊन रवाना झाला. मामांनी उलट सुलट करून पत्रिका वाचली. मोरेश्‍वरचं नाव सोडलं तर बाकी सारे आधीच्याच पत्रिकेतला मजकूर होता. त्यामुळे बापाचं नाव बदललं, कार्यस्थळ बदललं, लग्नाची तारीख बदलली व आपल्या आगमनाच्या प्रतीक्षेत असलेलेही दुसरेच होते. सारे पुन्हा अर्जंटली बदलावे लागले. मुद्राराक्षस जोडाक्षरामधला अक्षरशत्रू आहे. सुस्वागतम्‌चे त्याने सुवासगतम् केले, सरस्वतीची त्याने सर्वसती केली आणि विश्‍वंभराचे विषमभर केले होते. निमंत्रित पाव्हण्यांना कुठलेतरी भावेल असे निमंत्रण त्यांना द्यायचे असते, ‘आम्ही आपल्या आगमनाकडे डोळे लावून चातकासारखी वाट पाहातो आहोत,’ असे लिहितात. काहीजण निमंत्रिताला ‘हे मानसीच्या राजहंसा’ असे उद्देशून पुढील काव्यमय पत्रिका असते. त्यातला मायना असतो ‘दोन अजाण पक्षी आपले आशीर्वाद घेऊन संसार सागरात विहार करायला निघाले आहेत. त्यांच्या भावी आयुष्याची सोनेरी पहाट यशस्वी वाटचाल व संसाराचे पैलतीर त्यांना गाठायचे आहे. तेव्हा आपले आगमन आम्हास परमेश्‍वररूपीच आहे. अवश्य यावे ही एक विनंती.’ एका हिंदी पत्रिकेत तर, ‘पलके बिछाये रख्खी है तुम्हारे इंतजार मे’ असे म्हणून एक शेरही लिहिला होता. इंग्रजी पत्रिकांची हौस सार्‍यांनाच. खरे तर खरी इंग्रजी समजणारे इंग्रज केव्हाच निघून गेले व आपली इंग्रजी येथे सोडून गेले. मला समजत नाही इंग्रजी पत्रिकांचा एवढा सोस कशाला व कुणासाठी. येणारे निमंत्रित मराठी, मग पत्रिका इंग्रजीत कशाला? इंग्रजी पत्रिका वाचून एक तरी इंग्लीश मॅन लग्न अटेंड करायला आला का? इंग्रजी लिहिणारे पत्रिका लिहून देतात. छापणारे छापतात व वाचणारे मुद्याचे तेवढे वाचतात. इंग्रजी पत्रिकांचे नमुने मी गोळा करून ठेवले आहेत. एका पत्रिकेत ढहळी ळी ींे ळपषेीा र्ूेी म्हणून नोटीस बजावली होती. तो कलेक्टर ऑफिसमध्ये बाबू असल्याचे नंतर कळले. एका पत्रिकेवर र्धेी रीश लेीवळरश्रश्रू च्या ऐवजी लरीवळरश्रश्रू लिहिले होते. लरीवळेश्रेीळीीं सोडून इतरांना त्यातले अगत्य कळले नाही, हे वेगळे. एका पत्रिकेत ढे ुळींपशीी ींहश लशीशोपू एवढेच अगत्याचे बोलवणे होते. एका इंग्रजी पत्रिकेत र्धेी रीश लेीवळरश्रश्रू ळर्पींळींशव षेी ींहश ुशश्रवळपस लशीशोाू’ असं आवतण होतं. खरे आहे. विवाह बंधन हे वेल्डिंग एवढेच पक्के असते ना? फक्त उखडले तर मात्र पुनर्वेल्डिंग करावे लागते एवढेच. एका पत्रिकेत नजरचुकीने ऑस्पिशियस ऑकेजनच्या ऐवजी सस्पिशियस ऑकेजन झाले होते, पण लग्न कुठल्याही संशयाच्या वादात न सापडता पार पडले. एका पत्रिकेत र्धेी रीश हशरीींळश्रू ळर्पींळींशव ींे लहरळप ींहश लीळवश रपव लीळवसीेेा ळप ींहश ुशवश्रेलज्ञ अशी विनवणी होती. एकाने ुश रीश शरसशी ींे ाशशीं र्ूेी रीं ींहश लीळवशी हेाश लिहिले होते. अशा या लग्नपत्रिका. छान कागद वापरल्या जातो. साहित्यिक निमंत्रण असते, पण या उत्साहाच्या भरात कधी तारखेचे, तर कधी कार्यस्थळ छापण्याचे भान रहात नाही. मग प्रत्येक पत्रिकेवर शाईने ते लिहिल्या जाते व आणखी स्पेशल निमंत्रण म्हणून शाईने ‘पूर्ण कुटुंब परिवारासह’ अशी फेवर असते. असा हा विवाह सोहळा चांगला झाला तर कुणाच्या स्मरणात राहात नाही. काही गडबड, गोंधळ झाला; रुसवे फुगवे झाले किंवा प्रकरण हातघाईवर आले तर मात्र अनेक वर्षांपर्यंत या लग्नाची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितल्या जाते. आजचे विवाह सोहळे बदलत आहेत. बफे आलेत. खायला चाळीस आयटम्स ठेवले जातात. मंडळी बफेवर तुटून पडतात. हॉलमधल्या कल्लोळात भर टाकायला मंगल वाद्ये वाजत असतात. डीजे की काय म्हणतात तो दाण दाण वाजत असतो, त्याचे दणके डायरेक्टली हृदयाला भिडणारे असतात. नाचणारे मस्तीत नाचतात. बाया फुगड्या घालतात. अलीकडे फेटे बांधण्याची पद्धत आली आहे. महत्त्वाच्या व्यक्तींना फेटाळण्यासाठी एक एक्सपर्ट फेटेवाला आला असतो. सारेच जण धुंदीत लग्न एन्जॉय करीत असतात. नाचगाणी बँड, लेडिज संगीत, मेंदी, शीतपेये, आईस्क्रीम इत्यादी गोष्टींची हॉलमध्ये रेलचेल असते. मुलीचे वडील मात्र आपण मोजलेल्या पैशाचे वितरण कुठे कुठे व कसे कसे होत आहे ते पहात असतात व चेहर्‍यावर उसने हसू आणत येणार्‍यांचे स्वागत करीत असतात.

मराठी लग्नांचा ग्रॅण्ड फंडा

पूर्वी एक दिवसात आटोपणाऱ्या लग्नाला आता ३- ४ दिवसांच्या सोहळ्याचं स्वरूप आलंय. कोणताही मोठा समारंभ न करता अत्यंत साधेपणानं किंवा प्रसंगी कोर्ट मॅरेज करून लग्न उरकावं असा आग्रह धरणारा , प्रसंगी वडीलधाऱ्यांशी वाद घालणारा तरुण वर्ग आता लग्नसोहळ्यांत हौसेनं रंगू लागलाय.
................

मिनू लग्नाची पत्रिका घेऊन आली. लांबलचक आणि जाडजूड पत्रिका होती. शोभनाताईंनी पत्रिका उघडली तेव्हा आत तीन कार्डं होती. मिनूचं लग्न म्हणजे चार दिवसांचा मोठा कार्यक्रम होता. ' काय गं मिनू हे ?' त्या म्हणाल्या. ' अगं मावशी प्रितमकडे संगीत , मेंदीशिवाय लग्न होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडचे दोन रिवाज आणि आपल्याप्रमाणे हळद आणि लग्न असा मस्त चार दिवसांचा प्रोग्राम आखला आहे. ज्यांना केवळ लग्नाचं आमंत्रण आहे , त्यांना ही तीन कार्डं न देता नुसती पत्रिका देणार ,' मिनू म्हणाली. हे ऐकून शोभनाताईंना आपलं ४० वर्षांपूर्वी साखरपुड्यासह एका दिवसात साधेपणानं झालेलं लग्न आठवलं ...
पूर्वी एक दिवसात आटोपणाऱ्या लग्नाला आता ३- ४ दिवसांच्या सोहळ्याचं स्वरूप आलंय. एके काळी कोणताही मोठा समारंभ न करता अत्यंत साधेपणानं किंवा प्रसंगी कोर्ट मॅरेज करून लग्न उरकावं असा आग्रह धरणारा तरुण वर्ग आता लग्नसोहळ्यात रंगू लागलाय. ३-४ चार दिवसांचं वेडिंग प्लॅन करून एन्जॉय करण्याचा ट्रेण्ड मात्र वाढतोय. मेंदी , संगीत , पारंपरिक विधी , हळद आणि प्रत्यक्ष लग्न यात ३ ते ४ दिवस जातात. हल्ली यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कॉण्ट्रॅक्ट दिलं जातं.

आंतरजातीय , आंतरधर्मीय विवाह ही काही विशेष गोष्ट राहिलेली नाही. यात दोन्हीकडच्या पद्धतींनुसार लग्न करण्याकडे कल दिसतो. त्यामुळे गुजराती , मारवाडी , पंजाबी , बंगाली , दक्षिण आणि उत्तर भारतीय अशा सर्व ठिकाणच्या पद्धती लग्न सोहळ्यांमध्ये आढळतात. चार दिवस लग्न ही कल्पनादेखील त्यातूनच पुढे आली आहे. ' माझ्या दादाने फ्रेंच मुलीशी लग्न केलंय. गेल्याच वर्षी त्यांचं लग्न झालं. माझ्या वहिनीचे आई-वडील , नातेवाईक आणि मित्रपरिवार असे सगळेजण लग्नासाठी खास भारतात आले होते. त्यांना भारतीय परंपरा आणि विवाह सोहळ्याबद्दल खूप आकर्षण होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ३ दिवसांचा कार्यक्रमच आखला होता. पहिल्या दिवशी मेंदी आणि संगीत , दुसऱ्या दिवशी पारंपारिक विधी आणि हळद आणि तिसऱ्या दिवशी लग्न. लग्नाला वहिनीकडच्या पुरुषांनी सदरे घातले होते आणि फेटे बांधले होते. महिलांनी साड्या नेसल्या होत्या. ते लग्न त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरले असेल , मला खात्री आहे ,' डोंबिवलीतील राधिका ठाणकर सांगते.

पूर्वी लग्न ही प्रामुख्याने कौटुंबिक बाब होती. आता त्यातील मित्रपरिवाराचा सहभाग वाढला आहे. मग मित्रमंडळींना मजा करता यावी म्हणून मेंदी आणि संगीत असे कार्यक्रम ठेवले जातात. हळदीलादेखील आता मित्रमंडळी आवर्जून हजर असतात. मग नाच-गाणी , डीजे असे प्रकार आयोजित केले जातात. ' लग्न एकदाच होतं. त्यामुळे ते एन्जॉय केलं पाहिजे असं मला वाटतं. लग्नापेक्षा हळदीला जाण्याची मजा अधिक असते. मित्रमैत्रिणी येतात , गप्पा होतात. लग्न असलेल्या मित्र किंवा मैत्रिणीची थट्टा मस्करी होते आणि मग नॉनव्हेज जेवण. ही मजा लग्नाला नाही करता येत. त्यामुळे हळद आणि मेंदीचा दिवस मला महत्त्वाचा वाटतो ,' सुनिता देसाई सांगते.

बदललेले महाराष्ट्रीय विवाह

पूर्वी महाराष्ट्रातील लोक पारंपारिक पद्धतीने विवाह करण्याला प्राधान्य देत. हल्ली मात्र बऱ्याच लग्नघरांत मेंदी आणि संगीत ठेवण्याचा आग्रह होतो. आधी कॉस्मोपॉलिटन लोकच संगीत आणि मेंदी ठेवायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. बॅचलर्स आणि स्पिन्स्टर्स पार्टीज होतात. विशेष म्हणजे हे प्रकार केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत. यवतमाळसारख्या भागांतही लग्नांना संगीत आणि मेंदी असते , असं इव्हेंट मॅनेजर रसिका जोशी सांगतात. मराठी लोक संगीत कार्यक्रमासाठी कोरिओग्राफरदेखील हायर करत आहेत. ' संगीत ' च्या दिवशी परफॉर्म करण्यासाठी त्यांच्याकडून डान्स बसवले जातात. यासाठी खूप पैसा लागतो , असं काही नाही. तुमच्या बजेटनुसार हे कार्यक्रम आयोजित करता येतात. काही जण आपल्या फार्म हाऊसवर संगीत , मेंदी ठेवतात. त्यामुळे खर्च वाचतो.

याशिवाय नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आतापर्यंत जेवणात पनीरची भाजी वगैरे पदार्थ हमखास बघायला मिळायचे ; हल्ली मात्र जेवणात महाराष्ट्रीय पक्वान्नं ठेवण्यासाठी आग्रह होतो , असं रसिका जोशी सांगतात. नॉनव्हेज असेल तर मटण भाकरी ; व्हेज असेल तर भरली वांगी , सुरळीच्या वड्या , मोदक असे पदार्थ आवर्जून ठेवले जातात. मंगलाष्टकं किंवा वधूला हॉलमध्ये आणण्याची पद्धत यांमध्येही वैविध्य आलंय. वधूला डोलीमधून आणले जाते. लग्नांसाठी थीम ठेवली जाते. व्हाईट आणि रेड , व्हाइट आणि पिंक किंवा फ्लॉरल अशा थीम ठेवल्या जातात. मुलामुलीचे कपडे त्यानुसार निवडले जातात. नऊवारी साडी , पगडी आणि भिकबाळी यांनाही वधू-वरांच्या पोषाखात स्थान मिळालंय.

डेस्टिनेशन वेडिंगचा नवा प्रकार

हल्ली डेस्टिनेशन वेडिंगचा प्रकारही लोकप्रिय झाल्याचे रसिका जोशी सांगतात. जयपूरमध्ये झालेल्या एका विवाहाचे उदाहरण त्यांनी दिले. संगीत आणि मेंदी रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते , तर सीमांतपूजन आणि लग्न चोकीदाणी येथे करण्यात आले. पुण्यातील नारायणी धाम हे ठिकाण डेस्टिनेशन वेडिंगसाठी फार लोकप्रिय होत असल्याचं सांगतात. दोन्हीकडची मिळून फक्त १०० माणसं लग्नाला या ठिकाणी उपस्थित राहतात. इतरांसाठी मग रिसेप्शन ठेवलं जातं.
काळानुसार बदलत जातात , त्याच परंपरा टिकतात. जग इतकं जवळ आलेलं असताना देशभरातल्या रीतीरिवाजांची घुसळण होऊन थोडं आपलं , थोडं त्यांचं करत एक नवीच विवाह परंपरा मराठी मातीत रुजते आहे. अन् तरुण मुला-मुलींसह मोठ्यांनाही ती आवडते आहे ... 

लग्नाची पत्रिका

प्रा. न. र. फाटकांकडे त्यांचा एक विद्यार्थी आपल्या लग्नाची पत्रिका घेऊन गेला.
फाटकांनी ती पत्रिका वाचली म्हणाले, ’म्हणजे आता तुम्ही जनावर झालात,’
त्या पत्रिकेत, अमुक अमुक यांची कन्या ‘जना’ हिच्याबरोबर विवाह ठरला, आहे असा मजकूर होता.

लग्नाला यायचं हं!


सकाळी सकाळी शेजारी राहणाऱ्या पाटीलकाकांचा फोन आला.
“अरे मुलीचे लग्न ठरलेय रे. तू पत्रिका छापतोस ना?”
“काका कामाचा ताण आहे हो खूप, वेळ लागेल.”
“ते लोकांना सांग रे. मला नको. उद्या मजकूर ऑफिसात आणून देतो. दोन दिवसात छापून दे लगेच.”
एकतर प्रिंटिंगचे कुठलेच काम टाळू वाटत नाही त्यात हे काम जवळ जवळ घरचे असल्यासारखेच, मी हो म्हणून टाकतो.
दुसरे दिवशी काका दोन फुलस्केप कागदावर लिहिलेला मजकूर घेऊन हजर होतात.
आतापर्यंत तीनचारशे पत्रिका टायपून सराईत झालेला डीटीपी आपरेटर भराभरा कीबोर्ड बडवत काकांनाच सल्ले देऊ लागतो.
“जावयांचे नांव कार्यवाहात टाका हो. ते स्वागतोत्सुक नसतात.”
“ गल्लीतल्या मंडळाचे नांव व्यवस्थापक म्हणून करतो“
“आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं, जुनं झालं आता. बालनिमंत्रक नाहीतर किलबिल टाका.”
“प्रतापरावांना दोन बायका आहेत काय़? महिरपी कंस करतो मग.”
“गं. भा. करु का श्रीमती? ते सेंटरला घ्यावे लागेल.”
“सचिन नितीनचे लग्न झाले नाही ना अजून मग श्री. नको, चि. करतो. आगामी आकर्षण आहेत ना ते.”
या लग्नपत्रिकातील मजकुरांचे इतके संकेत आणि प्रकार आहेत की त्यावरसुध्दा एखादी पीएचडी व्हावी.
एकदाचे मजकुराचे प्रुफ पाहिल्यावर काकांचे माझ्याबरोबर हिशोब चालू होतात. “आज पत्रिका छाप, उद्या पाकीट मग परवा सकाळी येतो न्यायला.”
“अहो काका असे नसते हो. मी वेगळ्या प्रकारच्या पत्रिका छापतो. आणि अजून दोन महिने आहेत की लग्नाला.”
“तुमचे छापायचे काम म्हणजे महिनाभर थांब असेच असते रे. पण वेगळ्या म्हणजे अजून कसल्या करतोस बाबा?”
“अहो मी फोर कलरचे काम करतो फक्त. तुम्ही म्हणता त्या रेडीमेड पत्रिका असतात.”
परत काकांचे प्रश्नचिन्ह. “जरा सांग तरी डिटेलमध्ये रे. काय काय करता तुम्ही लोक?”
आता बघा तुम्हीच.
आता हा मजकूर टाइप झाल्यावर एकदा वाचून बघणार, मग डिझाइनसाठी घेतली जाते
a
म्हणजे पीसीवरील कोरलड्रॉ फोटोशॉप हि अ‍ॅप्लिकेशन वापरून, काही स्कॅनड इमेजेस, काही फोटोग्राफ वा क्लीपआर्टस वापरून एक जशी पत्रिका दिसते त्याप्रमाणे तयार होते.
b
या कामात डिझाइनिंगचे आणि व्हिज्युअलायझिंगचे कौशल्य लागते तसेच कागदांच्या साइज, प्रिंटिंगचे ज्ञान, मशीनच्या साइज आणि इतर तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे देखील गरजेचे असते. हे सर्व सीएमवायके फॉर्मॅटमध्ये होते. आऊटपुट फाइल्स tiff, pdf किंवा cdr फॉर्मॅटमध्ये सेव्ह केल्या जातात. यांचे रेझोल्युशन उच्च असते (३०० ते ६०० डीपीआय, सेम साइज)
हे काम पूर्ण झात्यानंतर त्याचा एक कलर प्रिंट काढून तो प्रुफरिडिंगसाठी ग्राहकाला दिला जातो. शक्यतो एका ग्राहकासाठी दोन अथवा तीन वेगवेगळी डिझाइन्स केली जातात. त्यातील मजकूरांच्या चुका, डिझाइनमधील इतर काही चुका दुरुस्त केल्या जातात. कधीकधी पूर्ण डिजाइन बदलले जाते. (माझ्यावर अशी वेळ आजपर्यंत तरी आली नाही, शक्यतो सुरुवातीला केलेलेच पसंत पडते असा अनुभव आहे.)
c
(कलरप्रिंटसाठी व शॉर्टरन प्रिंटिंगसाठी हा कलर प्रिंटर)
हा मसुदा एकदा पक्का झाला की ग्राहकाचे काम पैसे देऊन तयार पत्रिका ताब्यात घेणे एवढेच उरते.
आता आमचे खरे काम सुरु होते.
ग्राहकाच्या अपरोक्ष कामाच्या सुरुवातीलाच बराच विचार केलेला असतो, जसे की पेपर साईज, कटींग, लॅमिनेशन, एन्हवलप आदी.
कारण कागद आणि कार्ड ठराविक साईजमध्येच बाजारात उपलब्ध असतात.
d
उदा. कार्ड २२x२८, कागद १८x२३, १५x२०, १७x२७ ह्या इतर आकारात पण काही खास पेपर्स उपलब्ध असतात. १८x२३ इंच ह्या आकारालाच डेमी म्हणले जाते. सर्वांना माहीत असलेला ए४ हा १८x२३ चा साधारणपणे एक चतुर्थांश असतो. त्यामुळे हा विचार करुनच पत्रिकेची साईज ठरवली जाते. पत्रिकेसाठी किंवा ब्रोशर्ससाठी २५० जीएसएम(ग्रॅम/स्क्वेअर मीटर) आर्टकार्ड म्हणजे दोन्ही बाजूने चमक असणारा जाड कागद वापरला जातो.
कमीत कमी कागदात, कमीत कमी प्रिंटींग मध्ये आणि कमीत कमी कागदाचा तुकडा वाया घालवून अपेक्षित काम करणे हेच यशस्वी प्रिंटरचे ध्येय असते.
पीसीवर केलेले डिझाइन सीटीपी (कम्प्युटर टू प्लेट) यंत्रावर घेतले जाते. मूळ डिझाइनचे चार रंगात (स्यान, मॅजेण्टा, यलो, ब्लॅक) विभाजन केले जाते. पाचसहा वर्षापूर्वी हेच काम इमेजसेटरने फिल्म काढून त्या फोटोसेन्सिटिव्ह केमिकलने पत्र्याच्या प्लेट बनवून केले जाई. आता सीटीपी ने आपल्या लेसर प्रिंटरसारख्या डायरेक्ट चार प्लेटस मिळतात. इथपर्यंतच्या प्रक्रीयेला प्रीप्रेस म्हणले जाते.
f
(सीटीपी : कम्प्युटर टू प्लेट)
आता ह्या चार प्लेटस ऑफसेट मशीनच्या सिलिंडर्सवर चढविल्या जातात. हि भलीमोठी मशीन्स एकाच वेळी चार रंगी छपाई करणारी असतात. शक्यतो जर्मन, झेक अथवा जापनीज मेकची हि मशीन्स ताशी १०००ते ३००० प्रति छापू शकतात. या क्षेत्रात हायडेलबर्ग, अ‍ॅडॅस्ट, रोलंड, कोमोरी लिथ्रॉन, मित्सुबिशी हि विदेशी मशीन्स जास्त आहेत. ऑटोप्रिंट सारख्या भारतीय कंपन्या कमी आहेत. एकरंगी छपाईत मल्टिलिथ आणि फरिदाबादच्या मशीन्स बर्‍याच ठिकाणी आहेत. मोठ्या मशीनवर एका वेळी तीन चार ऑपरेटर्स आणि हेल्पर्स काम करतात.
f
(कोमोरी ४ रंगी ऑफसेट मशीन)
आता वेळ येते पोस्टप्रेसची. एकदा प्रिंटिंग झाले की त्यावर लॅमिनेशन (प्लास्टिकच्या पातळ फिल्म चा थर) केले जाते. हे थर्मल अथवा गमिंग अशा दोन प्रकारे वेगळ्या मशीनवर केले जाते. यात सुध्दा मॅट अथवा ग्लॉस फिनीश असे पर्याय असतात.
j
(लॅमिनेशन मशीन)
काही वेळा स्पॉट लमिनेशन (डिझाइनचा विवक्षित भाग लॅमिनेशन) केले जाते. हि प्रक्रिया रासायनिक थर चढवून वेगळ्या मशीनवर अथवा स्क्रीन प्रिंटिंग पध्दतीने केली जाते. कधी कधी सोनेरी, चंदेरी, मोतिया रंगाची छपाई जी ऑफसेटवर होत नाही तीपण स्क्रीन प्रिंटिंग ने अथवा मेटॅलिक फिल्म वापरुन केली जाते. एम्बॉसिंग असेल तर त्याचा पण वेगळा डाय व मशीन असते.
नंतर वेळ येते कटिंगची. सरळ रेषेत कटिंग असेल तर ते गिलोटीनने केले जाते. या मशीनला धारदार ब्लेड असते. हे मशीन मोटर पावरने, हायड्रॉलिक अथवा न्यूमॅटिक पावरने कागद कापते. आता कम्प्युटराइज्ड कंट्रोल्ड मशीनमुळे या कामातील धोके बरेच कमी झाले आहेत अन्यथा प्रत्येक प्रेसमध्ये एखादी दुर्दैवी कहाणी ऐकावयास मिळते. अजूनही येथे कटरशिवाय दुसर्‍या माणसाने येऊ नये असा संकेत आहे.
k
(गिलोटीन: पेपर कटिंग मशीन)
डिझाइननुसार जर गोल, कर्व असेल तर डाय तयार करावा लागतो. हे डाय पंच एका पंचिंग मशीनवर चढवून असे कटिंग होते. कार्डला घडी घालण्याचे काम (क्रिजिंग) पण याच वेळी होते. काही ठिकाणी जुन्या ट्रेडल मशीनमध्ये पण थोडे फेरफार करून पंचिंग मशीन म्हणून वापरले जाते.
l
(हा कर्व्ह कटिंगचा व दोन घड्यांचा डायपंच, जो मशीनवर बसवून काम केले जाते.)
m
पत्रिकेची पाकीटे एका डायमध्ये कापून ती हाताने बनवली जातात. सराईत माणसे ताशी २००० पाकीटे सुध्दा घड्या घालून व चिकटवून तयार करतात. कोर्‍या पाकीटावर छापून अथवा आधी कागदावर छापून त्याची पाकीटे तयार करतात.
n
नंतर हे पत्रिका, पाकीटे गठ्ठे बांधून ग्राहकांसाठी तयार असतात.
o
“आता सांगा काका, कधी येता डिझाइन बघायला आणि त्यानंतर पत्रिका न्यायला?”
“तूच हे सगळं झाल्यावर फोन करून सांग बाबा आणि हे घे अ‍ॅडव्हान्स.”
....................................................................................................................
(ह्यात रंगीबेरंगी दोरे, गोंडे, मणी, छोट्या मूर्ती, हातकागद, कापड वगैरे वापरून केलेल्या पत्रिका समाविष्ट नाहीत. तो एक स्वतंत्र उद्योग आहे. अशा रेडीमेड पत्रिका घेऊन त्यावर एकरंगी अथवा दुरंगी छपाई करणे हा पण आता सर्वमान्य प्रकार आहे. या प्रकारात बराचशी बंधने असतात. उदा. बहुरंगी छपाई वा फोटोग्राफ्स छापता येत नाहीत. तयार अल्बममधील डिझाइन निवडावे लागते, किंमतीत फरक आदि. सर्वसामान्यपणे प्रिटिंग तंत्राचा हा अगदी छोटासा उपयोग आहे. पुण्यामुंबईसारख्या शहरात हा उद्योग बराचसा प्रगत आहे. सोलापूरमध्ये उपलब्ध तंत्राने सर्वांच्या बघण्यातली लग्नपत्रिका प्रत्यक्षात कशी तयार होते हे सांगायचा माझ्या अल्पमतीने हा छोटासा प्रयत्न. बरेचसे शब्द प्रचलित असल्याने वापरले आहेत, तांत्रिक नांव कदाचित वेगळे असू शकते. काही चित्रे जालावरून साभार. पर्यावरणरक्षकांनो मला माफ करा.)


lagna patrika

lagna patrika format in marathi

marathi lagna patrika wordings

lagna patrika mayna

lagna kundali

lagna patrika matching

marathi lagna patrika format download

lagna chart

lagna patrika in english 


अक्षतांना पर्याय नको का? 


दोन दशकापूर्वी ८-८ दिवस चालणारे लग्न सोहळे आज जेमतेम बारा तासांवर येऊन ठेपले आहेत. वेळ नाही किंवा सुटसुटीत लग्न व्हावे, या सबबीखाली लग्नातील बर्‍याच सोहळ्यांची काटछाट करण्यात आली आहे. याला यजमान आणि उपस्थित दोघांचीही मूक संमती असते. सकाळी १० चे लग्न असेल तर ९ किंवा ९.३० वाजता वधूमंडपी हजर व्हायचं. मंगलाष्टके आणि अक्षदा फेकणे आटोपले की लग्न लागले असे समजून उभ्यानेच चप्पल/जोड्यानेच (कदाचित ते हरवतील म्हणून) जास्तीत जास्त अन्न घेऊन एकदाच रांगेत राहून ताट भरून आणलं जातं, भराभर संपवून ओळखीच्यांशी मोजकच बोलून मंडपातून काढता पाय घेतला जातो. घरच्या माळ्यावर असलेलं चांगलंसं गीफ्ट देण्याचा मोह होतो. असं काहीसं आजच्या लग्नाचं स्वरूप झालं आहे. पूर्वी तंत्रज्ञान दूर होतं तर माणसं माणसाच्या जवळ होती. आज तंत्रज्ञानानं भलेही जग जवळ आले असेल पण माणूस मात्र प्रत्यक्षात माणसापासून दूर गेलेला आहे. आजची लग्नेसुद्धा ओलावा नसल्यागत पार पडताना दिसतात.
लग्नसोहळ्यामध्ये सुरुवातीलाच मंगलाष्टके झाल्यानंतर वधूवरांवर अक्षदा टाकणे (नव्हे अक्षरश: फेकणे) हा अविभाज्य भाग असतो. वास्तविक अक्षदा प्रत्यक्षात मधे बसलेल्या उपस्थितांच्या डोक्यावरच जास्त पडतात आणि अक्षदा टाकणारे गप्पात इतके दंग झाले असतात की त्यांचं वधूवराकडे लक्षही नसतं. लग्न लागल्यानंतर मात्र खाली सतरंजीवर जवळपास ४ ते ५ किलो तांदूळ सांडलेले असतात. अक्षरश: पायदळी तुडविल्या जातात. त्याकडे कोणाचेही फारसे लक्ष नसते. अन्न हे पूर्णब्रह्म मानणारे आम्हीच अन्नधान्याचा सहज अपमान करतो. आज अन्नधान्याचा हा अपमान हमखास सुरू आहे. कधी कधी वाटतंही अन्न पायदळी तुडविण्याची प्रथा बंद व्हायला पाहिजे, त्याऐवजी वधूवरांचे अभिनंदनच करायचे असेल किंवा आशीर्वाद द्यायचा असेल तर स्टेजवर जाऊन एक फूल द्यावे किंवा हातमिळवणी करावी. अन्नधान्याची अशी नासाडी तर बघावी लागणार नाही. इतिहासकालीन, रामायण, महाभारत कालीन मंगलसोहळ्यामध्ये पुष्पवृष्टी व्हायची. आपणही फुले वापरावीत पण नंतर सर्व पाकळ्या घंटागाडीत न टाकता त्याचे खत करून शेतकर्‍यांना वापरावयास सांगावे.
अन्नधान्याची नासाडी, बुफे मध्ये पदार्थांची वाट्टेल तशी नासाडी, वधूवरांचे डोके आपटून अभिनंदन वधूला वर उचलताना होणारा गोंधळ माळ्यावरच्या कोर्‍या वस्तू परत गीफ्ट देणे या सर्व गोष्टींमुळे मला नाही वाटत लग्नसोहळा दोन्ही पक्षांना आनंददायी वाटत असेल म्हणून.काळानुरूप काही अनावश्यक रूढी प्रथा बदलता येतात. शास्त्र तशी परवानगी सुद्धा देते. फेकलेल्या अक्षदा पायदळी तुडविण्यापेक्षा अनाथालयाला दान दिल्या तर किंवा गरजूंना वाटप केल्यातर अक्षता फेकणे, अन्नाची नासाडी, डोक्याची टक्कर, कुणाशीही मोजकेच बोलणे या सर्व गोष्टींमुळं विवाह सोहळ्यातला आनंद तर द्विगुणीत होत नाही, उलट घरी आल्यावर वाटतं उगीच गेलो, गेलो नसतो तर बरं झालं असतं.

शुभलग्न? सावधान!

$img_titleआयुष्यात एकदा तरी लग्न करावंच म्हणजे दिला जन्म सफल होतो असं म्हणतात. लग्न पहावं करून अन् घर पहावं बांधून. दोन्ही स्वप्नवत अशी कार्ये आहेत. ज्यात नशिबाचा भाग फार मोठा असतो हो! दोन्ही गोष्टी घडल्या तर अगदी सहजासहजी घडतात आणि रखडल्या तर मात्र जीव नकोसा करून सोडतात. लग्न म्हणजे संसार आणि संसारासाठी घर. आधी घर की आधी लग्न? अर्थात लग्न करण्यापूर्वी घर असेल तरच लग्नाचा विचार केला जातो. आपली मुलगी, मुलाला देण्यापूर्वी सर्वप्रथम घर पाहिले जाते. मुलाने मनात घर केलं असलं तरीही त्या मुलीला वास्तवातील घर आधी हवं असतं. प्रत्येक कुटुंबाची स्वत:ची ‘ऐपत’ नावाची एक ‘पत’ असते. आर्थिक परिस्थिती पाहूनच दोन्ही घरांची ‘नाळ’ जुळते. लग्न एकदाच व्हावं आणि तेही धूमधडाक्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याप्रमाणे लग्नाचा ‘बार’ उडवला जातो. परंतु लग्नकार्य म्हटलं की मुलीची बाजू नेहमीच दुय्यम ठरते. बर्‍याचदा नवरदेवाकडील सर्व खर्च वधूनेच करावा, अशी एक अट असते आणि वधुपिता त्यात धुऊन जरी निघणार असला तरीही तो आपल्या लाडक्या लेकीचं संसाराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून का होईना परंतु हे लग्नकार्य, ‘शुभमंगल’ कार्य मानून कार्यसिद्धीस नेतो. अर्थात हे झालं सर्वसामान्य माणसांच्या कुटुंबातील लग्न. परंतु सर्वांचीच लग्न अशी कर्ज काढून होत नसतात. काही काही लग्नाचा थाट पाहून आपण भूलोकी आहोत की स्वर्गलोकात असा प्रश्‍न पडतो. परंतु लग्नकार्य जेव्हा एखाद्या कुटुंबासाठी प्रतिष्ठेच्या पातळीवर नेले जाते, तेव्हा त्या कुटुंबाला आपल्या श्रीमंतीचे दर्शन घडविण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. अशा लग्नाचा डामडौल, रोषणाई, भव्यता, जेवणावळी, निमंत्रितांच्या वेशभूषेतून दिसून येणारी त्यांची ‘श्रीमंती’ या सर्व बाबींचा वधू-वरांच्या नवजीवनाशी काही संबंध असतो का? वधू-वरांना ‘आशीर्वाद’ हवा असतो, या आशीर्वादासाठी जेव्हा लाखो, करोडो रुपयांची उधळण केली जाते, तेव्हा लग्न कौटुंबिक आनंद न राहता तो एका सामाजिक प्रश्‍नाच्या रूपात जागोजागी दिसू लागतो आणि लग्नसमारंभाचा अतिरेक आता कुठेतरी थांबायला हवा, असे वाटू लागते.
लग्नकार्य हा भावनिक आनंद आहे. तो सणासारखाच साजरा व्हायला हवा असं यजमान म्हणतात. काही घरात एकुलत्या एकाचा विवाह होणार असतो म्हणून ते आर्थिक खर्चासाठी जराही मागेपुढे पहात नाहीत. एखाद्या व्यक्तीने अगदी साधेपणाने जर आपल्या घरचे ‘कार्य’ साजरे करायचे म्हटले, तर तो इतरांना कमीपणा वाटतो. खरं तर आपण लग्नासाठी किती खर्च आणि कोणत्या गोष्टींवर करावा यासाठी काहीही नियम नाहीत. मात्र, जे दिसेल ते भव्य आकर्षक असावे, काहींच्या मते तो ‘इव्हेंट’ वाटायला हवा, ज्यामुळे त्या कुटुंबाबद्दल सर्वांच्या मनात भीतियुक्त ‘आदर’ निर्माण व्हावा आणि निमंत्रितांना संबंधितांच्या आर्थिक शक्तीची कल्पना यावी. लग्नाच्या या दिवसात जेव्हा अनेक लग्नसमारंभांना उपस्थित राहून त्या समारंभाचा ‘आस्वाद’ घेत असतानाच, राजकारण्यांच्या घरचे लग्नसमारंभ, उद्योगपतींच्या घरचे लग्नसमारंभ, कलाकारांच्या घरचे लग्नसमारंभही चर्चेत होते तेही पाहिले आणि वाचले, तेव्हा या लग्नकार्यातील ‘थरार’ म्हणजे आर्थिक शक्तीतून केली जाणारी उधळपट्टी आहे आणि यातून कौटुंबिक आपुलकी किती निर्माण होत असेल हे सांगता येत नसले, तरीही लग्नाच्या देखाव्यातून मात्र बेगडी सुखाचा लोभ आणि त्यासाठी ही ‘लग्नस्पर्धा’ आयोजित केली जात असावी, असे दिसून येते. आता ज्यांचे मीठ खाल्ले त्यांच्याबद्दल वाईट काय बोलायचं? परंतु अंतर्मुख होऊन जर प्रत्येकाने याचा विचार केला आणि या आनंदाच्या तळाशी जाऊन सत्कार्याची कल्पना जरी फुलवली, तरी एका विधायक कार्याचे स्वप्न या लग्नसमारंभातील खर्चात काटकसर करून पूर्ण करता येईल आणि तोच खरा वधू-वरांना आशीर्वाद असेल.
सत्पात्री दान, मग ते धन वा अन्नस्वरूपात असो. ते करण्यासाठी, देण्यासाठी हृदयाची विशालता असावी लागते. स्वार्थाचा विचार करून; दानाच्या बदल्यात मला काय मिळणार? तरच मी दान करणार असे म्हणणारे दानी जसे दानाची किंमत कमी करतात तसे शुभसमारंभात या निमित्ताने ‘अन्नछत्र’ उघडणारे धनवान, सत्कर्मासाठी कधीही दानाचा विचार करीत नाहीत. कारण दान आणि प्रतिदान यातील नफा-तोटा त्यांना नेमका माहीत असतो. ही मानसिकता आपण आज बदलणे आवश्यक आहे. समारंभ लग्नाचे, वाढदिवसाचे, मुंजीचे किंवा इतर कोणत्याही शुभकार्याचे असोत, प्रत्येक समारंभात अन्नासाठी होणारा खर्च आणि अन्नाची होणारी नासधूस पाहता भूकेली माणसं, दारिद्र्याशी लढणारी या देशातील जनता यांचा थोडासा तरी विचार या निमित्ताने करता येऊ शकतो.
लग्नसमारंभासाठी होणारा सर्वसामान्य माणसांचा खर्च आता लाखाच्या घरात गेला आहे. आमच्या एका मित्राच्या मुलीचा लग्नाचा खर्च, त्याने हात आवरता घेत असतानाही दोन कोटी रुपयांच्या घरात गेला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ‘तरी आम्ही लग्न बरेच साधेपणाने केले’ अशा थाटाचे होते. जेवणाचा खर्च थाळीला हजार रुपये इतका होता. एक माणूस हजार रुपयाचे जेवेल का? लग्नसमारंभातील जेवणाचा खर्च म्हणजे ‘देवाचा नैवेद्य’ असावा. देव जेवत नाही आणि पावतही नाही. ओठाचे पोटात जाईपर्यंत भूक मेलेली असते. परंतु भोजनावळीचा हा भंडारा भरविल्याशिवाय कुठलाही समारंभ पूर्ण होत नाही. लक्षभोजन, पंचपक्वान्नांच्या पंक्ती उठल्याशिवाय समारंभाची नशा उतरत नाही. आपण हाच समारंभ एका मर्यादेत राहून, साधेपणाने आणि आर्थिक खर्चाचाच सुवर्णमध्य साधून जर साजरा केला व त्यातील खर्चातील एक घसघशीत रक्कम लायक अशा सेवाभावी संस्थांना दान केली, तर तो आशीर्वाद वधू-वरांसाठी फार मोलाचा ठरेल, असा विचार का कुणाच्या मनात येत नाही?
उक्ती अन् वर्तन यांचा संबंध असतोच असे नाही. बोलणं सोपं असतं परंतु आचरणात ते आणणं आव्हान असतं. राजकारणी लोकांच्या नातेवाईकांची, मुलांची लग्न नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय झाली आहेत. ‘मूहँमे रामनाम बगलमें छुरी’ असं यांचं या खर्चाबाबतीत स्पष्टीकरण असतं. चिपळूणच्या ‘भास्कराचार्यांचे’ लग्नकार्य पाहून जाणत्या राजांची झोप उडाली त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते घरी दोन दिवस जेवले नाहीत. भास्कररावांनी मुला-मुलींच्या लग्नात उभारलेला सेट पाहून तर ताजमहालही आता नकोसा वाटू लागला आहे. अवाढव्य मैदानात साहेबांनी लगेच सभा आटोपली असती, तर लग्नाचा दुहेरी फायदा घेता आला असता. परंतु साहेबांनी भास्कररावांना ‘बास् करा राव’ असा संदेश दिला. अशाच एका लक्ष्मणरावांनी आपल्या वाढदिवसाला लक्षभोजन घातलं. त्याची दृश्यं पाहिली आणि या मंत्र्याची सर्वांनाच घृणा वाटू लागली. ही धनशक्तीच यांना राजकारणातून बदनाम करेल व यांना आपली खरी जागा दाखवेल, असं ठामपणे सांगता येईल. समारंभाच्या निमित्ताने या मंत्र्यांनी केलेले प्रतिष्ठेचे दर्शन त्यांची प्रतिष्ठा नसून, ही ‘राजकीय विकृती’ आहे. यालाच जर ते सामाजिक कार्य म्हणत असतील, तर जनता त्यांना कधीच आशीर्वाद देणार नाही.
सर्वच थरातील आणि समाजातील सर्व स्तरातील विवाह आणि इतर समारंभाचे दर्शन वरवर कितीही भवदिव्य दिसत असले, तरीही खर्च होणार्‍या या पैशाचा रंग काळा की सफेद याचा कोण विचार करणार? निमंत्रण पत्रिकेसाठी हजार रुपये खर्चणारे कधी एक विचार करीत नाहीत की ती निमंत्रण पत्रिका नंतर केराच्या टोपलीत जाते. परंतु त्या पत्रिकेवर खर्च करण्याचा मोबदला त्यांना पुढे मिळत असतो. आहेर आणू नये असे जरी सांगितले गेले असले तरीही ‘बुके’ आणले जातात आणि असे शेकडो ‘पुष्पगुच्छ’ लगेच कचर्‍यात फेकले जातात. हा कित्येक हजाराचा खर्च फुकाफुकी वाया जातो. यावर प्रतिक्रिया असते की या भावना आहेत. हे प्रेम त्यांनी व्यक्त केले आहे त्याला कोण काय करणार?
भावना, प्रेम यांचं मनोमिलन म्हणजे विवाह सोहळा. प्रत्येक कुटुंबाचं ते घरकार्य असतं. त्यानिमित्ताने सर्व मित्र, नातेवाईक एकत्र येतात. अशा या आनंदी सोहळ्यासाठी झाला खर्च तर तो आम्हाला मान्य आहे असं समारंभाघरचं म्हणणं. तरीही खाल्ल्या अन्नाला जागून एक विचार नेहमीच मनात येतो की, अर्धपोटी राहून जर भुकेल्याला तृप्त करता आलं तर राजकारणी, उद्योगपती किंवा इतर कुणाच्याही घरचं शुभकार्य असो, आशीर्वाद सर्वांनाच लाभतील. परंतु त्यांची तशी नियत हवी, भल्या भल्या नेत्यांसाठी ही लग्नकार्ये, विघ्नकार्ये ठरली आहेत. तेव्हा शुभलग्न! पण ‘सावधान!’

कथा एका विघ्नाची


  कोणत्याही मंगलप्रसंगी आपण विघ्नहर्त्या गणेशाला प्रार्थना करतो ‘निर्विघ्नं कुरुमे देवो सर्व कार्येषु सर्वदा:’ लग्न तर फार मोठी गोष्ट. त्यातून वधूपक्ष असल्यावर काय विचारता? गोष्ट आहे २७ मे १९६४ ची.त्या दिवशी माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या सीमंतीचा कार्यक्रम होता. २८ तारखेला गोरजमुहूर्तावर लग्न लागणार होते. २७ ला सकाळी वरात नाशिकहून आली. मुलाचे मामा हे सर्व कर्ते. त्यांनी म्हटले सकाळचे जेवण आमच्याकडून.व्याहीभोजनाचे जेवणे आटोपली. सायंकाळी सीमंतीची तयारी. त्यावेळी कार्यालये नव्हती. आम्ही घरी आलो तर माझा मामेभाऊ रेडिओवर बातम्या ऐकत होता. अचानक तो ओरडला पं. नेहरू गेले. आता १० दिवस शोक पाळणार. उत्सव वगैरे सर्व बंद. उद्या ठिकठिकाणी सायंकाळी त्यांना अग्नी देणार (फोटोला). झाले वातावरण एकदम बदलले. वडील स्थितप्रज्ञ. शिवाय गावातील प्रतिष्ठित अनेक मोठ्या संस्थांचे अध्यक्ष म्हणजे त्यांच्या हातून सर्व विधी होणार. या विचाराने आई, बहीण व मी रडायलाच लागले. आयुष्यात एकदाच लग्न. मी १५ वर्षांच्या बहिणीला मंगळ त्यामुळे आधीच लग्न २६ व्या वर्षी जुळले. आता लग्नात मेजवानी नाही, बँड-वरात काही नाही. रोषणाई नाही. गुपचुप करायचे. गोंधळ वाढला. प्रथमच देशाच्या पंतप्रधानांचे निधन झालेले. वडील वराकडील मंडळींना भेटायला गेले. सर्व कल्पना दिली. तेही समंजस होते. साधेपणाने लग्न लावायला तयार झाले. पंगत नाही. आमंत्रितांना काय सांगायचे? शेवटी बिनागोडाचे साधे जेवण द्यायचे ठरले. २८ तारखेला वडील ५ वाजेपर्यंत फोटोला अग्नी द्यायला स्मशानात. ६ वाजता मुहूर्त. कन्यादानापर्यंत ते आले. तेव्हा कॅटरर्स वगैरे नव्हतेच. स्वयंपाकी आलाच नाही. देश का नेता चल बसा काहे की शादी और काहे का खाना? असे म्हणून घरीच होता. त्याला ४ जणांनी धरून आणले. कसाबसा बेचव स्वयंपाक त्याने भराभर केला. लोक ताटकळले होते. लग्न अगदीच सुमार झाले. आज काळ बदलला. कोणी घरच्यांचेच मरणाचे दु:ख करीत नाहीत, तेथे देशाच्या पंतप्रधानाचे काय? लोकांची दृष्टीच बदलली पण तो काळ वेगळा होता. आजही २८ मेला तिचा लग्नाचा वाढदिवस साजरा करताना आम्हाला ही आठवण येते.
 बहिणीने तर लग्नाचा धसकाच घेतला. कुणाचेही नात्यात लग्न असले की, तिला टेंशन. बाई ग कुणी खपेल का? लग्नात विघ्न येईल का? आणि तिची वाचा म्हणजे आम्ही म्हणायचो चूप रहा शुभ बोल नारी.
 पुढे १९७० साली माझे लग्न होते. हिचे परत तेच सुरू आणि खरोखरीच माझ्या लग्नात आम्ही कार्यालयात पोहोचत नाही तर माझी आजी गेली. पण, मावशी डॉक्टर, तिने बातमी लपवून ठेवली. दुसरे दिवशी लग्न लागले, पंगत आटोपली व तिने निरोप पाठवला की, आजीच्या अंत्येष्टीला या म्हणून. असो. घटना घडून जातात. आठवणी तशाच राहतात. आकांक्षा व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांना उजाळा मिळाला.

लाईफ पार्टनर


 पती-पत्नीचे नाते संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे असते. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत जोडीदाराचीच साथ असते, बाकी नाती गौण ठरतात. कोणत्या कुटुंबात जन्म घेणे आपले हाती नाही, परंतु योग्य जीवनसाथी निवडणे आपले हाती आहे.
 लग्न ही भावी पिढीच्या निर्मितीची प्रथम पायरी आहे.
 बरेच वेळा करीअरचे मागे लागून मुले/मुली लग्न लांबणीवर टाकतात. मिळवत्या मुलींचे पालकही बरेच वेळा बेफिकीर असतात. मुलांचे पालक-मुलाचा पगार २५ वरून ५० हजारावर जाऊ द्या, मग पाहू! अजून चांगली स्थळे मिळतील असे म्हणतात. अगदी वेगळी धाटणी असलेला जोडीदार मिळाला/मिळाली तर मग मात्र आयुष्य अनेकदा नीरस-बेचव होऊन जाते. याला महत्त्वाचे कारण उशिरा लग्न हेच असून, निराशपणे, कुठेतरी, घाईघाईने लग्न उरकविणे हे आहे.
 लक्षात ठेवा पसंत नसेल तर ३० हजाराचा टी. व्ही. फेकून द्याल, पसंत नसेल तर ३ लाखाची कार फेकून द्याल. अनमोल जोडीदार फेकून देता येत नाही. बरेच वेळा मुले-मुली लग्न मला करावयाचे आहे. तुम्ही जास्त लक्ष देऊ नका! असे पालकांना सांगतात. लक्षात ठेवा आईवडील तुम्हाला प्राणापलीकडे जपत असतात. सबब मुलीचे लग्न शिक्षण/नोकरी नंतर दोन वर्षाचे आत व मुलाचे लग्न ३ वर्षाचे आत होणे आवश्यक आहे.
 लग्नप्रसंगी तीन लाख खर्च करणारे पालक जोडीदार निवडीकरिता ३० हजारही करीत नाही. लग्न जुळले हे जाहीर होताच मुलगा-मुलगी व पालक यांचे लग्न बाजार मूल्य शून्य झालेले असते. त्यामुळे लग्नावर हॉल, डेकोरेशन, कॅटरिंगवर किती खर्च करता हे गौण ठरते. साध्या किंवा भपकेबाज लग्नाची चर्चा फक्त ४ दिवसच असते. सबब जोडीदाराची निवड महत्त्वाची आहे.
 मुला-मुलींचे पालक पाहणी झाल्यावर जर १५/२० दिवसात काहीच निरोप आला नाही तर त्यांना स्थळ पसंत नसेल असा गैरसमज करून घेतात. मनात असते परंतु अधिक चांगल्या स्थळांचा मधल्या काळात शोध घेत असतात. म्हणून दुसरे स्थळ पक्के करताना अगोदरचे स्थळ जास्त चांगले वाटत असल्यास एकदा विचारायला काय हरकत आहे! नाहीतर अगोदरचे स्थळ अधिक चांगले होते, त्यांनी उशीर लावला ही टोचणी नेहमीकरिता राहते.
 आजकाल मुलांचे पालक मुलींच्या पालकांशी सरळ विचारणा करतात हा चांगला स्वागतार्ह बदल आहे. चांगल्या मुलाचे स्थळ मिळणे कठीण आहे, परंतु चांगल्या मुलीचे स्थळ मिळणे जास्त कठीण आहे. मुलीचे लग्नाचे वेळी पालक बरीच तडजोड करतात परंतु तेच पालक मुलाचे वेळी तडजोड कमी करतात. बरेच वेळा व्हेटो मुलाकडे असतो.
 आपण कोणाला पसंत करतो याचबरोबर आपल्याला कोण पसंत करतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. वधू-वर संशोधन करताना वास्तवाचे भान ठेवून आपल्या पाल्याचे रंग-रूप, उंची, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा जाणीवपूर्वक विचार करून अवास्तव अपेक्षा न ठेवता जोडीदार निवडावा.
 पूर्वी राजकन्येचे स्वयंवर व्हायचे. आजूबाजूचे राज्यात दूत पाठविले जात. राजकन्या पतीची निवड करायची, तो हक्क राजकुमारांना नव्हता. आजची वधू-वर पुस्तके दूताचे काम करतात व वधूचा परिचय मेळावे हे स्वयंवराचे आधुनिक स्वरूप आहे. येथे दोघांनाही योग्य जोडीदार निवडण्याची समान संधी आहे.


तंदेव लग्नम 

$img_title


 फेसबुकवर मित्राचा मॅसेज होता, ‘‘एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोडी वर बनते, पण सेटिंग जमिनीवरचकरावी लागते.’’ असं म्हणतात की,लग्नाच्या गाठी स्वर्गातच बनतात, पण वरील मॅसेजनुसार त्याचे निर्गठण आपल्याला जमिनीवर म्हणजे संसारातच करावे लागते.
 ‘घर पाहावेे बांधून व लग्न पाहावे करून’, मग कळतं दोन्ही गोष्टी आहेत मोठ्या कठीण! मुला-मुलींची लग्नं जमवताना अलीकडे मुला-मुलींवर व त्यांच्या पालकांवर प्रचंड ताण येतो असे दिसते.या ताणाची कारणे बदलती जीवनशैली आणि मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षा हीच आहेत काय? या ताणावर उपाय आहे काय? खरंतर मुलं-मुली लग्नाच्या वयात येण्याआधीपासूनच घरात या संदर्भात चर्चा व्हायला पाहिजे.या संदर्भात मुलाला किंवा मुलीला नेमकं काय हवंय्? लग्न म्हणजे काय? काय आहे लग्नाचा अर्थ? सहजीवनासंबंधी काय विचार केला आहे? आवडीनिवडी काय? विचारधारा कोणती? तुलाही नकार येऊ शकतो हे सत्य स्वीकारता येतं का? तू त्या व्यक्तीला नकार का देतोस?अशा अनेक गोष्टींबाबत उपवर मुला-मुलींशी, पालकांची मनमोकळी चर्चा व्हायला पाहिजे. सध्याची परिस्थिती अशी आहे की, मुलं आणि मुली दोघांनाही लग्नाची घाई दिसत नाही. दोघांनाही भरपूर मित्रमैत्रिणी असतात. सूनसान जागी, सूनसान रस्त्यांवर एक मुलगा व डोळे वगळून सर्व चेहरा ओढणीने झाकलेली मुलगी अशा ग्रुपमध्ये आपण त्यांना दररोज बघत असतो. त्यामुळे या गोष्टीचा पालकांवर बराच ताण येतो.आज नाही म्हणायला सर्व पालकांना आपल्या पाल्यासाठी अगदी ‘सुयोग्य,’ ‘अनुरूप’ असा जोडीदार पाहिजे आहे, अशी त्यांची अपेक्षा असणं अजीबात चूक नाही. पण, त्या मागण्या बनू लागल्या की त्याचं ओझं व्हायला लागतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
 परवा मानसीच्या आईचा फोन आला होता की, मुलाकडील मंडळी पत्रिका जुळत नाही म्हणतात. ते म्हणतात की, पत्रिकेत ‘कूटदोष’ आहे. मानसीच्या आईला कूटदोष काय प्रकार आहे, हे माहीत नव्हतं. मुलाकडील मंडळींनी केवळ कूटदोष म्हणून पत्रिका जमत नाही, असे सांगितल्याचे दिसते.ज्योतिषशास्त्राप्रमाणे काही कूटदोष हे वर्ज असतात, तर काही कूटदोष हे ग्राह्य असतात. पण, हे कोण कोणाला, कसं सांगणार?एकदा मुलाकडील मंडळींनी पत्रिका जुळत नाही म्हटलं की, त्याला काहीही उत्तर नसतं. लग्न जुळवण्याची प्रोसेस व प्रोग्रेस तेथेच त्या स्थळापुरता बंद होतो.पत्रिका जुळवण्याच्या बाबतीत समाजात आजही बरेच गैरसमज आढळून येतात. कधी कधी स्थळ नाकारण्यासाठीही पत्रिकेचा आधार घेण्यात येतो असे दिसते.
 अनेक, विशेषत: उच्चशिक्षित मुला-मुलींच्या लग्नाबाबत काही पालकांना अगदी हतबल व्हायला होतं. लग्न ठरवण्याच्या बाबतीत स्वत: लक्ष न देणे, पालकांनी आणलेली स्थळे नाकारणे, प्रत्येक स्थळात काही ना काही खोट काढणे,नकाराचे कारण न सांगणे आणि यापायी लग्नाचे वाढते वय हे पाहून पालक अगदी अगतिक होतात. त्यातही मुलगा परदेशी असेल तर टेन्शन फारच असतं.समीरची आई सांगत होती, ‘‘वर्षातून हा एकदा भारतात येणार. जेमतेम पंधरा दिवस राहाणार. त्या वेळात काय काय करायचं!’’ विद्याची आई म्हणते, ‘‘ती करीअरच्या मागे लग्नाचा विचारच नाही. वाढता वाढता तिचे उत्पन्न महिना एक लाखपर्यंत पोचलंय्.’’ अशा मुलीसाठी जावई पण लाखाच्या वर उत्पन्न असलेलाच पाहावा लागणार ना!
 खरंतर लग्न हे एका व्यक्तीचं दुसर्‍या व्यक्तीशी होत नाही तर एका लग्नामुळे दोन कुटुंबे जवळ येतात. नम्रता म्हणाली, ‘‘जसं मला त्यांचं घर आवडायला पाहिजे तसंच मला त्याचे आई-वडीलही आवडायला पाहिजेत.मला एकच मोठी बहीण आणि ती परदेशात असते. त्यामुळे जशी मी त्यांच्या आई-वडिलांची काळजी घेईन, तशीच त्यानंही माझ्या आईवडिलांची विचारपूस करायला पाहिजे, असं मला वाटतं.’’ नम्रतासारखं आज अनेक मुलींना वाटतं. विशेषत: ज्यांना दोन्ही मुलीच आहेत त्यांच्याकडे होणार्‍या जावयाने आवर्जून लक्ष द्यायला हवं असं वाटतं.
 लग्न, विवाह या विषयावर आपल्याकडे बरंच बोललं जातं, लिहिलं जातं. उपवर मुला-मुलींनी अमुक करावं, तमुक करू नये, अशी पालकांची इच्छा असते. पण, लग्न जमणं किंवा जमवणं या गोष्टी आता तितक्या सोप्या राहिल्या नाहीत एक काळ असा होता की केवळ ‘प्रेमविवाह’ म्हणून त्या विवाहाला विरोध व्हायचा. आता जवळजवळ सर्व पालकांना आपल्या मुला-मुलींनी स्वत:चं स्वत: लग्न जमवावं असं वाटतं. पण, त्यांचं त्यांनी जमवलेलं नसेल तर मात्र ही जबाबदारी पालकांवर येते आणि मग पालकांची कसरत सुरू होते. अनेकदा पालकांच्या दृष्टीने ‘अनुरूप’ असलेलं स्थळ मुला-मुलींच्या दृष्टीने काहीतरीच असतं आणि मग विसंवादाला सुरुवात होते. खरंतर आपल्या पाल्याचं लग्न करायचं, हे सामंजस्यानं घरात चर्चा करून ठरवायला पाहिजे. त्याबद्दल घरात संवाद व्हायला पाहिजे, पण बरेचदा पालक मुलामुलींशी चर्चा न करता विवाहसंस्थेत नाव नोंदवतात आणि त्यांना अनुरूप वाटणारी स्थळं घरी घेऊन जातात. मात्र, नकाराचं अस्त्रं मुला-मुलींच्या हातात असतं. छोट्या छोट्या कारणांवरून मुलं-मुली ती स्थळं नाकारतात आणि पालकांची काळजी अजून वाढायला लागते.
 आता लग्नाला उभी असलेली मध्यमवर्गातली ही पिढी संपन्न अवस्थेत आहे. उपवर मुलं-मुली जवळपास सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. ती आर्थिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सगळ्या प्रांतात स्वत:ला सिद्ध करू पाहत आहेत.त्यामुळे मुला-मुलींच्या अपेक्षाही रेडिमेड संसाराकडे आहेत.लग्नाआधीच सर्व अत्याधुनिक वस्तूंनी सुसज्ज घर त्यांना हवे आहे. त्यामुळे मुला-मुलींनी स्वतंत्र फ्लॅट्‌स घेऊन ठेवलं असल्याचं बहुतांशी दृश्य दिसतं.
 लग्न जमवताना पत्रिका हा एक गहन मुद्दा आहे. अनेक उपवर मुला-मुलींचे पालक आज प्रगल्भ, सुसंस्कृत, सुशिक्षित आहे. तथापि पत्रिकेबाबत ते काही पटवून घेताना दिसत नाहीत. आजच्या २१ व्या शतकात जवळपास ९५ टक्के लोक पत्रिका पाहूनच लग्न ठरवतात. असं म्हणतात की,पत्रिकेच्या बाबतीत अर्धवट ज्ञान खूपच धोकादायक असू शकतं. पत्रिकेतील १, ४, ७, ८ व १२ या स्थानी मंगळ ग्रह दिसला तरी ही मंगळी पत्रिका आहे म्हणून काही पालक ते स्थळ नाकारतात. खरंतर या स्थानी मंगळ असूनही पंचांगात त्याला अपवाद दिलेले आहेत व या अपवादांनुसार उपरोक्त स्थानी मंगळ असूनही ही मंगळी पत्रिका होत नसते. मंगळाच्या नंतर सगोत्र, एक नाड हे दोष खूपच धोकादायक असतात,असे काही पालक मानतात. पत्रिकेच्या संदर्भात ‘उगीच विषाची परीक्षा कशाला?’ अशी समजूत आजही ग्राह्य आहे. पत्रिकेच्या आग्रहापायी ‘चांगली’ स्थळं सोडण्याची वेळ अनेकांवर येताना दिसते.
 स्थळशोध मोहिमेत ‘पैसा’ हे एक मोठं प्रश्‍नचिन्ह आहे. आय. टी. सोडून कोणत्याही क्षेत्रातील मुलामुलींची लग्न जमणं अतिशय अवघड होऊन बसलं आहे. एम. कॉम. झालेला अभय हताश झाला आहे. लग्नाच्या बाबतीत त्याचा स्वत:वरचा विश्‍वासच उडालेला आहे. मुलीचं पॅकेज ८ लाखांचं आहे.त्यामुळे मुलाचं किमान १० ते १२ लाखाचं पॅकेज असावं, असं मुला-मुलींना व पालकांनाही वाटत आहे. आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे. याबद्दल दुमत नसावं, पण आयुष्य जगण्याच्या संकल्पनेला केवळ तो एकमात्र निकष ठरू नये किंवा स्थळ निवडीसाठी तो फार महत्त्वाचा मुद्दा असू नये, पण असं होत नाही.
 वयातलं अंतर आणि उंचीतील फरक हे मुद्देे आजही लग्न जमवताना खूप महत्त्वाचे ठरत आहेत. अनेक मुलामुलींशी संवाद साधताना जाणवतंय् की अनेक मुलींना वयामध्ये २ वर्षांपेक्षा जास्त अंतर नको तर मुलांना मात्र हे अंतर ४ ते ५ वर्षांचं चालतं. याचं कारण मुलींना अंतर कमी हवं कारण, त्यांना अंकलसारखा वर नको व मुलांना हे अंतर ४ ते ५ वर्षांचं हवं आहे. कारण, त्यांना वाटतं की मुलगी लहान असेल तर ती थोडं ऐकेल तरी.असंच काहीसं उंचीबद्दलही आहे. अक्षय उंचपुरा ६ फूट आहे. त्याच्या पालकांना सून साडेपाच फुटापेक्षा जास्त उंचीची पाहिजे.कारण,जोडा ‘लक्ष्मीनारायणा’सारखा दिसला पाहिजे. पण, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, या सगळ्यात अक्षयला काय हवंय् हा विचार कुठेच नाही.
 भारताच्या स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली आणि आपण एकविसाव्या शतकात प्रवेश केला, तरीही स्थळं शोधताना धर्म, जात, पोटजात असा पक्का आग्रह दिसतो. कारण, पालकांना जातीबाहेर लग्न केलं तर समाजात छी-थू होईल, याची भीती वाटते. तसंच आपापल्या जातीतील कुळाचार, रीतिरिवाज, आहार-विहारातील फरक, वंश व जातीच्या अभिमानाला तडा जाईल असं वाटतं. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी ही आपल्याच धर्माची, जातीची, शाखेची व पोटशाखेची हवी अशी आपली अपेक्षा असते. सामान्यत: असं दिसतं की, एखाद्या स्थळामध्ये थोडंसं जरी शारीरिक व्यंग असेल तरी ते स्थळ आधी पालकांनाच नको असतं आणि काहीही विचार न करता मुलं-मुलीही ते स्थळ नापसंत करतात.
 प्रेरणाचे बाबा म्हणाले, ‘‘अहो, आता मला माझ्या नोकरीत जेवढा पगार मिळतो त्याच्या दुप्पट पैसे आज आमची प्रेरणा दरमहा मिळवते’’ या प्रेरणाच्या बाबांना त्यांच्या प्रेरणासाठी पुण्यात वडगावचं स्थळ नको असतं कारण,प्रेरणा हिंजवाडीत काम करते आणि वडगाव-हिंजवाडीत या अंतराची दगदग होईल असं त्यांना वाटतं. मुलांचं शिक्षण तर चांगलंच पाहिजे,शिवाय तो पुण्यातला पाहिजे. कारण, तिची नोकरी पुण्यात! हे सांगताना प्रेरणाचे बाबा असंही म्हणतात, ‘‘माणसं चांगली हवीत हो, तिला समजून घेणारी. जसं आम्ही तिला वाढवलंय् अगदी तस्सं!’’ आज आय. टी. सेक्टरमधील मुलगा इंग्लंडला, मुलगी पुण्याला, तर मुलगी मुंबईला, तर मुलगा अमेरिकेत असं चित्र सरसकट दिसतं. त्याला नाईलाज आहे व हे सर्व मान्य करणं क्रमप्राप्त झालं आहे.
 लग्न जुळवण्यासाठी प्रत्येक शहरात बरीच वरवधू सूचक मंडळं स्थापन झाली आहेत. या मंडळातील फॉर्म्स वाचल्यास ९० टक्के मुलांची अपेक्षा मुलगी मनमिळाऊ, गृहकर्तव्यदक्ष हवी. तिला स्वयंपाक यायला हवा, तिने घरातले कुळाचार पाळले पाहिजेत, मुलगी आकर्षक, संस्कारित, घरंदाज, प्रेमळ, मोकळ्या स्वभावाची, कुटुंबावर प्रेम असलेली, घरच्या सगळ्यांना सांभाळून घेणारी व गोरी असावी असं लिहिलेलं आढळतं. या अपेक्षांमध्ये आता भर पडली आहे ती ‘मुलगी नोकरी करणारी किंवा नोकरी करण्याची तयारी असावी,’ ही. मुलीने केवळ गृहिणी होऊन घर सांभाळावे आणि मुलांना वेळ द्यावा, अशी अपेक्षा अलीकडे औषधालाही सापडत नाही. झाडून सर्व मुलांना नोकरी करणारी बायको हवी असते.पण,नोकरी करत असतानाच तिने कुटुंबीयांना सांभाळले पाहिजे, स्वयंपाकपाणी केलं पाहिजे,घरची स्वच्छता केली पाहिजे, मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, हसतमुखाने पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे, घरकाम केलं पाहिजे अशीही पारंपरिक अपेक्षा बर्‍याच मुलांची व त्यांची आई-वडिलांची असते.पिढ्यान् पिढ्या याच अपेक्षा आहेत. त्यात फारसा फरक झालेला नाही. मुलीला आजच्या काळानुसार बारा-बारा तास जर ऑफिसमध्ये काम करावं लागणार असेल, तर ती या अपेक्षा कशा पूर्ण करणार? आणि करीअर आणि कौटुंबिक जबाबदार्‍या अशी तारेवरची कसरत करून फ्रेश दिसणारी ‘सून’ केवळ टीव्ही मालिकांमध्येच असू शकते.
 दिसणं हा मुद्दा मुलांच्याच नव्हे, तर मुलींच्या अपेक्षांमध्ये फार महत्त्वाचा असतो. कर्तृत्ववान पण दिसायला डावा असलेला मुलगा मुलींना नको असतो.मुलगा हँडसम हवा,अगदी स्वप्नातल्या राजकुमारासारखा, अशी मुलींची अपेक्षा असते. रंग सावळा असला तरी दिसायला स्मार्ट हवा असतो.अलीकडे मुलगा आणि मुलगी दोघांच्याही जोडीदाराबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत.तडजोड करण्याची फारशी तयारी दिसत नाही. मुलाचं घरदार, नोकरी चांगली असली तरी तो दिसायला हँडसम नसेल तर मुलींना मुलगा पसंत पडत नाही.
 लग्न एकदाच होतं. त्यामुळे मुलांचं लग्न थाटामाटात व्हावं अशी मुलाची व मुलाच्या आई-वडिलांची इच्छा असते.एरवी आधुनिक वाटणारी ही मुलं डामडौल आणि मानापानासाठी कितीही खर्च करायला तयार होताना दिसतात. रजिस्टर लग्न करण्याचा आग्रह धरणारी मुलं-मुली अगदी कमी आहेत.
 थोडक्यात सांगायचं तर, उच्चशिक्षित महाविद्यालयात मित्र-मैत्रिणींसमोर स्वत:चे लग्नविषयक आधुनिक विचार ऐकवणारी तरुण पिढी जेव्हा बोहल्यावर चढायची वेळ येते, तेव्हा कमालीची पारंपरिक होते. स्वत:चं लग्न स्वत: न जमवलेले मुलं-मुली अरेंज मॅरेजकडे वळतात, तेव्हा त्यांचे आधुनिक विचार कुठे गायब होतात, ते कळतही नाही. पत्रिका पाहण्यापासून ते लग्नसमारंभापर्यंत सर्व गोष्टींत उपवर मुलं-मुली कमालीची पारंपरिक होतात व सर्व कर्मकांडे पूर्णपणे पार पाडली जातात असे दिसते.
 लग्न झाल्यानंतर संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधनं ही वयानुरूप, कालानुसार निरनिराळी असतात आणि प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही पण, संसार टिकतो तो कसा? तर दु:ख जेव्हा सगळ्यांचं एकच होतं, तेव्हा घर उभं राहतं.आपल्या तरुणाईला आणि त्यांच्या सुज्ञ पालकांना या गोष्टी कळायला हव्या.अपेक्षांच्या पुर्तीची वाट पाहत बसण्यापेक्षा जरा ऍडजस्टमेंट केली तर कुठं काय बिघडतंय् याचाही जरा विचार केला जायला हवा.

1 comment:

  1. Really loved this post. It was nice to read this post with interesting and useful information. Many thanks for sharing it.
    Regards,
    Cab Service in India

    ReplyDelete