Wednesday, December 24, 2014

Fashionable Winter


फॅशनबल थंडी

 
या थंडीच्या मोसमात कुठले फॅशन ट्रेण्ड चलतीत आहेत याची माहिती. विंटर फॅशनची झलक..
गुलाबी थंडीच्या डिसेंबर महिन्याची सगळ्या फॅशनप्रेमी मुली आतुरतेने वाट बघत असतात, कारण एरवी वापरता येणार नाहीत असे निटेड वेअर, जॅकेट्स, बूट्स अशी वेगळी फॅशन करण्याचा हाच महिना असतो. यामुळे वातावरणात एक प्रकारचा उत्साह असतो. कलरफूल विंटर बघायला मिळतो. वर्षभर धूळ खात पडलेले स्वेटर्स आणि जॅकेट्स, स्कार्फ्स बाहेर येतात आणि कॉटनच्या कपडय़ांना उन्हाळ्याची चाहूल लागेपर्यंत रामराम मिळतो. मात्र बाजारात आलेलं नवनवीन कलेक्शन खुणावत असतंच आणि सीझनल ट्रेण्डनुसार थोडीशी खरेदीही होऊन जाते. थंडीपासून संरक्षणासोबत वेगळी फॅशनसुद्धा या निमित्ताने होते.
स्टॉकिंग्ज, जॅकेट्स आणि श्रग्ज
डिसेंबर म्हणजे न्यू इअर आणि ख्रिसमस पाटर्य़ाचा महिना. अशा पार्टीजना मुली सहसा वन पीस, स्कर्ट टॉप यालाच प्राधान्य देतात. स्लीव्हलेस वनपीसवर क्रॉप स्टाइल जॅकेट्स, ट्रीम ब्लेझर वापरलं तर छान दिसतं. पायाला थंडी लागू नये म्हणून संध्याकाळच्या पार्टीसाठी स्टॉकिंग्जचासुद्धा वापर करता येऊ शकतो. थंडीच्या दिवसात ट्रेकिंग आणि माउंटनीअरिंगला बाहेर पडणारे पॅडेड जॅकेट्सचा वापर करतात. स्लीव्हलेस वॉर्म जॅकेट्स स्पोर्टी लुक देतात. हॅण्ड ग्लोव्हज तर बाइक रायडर्सच्या शॉपिंग लिस्टमध्ये हमखास असतात. व्हेरो मोडा, प्युमा, नाइकी, आदिदास अशा ब्रॅण्ड्सनी जॅकेट्सचं नवीन कलेक्शन बाजारात आणलं आहे.
वेगवेगळ्या प्रकारची लेदर जॅकेट्स आणि श्रग मुलींनाही खुणावत आहेत. ऑनलाइन शॉपिंग साइटवरून चक्कर मारली तर याचे विविध प्रकार बघायला मिळतील.
लेदर पँट
ओन्ली फॉर विंटर असं काही कलेक्शन असतं. फक्त स्वेटरचा त्यात समावेश असतो, असं नाही. विंटर कलेक्शनमध्ये फूल स्लीव्ह वॉर्म टी शर्ट आणि त्याखाली लेदर पँट्स असं कॉम्बिनेशन करता येतं. लेदर पँटला स्किनी जीन्स किंवा डेनिमचा ऑप्शन उपलब्ध असतो. लेदर पँट इतर कुठल्याही सीझनमध्ये वापरता येणार नाही. त्यामुळे नवीन फॅशनबद्दल हौशी असाल तर लेदर पँट घेऊन बघा आणि याच सीझनसाठी एक्स्लुझिव्हली वापरा. स्वेटरमधले प्रकार बघायचे तर लोकरीपासून विणलेले स्वेटर, वेलवेटचे स्वेटर, सिंथेटिक पॉलिस्टर फॅब्रिक आजही तितकंच वापरलं जातं पण त्याच्या सोबतीला हुडी आणि झिपरसुद्धा आले आहेत. व्ही नेक, पूलओवर, स्वेटर वेस्टस असे स्वेटरचे प्रकार आहेत. स्वेटशर्टही असतोच.
शाल, स्टोल आणि स्कार्फ
ट्रॅडिशनल लुकसाठी शाल अजूनही वापरली जातेय. पण पश्मिना स्टोलसुद्धा ट्रेण्डमध्ये आहेत. स्टोल शालीपेक्षा कमी जड आणि छोटा असल्याने इंडियन वेअरबरोबरच वेस्टर्न वेअरसाठीही उपयुक्त ठरतो. याशिवाय विंटर कलेक्शनमध्ये स्कार्फकडे स्टाइल स्टेटमेंट म्हणून पहिलं जातंय. चौरसाकृती, आयताकृती आणि त्रिकोणाकृती अशा आकारात स्कार्फ मिळतात. वुलन, जर्सी आणि अ‍ॅक्रॅलिक या फॅब्रिकमधले स्कार्फ थंडीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात. वेस्टर्न वेअरवर बंधाना स्कार्फ सूट होतो. ते मानेभोवती, डोक्यावरून अथवा केसांच्या पोनीटेलवर बांधले जातात. गोल आकाराचे इन्फिनिटी स्कार्फ मानेभोवती गुंडाळले जातात. हे स्कार्फ वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये मिळतात. कोणत्याही त्रासाशिवाय स्कार्फ बांधणे या स्कार्फमुळे शक्य होते. नेक स्कार्फ आणि हेड स्कार्फ असे गरजेनुसार पर्याय स्कार्फमध्ये मिळतात. वुलन पिंट्रेड सॉक्स मुलींमध्ये त्याच्या 'क्यूट' फॅक्टरमुळे सध्या हिट आहे. स्वेटर, स्कार्फ इतकेच लक्ष विंटर शूजकडेसुद्धा दिलं जातं. लो कट बुटीज, अँकल बूट्स, गुडघ्यापर्यंत येणारे नी हाय बूट्स फॅशन म्हणून वापरले जातात. खरं तर हे बूट अतिथंड प्रदेशात वापरायला योग्य. पण ग्लोबल फॅशन ट्रेण्डमुळे परदेशातले सीझनल ट्रेण्ड आता भारतातसुद्धा पाहायला मिळतात आणि आवर्जून खरेदी केले जातात हे विशेष.

No comments:

Post a Comment