Selection of Bra and Panties
योग्य अंतर्वस्त्रांची निवड
करीना कपूर खान
बोर्डिग स्कूलमुळे आयुष्यात खूप काही शिकायला मिळते. मुलींना शिस्त, शिष्टाचार, आज्ञाधारकपणा, पुस्तके इत्यादी गोष्टीचे विशेष महत्त्व कळते. आणखी एक गोष्ट कळते.. अंतर्वस्त्रांची योग्य निवड. कोणतीही मुलगी तुम्हाला हे सांगेल की, गणवेशातला हा किती महत्त्वाचा भाग आहे. बोर्डिग स्कूलमध्ये तुम्ही सगळेच बरोबर मोठे होत असता. त्यामुळे आतल्या कपडय़ांवर चर्चा ह्य़ा होतातच. एकमेकींच्या अनुभवावरून त्यांचे वेगवेगळे ब्रँड्स त्याबाबतचे सल्ले, त्यातले नवीन प्रकार, ज्याची तुमच्या आईलासुद्धा माहिती नसेल.
मला शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची कल्पना करायलासुद्धा नकोशी वाटायची. त्यामुळे माझ्याकडून त्याला विरोध करण्यासाठी जे जे शक्य असेल ते मी करायचे. वेलहॅम गर्ल्स स्कूलची प्रवेश परीक्षा मुद्दाम नापास होण्याची मी पूर्ण खबरदारी घेतली होती. पण माझी आई माझ्यापेक्षासुद्धा हट्टी असल्यामुळे
बोर्डिग स्कूलमध्ये आतल्या कपडय़ांबाबतचे माझे विचार थोडे पुराणमतवादी झाले. अजूनसुद्धा मला ज्यातून आतली ब्रा दिसेल असे पातळ झिरझिरीत टॉप्स घालायला आवडत नाही. शाळेत तर असले काही घातले असते तर मला शिक्षा झाली असती. त्यामुळेच असेल, पण जर जीन्सच्या वर पॅन्टी दिसत असेल तर मला अतिशय चीड येते. आपण मॉल्समध्ये अशा कितीतरी फॅशनेबल लो कट जीन्स घातलेल्या मुली, स्त्रिया बघतो आणि ज्या क्षणी त्या खाली वाकतात, तेव्हा त्यांची केल्वीन क्लाइनची कड दिसते किंवा त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचे शरीर उघडे स्पष्ट दिसते. शी:! किती घाणेरडेपणा! त्याला आपण अंतर्वस्त्र म्हणतो म्हणजेच ते बाहेर दिसता कामा नये. फक्त बाथरूम किंवा बेडरूममध्येच.
योग्य तीच ब्रा निवडा
मी 'व्हिक्टोरीयाज सिक्रेट'ची फॅन आहे. ह्य़ापेक्षा जास्त योग्यपणे ब्राचे महत्त्व मी सांगूच शकत नाही. तुमचा बांधा सुडौल दिसण्यात चांगल्या ब्राज्चा खूप मोठा वाटा आहे. लहान वक्षभाग असणाऱ्या मुलीसुद्धा पॅडेड ब्राज् घालून योग्य गोलाईचा आभास निर्माण करू शकतात. ज्यांचा हा भाग जरा जास्त मोठा असेल त्यांनीसुद्धा जर योग्य प्रकारच्या ब्राज् निवडल्या नाहीत तर त्या थकलेल्या वाकलेल्या दिसतात आणि ते अर्थातच बरे दिसत नाही.
ब्रा खरेदीचे माझे ३२ चे नियम आहेत- २-साईझ, २-सपोर्ट, २-सेक्सअपील!
साईझ
कित्येक स्त्रिया ज्या आयुष्यभर ब्राज् वापरत आल्या आहेत, त्यांना त्यांच्या ब्राचे नेमके मापच माहीत नसते. आपल्याला सगळ्यांना ३२C माप असणे आवडते. पण प्रत्येक स्त्रीचा बांधा, माप वेगवेगळे असते. जाड, बारीक, भरीव! त्यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. जर तुमचे माप ३४D असेल तर अंतर्वस्त्रांच्या दुकानात जाऊन तसे मागा.
नशिबाने हल्ली अशा बऱ्याच दुकानात हुशार चुणचुणीत मुली कामाला असतात. ज्या तुम्हाला तुमचे योग्य माप घेऊन त्या मापाच्या ब्राज् शोधून घ्यायला मदत करतील.
एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, प्रत्येक वेळेस वजन कमी किंवा जास्त झाले तर आपल्या छातीचे मापसुद्धा कमी जास्त होते. माझ्या वाचनात असे आले होते की, स्त्रियांचे ब्राचे माप हे आयुष्यभर बदलत राहाते. जेव्हा मी वजन कमी केले व साईज झीरो झाले तेव्हा अर्थातच माझ्या कमरेच्या वरच्या भागाचे माप कमी झाले. पण जसजसे पुन्हा वजन वाढले तसतसे तेसुद्धा वाढत गेले. त्यामुळे माझे ब्राचे मापसुद्धा बदलावे लागले नाही तर त्या लहान ब्राज्मध्ये श्वास घेणे मुश्कील झाले असते.
दर थोडय़ा महिन्यांनी जेव्हा तुम्ही नवीन अंतर्वस्त्र खरेदी करता तेव्हा प्रत्येक वेळेस तुमचे माप घेऊनच ती खरेदी करा. योग्य माप असेल तर ती तुमच्या पाठीला, खांद्याला काचणार, रुतणार नाही. पट्टय़ांमुळे ब्रा व्यवस्थित जागच्या जागी बसणे अपेक्षित आहे. ब्रा जर का मोल्डेड किंवा सॉफ्ट होजिअरी असेल तर ती अंगासरशी घट्ट बसणेच अपेक्षित आहे. त्यात चुण्या पडणे, जागा राहाणे अपेक्षित नाही. तसे जर होत असेल तर तुम्हाला नवीन ब्राजची आवश्यकता आहे. भारतात काही काही ब्रँड्स ठरावीक मापाच्या ब्राज् ठेवतच नाहीत. हे अतिशय चुकीचे आहे. पण म्हणून चुकीच्या मापाच्या मात्र घेऊ नका.
अगदी महागाईच्या 'लापर्ला' किंवा पैसा वसूल 'मार्क्स अँड स्पेन्सर' कोणताही ब्रँड असू दे घालून बघितल्याशिवाय तुम्हाला कोणती व्यवस्थित बसते तुम्हाला कळणार नाही.
सपोर्ट
कोणत्याही चांगल्या सहकाऱ्याप्रमाणेच तुमच्या ब्रानेसुद्धा तुम्हाला अवघड प्रसंगी आधार देणे अपेक्षित असते. जर तुम्ही छातीकडे भरलेल्या असाल तर नाजूक बारीक पट्टे असलेल्या ब्रा घेण्यात काहीच अर्थ नाही. उगाच दिवसभर ते वरखाली ओढण्यातच सगळे लक्ष जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या कपडय़ांमध्ये त्याचे कापड, गळा ह्य़ावर ब्राचा प्रकार अवलंबून ठेवावा लागतो. आपल्या छातीला व्यवस्थित आधार आणि आकारसुद्धा देईल अशीच ब्रा असायला हवी.
तुमच्या चणीसाठी कोणती निवडाल?
बाल्कोनेट
थोडय़ा लहान चणीच्या स्त्रियांसाठी हा योग्य प्रकार आहे. खोल गळ्यांच्या पोशाखाच्या आत त्या छान दिसतात. त्यामुळे Cleavage व छातीचा आकार उठावदार दिसायला मदत होते. आमान्ते ही कोणत्याही दुकानात मिळणारी एक छान बसणारी बाल्कोनेट ब्रा आहे.
पुश-अप
पुश-अप हा प्रकार खूप लोकप्रिय होतो आहे. 'वंडरब्राने' लहान चणीच्या स्त्रियांसाठी ही कमाल केली आहे. या घातल्यानंतर अधिक सुडौलपणा आणि गोलाई जाणवते. या प्रकारात ला सेन्झा आणि ट्रायम्फ यांचे परवडण्याजोगे आणि अनेक रंगांतले पर्याय उपलब्ध आहेत.
अंडर वायर फुल कप
टी शर्ट
प्रत्येक मुलींकडे टी शर्टच्या आत घालायला शिवण दिसणार नाही अशी ब्रा हवीच. मी तर नेहमी आतले कपडे खरेदी करताना घट्ट बसणारा टी शर्ट घालून जाते. त्यामुळे आपण जे खरेदी करतो ते आपल्याला योग्य तऱ्हेने बसते आहे, हे कळते.
स्ट्रॅपलेस
स्पोर्ट्स ब्रा
व्यायाम करणाऱ्या सर्वासाठी ही अत्यावश्यक. ती घेतल्याशिवाय जिमला जाणे अशक्यच. त्या तशा जाड व दणकट बनवल्या जातात. ट्रेडमिलवर धावताना किंवा इतर व्यायाम करताना सर्व जागच्या जागी ठेवण्यात ह्य़ांचा सहभाग मोठा असतो. कोणतेही खेळाचे कपडे बनवणारी कंपनी जसे नाइके, आदिदास किंवा लॅकोस्टच्याच स्पोर्ट्स ब्रा चांगल्या असतात. इतर साध्या नकोतच.
न्यूड ब्रा
बऱ्याच वेळा बायकांना असा प्रश्न पडतो की, माझा पांढरा ड्रेस जरासा पातळ आहे. मग मी आता कोणती ब्रा वापरू? तुम्हाला काय वाटले उत्तर पांढरी असे असेल? चूक- अगदी काळी घालण्यापेक्षा पांढरी बरी! पण खरे, उत्तर आहे ते त्वचेच्या रंगाची. त्यामुळे सर्वत्र सारखा रंग दिसतो व ब्रा वेगळी उठून दिसत नाही. पण अर्थातच खूप फिक्या रंगाचे टॉप असतील तरच. काळ्या शर्टच्या आतून नाही. नाहीतर आत काहीच घातले नसल्याचा भास होईल. जर माझ्यासारखे तुम्हालासुद्धा कॅमेऱ्यासमोर उभे राहावे लागणार असेल तर आयुष्यभर, तुम्हाला त्या फोटोचा पश्चात्ताप करत बसावा लागेल.
कॉरसेट
No comments:
Post a Comment