Thursday, July 24, 2014

सावधान...नवा व्हायरस आलाय! - New virus Bladabindi

सावधान...नवा व्हायरस आलाय!


नकळत तुमच्या कम्प्युटरचा कॅमेरा सुरू झाला, तुम्ही की-बोर्डवर करत असलेल्या टायपिंगमध्ये आपोआपच फेरफार होऊ लागले लागल्यास तुमच्या कम्प्युटरमध्ये ब्लादाबिंदी (Bladabindi ) हा व्हायरस शिरल्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्याने समोर आलेला हा व्हायरस कम्प्युटरमधील माहिती हॅकर्सना पुरवितो आणि ते तुमच्या कम्प्युटरचा गैरवापर करतात. विशेष म्हणजे हा व्हायरस पसरविण्यासाठी सोशल मीडियाचीही मदत घेण्यात आली आहे. सुमारे ७५ लाख लोकांना या व्हायरस फटका बसला आहे.

सोशल मीडिया, काही चुकीच्या वेबसाइट, अनोळखी ईमेलवरून आलेल्या लिंक या माध्यमातून हा व्हायरस कम्प्युटरमध्ये प्रवेश करतो. कम्प्युटरमध्ये विचित्र नावाने फोल्डर किंवा आयकॉन तयार करून हा व्हायरस युजरला आकर्षित करतो. अन्यथा कम्प्युटरमधील ड्राइव्हच्या (सी, डी) नावानेही त्याचे शॉर्टकट सुरू दिसू लागतात.

त्यावर क्लिक केल्यावर इंटरनेट एक्स्प्लोअरर सुरू होतो व हा व्हायरस कम्प्युटरमध्ये प्रवेश करतो. प्रभावित कम्प्युटरला जोडलेल्या पेनड्राइव्हच्या माध्यमातून इतर कम्प्युटरमध्ये हा व्हायरस शिरतो. काहीवेळा तर स्टार्टअप फोल्डरमध्ये प्रवेश करून दरवेळी कम्प्युटर सुरू झाला की हा व्हायरस रन होतो. हा व्हायरस कम्प्युटरचा सीरियल नंबर, ऑपरेटिंग सिस्टीमची व्हर्जन, युझरची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवतो आणि त्या माध्यमातून हे हॅकर कम्प्युटरमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून त्यातील माहिती चोरतात. कॅमेरा सुरू करून युजरचे फोटो टिपतात, कम्प्युटर रिस्टार्ट होतो, काही सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल होतात किंवा की-बोर्डवर प्रेस होत असलेल्या बटनांच्या आधारे युझरनेम व पासवर्ड चोरून त्याचा गैरवापर करतात.

No comments:

Post a Comment