शिवसेना खासदारांनी केलेल्या 'चपाती राड्या'नंतर आता दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात मराठमोळं जेवण मिळण्यास सुरुवात झाली आहे. महिला बचत गटाकडे हे काम सोपवण्यात आलं असून सदनात सुग्रास जेवण मिळू लागल्यानं शिवसेनेचा लढा यशस्वी झाल्याचं बोललं जातंय.
दिल्लीतल्या आधीच्या महाराष्ट्र सदनात उत्तम दर्जाचं जेवण मिळत असे. त्याची ख्याती संपूर्ण राजधानीत होती. परंतु, नव्या महाराष्ट्र सदनात कँटिनची सूत्रं आयआरसीटीसीकडे सोपवण्यात आली आणि खासदारांचे जेवणाचे हाल सुरू झाले. त्यांना चविष्ट सोडाच, पण खाण्यायोग्य जेवणही मिळेनासं झालं. सन्मानजनक वागणूक नाही आणि त्यात भर म्हणून 'रबरी' पोळ्या खायला लागल्यानं शिवसेना खासदारांच्या रागाचा उद्रेक झाला आणि त्यांनी आपल्या 'स्टाइल'नं आंदोलन केलं. त्यांच्या या 'चपाती राड्या'मुळे देशभरात गहजब झाला असला, शिवसेनेवर टीकेची झोड उठली असली, थोडीशी धार्मिक तेढ निर्माण झाली असली, तरी त्यांच्या या लढ्याला चांगलंच यश आलं आहे. महाराष्ट्र सदनातील कँटिनचा नजारा आता पालटला आहे आणि तिथे अस्सल मराठी जेवण मिळू लागलं आहे.
तसंही, शिवसेनेच्या दणक्यानंतर आयआरसीटीसीनं महाराष्ट्र सदनाच्या कँटिनमधून गाशा गुंडाळायला सुरुवात केलीच होती. त्यांनी तिथून पळ काढल्यानंतर, खासदारांच्या शिफारशीनुसार कँटिनचा ताबा विजयश्री महिला बचत गटाकडे देण्यात आला आहे. प्रभा रावत यांच्या देखरेखीखाली बचत गटाचे १७ कर्मचारी महाराष्ट्र सदनात खमंग, चमचमीत, चटपटीत जेवण बनवण्याचं काम चोख करत आहेत.
महाराष्ट्र सदनाच्या कँटिनमध्ये गेल्या शुक्रवारपासून वरण-भात, शिरा, कोल्हापुरी पद्धतीचं चिकन हे मराठमोळे पदार्थ मिळू लागलेत. सगळे कर्मचारी आणि वेटर मराठी असल्यानं सदनातील वातावरणही मराठमोळं होऊन गेलंय. विशेष म्हणजे, हे कर्मचारी आवर्जून सगळ्या येणाऱ्या-जाणाऱ्यांशी मराठीतच बोलतात. अर्थात, सदनातील कामाच्या मानानं कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे अजून मोजकेच पदार्थ आम्ही सुरू केलेत. पण हळूहळू ही यादी नक्कीच वाढत जाईल आणि इथे येणारे सगळेच तृप्तीचा ढेकर देऊन बाहेर पडतील, असा विश्वास प्रभा रावत यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र सदनातील या सुखद बदलाला शिवसेनेचं आंदोलनच कारणीभूत ठरलंय. त्यामुळे कँटिनच्या जेवणाचा आस्वाद घेणारे सगळेच शिवसेनेला मनोमन शाबासकी देत आहेत.

No comments:
Post a Comment