पानिपत रणसंग्राम महाराष्ट्राची शौर्यगाथा
पानिपतने महाराष्ट्राला "पत' आणि "पथ' दिली -
मराठी भाषेत पानिपत या विषयावर प्रचंड लिखाण झाले आहे, त्यामध्ये संशोधनात्मक लेखन खूप आहे. पानिपतच्या यश-अपयशाची कारणमीमांसा करणारे आणि पानिपताच्या रणातून पळ काढून, आला जीव वाचवत पळून आलेल्या लोकांच्या आठवणीच्या आधारे लिहिला गेलेला इतिहास म्हणजे पानिपतच्या अपयशाचा, अशुभाचा इतिहास असा समज मराठी मनात दृढ झाला. यामध्ये मराठीतील पहिले प्रवास वर्णन "माझा प्रवास' हे गोडसे भटजींचे पुस्तक प्रत्यक्षदर्शी इतिहास मानला जातो. याच पार्श्वभूमीवर विश्वास पाटील यांनी पानिपत ही कादंबरी व रणांगण हे नाटक लिहिले आहे. एक वेगळा दृष्टिकोन घेऊन विश्वास पाटील यांनी हे लिखाण केले आहे या पार्श्वभूमीवर पानिपत या विषयाबाबत विश्वास पाटील यांच्याशी केलेली बातचीत.
आपण पानिपत या विषयाच्या अभ्यासाकडे कसे वळलात?
वयाच्या तेवीस-चोवीसाव्या वर्षी मी सरदेसाई यांचे "न्यू मराठा हिस्ट्री' वाचली. आणि त्यातील पानिपतावरचे प्रकरण वाचताना मला जाणवले की एवढ्या विराट सं"येने, एवढ्या दूर जाऊन ते महायुद्ध लढले. यातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा मला खूप भावल्या. सदाशिवराव भाऊ, नजीबखान यांनी मला भुरळ घातली. आपल्याकडे आतापर्यंत जो भाऊसाहेब मांडला गेला, भाऊसाहेब हा लेचपेचा सेनाधिकारी, वेडा, ज्याने एवढे सैन्य नेऊन बुडवले. त्याच्याऐवजी जर राघोबा दादा गेला असता तर पानिपत झाले नसते. अशा प्रकारच्या काही प्रचलित धारणा समाज मनावर आहेत. पण मी जसा अभ्यास करायला लागलो तसे माझ्या लक्षात आले की महाराष्ट्रात जो पानिपतचा इतिहास सांगितला जातो, तो पळपुट्यांनी सांगितलेला इतिहास आहे. अनेक महत्त्वाचे सरदारही त्यावेळी युद्धाचे पारडे फिरू लागताच पळून आले आहेत. सरदार विंचुरकर हे त्यापैकी एक. या परत आलेल्या लोकांनी ज्या आठवणी सांगितल्या तो इतिहास झाला. भाऊला गर्व झाला, तो कुणाचा ऐकत नव्हता, अशा अनेक कथा यातून प्रस्तुत झाल्या, सुरुवातीला सदाशिवभाऊना खलनायक म्हणून रंगवणार होतो. वि.ग. खोबरेकरांनी "मराठ्यांच्या स्वाऱ्यांचे मुक्काम' हे पुस्तक लिहिले आहे. त्यात उत्तरेतील मोहिमांची माहिती आहे. त्याच प्रमाणे शत्रू पक्षानेही इतिहासाची नोंद केली आहे. विशेषति अहमद शहा अब्दालीसोबत अनेक शाहीर, इतिहासकार, लेखक, कवी आले होते. त्यांनी मराठ्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे. मराठ्यांची तारीफ केली आहे. मध्य प्रदेशातून "हितवाद' नावाचे मासिक निघत असे. त्यांनी 1950च्या आधी पानिपत या विषयावर विशेषांक काढला होता. या अंकात रियासतकार सरदेसाईंनी एक सुंदर लेख लिहिला होता. "भाऊसाहेब पेशव्याच्या जीवनाचे धागेदोरे' या नावाच्या लेखात त्यांनी सदाशिवभाऊच्या व्यक्तित्वाचे वेगळे रूप साकारले होते. जसजसे अशा प्रकारचे साहित्य मला वाचायला मिळाले तसतसं मी सदाशिवभाऊला खलनायकाऐवजी धीरोदात्त नायकाच्या रूपात पाहू लागलो. याचबरोबर सुमारे सात हजार तत्कालीन पत्र मी वाचली. या सर्व अभ्यासातून मला त्यावेळच्या चालीरीती, रूढी-परंपरा, पोषाख, वेशभूषा, म्हणी यांची माहिती झाली. त्याचप्रमाणे मी पानिपतच्या युद्धात सहभागी झालेल्या सरदाराच्या घराण्याचा, वंशावळीचाही अभ्यास केला. यातून मला पानिपतचा विराट पट उलगडता आला.
अन्य व्यक्तिरेखांचा शोध कसा घेतलात?
सदाशिवरावभाऊ जसी मुखव्यक्ती रेखा आहे तशी नजीबखान ही व्यक्तिरेखा फार महत्त्वाची आहे. नजीबखान हा सोळाव्या शतकातील गोबेल्स होता. हिटलरचे प्रचारतंत्र राबवण्यासाठी गोबेल्सने अनेक थापा मारल्या व लोकाना युद्धास प्रवृत्त केले. अगदी तसेच अब्दालीला भारतात बोलावणारा हा नजीबखान आहे. मराठ्याकडे बोट दाखवून ते हिंदू आहेत, आपण मुसलमान आहोत, राज्यस्थानमधील राज्याकडे गेला की म्हणे ते द"खनी आहेत, आपण उत्तरी आहोत. उत्तर जर टिकवायचे तर द"खनी लोकांनी येथे येता कामा नये, तो शियाकडे गेला की सुीकडे बोट दाखवत असे, सुीकडे गेला की शियाकडे बोट दाखवे. अत्यंत दाहक ऊर्जा नजीबखानमध्ये होती. यांची जाण सदाशिवराव, नानासाहेब यांना होती. पहिला नजीबखान संपवा, असे पेशवे म्हणत पण बऱ्याच वेळा मल्हारराव होळकरांनी त्याला आश्रय दिला आहे. असा हा विस्तीर्ण पट असणारा विषय आपण लिहावा असे वाटत राहिले आणि त्यातून पानिपतची निर्मिती झाली.
कादंबरीचा फार्मच का निवडला?
सातत्याने तीन वर्षे मी या विषयाचा अभ्यास केला. याच्या आधारावर मी एक संशेधनात्मक ग्रंथ लिहू शकलो असतो. पण असा ग्रंथ एक तर ग्रंथालयाच्या संदर्भ विभागात पडून राहिला असता किंवा इतिहासाच्या अभ्यासकापुरता मर्यादित राहिला असता. हा धगधगता इतिहास जर खऱ्या अर्थाने वाचकापर्यंत पोहचवायचा असेल तर कादंबरीच लिहिली पाहिजे असे मला वाटत होते. याच काळात श्रेष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांची भेट झाली, त्यांनी माझ्या लिखाणाची चौकशी केली. मी पानिपत या विषयावर लिहीत आहे असे सांगितल्यावर ते म्हणाले, "अशुभ..पानिपतवर लिहू नकोस' मी मात्र ठरवले होते, मी पानिपतसोबत बुडालो तरी चालेल पण ही कादंबरी लिहायचीच.
पानिपतच्या युद्धाचे भारतीय राजकारणावर काय परिणाम झाले?
मराठे उत्तरेत का गेले? या प्रश्नाचे उत्तर पाहिले की त्यावेळी महाराष्ट्र किती बलशाली होते याचा अंदाज येतो. 1752 साली दिल्लीच्या बादशाहने स्वतच्यिा संरक्षणासाठी मराठ्यांशी करार केला. हा करार अहमदिया करार या नावाने ओळखला जातो. या करारानुसार अंताजी माणकेश्वर हा सरदार दिल्लीत पाच हजार फौज घेऊन राहिला. जेव्हा नजीबखानच्या आमंत्रणाने जेव्हा अहमदशहा अब्दालीने आक"मण केले तेव्हा मराठे उत्तरेच्या रक्षणासाठी निघाले. केवळ भाग्य म्हणून या युद्धात अब्दाली जिंकला. पण त्याला मराठ्यानी असा धाक दिला की पुन्हा त्या दिशेने कधी आक"मण झाले नाही. या युद्धानंतर उत्तरेत अनेक मराठा सरदार स्थिर झाले. बडोदा, ग्वाल्हेर, इंदोर, बडोदा, देवास, धार या ठिकाणी या सरदारांनी आपली संस्थाने उभारली. उत्तरेतील राजकारणावर या गोष्टीचा मोठा प्रभाव निर्माण झाला.
अटकेपार गेलेल्या मराठ्यांची अखिल भारतीय साम्राज्याची संकल्पना मान्य का होत नाही?
मराठ्याचा प्रभाव होताच. पंजाब, पतियाला येथून मराठ्यांना मदत झाली आहे. आणि उत्तरेतील बऱ्याच संस्थानांनी मराठ्याचे नेतृत्व मान्य केले आहे. पण आपल्या इतिहासाकडे जातीवादी दृष्टीने बघण्याची सवय लागून गेली आहे. पानिपतच्या संग"ामाचे नेतृत्व पेशव्यांनी केले त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले, नेतृत्वाचे कौतुक केले तर आपण प्रतिगामी ठरू अशी काही लोकांना भीती वाटत असते. पानिपत म्हणजे ब"ाह्मण असा काही लोकांचा समज झाला आहे. त्यावेळी रणांगणात असणाऱ्या सरदाराची नावे शाहिरांनी आपल्या पोवाड्यातून पुढे आणली आहेत. यात आठ-दहा ब"ाह्मण, पंधरा-वीस मराठे आणि बाकी सारेजण बहुजन समाजातील आहेत. हे सारेजण मराठे म्हणून पानिपतच्या रणांगणावर लढले. या युद्धात महाराष्ट्र लढला. त्यावेळी पुण्याची लोकसं"या केवळ एकवीस हजार होती. मग सव्वा लाख लोक पानिपतावर कुठून गेले? या युद्धात मराठ्यांनी अखिल भारतीय राजकारणाची दृष्टी ठेवून काम केले आहे. पण दुर्दैवाने ते स्वीकारणे म्हणजे स्वति प्रतिगामी होणे अशा मानसिकतेचा प्रभाव आपल्याकडे दीर्घकाळ राहिला आहे.
पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांचे गुणदोष समोर आले ते आजपर्यंत तसेच पुढे चालू आहेत का ?
पानिपतवर लढलेल्या मराठ्याचे गुण अधिक आणि दोष कमी होते. ते जातीसाठी नाही तर देशासाठी लढले. आता आपल्या समाजात दोषांचे आगर तयार झाले आहे. आता प्रत्येक जण जातीय नजरेने समाजाकडे पाहत आहे. आम्ही संत, मंहतांनाही जातीत वाटून टाकले आहे. आज आपण पुरोगाम्याचे सोंग आणत प्रतिगामी झालो आहोत. देशापेक्षा आपली जात प्रत्येकाला मोठी वाटत आहे.
पानिपतच्या युद्धाने महाराष्ट्रास काय दिले?
पानिपतच्या रणांगणावर सव्वा लाख बांगडी फुटली असे जरी असले तरी या युद्धाने महाराष्ट्राला "पत' मिळवून दिली. महाराष्ट्र धर्माला "पथ' दिला. भारताच्या संरक्षणाचे भान उत्तरेत जाऊन मराठ्यांनी दिले. आपण राष्ट्रासाठी आहोत ही एक भावना या युद्धाने समाजाच्या मनात जागवली. पानिपत म्हणजे अशुभ घटना ही मानसिकता आता तरी आपण बदलली पाहिजे. आणि महाराष्ट्र हा एका गौरवशाली शौर्याचा वारसा जपतो आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले पाहिजे.
या अंकाच्या निमित्ताने आपण काय संदेश द्याल?
14 जानेवारी 2011 ला पानिपत रणसंग्रामास दोनशे पास वर्षे पूर्ण होतील. पानिपतच्या रणांगणात धारातीर्थी पडलेल्या वीराच्या रक्ताचा रंग आाणि "26/11' च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या रक्ताचा रंग एकच आहे. या साऱ्यांना आपल्या देशाला सुरक्षित ठेवायचे होते. आणि त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. समाजाने या बलिदानाची जाणीव ठेवून आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो याचा विचार करून तो विचार अंमलात आणला पाहिजे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
मुलाखत रवींद्र गोळ
Panipat Marathi book Purchase here
No comments:
Post a Comment