Friday, December 12, 2014

On June 21, the World Yoga Day United Nations Declaration

२१ जून आता 'जागतिक योग दिन'


संयुक्त राष्ट्रांची घोषणा

शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही हा प्रस्ताव मांडला होता. त्याला तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आलेले आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलातीत ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली हाती. त्यानंतर अन्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधी लाभले आहेत. प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी लाभले. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.

२१ जूनच का?
२१ जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारतातील ५००० वष्रे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

On June 21, the World Yoga Day

United Nations Declaration

Yoga is a need to be a regular for the prevention of physical and mental anarogyace, offer advice that many yogabhyasaka. Prevention of this method is now received international approval. United Nations, 21 June, the International Day of Yoga 'has approved the proposal to celebrate. India led to 175 countries pratinidhinkaduna this proposal was.
Prime Minister Narendra Modi had proposed this mahasabhetahi of the United Nations in September. He was given three months after the approval. Yoga and its health benefits this proposal has been discussed in detail, and the results.
United Nations Indian embassy diplomatic hand to discuss the proposal in October. Then this proposal was presented by representatives of the General Assembly of the United Nations to discuss other countries. There are 175 countries in the United Nations received sahapratinidhi 193 countries. For the first time gained sahapratinidhi countries evadhaya a proposal. The permanent members of the United nations Security Commission, China, France, Russia, Britain and the United States there are countries sahapratinidhi this proposal.

21 of June?
On June 21, the day is the biggest day in many countries around the world. Therefore, it is of special importance. As this day 'International Yoga Day might be observed, that the proposal was presented. India 5000 years old, physical, mental and spiritual discipline, which it brings about a change in the mind and body.

No comments:

Post a Comment