Monday, December 22, 2014

Marathi Story - Nakushi

 Marathi Story - Nakushi

नकुशी


माझे बाबा हे आजी, आजोबांचे एकुलले एक, लाडके चिरंजीव होते. आजोबांची गडगंज इस्टेट, शेती, मोठा वाडा, गाई-वासरे, दूधदुभते सार्‍यांची रेलचेल होती. आजी तर नखशिखांत सोन्याने मढलेली होती. त्यावेळी अंगावर सर्व दागिने असावयाचे. आजी दिसायला सुंदर, ठसठशीत, मनमिळावू व आला गेला सांभाळण्यात मग्न असायची. घरात गडी-माणसे, कामाला बायका असून देखील आजी स्वतः सगळीकडे लक्ष पुरवायची. सकाळी लवकर उठून जी कामाला लागायची ती झोपेपर्यंत. पण कधी कुठलीचा तक्रार तिची नसायची. शेती भरपूर असल्यामुळे शेतीतील डीग्री माझ्या बाबांनी घेतली. शेतीत चांगलेच लक्ष घातले व आजोबांना मदत केली. यथावकाश त्यांचे लग्न झाले. आई देखील त्यांना साजेशीच होती. बाबा एकटेच असल्यामुळे आईचे देखील खूपच घरात लाड होत होते. आई सुखात होती. सुखाचे दिवस जावयास वेळ लागल नाही. आजी तर आईचे खूपच लाड करायची. आजीला तिला कुठे ठेवू नि कुठे नाही असे झाले होते. प्रत्येक सण हौशीने करून ती आईचे कौतुक करायची.
वर्षाच्या आत घरात पाळणा हलणार हे समजल्यावर तर आजीला माझ्या आईला कुठे ठेवू नि कुठे नाही असे झाले. वंशाला दिवा हवा ही आशा आजीने मनात ठेवली होती. आईचे गाव म्हणजे माझे आजोळ हे खूपच खेड्यातील होते म्हणून आईचे बाळंतपण सासरी म्हणजे आजीकडे करण्याचे ठरले. बाबा तसे खूपच कामात असायचे व जरा अबोल होते. पण आईवर व्यांचे मनापासून प्रेम होते. श्रावण महिना कृष्णअष्टमी. बाहेर खूप पाऊस पडत होता व आईने जुळ्या बहिणींना जन्म दिला. नवीन बाळांचे कौतुक करण्यापेक्षा घरात काय होते? काळ खूपच जुना होता. त्यामुळेे आतासारख्या टेस्ट वगैरे नव्हत्या. जे पदरात पडेल त्याचा स्वीकार करणे हा एकच मार्ग होता. मुली हळूहळू लहान्याच्या मोठ्या होऊ लागल्या. पण घराण्याच्या नावलौकिकाप्रमाणे बारशाचा कार्यक्रम झाला. जाई-जुई हे नाव ठेवण्यात आले. आई आनंदात होती. तिला तर दोघींचे करण्यात वेळ पुरत नव्हता. चंद्राच्या कलेेप्रमाणे दोघी बहिणी मोठ्या होऊ लागल्या. आजी खूपच नाराज झाली. आपल्याला नातू दिसेल की नाही हाच ध्यास तिने घेतला.
पुन्हा दोन वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती झाली. या वेळेस तरी नक्कीच मुलगा होणार हा सर्वांचा विश्वास. आईने तर धास्तीच घेतली. पुन्हा तिसरी मुलगी. ती मुलगी म्हणजे मी. जन्मापासूनच मी ‘नकुशी’ झाले. माझ्याकडे कुणी बघेना तर लाड करणे कुठले? पण आईला सर्वच मुलेे सारखी असतात ना. ती पण माझा राग करू लागली. माझे बारसे नाही की नाव ठेवणे नाही. पण माझे नामकरण हे देव्ह्यार्‍यातील देवासमोर झाले. माझे नाव ‘अबोली’ ठेवण्यात आले. नावाप्रमाणे मी खरोखरच अबोल होती माझ्या वडिलांप्रमाणे. यथावकाश आम्ही तिघी बहिणी शाळेत जाऊ लागलो. मी जाईजुईपेक्षा २ वर्ग मागे होते. मी वर्गात हुशार होते पाहिला नंबर कधी सोडला नाही. मोठे होऊन खूप शिकायचे, डॉक्टर व्हायचे व मुलाची उणीव भरून काढायची हेच माझे स्वप्न होते. पण घरी पैसा असून देखील माझ्या शिक्षणाला पाठिंबा मिळाला नाही. खूप वाईट वाटले. आपले स्वप्न अपुरेच राहणार पण माझी मावशी देवासारखी धावून आली व तिने माझ्या आई-बाबांना सांगितले की मला तर देवानेे मूलबाळ दिले नाही. माझी कूस उजवली नाही. घरी गडगंज श्रीमंती आहे. मी विचार करून निर्णय घेतला आहे व मी ‘अबोली’ ला माझ्या घरी घेऊन जावे. तिला खूपच शिकवून डॉक्टर करीन व नंतर तुमच्या घरी आणेल. आईला वाईट वाटले पण मोठ्यांसमोर तिचे काहीच चालेना. डोळ्यात पाणी आणून तिने मला मावशीच्या स्वाधीन केले. आईच्या डोळ्यातील अश्रू मला बघवेना. पण मी सर्वांचा निरोप घेऊन निघाले व मावशी बरोबर गेले.
त्यावेळी डॉक्टर होणे कठीण नव्हते. आजीचे म्हणणे बाबांनी मुलाकरिता तरी दुसरे लग्न करावे. पण बाबांना ते मान्य नव्हते. त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचे ठरविले. माझी लहान मुलगी हीच माझा मुलगा पण असणे आणि मानणे यात जमीन-अस्मानचा फरक असतो. त्यांना आजीच्या हट्टापुढेे काहीच बोलता येईना. मोठ्या बहिणींची लग्न झाली त्या आपल्या घरी गेल्या. आई खंगत चालली होती. तिने माझा ध्यास घेतला पण मी शिक्षणात इतकी गुंग झाले की मला सगळाच विसर पडला. मी डॉक्टरची पदवी घेतली. कृतकृत्य झाले. आता मी आई-बाबांचा मुलगा होऊन त्यांची सेवा करणार. आजी-आजोबांना आनंद देणार ह्या विचारानेे मी आनंदले. आईने तर अंथरूणच धरले होते. मी माझी डिग्री दाखविण्यास माझ्या आईकडे आनंदाने गेले पण ते बघण्याचे सुख तिच्या नशिबी नव्हते. ती हे जग सोडून निघून गेली होती. मला सेवा करण्याची संधीच तिने दिली नाही.
कौतुक करण्याला आई-वडील दोघांची साथ लागते. मी गहिवरल्या डोळ्याने आईच्या फोटोकडे बघितले आणि अश्रूंना वाट करून दिली. मी शिकले, डॉक्टर झाले पण तुझी सेवा करण्याचा मला मोका मिळाला नाही. मला माझ्यावरील ‘नकुशी’ हा डाग धुऊन काढावयाचा होता पण मी हरले. मी आता नकुशीच राहाणार. लोकांच्या दुष्टीने मी मोठी डॉक्टर असणार पण आपल्या घराण्यात नकुशी म्हणून माझे नाव रहाणार. माझी ही व्यथा मी कुणाला सांगू? कुणाजवळ माझे मन मोकळे करू. कारण माझे नावच मुळी अबोली आहे. मी माझी व्यथा सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. लग्न न करता मी सर्व गरिबांची सेवा करण्यात माझे आयुष्य घालवीन आई. म्हणजे तरी तुझ्या आत्म्याला शांती मिळेल.
तुझी दुर्दैवी-
अबोली

My dad is a grandmother, a grandfather ekulale, was dear son. Grandpa gadaganja estate, agriculture, mansion, Guy-calves, dudhadubhate Muslims were helpful. Cap-a -pie gold madhaleli the grandmother. When put on the ornaments doing. Granny look beautiful, sonorous, and would fain maintaining went manamilavu was. Man-men in the house, and also to provide attention to the work of women around itself grandmother. Which she had to work myself up early in the morning. But when any guide her complaint. Since a lot of the agricultural farm got my degree. Helped put the focus on good agricultural and grandpa. Of course, they were married. I was also going to them. Baba alone because his mother was also not indulge too much in the house. I was enraged. Euthanasia is not the time for lying to the day. If you want to indulge such grand mother. Where her grandmother was not where to put free. She appreciated by every mother to San amateur.

This Mobile cradle house within a year he had understood, but do not understand where to put it where my mother free. The lamp should hope grandmother had kept in mind. My mother's village is ajola was to receive maternity mother's wish that this village was so much. Baba so much work on board and was a little tight-lipped. But the mother vyance love truly. Shravan month krsnaastami. And the mother gave birth to twin sisters, falling out of a lot of rain. What was new babies in the house than to appreciate? Much time was used. Tyamulee atasarakhya not test anymore. Which was the only way to be accepted into. Girls were not large lahanya gradually. But the house of navalaukikapramane barasaca the program. Jasmine-jui was put there name. I was happy. If she was not tendered to the time suckers. As the two sisters of the moon kaleepramane be large. She was really upset. She took us to see the future is not the grandson.

History was repeated again two years later. Of course, all of this is believed to be the son of one time. If the mother dhastica. Re hookers. She is me. Birth, I nakusi became. Which indulge me if anyone desire? But the mother of all children are the same. But it was not my anger. Not to put my name's not christening. But my name was there before devhyaryatila. My name is 'tight-lipped' was kept. Vadilampramane I was really tight-lipped name. Of course we had to go to school sisters tighi. I was already more than class 2 jaijui. I do not ever watched a number of subtle class. And learn a lot of great, filling defect is removed and the child was my dream to become a doctor. It has also not received the money home to support my education. I felt very bad. Your dream will come to the rescue, but apureca God, my aunt and her children, God has not given me that my mother-Baba said. I do not ujavali side. There is wealth gadaganja. I have taken a decision, and I think 'taciturn' to be brought to my house. The doctor will then bring her to such effect in your home. I felt bad, but nothing like mothyansamora her mother. Bring the water in the eye, she gave me of the loss. Baghavena my mother's tears eye. But I went along, and all bearing the message loss.

At that time it was not difficult to become a doctor. Mother say to another man's wife when Baba son. But they did not agree with Baba. He decided to adapt. My little daughter, and consider it to be the same, but my son is a difference between land-asmanaca. They could not wear anything hattapudhee grandmother's. The last home of his sisters married. I had gotten decline. She had an obsession with me, but I have forgotten sagalaca I was so absorbed in learning. I took a doctor's degree. Pain was. Now, I will serve them and the mother-son Baba. I thought this grand-grandpa will enjoy anandale. If the mother had caught antharunaca. I went with my mother to see the joy of my degree, but they did not end her pleasure it contains. She was gone from this world. She gave me the chance to serve.

Parents need to be made with a combination of appreciation. I looked at the photo of the mother's eye and gave vent gahivaralya tears. I learned, was a doctor, but I did not serve to embrace. Me me 'nakusi this spot, but I was washed kadhavayaca loses. I shall now nakusica. But I would be a great doctor of the dustine my name as your house nakusi. I tell my suffering to someone? Saying to free my mind. The reason is tight-lipped think my O. I can not tell my suffering, can not speak. I removed all my life without being married to the mother of poor service. So when you get the peace of the soul.

your durdaivi

tight-lipped

No comments:

Post a Comment