Thursday, February 16, 2012

या सह्याद्रीला, या स्वराज्याला, या शिवराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा...

या सह्याद्रीला, या स्वराज्याला, या शिवराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा...

बाजी पासलकर

Picture
बाजी पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार.निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून,धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती.अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते.तंटे सोडविण्यात ते हुशार होते.इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या.पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली.फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.
 त्याशी खासाखाशी गांठ पडली.एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले.मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले.
   
    बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे,याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळाला नाही.त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम करत आहेत.

शिवा काशिद

Picture
        शिवा काशिद हा एक शिवरायाचा सरदार होता.त्याने शिवरायाच्यावर व आपल्या स्वराज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले म्हणुन शिवाजीराजे सुखरुप् सिददी जोह‍रच्या वेढयातुन सुटुन आले व विशाळगडावरति पोहचले .शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हा शिवाजी नाही असे कळताच जोहर म्हणतो कसा 'शिवा काशीद आता तु मरणाला तयार हो'.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला 'शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील आता मी सुखाने मरण्यास तयार आहे'.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे'. हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले.अशा प्रकारे शिवा काशिदला वीर मरण आले.अशा या वीर मावळ्याचा पराक्रम अजुनही जनतेस माहीत नाही.इतिहास:(म‍राठयाचा)इतिहास हि त्याच्या पराक्रम विसरु शकणार नाही,कारण शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. म्हणुनच रयत सुखाने व स्वाभिमानाने जगु लागली.शिवा काशिद या मर्द मावळ्याची समाधि अजून हि पन्हाळगडाच्या पायथ्याशी विशाळगडाकडे जाणार्‍या वाटेतिल गावापाशी दुरावस्थेत आहे.
 शिवा काशिद हा महाराजांचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ह...शिवाजी महराजांसारखिच होती. जर शिवा काशिदास महाराजांचे कपडे घातले तरनवीन माणुस नक्की फ़सेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या.एक महाराजांची आणी दुसरी शिवा काशिद. एक विशाळगडाकडे व दुसरी सिद्धीजोहरकडे.हे तर आपण जाणलच असेल की सिद्धी जोहरकडे गेलेला शिवाकाशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्या आधी प्रहर दोन प्रहर का होइना एकसामान्य मावळा राजा झाला. स्वत: मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचाराजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाइल.धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळेसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाहीपुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाईनिघाली एक फ़ोज मोठी विजापुरीमहराज होते त्यावेळी कोल्हापुरीवेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीनेउन पावसाची न करता तमा फौज लढली महिने चारवेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पारकरुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारेफ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारेरात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेवगडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेवपाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाईगाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बातजणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघातअंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महारांजा सारखीकरुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखीशिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरणपण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरणप्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किंचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितोमरताना शिवा काशिद बोलतो "सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो?"
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंतस्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंतगजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहासपण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास

शिवा काशीद यांच्या  समाधीसाठी  महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष  

Picture

बाजी प्रभू देशपांडे

Picture
     बाजी प्रभू देशपांडे हे मराठ्यांचे शूर योद्धे होते. पावनखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत पावनखिंड रोखून धरली.
बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली.सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी, आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना १३ जुलै, इ.स. १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे. घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो.


बाजी प्रभूची समाधी

Picture
मी आणि माझे दोस्त काही दिवसा पूर्वी विशाळगड वर बाजी प्रभू ची समाधी पाहण्यासाठी गेलो होतो .मनात फक्त  बाजी आणि त्यांच्या मावळ्यांच्या शोर्याचा पराक्रम डोक्यात होता .गड चढत चढत विचार येत होते की कशी असेल  बाजी प्रभू समाधी आणि आत्ता अधिकच उत्सुकता वाढतच होती. त्या पावन खिंडतील बाजीचे शब्द मनात गोधळू लागले होते

"राजे तुम्ही निम्मे मावळे घेवून विशाळ गड घाटा मी येथेच तुम्ही विशालगडा वर पोहचे पर्यंत हि खिड लढवतो"

"लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशीदा जगाला पाहिजे, आज एक बाजी मेला तर अशी लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशालगड गाठा "

 आम्ही गडावर जाताच क्षणी बाजी प्रभू समाधी समाधीची चौकशी केली कि ती कोठे आहे पण तेथील काहीनी  सागितले कि आम्हाला माहित नाही आणि काहींनी सागितले जरा पुढे आहे .असे करत करत आम्हाला १.३० ते २ तास लागले समाधी शोधण्यासाठी ती गडाच्या एका बाजूला एकाकी पडलेली  तिकडे कोणीही जात नाही  आणि फिरकत हि नाही पाहतो तर काय ज्या बाजी - फुलाजी बंधूंवर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा या बाजी - फुलाजी यांची समाधी अशी धूळ ,उन ,वारा खात खितपत पडली आहे .त्या समाधीवर एक फाटका रंग उडलेला भगवा धज्व मन भारावून गेले आणि अलगद डोळ्यातून एक अश्रू आला कि हि ती समाधी ज्या माणसाने शिवरायांसाठी सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि अखेर महाराज विशाळ गड वर पोहचल्यावरच प्राण सोडला  ह्याची हि अवस्था पाहून मनात आले कि कसला मराठी पणा आणि बाणा ज्या माणसाची  समाधी  ह्या  सोन्याच्या हव्या होत्या परंतु काही विचित्र चित्र नजरेस पडाले . आम्ही सर्वजन फक्त एकामेकाकडे पाहत होतो आम्हाला काहीच सुचत नव्हते.एक वाक्य मनात सारखे येत होते कि

"लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशीदा जगाला पाहिजे आज एक बाजी मेला तर अशी लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशालगड गाठा"

       मराठ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली  त्या बाजीच्या समाधी पुढे नतमस्त झालो आणि अलगद एक अश्रू  डोळ्यातून बाजीच्या समाधी वर पडला अंग भरून आले होते काय करावे हे समजत नव्हते शेवटी तेथील साफसफाई करू लागलो . काही वेळ चिंतन करून निराश मनाने माघारी फिरलो .

       आज आपलीच माणसे हि त्या विशाळ गड वर येतात पण बाजी समाधी कडे कोणीही फिरत नाही हि आजची वस्तुस्तीथी आहे .


  मुरारबाजीं

Picture
   १६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी 3.आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला.तह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
    सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तयार केले आणि त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.



  तानाजी मालुसरे

Picture
  छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते.
मृत्यू:     फेब्रुवारी ४ , १६७०,
सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ:   हिंदवी स्वराज्य

धर्म:      हिंदू
अपत्ये:   रायबा


बालपण
    सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे.

कामगिरी
     छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.
कोंढाणा किल्ला
          स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेंव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेंव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नात होते. त्यानी ते लग्न अर्धे सोडले आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."
  गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती होते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करुन त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.
   तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला".अत्यंत दुःखी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'विरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आह
तानाजी मालुसरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.

जिवा महाला

Picture

Picture
नेताजी पालकर
    
        नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.
           पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
        शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
     शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.

प्रतापराव गुजर

Picture
    प्रतापराव गुजर यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होतो.शिवाजी महाराजांकडून त्यांना 'प्रतापराव' अशी पदवी मिळाली होती. प्रतापराव गुजर कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं. पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.
    मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, "प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!" आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. हे सात शिपायी म्हणजे प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी होत.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.    
     प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे. 
   प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.
महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.
पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा

कोंडाजी फर्जंद

अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १७७२ रोजी रायगडावर आपल्या सहकार्यांनना ही सल बोलून दाखविली.

यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.

फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.

येसाजी कंक

Picture
           येसाजी वेलवंड खोर्‍याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेत ते राजेंसोबत होते.छत्रपतीच्या आदेशानुसार येसाजीने गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह याच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते.अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले होते.

शिवाजीराजेंनंतर शंभूराजेंसोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळच्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.पोर्तुगीजांनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.

पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातून आत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्या मोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्या मदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.

सुर्यराव काकडे

Picture
सुर्यराव हे,छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते.रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.शिवाजीने 'सुरराव काकडे दोन हजार हासम जावळीवर रवाना केले.'असा मोर्यारच्या बखरीमध्ये उल्लेख आहे.सुर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे.

शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला.त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली.ते एकून पातशहा कष्टी झाला,नि म्हणाला,' काय इलाज करावा,लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले.आता कोण पाठवावे 'तेव्हा पातशहाने 'शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही'असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले.

मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला.हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले 'तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.'हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे'अशी पत्रे पाठविली.

त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव,सुर्यराव तर दुसरीकडून पेशवे,उभयता सालेरीस आले,आणि मोठे युध्द झाले.सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो ''चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल,पठाण,रजपूत,तोफांचे,हत्ती,उंट आराबा घालून युध्द जाहले.युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की,तीन कोश औरस चौरस,आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले,पूर वहिले.रक्ताचे चिखल जाहले.मराठांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला.युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली.या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता,पैकी १० हजार माणसे कामीस आले.सहा हजार घोडे,सहा हजार उंट,सव्वाशे हत्ती तसेच खजिना,जडजवाहीर ,कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली.

या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली.सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला.ते तोफेचा गोळा लागून पडले.'सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे.भारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा,असा शूर पडला.'विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले.खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत,मोरोपंत पेशवे, आनंदराव,व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले.हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो,पातशहा असे कष्टी जाले.'खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते.

आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे.आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही.'असे बोलिले.मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता,त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता.असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.या युध्दात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला.साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला.त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.

सुर्यराव काकडे समाधीवरील चंद्रसुर्य

चंद्रसूर्य असेपर्यंत तुमची किर्ती दिगंतात राहील असा त्याचा अर्थ आहे.


कान्होजी जेधे

Picture
कान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील दोन कर्तबदार पुरूष होते.पुण्यापासून दक्षिणेस सुमारे पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या भोरजवळच्या कारी या गावचे देशमुख,कान्होजी जेधे होते.ही देशमुखी त्यांना अदिलशाहने दिली होती.शिवाजीराजेंच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या अदिलशाहने फत्तेखान या सरदारामार्फत सन १६४८ साली शहाजीराजेंना अटक केली होती,तेव्हा कान्होजी व दादाजी लोहोकरे शहाजीराजेंसोबत होते.पुढे सर्वांची सुटका झाल्यावर शहाजीराजें अदिलशाहाच्या हुकूमानुसार बंगळूर या आपल्या नव्या जहागीरीच्या ठिकाणी निघाले असता त्यांनी कान्होजींना शिवाजीराजेंकडे पाठविले.

शहाजीराजें त्यांना बोलिले,"मावळप्रांती तुम्ही जबरदस्त आहा,राजश्री सिवाजी राजेपण आहेत.त्यांकडे जमेतीनिसी तुम्हास पाठवितो.तेथे इमाने शेवा करावी कालकला(बिकट प्रसंगी)तरी जीवावरी श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे(मरण पत्करावे)तुम्ही घरोबियातील मायेचे लोक आहा.तुमचा भरोसा मानून रवाना करतो(जेधे करीना)

शहाजीराजेंचे हे बोल म्हणजे आज्ञा मानून कान्होजीं शिवाजीराजेंकडे आले आणि म्हणाले,"महाराजांनी(शहाजी)शफत घेऊन साहेबांचे शेवेसी पाठविले.तो इमान आपला खरा आहे.खासा व पाच जण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ."(जेधे करीना)

याच सुमारास सन १६४९ साली अफजलखानाने जावळीवर स्वारी करावयाचे ठरविले व अदिलशाहाच्या  वतनदारांना फर्मान धाडिले व आपणा सोबत येण्यास सांगितले.खानाच्या फर्मानास घाबरून केदारजी व खंडोजी खोपडे खानास मिळाले.फलटणचे निंबाळकर पूर्वीपासून अदिलशाहसोबत होते.पण कान्होजीं जेधे आपले पाच पुत्रासह,सहकारी घेऊन राजापाशी आले आणि बोलिले,"यापुढे खस्त होऊ(मरण पत्करू)तेव्हा आमचे वतन कोण खावे आम्ही इमानास अंतर करणार नाही."यानंतर राजेंचा निरोप घेऊन कान्होजीं कारी या आपल्या गावी आले,व मावळातील समस्त देशमुखांना बोलावून शिवरायांची मदत करावयास सांगितले.
कान्होजी समस्त देशमुखांना म्हटले,"अफजलखान बेईमान आहे.कार्य जालियावरी नस्ते निमित्य ठेऊन नाश करील हे मर्हाडष्ट राज्य आहे.अवघियांनी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री..स्वामी सांनिध राहोन येकनिष्ठेने शेवा करावी यैश्या हिमतीच्या गोष्टी सांगितल्या."यावर सर्व देशमुखांनी राजेंकडे जाऊन आपले इमान व्यक्त केले.अडचणीच्या वेळी मावळातील सर्व देशमुखांना एकत्र करण्याचे काम कान्होजींनी करून राजांस मोठी मदत केली.

प्रतापगडाच्या लढाईत कान्होंजीचा पुत्र बाजी याने जीव महालासोबत राहून महाराजांचे प्राण वाचविले तर खानाचा पाडाव झाल्यावर कान्होजी आपल्या सहकार्यांेसोबत खानाच्या सैन्यावर तुटून पडला व हत्ती, घोडा, नौबती, नगारे, बिशादी, खजाना मिळविला.शिवाजीराजेंनी सन १६५५-५६ साली जावळीच्या मोर्यांास शासन केले,त्यावेळी कान्होजी,बांदल,सिलिंबकर व इतर देशमुखांनी त्यांना सहकार्य केले.
शाहित्येखानाविरूध्द लढण्यासाठी बाजी व चंदाजी हे कान्होजीचे दोन पुत्र राजेंसोबत लालमहालात गेले होते.राजें तोरणा,राजगडच्या बांधणीत गुंतले असताना,विजापुरी सरदार फत्तेखान याने अचानक पुणे परिसरावर हल्ला केला.राजे तातडीने कान्होजीस पुरंदर किल्ल्यावर आले.मराठ्यांचे गनिमाबरोबर धारोंधर युध्द जाहाले,अनेक मावळे मृत्युमुखी पडले,पराभव झाल्यास मराठ्यांचा ध्वज शत्रुच्या हाती लागू नये म्हणून बाजीने काही गनिमास यमसदनास धाडून ध्वज घेऊन पुरंदरावर आला.तेव्हा राजे निशाण सांभाळून आणले म्हणोन खूष जाहाले व त्यास सर्जाराई असा किताब दिला.पुढे बाजी,सर्जेराव या नावाने ओळखू लागला.
पुढे छत्रपती राजारामच्या कालखंडात सर्जेरावने आपल्या पित्याप्रमाणे कामगिरी करत औरंगजेबविरूध्द मावळातील देशमुखांना एकत्र केले.स्वराज्यासाठी जेधे घराण्याने मोठे योगदान केले आहे.


फिरंगोजी नरसाळा

Picture
शाहित्येखानाने स्वराज्यावर आक्रमण केल्यावर पुण्यात लालमहालात मुक्काम ठोकला.शाहित्येखानाच्या फौजा संग्रामदुर्गावर(चाकणचा भूईकोट किल्ला)चालून गेल्या.संग्रामदुर्गाचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा होता.फिरंगोजी महापराक्रमी वीर होता.किल्ल्यावर अवघे ३००-३५० मावळे होते.पावसाळा चालू होणार म्हणून किल्यावर भरपूर रसद भरली होती.मुघलांनी किल्यास वेढा घातला व किल्यावर तोफांचा भडिमार चालू केला.पण किल्या काही दाद देत नव्हता.मुघल सैनिक किल्याच्या बुरूजाजवळ आले की त्यांना गोफनगुंडे बसत.गोफनच्या साह्याने त्यांनी मुघली सैन्यांस रक्तबंबाळ केले होते.अवघ्या ३००-३५० मावळ्यासह फिरंगोजीनी किल्ला ५५ दिवसलढविला.मुघलांना किल्यावर प्रवेश करता येईना.अखेर त्यांनी तटापर्यंत भूयार खणून किल्ल्याचा तट उडविला.किल्याची एक बाजू उघडी पडली. किल्याजवळ हातघाईची लढाई झाली.
मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या सैन्याची वाताहत होणार ध्यानात आल्यामुळे त्यांनी माघार घ्यावयाचा निर्णय घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला व मावळ्यांचे होणारे नुकसान टाळले.कारण महाराज म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा.माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.'फिरंगोजीच्या पराक्रमावर खुष होऊन राजेंनी त्याना भूपाळगडाची किल्लेदारी,एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.


रामजी पांगेरा

दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेलेहोते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यातहोता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा
स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा. हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता.
एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. तो
आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ' मर्दांनो , खानाशी झुंजायचंय , जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी
बांगडी ' असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला.
साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले.
मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच... वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की , मराठीयांची पोरे आम्ही , भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.

    कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती. त्यातलाच हा रामाजी पांगेरा. इतिहासाला त्याचं घर माहीत नाही , त्याचं गाव माहीत नाही , त्याचा ठाव
माहिती नाही. त्याचा पराक्रम मात्र माहिती आहे. आणि आम्हाला रामाजीही माहिती नाही आज अन् कण्हेरागडही माहीत नाही आज.कदाचित पुढे मागे संशोधकांना या रामाजी पांगेऱ्याची अधिक माहिती कागदपत्रांतून मिळेल. अन् काळोखातून उन्हाचा कवडसा उजळत यावा तसा त्याचा इतिहास आमच्या काजळलेल्या काळजात प्रकाश टाकेल.

बहिर्जी नाईक-

Picture
    बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते.
दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
         बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार
गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणा‍‍र्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वा‍र्‍याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आजकुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी
नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना
माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती
पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत. शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या
दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे
गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्‍यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग
असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी
शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.ब‍र्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं
तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते. अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

सुरतेची पाळती

    सुरतेहून पाळती बहिर्जी जासूद आला. सुरतेची पोथी त्याने महाराजांपुढे वाचली आणि म्हणाला की, ''सुरत मारील्याने अगणित द्रव्य सापडेल, असे सांगितले त्याजवरून राजीयांनी विचार केला, आणि बेत निघाला. सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारडू मेलेली दुभती म्हैसच होती. दिल्ली खालो खाल दिमाख होता सुरतेचा अशा ह्या सुरतेत औरंगजेबाच्या ...पाच हजार सैनिकांचा जागता पहारा. सुरतेभोवती अभेद्य तटबंदी राजगडापासून अंदाजे ३२५ किलोमीटर उत्तरेला असलेल्या ह्या सुरतेच्या प्रत्येक घराची खडान खडा माहिती राजांना होती कारण राजांचा तिसरा नेत्र सुरतेवर पाळत ठेवून होता तो तिसरा नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक. सुरत म्हणजे ऐश्वर्य. अवघ्या जगातील व्यापाराच्या मोठ्या घडामोडी इथे चालत अठरा टोपीकर, इराणी, हाफ्शी, तुराणी, बगदादी, अरबी, बोहरा, खोजा, यहुदी, अफघाणी, मुघली इत्यादी परदेशी व्यापारीही इथून व्यापार करत असत. ह्या लोकांनी सुरत भरून गेली होती. औरंगजेबाच्या फौजेने ३ वर्षे रयत नासवली होती, नागवली होती ह्याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती. ई.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. शत्रूला ही चिंता फार सतावित नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूलन्यास बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहित असलेली सुरतेची पहिली लुट. सुरत शहर (जे आजच्या गुजरात राज्यात येते) हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रीया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट साध्य केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लूटीतून संरक्षण दिले गेले सुरतेवर निघण्याची तयारी जय्यत झाली. आठ हजार घोडेस्वार तयार झाले. निघण्याचा दिवस ठरला १५ डिसेंबर १६६३. आई जगदंबेचे दर्शन घेऊन आणि आऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे निघाले. मजल दरमजल करत ५ जानेवारी १६६४, मंगळवार शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही." पण दिखाऊ कर्तबगारीचा तो इनायतखान बहादूर याने महाराजांचे सौजन्यशील फर्मान धुडकावून लाविले. त्या मगरूरी मुळे महाराजांनी सुरत लुटण्याची आज्ञा केली. सावकारांचे वाडे काबीज करून सोनं, रूपे, मोती, पोवळे, माणीक, हिरे, पाचू, गोमेदराज, असे नवरत्ने; नाणे, मोहोरा, पुतळ्या, इभ्राम्या, तराम्या, असफ्या, होन, नाणे नाना जातींचे इतका जिनसांच्या धोंकटीया भरल्या. कापड, भांडे, तांब्याचे वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही. असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले सूरत मनसोक्त लुटून महराज आल्या मार्गानेच निसटले.

    इतिहास काळापासूनचं लुट ह्या शब्दानेच अंगावरती काटे उभे राहतात, अर्थातच भयावह असणा-या ह्या शब्दाला देखील महाराजांनी किती वेगळाच अर्थ दिला. लुट म्हटली की कत्तली ह्या अग्रभागीच. कुणाचीच गय त्यात केली जात नाही. कुठलेही ठिकाण सोडले जात नाही. पण परधर्माची मंदिरेच काय साध्या मुक्या जनावरांना देखील धक्का लागणार नाही अशी लुट घडविले माझ्या राजाने! दिनांक ५ जानेवारी १६६४ पासून पुढे ४ दिवस ही लुट चालू होती. पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...........


शूरवीर बहिर्जी नाईक समाधी

Picture

कान्होजी आंग्रे-समुद्रावरचा शिवाजी

Picture
सुमारे २५ वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले 'मराठी आरमार प्रमुख'!

स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी ! पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला. कालोसे गावातील आंगरवाडी ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ झाले.

कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. इ.सन १६८८ च्या सुमारास सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्‍या मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून त्यांनी आपल्या पराक्रमास सुरुवात केली. तसेच ह्या विजयानंतर  मोगलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली.

छत्रपती राजारामांच्या काळात मराठ्यांचे अस्तित्व टिकविण्याची जबाबदारी कान्होजींवर आली होती. अनुभवाने आणि मुत्सद्देगिरीने ते शत्रूला तोंड देत होते. त्यांची स्वतंत्र कामगिरी पाहूनच राजारामांनी त्यांना  'सरखेल' हे सन्मानाचे पद दिले. कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्‍याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावा लागत होता.

कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्‍या परकीयांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. ह्याचा प्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले, तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्र किनार्‍यावर एक दबदबा निर्माण केला होता.

कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शूर सरदारांचे योगदान होते. कोकण किनार्‍यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक ! दिनांक ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला

हिरोजी इंदलकर

Picture     शिवछत्रपती महाराजानी जीवन भर एकच वसा पेलला तो म्हणजे माणूस जोड्न्याचा ..
मराठयानी इतिहास घडविला परन्तु मराठयानी इतिहास लिहला नाही .
शिवाजिनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर ... निष्ठा
माणस कशाच्या मोहने शिवाजी कडे आली....
विश्वास दिला राज्यानी"आपल राज्य उभा करायचा"मला छत्रपती व्हायच म्हणून नाही ....
तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे..
ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती ....

हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यान कडे होता.
रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली ...शिवाजी महाराज स्वारी वर गेले...

हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला ..
आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीने तर जबाबदारी टाकली आहे .
किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले.
आपला राहता वाडा , आपली जमिन विकली.
बायकोसह रायगडावर आला..
पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली शिवाजीना आल्यावर कळल हिरोजिने काय केले . राज्याभिषे काच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ..
राज्याभिषे काच्या वेळी शिवाजी म्हणाले,"हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय."

त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान जुकवून म्हणाला ,"महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय...."
महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे ..
रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच् या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया .

महाराजाना कलेणा हे कसल मागण..
पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ...
मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ...????

आणि हिरोंजी उत्तर देतात,"राजे..! ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल,त्या- त्या वेळी जगदिशवराच् या दर्शनाला तुम्ही याल... ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्य ा वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल.."

No comments:

Post a Comment