Wednesday, November 16, 2011

एका दारुड्याची कथा !

एका दारुड्याची कथा !

मागील आठवड्यापासून अचानकपणे ‘किंगफिशर’या विमान वाहतूक करणार्‍या खाजगी आस्थापनाचे मालक विजय मल्ल्या चर्चेत आले आहेत.त्यांचे आस्थापन आर्थिक तोट्यात आले असल्याने शासनाने अर्थसाहाय्य करावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. जनतेच्या खिशातून कररूपाने वसूल केलेला पैसा जर ‘मद्यसम्राट’ विजय मल्ल्या यांना शासनाने दिला, तर तो जनताद्रोह ठरेल !

विजय मल्ल्या, काँग्रेस शासन आणि पैसा !
    या निमित्ताने विजय मल्ल्या हे व्यक्तीमत्त्व पडताळून पहाण्याची संधी आली आहे. विजय मल्ल्या यांचा मुख्य व्यवसाय मद्यनिर्मितीचा आहे. ‘किंगफिशर’ असे त्यांच्या दारूच्या बाटलीचे नाव ! देशात आणि परदेशात ही दारू निर्यात केली जाते.तरुणांना व्यसनाधीन बनवून या माणसाने अमाप पैसा कमवला. मद्यनिर्मितीच्या क्षेत्रात त्यांच्या या आस्थापनेला तोडीसतोड स्पर्धक नसल्याचे म्हटले जाते. अशा या उद्योजकाने पुढे ‘किंगफिशर’ नावाची खाजगी विमान सेवा चालू केली. या आस्थापनाकडे प्रवासी वाहतूक करणारी एकूण ६६ विमाने आहेत. देशांतर्गत आणि देशाबाहेरील ८ देशांत ही विमाने फिरत असतात. विमान वाहतुकीतील धोरणांमध्ये शासनाने काही पालट करून करांमध्ये वाढ केली. त्यामुळे विजय मल्ल्या यांना एकही विमान उडवणे अशक्य वाटू लागले आणि त्यांनी तडकाफडकी चार दिवसांपासून सर्व विमाने बंद केली. एकप्रकारे दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न विजय मल्ल्या यांनी केला आहे. त्यांच्या या खोडसाळपणामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी शासन दरबारी अर्थसाहाय्याची भीक मागितली आहे. अनेक मंत्र्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे विजय मल्ल्या यांना यासाठी शासनाच्या तिजोरीतून पैसा मिळेल, याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही तसे सुतोवाच केले आहे. त्यामुळे सध्या यावर जोरदार चर्चा चालू झाली आहे.
विजय मल्ल्या यांचे बीभत्स छंद आणि पैशाची उधळपट्टी !
    विजय मल्ल्या यांचे व्यक्तीमत्त्व भोगवादी कुसंस्कृतीचे दर्शक समजले जाते. त्यासाठी अनेक छंद जोपासणारे मल्ल्या वर्षारंभी ‘किंगफिशर’ नावाची दिनदर्शिका प्रकाशित करतात. त्यासाठी तीन महिने ते ६ ते ७ नव्या ‘मॉडेल’ना घेऊन परदेशातील एखाद्या समुद्रकिनारी बस्तान मांडतात. तेथे या ‘मॉडेल’ची अर्धनग्न अवस्थेतील अथवा समुद्रात चिंब भिजलेल्या अवस्थेत मादक हावभावामधील छायाचित्रे काढतात अन् ती या दिनदर्शिकेवर छापतात. या दिनदर्शिकेच्या प्रकाशनासाठी ते कोट्यवधी रुपयांचा खर्च करतात. अश्लीलतेचे उघडउघड प्रदर्शन करणारी ही दिनदर्शिका प्रकाशित करून ते समाजात अश्लीलता पसरवत असतात. ‘आयपीएल्’ या झटपट क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत जुगाराप्रमाणे पैसा उधळण्याचा त्यांचा हा आणखी एक दुसरा छंद आहे ! याकरता ‘रॉयल चॅलेंज बँगलोर’ या नावाने त्यांनी संघ खरेदी केला आहे. त्यासाठी ४६४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच ‘फोर्स इंडिया’ नावाने चारचाकी वाहनांच्या स्पर्धेचे आयोजनही ते करतात, त्याकरता ६१० कोटी रुपये खर्च करतात. याशिवाय ‘इंडियन इम्प्रेस’ नावाचे आलिशान जहाज त्यांच्या मालकीचे आहे. त्याची किंमत ४५० कोटी आहे. ‘किंगफिशर बीयर’ या त्यांच्या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाची वार्षिक उलाढाल २२ सहस्र ८५० कोटी इतकी आहे.
राजा कालस्य कारणम् !
    विजय मल्ल्या यांच्याकडे असलेला अमाप पैसा पहाता त्यांच्या विमानसेवा देणार्‍या आस्थापनाला झालेला १ सहस्र २७ कोटी रुपयांचा तोटा त्यांच्यासाठी खिजगणतीतही नाही. हा तोटा त्यांना शासनदरबारी भीक मागण्यास लावणारा नक्कीच नाही. त्यांच्या मालकीच्या अन्य आस्थापनांमधील काही पैसा त्यांना विमानसेवा देणार्‍या आस्थापनाकडे वळवला, तरी हा तोटा सहज भरून येऊ शकतो. भोगवादी असलेले विजय मल्ल्या हे त्यांच्याकडील पैसा हा अश्लील आणि बीभत्स छंद जोपासण्यासाठी खर्च करतात. हाच पैसा त्यांना त्यांच्या विमानसेवेसाठी वापरण्याची सुबुद्धी अद्याप होत नाही. किंबहुना ते जाणीवपूर्वक या पर्यायाकडे दुर्लक्ष करून शासनाच्या तिजोरीवर डोळा ठेवून आहेत. जोपर्यंत मल्ल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मंत्री शासनात आहेत, तोपर्यंत विजय मल्ल्यासारखे उद्योजक शासनाच्या तिजोरीवर डोळा ठेवायला मागेपुढे पहाणार नाहीत. ‘राजा कालस्य कारणम्’ या गीतेतील वचनानुसार सध्याच्या परिस्थितीला राज्यकर्तेच कारणीभूत आहेत. राज्यकर्ते धर्मनिष्ठ आणि सत्शील असतील, तर जनताही तशी होईल. त्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !

--
!! जय हिंद जय महाराष्ट्र !!!

 मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा II

No comments:

Post a Comment