Saturday, July 19, 2014

Avoid these apps ही अॅप्स टाळा


pic

नेटबँकिंग असो, तिकिटे काढणे असो किंवा बिल भरणे असो या सर्व कामांसाठी स्मार्टफोन एक वरदान ठरत आहे. मोबाइल पाठोपाठ विकसित झालेल्या या स्मार्ट उपकरणाने जरी सर्वांना वेड लावले असले तरी, त्याच्यामुळे अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे हे नक्की! अर्थातच. ज्यांच्या घरात पौगंडावस्थेत आलेली, किशोरावस्थेत असणारी आणि वयात आलेली मुले आहेत, त्यांनी स्मार्टफोनचा अगदी धसकाच घेतला आहे. त्याला कारण त्यावर असणारे अॅप्स होय. गेम खेळण्यापर्यंत ठीक आहे; परंतु, आजची तरुण पिढी त्याही पुढे गेल्याचे दिसून आले आहे. गेमव्यतिरिक्त मोठ्या संख्येने आणि तेही चकटफू असणाऱ्या धोकादायक अॅप्समुळे पालकवर्ग मोठ्या प्रमाणावर चिंतीत आहे.

मुलं दिवसभर नेमकं काय करतात, हे पालकांना बघणं शक्य नसलं तरी खालील अतिधोकादायक अॅप्सपासून मुलांना किमान दूर ठेवणं तरी पालकांच्या हातात आहे. ते त्यांनी नक्की करावं, यातच त्यांचं आणि त्यांच्या पाल्यांचं भलं आहे. यापैकी नाही अॅप्सच्या वापरासाठी वयोमर्यादेची अट लागू असते; पण मुलं त्याकडे दुर्लक्ष करतात. बहुतांश अॅप्सना सुर​क्षा, सुरक्षितता आणि खासगीपणासंदर्भात काही सेटिंग असतात. त्यांच्याकडेही दुर्लक्ष केले जाते.

किक मेसेंजर : लहान मुलांसाठी अतिघातक असणाऱ्या अॅपमध्ये किक मेसेंजरचे स्थान अतिशय वरचे आहे. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर यूजर सतरा वर्षांचा आहे अथवा त्यापेक्षा अधिक वयाचा आहे, याची खातरजमा करून घेते. त्याव्यतिरिक्त कोणतीही तपासणी होत नाही. त्यानंतर यूजर दुसरे जरी अॅप वापरत असला, तरी बॅकग्राउंडला हे अॅप सुरूच असते. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन कनेक्ट होणाऱ्या अन्य यूजरच्या मेसेजसाठी खुलेच राहते. त्यातून लहान मुलांनी पाहूच नये, असा कंटेंट तुमच्या स्मार्टफोनवर येण्यास सुरुवात होते.

व्हॉक्सर : एकमेकांची ओळख न पटवता शेअरिंग करता येणारे हे अॅप आहे. या अॅपमागील निर्मात्यांची भूमिका चांगली आहे. पण या अॅपवर सायबर क्राइम आणि धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकारांमुळे अनेक कुमारवयीन मुलांनी आत्महत्या केल्याचे प्रकारही घडले अहेत. एखादी पोस्ट शेअर करताना ओळख जाहीर करण्याची गरज नसल्याने यूजर अत्यंत वाईट पद्धतीने व्यक्त होतात.

यिक याक स्नॅपचॅट : लहान मुलांच्या खासगीपणाविषयी अनेक अडचणी या अॅपमुळे निर्माण झाल्या आहेत. या अॅपच्या माध्यमातून यूजर एकमेकांना फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकतात. पाठवल्यानंतर ते आपोआप डिलीट होतात. त्यामुळे अनेक तरुण स्नॅपचॅटचा उपयोग 'सेक्स्टिंग'साठी म्हणजेच लैंगिक विषयावरील मजकूर पाठविण्यासाठी करतात.

पोक टंबलर : हा एक लोकप्रिय मायक्रोब्लॉ​गिंग प्लॅटफॉर्म आहे. इथे पोस्ट होणारा मजकूर सहसा कोणाच्याही देखरेखीविना पोस्ट होतो. या अॅपमध्ये प्रचंड लैंगिक साहित्य भरलेले असल्याने टंबलरवर आपले मूल नेमके काय करते, याचा पालकांनी शोध घेण्याची गरज आहे.

व्हिस्पर : हे एक सोशल नेटवर्क असून, यूजर आपली व्यक्तिगत गुपिते उघड करू शकतो. इथे उघड झालेली गुपिते यूजर फेसबुक, ट्विटर अथवा टंबलरवर उघड करू शकतो. व्हिस्परवर क्रौर्य, सायबर क्राइम, वर्णवाद, फोमोफोबिया आणि अश्लीलता भरलेली असते.

No comments:

Post a Comment