एक में भले दो
मेसेजिंग, फोटो, व्हिडीओज शेअरिंगचा स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे व्हॉट्सअॅप. एकच सिमकार्ड असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरताना काहीच अडचण नसते. पण ड्युअल सिम वापरणाऱ्यांना व्हॉट्सअॅप वापरताना अडचण येते. अनेकजण खासगी कामांसाठी एक आणि व्यावसायिक कामांसाठी एक असा ड्युअल सिम फोन वापरतात. पण एकच व्हॉट्सअॅप एकाचवेळी ड्युअल सिमसाठी कसं वापरता येईल असा प्रश्न पडतो. स्विच मी अॅपच्या मदतीने एकाच डिव्हाइसवरून वेगवेगळ्या अकाऊंटवर लॉग इन आणि लॉग ऑफ करता येतं. एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप अकाऊंटस कशी वापरायची यासाठी काही टिप्स आम्ही देतोय. सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये स्विच मी अॅप डाऊनलोड करा.'स्विच मी अॅप'मध्ये कोणत्याही नावाने प्रायमरी प्रोफाइल तयार करा. या प्रोफाइलमध्ये तुमची सध्याची सेटिंग्ज, डेटा, आणि अॅप्स साठवला जाईल. पहिलं व्हॉट्सअॅप अकाऊंट 'स्विच मी'मध्ये तयार केलेल्या प्रायमरी प्रोफाइलवरून वापरू शकता.
आता दुसरं व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरण्यासाठी स्विच मी अॅपमध्ये प्रायमरी प्रोफाइलप्रमाणे सेकंडरी प्रोफाइल तयार करा.
सेकंडरी प्रोफाइलमध्ये कुठलाही डेटा, सेटींग्ज, अॅप्स साठवली जात नाहीत. सेकंडरी प्रोफाइलमधून व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी फोनमध्ये पुन्हा व्हॉट्सअॅप डाऊनलोड करावं लागेल.
'स्विच मी' अॅपमध्ये तयार केलेली दुसरी प्रोफाइल अॅक्टिव्हेट करून दुसरं व्हॉट्सअॅप इनस्टॉल करा.
हे व्हॉट्सअप अकाऊंट अॅक्टिवेट करण्यासाठी दुसरा मोबाईल नंबर द्या.
काही क्षणातच दुसरं व्हॉट्सअॅप अकाऊंट अॅक्टिवेट होईल.
परत पहिलं व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरायचं असेल तेव्हा 'स्विच मी अॅप'च्या सेकंडरी प्रोफाइलमधून बाहेर येऊन प्रायमरी प्रोफाइल अॅक्टिवेट करा.
अशा प्रकारे कुठलीही अडचण न येता दोन व्हॉट्सअॅप अकाऊंटस एकाच फोनमध्ये वापरता येतील.
No comments:
Post a Comment