मोबाइलवरून तुम्ही कुणाशी चॅट करता, कुणाला इमेल करता, हे सगळं तुमच्या जोडीदाराला आता बसल्याजागी कळू शकेल. जोडीदाराच्या व्हर्च्युअल आयुष्यावर 'वॉच' ठेवणं शक्य करणारं नवीन अॅप लाँच झालंय. या अॅपमुळे दुसऱ्या मोबाइलचा थेट अॅक्सेस मिळणं शक्य होणार आहे.
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी जोडपी आपल्या आजुबाजूला पाहायला मिळतात. पण कितीही प्रेम असलं तरी अनेकदा जोडीदाराविषयी मनात संशयही असतोच. आपला जोडीदार आपल्याला फसवत तर नाही ना अशी शंका काहींच्या मनात डोकावत असते. जोडप्यांच्या मनातल्या या संशयी वृत्तीचा फायदा घेत एक भन्नाट अॅप नुकतंच लाँच झालं आहे. 'एम कपल' असं या अॅपचं नाव असून त्याच्या मदतीने तुमच्या जोडीदाराच्या डिजीटल हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य होऊ शकणार आहे.
लंडनमधल्या एम स्पाय या कंपनीने एम कपल हे अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अॅपच्या मदतीने जोडीदाराच्या व्हर्च्युअल आयुष्यावर नजर ठेवता येणार आहे. यासाठी अट फक्त इतकी आहे की हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी जोडीदाराची संमती असणं गरजेचं आहे. या अॅपमुळे जोडीदाराच्या मोबाइलचा थेट अॅक्सेस मिळणार आहे. त्यामुळे या अॅपच्या मदतीने, जोडीदाराला फसवणा-यांना रंगेहाथ पकडणं सोप्पं होणार आहे. कंपनीकडून या अॅपची सेवा पालकांना मुलांवर आणि कंपन्यांना आपल्या नोकरदारांच्या डिजिटल अॅक्टिव्हीटींवर लक्ष ठेवण्यासाठी पुरवली जात होती. मात्र आता डेव्हलपर्सनी प्रेमीयुगुलांना टार्गेट करुन याचं मार्केटिंग सुरु केलं आाहे. मोबाइलने फोटो काढला किंवा शूट केलं की जोडीदाराला त्याचं नोटिफिकेशन जाईल. एकीकडे जोडीदारावर लक्ष ठेवता येणार असल्याने अनेकांनी या अॅपला पसंती दिली असली तरी दुसरीकडे वैयक्तिक प्रायव्हसीवर हे अॅप गदा आणत असल्याने या अॅपला विरोध होतोय. कुणावरही अशा प्रकारे लक्ष ठेवणं हे बेकायदेशीर असल्याचं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=com.love.monitor
काय होऊ शकेल?
या अॅपवरुन जोडीदाराच्या मोबाइलवरी फोन कॉल लिस्ट, सर्व प्रकारचे टेक्स्ट मेसेजेस, ईमेल्स आणि चॅट पाहता येणार आहेत.
याशिवाय स्काइप आणि फेसबुकवरील प्रत्येक अॅक्टिव्हीटी जोडीदाराला पाहता येऊ शकेल.
प्रामुख्याने स्काइप कॉनव्हर्सेशन आणि फेसबुक शेअर, लाईक केलेले फोटो आणि व्हिडीओ पाहता येतील.
जीपीएस सिस्टिमच्या मदतीने जोडीदाराचा मोबाइल नेमका कुठे आहे याचा शोध घेता येऊ शकेल.
कसं होतं डाऊनलोडिंग?
गुगल प्लेवरुन दोघांच्या फोनवर अॅप्लिकेशन डाऊनलोड करा
अॅप इन्टॉल केल्यानंतर दोघांनाही एक आयडी दिला जातो
दोन फोनमधील माहिती शेअर करण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या आयडीवर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवावी लागते.
ती रिक्वेस्ट जोडीदाराने कन्फर्म केल्यावर तुम्ही त्यांच्या मोबाईलमधील मेसेज, फोन, जीपीएस ट्रॅकिंग आणि फेसबुक अपडेट्सवर नजर ठेवता येईल.

No comments:
Post a Comment