विनाइंटरनेट फोनमध्येही मोबाइल बँकिग
बँकिंग जगतात दिवसेंदिवस बदल होत असून मोबाइल नेट बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याचाच विचार करुन आता बेसिक मोबाइल हँडसेटमध्ये देखील विनाइंटरनेट बॅकिंग सुरु करण्यात येणार आहे. यासाठी 'ट्राय'ने टेलिकॉम कंपन्यांना मोबाइल शुल्क कंपन्यांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र काही टेलिकॉम कंपन्या गेल्या अनेक वर्षापासून याचा विरोध करीत आहे.
यूएसएसडी सिंपल टेक्स्ट मेसेज सिस्टिमच्या आधारे मोबाइल फोन सब्सक्राइबर्स फंड ट्रासफर, बँक खात्यातील शिल्लक रक्कम, बिल, पेमेंट, चेक कँसल, चेकबुक रिक्वेस्ट आणि अकांऊट स्टेटमेंट या सुविधा यात मिळणार आहेत. या सिस्टमच्या आधारे इंटरनेटविना किंवा स्मार्टफोनविना ग्राहकाला *67# या क्रमांकासोबत टेलिकॉम कंपनीकडून एक विशिष्ट नंबर देण्यात येईल. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यास ग्राहक बँकेतील आपली माहिती जाणून घेऊ शकतो.
मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत मोविडाच्या अधिकाऱ्यांनी टेलिकॉम कंपन्यांनकडून यूएसएसडी कोड मिळविण्यासाठी 'ट्राय'ची मदत मागितली होती. अनेक चर्चा-प्रतिचर्चेनंतर टेलिकॉम कंपन्यांनी याला मान्यता दिली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, 'ट्राय'ने मोविडाला यूएसएसडी कोड मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी टेलिकॉम कंपन्यांना डेडलाइनही देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment