Wednesday, July 30, 2014

‘एमआय-३’चे १० हजार हँडसेट पाच सेकंदात ‘खल्लास’ xiomi's mi3 handset finished in 5 seconds

'चले तो चाँद तक, नही तो शाम तक', अशी आपल्याकडे चिनी वस्तूंची 'ख्याती' असली, तरी सध्या भारताच्या मोबाइल बाजारपेठेत एका चायनीज कंपनीच्या मोबाइलनं हंगामा केला आहे. चीनमधील 'अॅपल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झीओमी कंपनीच्या 'एमआय-३' या भन्नाट स्मार्टफोनचे दहा हजार हँडसेट फ्लिपकार्टवर अवघ्या पाच सेकंदात विकले गेले आहेत. त्यामुळे सॅमसंगसह भारतीय मोबाइल कंपन्यांनाही धडकी भरली आहे.
MI-3
पाच इंची स्क्रीन, दोन जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल आणि ६४ जीबीपर्यंत वाढवता येणारी मेमरी, १३ मेगापिक्सलचा कॅमेरा, २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ४.३ अँड्रॉइड, अफलातून लुक, ही फीचर्स आणि किंमत १३,९९९ रुपये असल्यानं एमआय-३ बद्दल मोबाइलप्रेमींना प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात तो ऑनलाइन बाजारात, अर्थात फ्लिपकार्टवर दाखल झाला आणि पुढच्या ४० मिनिटांत १० हजार हँडसेटची विक्री झाली. पुढच्या दोन दिवसांत फ्लिपकार्टनं सगळ्या ऑर्डरची डिलिव्हरी दिली. तेव्हा, हा एमआय-३ 'याचि डोळा' पाहून सगळेच वेडावले. हा फोन घेतलाच पाहिजे, असं अनेकांना वाटलं. ते सगळेच फ्लिपकार्टवर बारीक लक्ष ठेवून होते. त्यामुळेच आज जेव्हा १० हजार हँडसेटची विक्री फ्लिपकार्टनं सुरू केली, तेव्हा अवघ्या पाच सेकंदातच हा सगळा स्टॉक संपून गेला. त्याहूनही थक्क करणारी गोष्ट म्हणजे, हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तब्बल अडीच लाख मोबाइलप्रेमी एकाच वेळी फ्लिपकार्टवर आले होते. त्यातून एमआय-३ बद्दलची क्रेझ अगदी सहज लक्षात येते.

आपल्या स्मार्टफोनला भारतात मिळालेल्या या उदंड प्रतिसादानं झीओमी कंपनी भारावून गेली आहे. एमआय-३चा पुढची विक्री ५ ऑगस्टला होईल, असं त्यांनी जाहीर केलं आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी नोंदणी करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.

Click on image to register to purchase this mobile phone.


Mi 3

No comments:

Post a Comment