Tuesday, December 16, 2014

तालिबानी हल्ल्यात ९० मुलं ठार

पाकवर 'तालिबानी', १०० मुलांसह १२६ ठार

 


 taliban

दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला आज त्याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागली आहे. तालिबानी अतिरेक्यांनी पेशावरमधील सैनिकी शाळेवर चढवलेल्या आत्मघाती हल्ल्यात आतापर्यंत ११० निष्पाप विद्यार्थी व शाळेच्या स्टाफला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या हल्ल्यात सुमारे ८० विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील ४२ विद्यार्थी चिंताजनक आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. 

स्फोटकांचा मोठा साठा घेऊन लष्कराच्या वेशात शाळेत घुसलेल्या दहशतवाद्यांनी सबंध पाकिस्तानलाच हादरवून टाकले आहे. गेल्या चार तासांपासून पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा आजवरच्या सर्वात बिकट संकटाचा मुकाबला करत आहे. शाळेत ५०० च्यावर मुलं व स्टाफला दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले असून मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला जात आहे. गोळीबारात आतापर्यंत ९० विद्यार्थी तसेच स्टाफ व पाक सैनिक मिळून ११० जणांचा बळी गेला आहे. 

पाकिस्तानी लष्कराने ओलीस मुलांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर ऑपरेशन हाती घेतले असतानाच एका मानवी बॉम्बचा स्फोट झाल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हवाई हल्ल्यांचाही मार्ग अवलंबला असून आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. दोन दहशतवादी अजूनही शाळेत आहेत. गंभीर बाब म्हणजे ज्या दहशतवाद्यांनी हे भयंकर कृत्य केलंय ते १८ ते १९ वर्षांचे आहेत. 

चार रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी 

पेशावरच्या या शाळेत सर्वत्र रक्ताचा सडा पडला आहे. जखमी मुलांना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत आहे. चार रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. शाळेजवळ विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली असून या भ्याड हल्ल्यानंतर एकच आक्रोश सध्या सुरू आहे. 

मलालाच्या सन्मानाचा बदला? 

पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी झटणारी १७ वर्षीय मलाला युसुफजई हिला नुकतेच प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या निमित्ताने मलाला हिच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. ही बाब तालिबान्यांना झोंबली असावी. मलाला हिच्यावर आधीही प्राणघातक हल्ला करणाऱ्या तालिबान्यांनी शाळेवर हल्ला करून मलालाविरोधातील राग व्यक्त केला असावा, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment