आजच्या इंटरनेटच्या युगात प्रत्येकाला मेल आयडीची गरज लागते. तुमचं व्यावसायिक करिअर तर या मेल्सशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पण अचानक एखाद्या दिवशी तुम्हाला कोणाकडून कळलं की, तुमच्या मेल आयडीवरून काही अनपेक्षित किंवा अश्लील मजकूर असलेले मेल्स त्यांना गेले आहेत, तर? असं झाल्यास तुम्हालाही धक्का बसणं साहजिकच आहे. अशा वेळी नक्कीच तुम्हाला वाटेल की, तुमचा मेल आयडी कोणीतरी हॅक केला असावा. त्याच हॅकरनं अशा प्रकारचे मेल्स तुमच्या नावावर इतरांना पाठवले असावेत. परंतु हे हॅकिंग नसून निव्वळ एका साईटची कमाल आहे.
'फेकमेलर' या वेबसाईटच्या मदतीनं कोणतीही अज्ञात व्यक्ती तुमच्या मेल आयडीवरून कोणालाही फेक अर्थात खोटे मेल्स पाठवू शकते. हे करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन्ही व्यक्तींच्या ईमेल आयडींची गरज असते. या दोन व्यक्ती म्हणजे ज्याच्या अकाऊंटवरून मेल पाठवायचा आहे त्याचा इमेल आयडी आणि ज्याला पाठवायचा आहे, त्याचा इमेल आयडी. यात पासवर्डचीही अजिबात आवश्यकता नाही हे विशेष. त्यासोबतच इतर मेल साईट्सवर उपलब्ध असलेल्या सुविधाही इथे बघायला मिळतात. आपण या साईटवरून ज्याला मेल पाठवतो त्याला तर कळणारही नाही की, हा आलेला मेल फेक असून तो दुसऱ्या व्यक्तीने पाठवला आहे. पण मजेपलीकडे या वेबसाइटमुळे अनेक धोके उद्भवु शकतात. यामुळे कोणाचं नुकसानही होऊ शकतं. तसंच यातुन गैरसमज होऊन नातेसंबंध दुरावू शकतात. इतकंच नव्हे तर हा फेकमेल तुमचं व्यावसायिक आयुष्य तसंच तुमचं करिअरसुद्धा धोक्यात आणू शकतो. म्हणून कधीही कोणत्याही मेलबद्दल शंका वाटत असल्यास, त्याची आधी समोरच्या व्यक्तीकडून प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी. त्याची नीट खातरजमा करून घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आपण www.emkei.cz या वेबसाईटची मदत घेऊ शकतो.

No comments:
Post a Comment