हिंदवी स्वराज्याची सुरुवात
छत्रपती शिवाजीराजे भोसले
मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.
शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ,शिवनेरी
जिजाबाई ह्या शहाजीराजांच्या प्रथम पत्नी. शिवाजीमहाराजांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इ.स. १९ फेब्रुवारी १६२७ (फाल्गुन कृष्ण तृतीया) रोजी पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शहाजीराजे
जिजाबाई
शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी
• बाजी पासलकर
• कान्होजी जेधे
• तानाजी मालुसरे
• बाजी प्रभू देशपांडे
• मुरारबाजी
• नेताजी पालकर
• हंबीरराव मोहिते
• फिरंगोजी नरसाळा
• बहिर्जी नाईक
• सूर्यराव काकडे
• येसाजी कंक
• शिवा काशीद
• जीव महाला
• कोंडाजी फर्जंद
• रामजी पांगेरा
• बाजी जेधे
. हिरोजी इंदलकर
शिवाजी महाराजांचे सरसेनापती
• नेताजी पालकर
• प्रतापराव गुजर
• हंबीरराव मोहिते
• कान्होजी जेधे
• तानाजी मालुसरे
• बाजी प्रभू देशपांडे
• मुरारबाजी
• नेताजी पालकर
• हंबीरराव मोहिते
• फिरंगोजी नरसाळा
• बहिर्जी नाईक
• सूर्यराव काकडे
• येसाजी कंक
• शिवा काशीद
• जीव महाला
• कोंडाजी फर्जंद
• रामजी पांगेरा
• बाजी जेधे
. हिरोजी इंदलकर
शिवाजी महाराजांचे सरसेनापती
• नेताजी पालकर
• प्रतापराव गुजर
• हंबीरराव मोहिते
लढाऊ आयुष्य
आदिलशाहीशी संघर्ष
सिद्दी जौहरचे आक्रमण
अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.
घोडखिंडीतली लढाई
पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वत: लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले. शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.

मुघल साम्राज्याशी संघर्ष
सुरतेची पहिली लूट
कोंढाणा लढाई
शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.
राज्याभिषेक
६ जून १६७४ रोजी जिजाऊचा शिवबा छत्रपती झाला. काशीच्या गागाभट्टांकडे या सोहळ्याचे पौराहित्य सोपविण्यात आलं होतं. ६ जून १६७४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास शिवबाचा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. छत्रपतींना तोफांची सलामी देण्यात आली. सिंहासनावर आरुढ होण्यापूर्वी महाराजांनी मातोश्रींच्या चरणी वंदन करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. जिजाऊंच्या डोळांचं पारणं फिटलं. आपल्या हातानं शिवरायांची दृष्ट काढत जिजाऊ म्हणाल्या, शिबवा, तू महाराष्ट्राचा राजा झालास, रयतेचा राजा झालास. शिवबांचा राज्याभिषेक 'ह्याच देही ह्याच डोळा' पहावा यासाठी जिजाऊंनी आपला जीव जणू मुठीत आवळून ठेवला होता. कारण राज्याभिषेक झाल्यावर अवघ्या दहा दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.

No comments:
Post a Comment