आपल्याकडे अनास्था आहे. योग्य मापाची ब्रा वापरणं स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या 'व्हिवा'मध्ये या बोलायला अवघड पण आवश्यक अशा विषयासंदर्भात चर्चा केली आहे.स्त्रियांची अंतर्वस्त्रं हा आपल्याकडे गोपनीयतेचा विषय मानला जातो. त्याविषयी चर्चा तर सोडाच, चारचौघात 'ब्रा'चा उच्चार करणंसुद्धा पाप असल्यासारखं वाटतं. आधुनिक कपडय़ांमध्ये आत्मविश्वासपूर्वक वावरायचं असेल तर अंतर्वस्त्रांची निवडही अचूक असायला हवी. नेमकी याविषयीच
स्त्रियांची अंतर्वस्त्रं हा आपल्याकडे गोपनीयतेचा विषय मानला जातो. त्याविषयी चर्चा तर सोडाच चारचौघात 'ब्रा'चा उच्चार करणंसुद्धा पाप असल्यासारखं वाटतं. त्यामुळेच की काय, अंतर्वस्त्रांबाबत, त्यातल्या प्रकारांबाबत, उपलब्धतेबाबत आजच्या भारतीय मुलीला अगदी कमी माहिती असते. परिणाम - अयोग्य मापाची अंतर्वस्त्रं वापरणं. आजची मुलगी अनेक बाबतीत आधुनिक झालीय, फॅशन कॉन्शस झालीय. वेगवेगळ्या स्टाइलचे, वेगवेगळ्या आधुनिक प्रकारचे कपडे घालणं तिला आवडायला लागलंय. पण अशा कपडय़ांसाठी आवश्यक असणारी अंतर्वस्त्र मात्र ती त्याच जुन्या पद्धतीची वापरतेय, किंवा अयोग्य पद्धतीनं वापरतेय. त्यामुळे फॅशनेबल कपडय़ातसुद्धा काही मुली बेंगरुळ दिसतात. त्यातून त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि कायमचा न्यूनगंड मनात तयार होतो.
आधुनिक कपडय़ांमध्ये आत्मविश्वासपूर्वक वावरायचं असेल तर अंतर्वस्त्रांची निवडही अचूक असायला हवी. योग्य मापाची ब्रा वापरणं स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या 'व्हिवा'मध्ये या बोलायला अवघड पण आवश्यक अशा विषयासंदर्भात चर्चा केली आहे. एका मोठय़ा हॉस्पिटलशी संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलतानाही या विषयी आपल्या स्त्रियांच्या मनात किती अनास्था असते याची जाणीव झाली. 'महागडे, फॅशनेबल कपडे घालणाऱ्या स्त्रिया अंतर्वस्त्रांबाबत कमालीची अनास्था दाखवतात. थोडे पैसे या गोष्टीवरही खर्च करा, असं त्यांना म्हणावंसं वाटतं', हा त्यांचा अनुभव.
अंतर्वस्त्रं हा तसा खासगी मामला. इंग्रजीत याला ब्रीफ्स म्हणतात. छोटी पण महत्त्वाची गोष्ट. पण आपल्याकडे आहे तितकी दुर्लक्षित ही इतरत्र कुठेही नाही. पाच मिनिटात होणारी ही खरेदी. दुकानात जाऊन खाली बघत सांगितलेला साईझ आणि त्यावर तो देईल तो ठरलेला माल घेऊन परत यायचं.
पण हल्ली मोठय़ा शॉपिंग मॉलमध्ये लाँजरीज (Lingeries.. याच्या स्पेलिंगनुसार उच्चार करण्याची चूक कधीही करू नका.) असा मोठा सेक्शन दिसायला लागलाय. त्यातले प्रकार, साईझ यांचं वैविध्य किमान नजरेत आलंय. त्यामुळे थोडी जागरूकता यायला लागली आहे. तरीही आपल्यासाठी कोणता प्रकार योग्य हे ठरवायला मात्र आणखी थोडी माहिती असणं आवश्यक आहे.
ड्रेसचं वैविध्य आणि त्यातल्या वेगवेगळ्या स्टाइल जितक्या चटकन आत्मसात केल्यात तेवढी तत्परता या खासगी खरेदीत आपण अद्याप दाखवलेली नाही. किंबहुना हा विषय अनेक मुलींना फार महत्त्वाचा वाटतच नाही.
ब्रा किंवा पँटीची योग्य निवड करण्याचा पहिला आणि महत्त्वाचा बेसिक निकष कोणता तर, ती बाहेर दिसता कामा नये. अंतर्वस्त्र याचाच अर्थ ती वस्त्र कपडय़ांमधून बाहेर डोकावता कामा नयेत. लो वेस्ट जीन्समधून खाली वाकल्यावर दिसणारी कडा किंवा इनकट्सच्या टॉपमधून डोकावणारा पांढरा पट्टा अगदीच वाईट दिसतो. हे आपल्यालाही कळत असतं. मग असे कपडे घातल्यानंतर आपला अर्धा वेळ आणि पूर्ण लक्ष बाही नीट करण्यात किंवा कपडे सावरण्याकडे जातं. अजाणतेपणी आपण आपला कॉन्फिडन्स गमवायला लागतो. म्हणूनच असे बोल्ड कपडे वापरायचे असतील, तर त्याच्या आत सुयोग्य कपडे वापरणं आवश्यक आहे.
हल्ली बाजारातल्या फॅशनेबल कपडय़ांवर नजर टाकली तर लक्षात येईल की, लो कट टॉप्स, नूडल स्ट्राईप्स, इनकट्स असे अनेक प्रकार दिसताहेत. आपणही असे कपडे घ्यावेत आणि वापरावेत असं अनेक मुलींना वाटतं, पण ते आपल्याला कसं दिसेल याची पहिली चिंता असते आणि त्याच्या आत काय घालायचं ही दुसरी मोठी चिंता असते. वेगवेगळ्या आऊटफिट्सची वेगवेगळी गरज असते. हे लक्षात घेऊनच त्यांची निवड करावी लागते. काळ्या सेमी ट्रान्स्परंट ड्रेसच्या आत घालायची ब्रा कशी हवी आणि पांढऱ्या ट्रान्सपरंट ड्रेसच्या आत कशी ब्रा हवी, याचं उत्तर काळी आणि पांढरी इतकं साधं सोपं नाहीय. ड्रेसची गरज आणि तुमचा कंफर्ट बघून योग्य 'ब्रा'ची निवड करायला हवी.
No comments:
Post a Comment