नवविवाहितांना एकमेकांविषयी जाणून घेण्यासाठी एक वर्ष तरी हवंच. शारीरिक, मानसिक, आथिर्क, लैंगिक सक्षमता असेल तेव्हाच गर्भारपण आणि बालसंगोपनाची जबाबदारी अंगावर घ्यायला हवी. त्यामुळे निदान वर्षभर तरी गर्भारपण टाळलेलं बरं. यासाठी अनेक उपाय आहेत. मात्र नवविवाहितेसाठी ओरल पिल्सचा पर्याय चांगला ठरू शकतो. पूर्वीपेक्षा आता या गोळ्या खूपच कमी मात्रेत येत असल्यामुळे त्यांचे साइडइफेक्टस् खूपच कमी झाले आहेत. याउलट या गोळ्यांचे बरेच फायदेही आहेत.
गृहस्थाश्रमात प्रवेश करताना किती तरी प्रश्ानंना सामोरे जावे लागते. एका अनोख्या जगात प्रवेश करायचा असतो. वैवाहिक जीवनाविषयी अपुरी आणि चुकीची माहिती उपलब्ध असते. थोडीफार भीतीही वाटत असते. अनेक शंका दोघांच्याही मनात दबा धरून बसलेल्या असतात. अशावेळी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे विवाहपूर्व वैद्यकीय सल्ला घेणे. भावी वधू-वरांनी जोडीने (उभयता) तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायला हवे. जननसंस्थेची रचना आणि कार्य कोणते? मासिक पाळी का येते? गर्भधारणा कशी होते? लैंगिक संबंध म्हणजे काय? वैवाहिक जीवन सुरू करताना काही अडचणी येऊ शकतात का? पहिले मूल केव्हा होऊ द्यावे? पहिले गर्भारपण लवकर नको असल्यास कोणते साधन वापरायला हवे? जबाबदार पतित्व आणि पत्नीत्व म्हणजे काय? अशा अनेक विषयांवर डॉक्टरांबरोबर नि:संकोचपणे चर्चा करायला हवी. तरच वैवाहिक जीवनात आत्मविश्वासाने प्रवेश करता येईल.
ब-याच वधू-वरांच्या मनात पहिल्या रात्रीविषयी भ्रामक कल्पना असतात. हिंदी सिनेमात तर हमखास 'सुहाग रात' फारच छान रंगवलेली असते. फुलांनी सजविलेला पलंग, दागिन्यांनी नखशिखांत मढलेली वधू आणि केशरी दुधाने काठोकाठ भरलेला प्याला. सगळे कसे सोपे-सरळ वाटते; पण प्रत्यक्ष जीवनात मात्र अनेक वधू-वरांची 'सुहाग रात' अपेक्षेइतकी फलदायक, सुखकारक ठरत नाही. खरे पाहता पहिल्याच रात्री सर्व सुरळीत झाले पाहिजे असा काही नियम नाही. उलट असे होणे हा नियमाला अपवाद आहे. कधी कधी तर मधुचंदाहून परत आल्यावरसुद्धा सगळे काही ठीक झालेले नसते. त्यामुळे नववधू आणि वर दोघांच्याही मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जोडीदाराच्या क्षमतेविषयी शंका येऊ शकते. वैज्ञानिक अज्ञान व अनाठायी भीती, संकोच यामुळे असे होते. लग्नाआधीच योग्य सल्ला मिळाल्यास वैवाहिक जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जाता येते.
लग्नानंतर पहिले मूल केव्हा होऊ द्यायचे हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. खरे पाहता लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षात गर्भधारणा न झालेली चांगली. नवीन कुटंुबीय, नवीन घर-वातावरण याची सवय व्हायला एवढा काळ हवाच. वैवाहिक जीवनात रुळायला एवढा कालावधी लागतोच. शारीरिक, मानसिक, आथिर्क, लैंगिक सक्षमता असेल तेव्हाच गर्भारपण आणि बालसंगोपनाची जबाबदारी अंगावर घ्यायला हवी. लग्नानंतर लगेच काही समस्या उद्भवू शकतात. कोणाचे शिक्षण पुरे व्हायचे असते, कोणाची नोकरी कायम नसते, तर कधी जागेचा प्रश्ान् असतो. म्हणजेच बहुतेक जोडप्यांना पहिले मूल लवकर नको असते; पण नुसते 'नको, नको' म्हणून भागत नाही. कुटुंबनियोजनाचे एखादे साधन वापरणे जरुरीचे असते.
गर्भनिरोधक खायच्या गोळ्या नववधूसाठी उत्तम! या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे अंतसाव असतात. त्यांच्यामुळे शरीरातील अंतस्त्रावांवर परिणाम होतो आणि स्त्रीबीज बीजकोशातून बाहेर पडू शकत नाही. स्त्रीबीजच उपलब्ध न झाल्यामुळे अर्थातच गर्भधारणा होऊ शकत नाही. या गोळ्यांची सवय व्हावी आणि त्यांच्या सफलतेचे प्रमाण वाढावे म्हणून लग्नाच्या आधी दोन महिने या गोळ्या घ्यायला सुरुवात करायला हवी. न चुकता नियमितपणे ठराविक वेळी गोळी घेतल्यास ही पद्धत खूपच यशस्वी ठरते; पण या गोळ्या सुरू करण्याआधी वैद्यकीय तपासणी करून घ्यायला हवी. कावीळ, अर्ध शिशी, हृद्रोग इत्यादी आजार असल्यास गोळ्या घेता कामा नयेत. गोळ्या कधी सुरू करायच्या, कशा घ्यायच्या, एखादी गोळी विसरल्यास काय करायचे, इत्यादी अनेक बाबींविषयी डॉक्टर सल्ला देतात. पूवीर् बाजारात उपलब्ध असलेल्या गोळ्या जास्त मात्रेच्या असत. त्यामुळे काही स्त्रियांना मळमळणे, उलट्या, डोकेदुखी, पायावर सूज, वजन वाढणे, मुरूम इत्यादी छोटे-मोठे त्रास व्हायची शक्यता होती; पण हल्ली बऱ्याच कमी मात्रेच्या गोळ्या मिळायला लागल्या आहेत- उदा. : फेमिलॉन, लोवेट इत्यादी. त्यांच्यात अंतसावाचे प्रमाण अत्यल्प असते. यामुळे गोळ्यांचे दुष्परिणाम कमी होतात. तसेच त्यांच्यात नवीन प्रकारचे प्रोजेस्टेटॉन म्हणजेच डिझोजेस्ट्रेल किंवा सायप्रोटेरॉन अॅसिटेट असते. अशा गोळ्यांमुळे चेहऱ्यावर मुरूमे यायचे प्रमाण कमी होते. या संतति-प्रति बंधक गोळ्यांमुळे इतरही अनेक फायदे होतात- पाळी नियमित होते, पाळी सुरू होण्याआधीच्या तक्रारी आणि दुखणे कमी होते. पाळीच्या दिवसांत अंगावर कमी जाते, कमी रक्त सावामुळे पंडु रोग व्हायची शक्यता घटते. गर्भ असाधारण ठिकाणी रुजणे, स्तनांत/स्त्रीबीज कोषात गाठी होणे, गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग, ऑटीपोटात जंतुसंसर्ग होणे इत्यादी अनेक रोगांपासून संततिप्रतिबंधक गोळ्या स्त्रियांचा बचाव करतात. म्हणजेच दुहेरी फायदा होतो. काही महिन्यांपासून ड्रॉसपिरेनॉन असलेल्या गोळ्याही भारतात उपलब्ध झाल्या आहेत. पाश्चात्य देशात त्या 'यास्मीन' नावाने बऱ्याच वर्षांपासून वापरात आहेत. त्यांचे सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता नगण्य असते. म्हणजेचे पूवीर्चे सर्व गैरसमज आता निकालात निघाले आहेत- संततिप्रतिबंधक गोळ्या घेतल्यामुळे स्द्बस्त्रद्ग द्गद्घद्घद्गष्ह्लह्य व्हायची भिती आता निरर्थक ठरली आहे. त्यांच्यामुळे वजन वाढत नाही; कॅन्सरची भिती नसते, गोळ्या थांबवल्यावर लगेचच गर्भधारणा व्हायची क्षमता परत प्राप्त होते. तेव्हा वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य त्या संततिप्रतिबंधक गोळ्या जरूर घ्यायला हव्यात.
क्वचित एखाद्या स्त्रीला गोळ्या सोसत नसतील तर ती योनिमार्गात ठेवायच्या रासायनिक औषधी गोळ्या वापरू शकते. नाही तर पतीने कंडोम वापरायला हवा. कॉपर टी सारखे गर्भाशय वलय मात्र नवविवाहित जोडप्यासाठी अयोग्य आहे- कारण नव वधूमध्ये ते बसवणे कठीण तर असतेच, शिवाय जंतुसंसर्गाचाही धोका असतो. एक मूल झाल्यानंतर मात्र गर्भाशय - वलय बसवायला हरकत नाही.
अनेक अत्याधुनिक गर्भानिरोधक साधने उपलब्ध असूनही काही जोडपी उशिरा जागी होतात. लग्नानंतर थोड्याच महिन्यांत पाळी चुकली की मग त्यांना 'आपल्याला इतक्या लवकर मूल नको' अशी उपरती होते. गर्भपात करून घेण्यासाठी मग डॉक्टरांकडे धाव घेतात. पहिल्यावहिल्या गर्भारणात गर्भपात करून घेणे तसे धोक्याचेच असते. गर्भाशयाचे मुख घट्ट बंद असल्यामुळे गर्भपात करणे अवघड होऊ शकते. कधी गर्भपिशवीला जखम होऊ शकते. जास्त रक्तसाव होऊ शकतो. तर कधी जंतुसंसर्ग होऊन बीजवाहक नलिका बंद होऊ शकतात.
कधी कधी अशा गुंतागुंतीमुळे परत गर्भधारणा होणे कठीण होऊन बसते. गर्भधारणा झालीच तरी आपसूक गर्भपात, अपु-या दिवसांचे बाळंतपण व्हयाची भिती असते. या सर्व विवेचनाचा मथितार्थ इतकाच की पहिले मूल लवकर नको असल्यास वेळच्या वेळी कुटुंब नियोजनाची साधने वापरणे सुरक्षित आणि फायद्याचे ठरते.
वैवाहिक सहजीवन यशस्वी होण्यासाठी 'विवाहपूर्व वैद्यकीय सल्ला' घेणे अनेक दृष्ट्या हिताचे ठरते. 'शुभमंगल सावधान' या दोन शब्दांत खूप मोठा गभिर्तार्थ सामावला आहे.
..............
रक्तगटांविषयीचे गैरसमज
सल्ला-मसलत हा विवाहपूर्व समुपदेशनाइतकाच महत्त्वाचा भाग आहे, शारीरिक तपासणी आणि रक्त चाचण्या! उदा. : रक्तगट ठरवणे. स्वत:चा रक्तगट काय आहे, हे प्रत्येकाला माहीत असायला हवेच. मात्र हल्ली वधूच्या रक्तगटाला अवास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वी पत्रिकेत मंगळ असला तर मुलांची जी स्थिती व्हायची तीच स्थिती आता (आर एच निगेटिव्ह) रक्तगट असलेल्या मुलांची व्हायला लागली आहे. पति-पत्नींच्या रक्तगटांविषयी बरेच गैरसमज सर्वांच्या मनात असतात. काही जणांना वाटते की, वधू-वरांचा रक्तगट एकच असू नये. या कल्पना चुकीच्या आहेत. रक्तगटांना आपण अवाजवी महत्त्व द्यायला लागलो आहोत.
==========
लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांत गर्भधारणा झाली नाही, की स्त्रिया अस्वस्थ होतात. डॉक्टरांच्या क्लिनिकचे उंबरठे झिजवायला लागतात. हे योग्य नाही. पती-पत्नीने निदान वर्षभर तरी एकत्र राहायला हवं. त्यानंतरच डॉक्टरांना भेटायला हवं. अर्थात स्त्रीचं वय पस्तिशीपेक्षा जास्त असेल, तर लवकर सल्ला घ्यायला हरकत नाही.
स्थूल स्त्रियांना गर्भधारणा व्हायला त्रास होतो. यासाठी वजनावर नियंत्रण ठेवावं. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग टाळावं. नव-यानेही या गोष्टी करू नयेत. दारूमुळे शुक्रजंतूंची संख्या कमी होते. स्त्रियांनी दारू प्यायल्यास तयार झालेल्या गर्भालाही इजा होऊ शकते. पुरुषांनी फार गरम पाण्याने आंघोळ केल्यास, वारंवार सोना बाथ किंवा गरम पाण्याने टबबाथ घेतल्यास त्यांचे शुक्रजंतू कमी होतात.
फार चिंता केल्यासही गर्भधारणेची शक्यता कमी होते. ब-याच स्त्रिया गर्भधारणा झाली नाही, याचीच चिंता करतात. हे टाळायला हवं. मन प्रफुल्लित असेल, तर गर्भधारणा लवकर होईल. दोन पाळ्यांच्या मधल्या दिवसांमध्ये अंडाशयातून अंडं बाहेर निघतं. या काळात दर दिवसाआड शरीरसंबंध झाल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. अंड्यांचं आयुष्य ४८ ते ७२ तासांचं असतं आणि दिवसाआड संबंध झाल्यास शुक्रजंतूंची संख्या ही वाढलेली असते.
अनेकदा प्रश्न याहूनही मूलभूत असतो. जोडप्यांचा शरीरसंबंधही नीट होत नाही. यासाठी डॉक्टरी सल्ला घेणं फार चांगलं. लैंगिक शिक्षण हाही त्यावरचा उत्तम उपाय ठरेल.
==================
आमचं लग्न होऊन चारच महिने झालेत. एरवी आम्ही काळजी घेतो पण काल रात्री ते राहून गेलं. आम्हाला एवढ्यात बाळाची जबाबदारी नकोय. प्रेग्नन्सी टाळायला काय करावं लागेल?...असे प्रश्न नवविवाहितांनाच नव्हे तर इतरांनाही पडू शकतात. गर्भनिरोधक साधनं ऐनवेळी दगा देऊ शकतात. अशा वेळी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरणं हा पर्याय आहे. पण त्यांचा अतिरेकी वापर स्त्रीच्या आरोग्यावर कायमस्वरूपी दुष्परिणाम घडवू शकतो.
..........
गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक आधुनिक गर्भनिरोधक साधनं उपलब्ध आहेत. कंडोम, ओरल हामोर्नल टॅबलेट्स, कॉपर टी, मल्टिीलोड इत्यादी. गेल्या काही वर्षापासून अत्यंत कमी मात्रेच्या गर्भनिरोधक गोळ्या (व्होरी लो डोस कॉन्ट्रासेप्टिव पिल्स) उपलब्ध झाल्या आहेत. या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि नवीन प्रकारच्या प्रोजेस्टेरॉनचा वापर केलेला असतो. या गोळ्या विशिष्ट तऱ्हेने नियमितपणे घ्यायच्या असतात. त्यांच्या यशस्वीतेचं प्रमाण जवळजवळ शंभर टक्के आहे. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाहीत. विशेषत: नवीन लग्न झालेल्या युुवतींसाठी त्या फारच उपयुक्त ठरतात. सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. तेव्हा विवाहपूर्व वैद्यकीय सल्ला घ्यायला येणाऱ्या सर्व जोडप्यांना विविध गर्भनिरोधक साधनांविषयी माहिती दिली जाते
ही साधने नियमितपणे आणि सातत्याने वापरायची असतात. म्हणजे यशस्वीतेचे प्रमाण वाढते. पण आयत्या वेळी कंडोम फाटणे, रोजच्या गर्भनिरोधक गोळ्या खायला विसरणे, कॉपर टी गर्भाशयातून गळून पडणे अशा इमर्जन्सीज निर्माण होऊ शकतात आणि गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. कधीकधी बेसावध राहिल्याने अनपेक्षीतरित्या लैर्गिक संबंध येतात, बलात्कारासारख्या प्रसंगामुळे नको असलेली गर्भधारणा राहण्याची भीती असते. अशावेळी आपत्कालीन गर्भनिरोधक अत्यंत उपयुक्त आहे.
जुन्या ग्रंथातसुद्धा आपत्कालीन गर्भनिरोधकांची थोडीफार वर्णनं आढळतात. अर्थात त्यासाठी झाडपाला, तेलं, विशिष्ट बिया यांचा वापर केला जात असे. आधुनिक वैद्यकात १९६० मध्ये एका बलात्कारित स्त्रीला गर्भधारणा होऊ नये म्हणून इस्ट्रोजेन हामोर्नचा मोठा डोस देण्यात आला होता. तेव्हापासून वेगवेगळी इस्ट्रोजेन दव्ये वापरली जाऊ लागली. पण मळमळणे, उलट्या, डोके दुखणे इत्यादी साइड इफेक्ट्समुळे त्यांच्या वापरावर मर्यादा आल्या. कॅनडातील डॉ. युझपीनी १९७० सालापासून इस्ट्रोजेन आणि नॉरजेस्ट्रेल यांचा एकत्रित वापर करण्यास सुरुवात केली. काही वर्षार्ंपासून मात्र प्रोजेस्टेरॉनचा वापर आपत्कालीन गर्भनिरोधक म्हणून सर्रास केला जातो. यासाठी लेव्होनोजेर्स्ट्रेल(०.७५ मिगॅ)च्या दोन गोळ्या वापरण्यात येतात भारतात हे औषध नॉरलिव्हो, पिल सेव्हण्टी टू, इसीटू या नावांनी बऱ्याच वर्षांपासून उपलब्ध आहेत. पण या गोळ्यांची आक्रमकपणे जाहिरात केली गेली नाही. या गोळ्या केमिस्टकडे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही मिळू शकतात. असुरक्षित लैर्गिक संबंधानंतर ७२ तासांच्या आत स्त्रीने या गोळ्यांचा वापर करायचा असतो. लवकरात लवकर पहिली गोळी आणि ७२ तासांच्या आत दुसरी गोळी घ्यायची असते. यामुळे अनेक बदल स्त्री जननसंस्थेमध्ये होतात. बीजविमोचन टळते, बीजवाहक नलिकांची गती मंदावते, फलीत स्त्रीबीज गर्भाशयाच्या अस्तरात रुजू शकत नाही. एरवी असुरक्षित संबंधामुळे गर्भधारण होण्याची शक्यता ८ टक्के असते. पण अशा संबंधानंतर आपत्कालीन गर्भनिरोधक वापरल्यास हे प्रमाण १ टक्क्यापर्यंत खाली येते. अर्थातच संबंधांनंतर जेवढ्या लवकर या गोळ्या घेतल्या जातात तेवढे यशस्वीतेचे प्रमाण जास्त असते.
* या गोष्टी लक्षात ठेवा -
* या गोळ्या गर्भपात करू शकत नाहीत म्हणजेच आधीच गर्भधारणा झाली असल्यास त्या उपयुक्त ठरत नाहीत.
* गोळ्या घ्यायच्या अर्धा तास आधी उलट्या न व्हायची गोळी घेतल्यास चांगले तरीही गोळी घेतल्यावर उलटी झाल्यास आणखी एक गोळी घ्यावी.
* या गोळ्या मासिक पाळीच्या चक्राच्या कोणत्याही दिवशी घेता येतात.
* या गोळ्या म्हणजे नेहमीची गर्भनिरोधक साधने नव्हेत. फक्त आपत्काळातच त्यांचा वापर करायला हवा.
* या गोळ्यांमुळे लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांना प्रतिबंध बसत नाही. उदा. एच आयव्ही, सिफिलिस
* या गोळ्यांचा वापर केल्यास पुढची पाळी थोडी लवकर किंवा उशिरा येण्याची शक्यता असते.
* या गोळ्या घेतल्यानंतर परत असुरक्षित संबंध आल्यास गर्भधारणा व्हायची भीती कायम राहते. म्हणजेच या गोळ्या केवळ एकाच सुरक्षित संबंधापासून संरक्षण देऊ शकतात.
* आधीच गर्भधारणा झालेली असली गर्भ रुजला असला आणि नंतर या गोळ्या घेण्यात आल्या तर गर्भपात होत नाही, पण गर्भावर दुष्परिणामही होत नाही.
* नियमितपणे एखादे गर्भनिरोधक साधन वापरणे आपत्कालीन गर्भनिरोधकापेक्षा नेहमीच जास्त फायद्याचे आणि सुरक्षित ठरते. उदा. कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, मल्टिलोड इत्यादी.
* या गोळ्या सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांत मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गोळ्या घेऊनही पाळी चुकली, पोटात दुखायला लागले किंवा अतिरक्तस्त्राव व्हायला लागला तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा कारण गर्भधारणा झाल्यामुळे किंवा अंतस्त्रावांमध्ये बिघाड झाल्यामुळे असे होऊ शकते.
...........
सावधान!
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, चांगली आणि वाईट! प्रत्येक औषधाचा उपयोग होऊ शकतो तसेच दुरुपयोगही. मध्यंतरी अशा एका गोळ्यांच्या जाहिरातीचे पेव फुटले होते. वृत्तपत्रे, लोकलचे डबे... बघावे तिथे या जाहिराती! नियमितपणे वापरायच्या गर्भनिरोधक गोळ्या आणि आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या यांच्यामधला फरक बहुतेक सर्वच जोडप्यांना माहीत नसल्यामुळे सगळ्यांच्या मनाचा गोंधळ उडाला. विशेषत: कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवतींनी या गोळ्यांचा वापर सर्रास सुरू केला. या गोळ्या महिन्यातून एकदा किंवा फारतर दोनदा वापरणे योग्य ठरते. यापेक्षा जास्त वेळा सेवन केल्यास त्यांचा उपयोग होत नाही. अयशस्वीतेचे प्रमाण वाढते. तसेच पाळीचे चक्र अत्यंत विस्कळीत होऊन रक्तस्त्राव अनियमित होतो. माझ्यासारख्या अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांकडे बऱ्याच मुली आणि स्त्रिया अनियमित रक्तस्त्रावाची तक्रार घेऊन आल्या. चार ते पाच वेळा या गोळ््यांचा त्यांनी वापर केल्यामुळे ही दुरवस्था ओढवली होती. तसेच काही तरूण कंडोम वापरणे सोयिस्कररित्या टाळायला लागले. मैत्रिणीने एक गोळी घेतली की काम भागले, कशाला कंडोम वापरायचा? असा अविचार बळावला. ही गोळी लैंगिक संबंधांमुळे प्रसारित होणाऱ्या रोगांना (सिफिलिस, एचआयव्ही इत्यादी) प्रतिबंध करू शकत नाही हे या जोडप्यांच्या लक्षात येत नाही. बेजबाबदार जाहिरातींमुळे काय अनर्थ होऊ शकतो याचे हे ढळढळीत उदाहरण! तामिळनाडूमध्ये या जाहिरातींवर बंदी आली. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी नापसंती दर्शवली, तेव्हा कुठे या जाहिरातींचे प्रमाण कमी झाले.
थोडक्यात सांगायचे झाले तर, नियमितपणे एखादे गर्भनिरोधक साधन वापरणे सर्वांत सुरक्षित आणि फायद्याचे असते. असे साधन वापरण्यात काही चूक झाल्यासच आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करायला हवा. हे सर्व करूनही गर्भाधारणा झाल्यास वैद्यकीय गर्भपाताचा पर्याय उपलब्ध आहे. जबाबदार लैंगिक वर्तनाचे फायदे समजून घेण्याकरता स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यायला हवा. म्हणजे कधी आणि कुठल्या गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करायचा असतो यात गल्लत होणार नाही.
===================
* मी २७ वर्षांची अविवाहीत तरुणी आहे. माझी आई आणि मोठी बहीण या दोघींचंही वयाच्या ३५ व्या वर्षी अंडाशय निकामी झालं होतं. ही समस्या माझ्यामध्ये निर्माण होऊ नये, यासाठी मी कशा प्रकारे काळजी घेऊ शकते?
प्रीमॅच्युअर ओव्हरीअन फेल्युअर म्हणजे वयाच्या आधी अंडाशय निकामी होण्याच्या फॅमिली हिस्ट्रीमुळे अशा प्रकारची समस्या तुमच्यामध्येही निर्माण होण्याची शक्यता बळावते. म्हणूनच दर वर्षाने डॉक्टरकडे जाऊन स्वत:ची मेडिकल तपासणी करून घ्या. सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट यासाठी कराव्या लागतील. याशिवाय ब्लड शुगर आणि थॉयरॉइड लेव्हलही चेक करणं आवश्यक आहे.
या समस्येमुळे वांझपणा (मूल न होणं) येत असल्याने तुम्ही आपलं मूल लवकर प्लॅन करणं अधिक योग्य! सुदैवाने, आता एग फ्रीजिंग टेक्निक उपलब्ध आहे. अधिक बीजांड विकसित होण्यासाठी इंजेक्शन देण्यात येतं. एकदा का या बीजांडाची वाढ झाली, की एका बारीक सुईतून ते तुमच्या शरीरातून काढून घेण्यात येतील. ही प्रक्रिया तुम्हाला अॅनेस्थेशिया देऊन पार पडली जाते. ही वेदनारहित अशी प्रक्रिया आहे. हे बीजांड मग खूप कमी तापमानाला स्टोअर करण्यात येतं. अनेक वर्षं हे बीजांड फ्रीज करून सुरक्षित ठेवता येतं. नंतर जेव्हा कधी तुम्हाला गर्भधारणेची इच्छा असेल तेव्हा तुमच्या पतीच्या वीर्यातील शुक्राणूंशी संयोग घडवून आणला जातो. यामुळे तुम्हाला मूल होऊ शकतं.
Turn off your child's TV addiction with Magic Crate
Ad: magic crate
Wish to know about making learning fun?
Ad: magic crate
Recommended By Colombia
* मी २७ वर्षांची असून माझी मासिक पाळी अनियमित आहे. माझ्या डॉक्टरने ही पीसीओएस (पॉलिसायस्टिक ओव्हरी सिण्ड्रोम)ची केस असल्याचं निदान केलं आहे. मी ऐकलं आहे, की अशी समस्या असणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भधारणा होत नाही. हे खरं आहे का?
अशी समस्या असणाऱ्यांमध्ये गर्भधारणा होणं कठीण असतं पण अशक्य नाही. वजन अधिक असणाऱ्या स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळीची समस्या दिसून येते. आणि त्यामुळे मूल न होण्याची समस्या निर्माण होते. म्हणूनच ही समस्या सोडवण्यातील पहिली पायरी म्हणजे वजन कमी करणं. समतोल आणि चौरस आहार आणि व्यायाम यामुळे आरोग्याबरोबरच हामोर्न्सचं बिघडलेलं संतुलन योग्य राखता येतं.
इतर उपाय म्हणजे औषधं, इण्ट्रायुटेरिन इनसेमिनेशन (आययूआय). आययूआयमध्ये बीजांड विकसित होण्यासाठी काही औषधं घ्यावी लागतात. एकदा का एकदा का या बीजांडाची वाढ झाली, की तुमच्या पतीच्या वीर्यातील शुक्राणूंशी संयोग घडवून आणला जातो. तयार होणारा गर्भ तुमच्या गर्भाशयात सोडण्यात येईल. ही प्रक्रिया खूपच सोपी आणि वेदनारहित आहे.
ज्या स्त्रियांमध्ये ही प्रक्रियाही यशस्वी होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आयव्हीएफचा पर्याय आहे. यात स्त्रीमधील बीजांडाचा लॅबमध्ये पुरुषाच्या शुक्राणूशी संयोग घडवून आणला जातो.
नंतर फलित बीज गर्भाशयात सोडण्यात येईल. ही प्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण ५० टक्के आहे. गर्भारपणाच्या काळात गर्भपात, डायबीटीस, उच्च रक्तदाब, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आदी धोके असतात. म्हणूनच नियमितपणे डॉक्टरांना भेट द्या.
==================
पॉलिसिस्टीक ओवरियन सिंड्रोम (pcos) हा अंतःस्रावी विकार असून त्यामुळे ओव्हरी (बीजकोष) अकार्यक्षम होते आणि त्याचा परिणाम १० ते १५ टक्के महिलांच्या जननक्षमतेवर होतो. हा विकार प्रामुख्याने स्थूलपणा व जादा वजन असेल्या महिलांमध्ये आढळून येतो. या आजाराचे प्रमाण तरुण महिलांमध्ये वाढत असून त्यामुळे गर्भधारणा होण्यास विलंब व जननक्षमतेवर होत आहे.
प्रत्येक महिन्यात स्त्रीच्या ओव्हरीमध्ये एक ओव्हम फलनासाठी तयार होते. या ओव्हरीमध्ये द्रवयुक्त कोशिका असते. त्याला फॉलीकल असे म्हणतात. त्यात सूक्ष्म ओव्हम असतात. जेव्हा ओव्हमची वाढ होते तेव्हा फॉलीकलमध्ये द्रव वाढण्यास सुरवात होते. जेव्हा ओव्हम परिपक्व होतात तेव्हा फॉलीकलमधून ओव्हमचे उत्सर्जन होते. या प्रक्रियेला ओवुलेशन म्हणतात. यातील निकोप ओव्हम फॅलोपियन नलिका उचलते तेथे त्याचा येणाऱ्या वीर्याशी संपर्क येतो. ते फलित होऊन भ्रूण तयार होते. जे पुढे फॅलोपियन नलिकेद्वारे गर्भाशयात जाते आणि त्याचे गर्भधारणेसाठी प्रत्यारोपण होते.
पॉलिसिस्टीक ओवरीयन सिंड्रोम असलेल्या महिलांत प्रत्येक ओव्हरीमध्ये अशा प्रकारचे फॉलीकल मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळे त्याला पॉलिसिस्टीक ओवरीयन सिंड्रोम असे संबोधले जाते.
जेव्हा एखाद्या तरुण मुलीला ऋतुप्राती होते तेव्हा तिच्या मासिक पाळीच्या संदर्भात अत्यंत जागरुक असले पाहिजे. विशेषतः ती मुलगी स्थूल किंवा अतिलठ्ठ असल्यास अधिक खबरदारी घेतली पाहिजे. तिने मासिक पाळीच्या तारखांची नोंदवही ठेवून त्या विषयीचे शास्त्रीय ज्ञान अवगत केले पाहिजे. तिने पुढील मासिक पाळीत अनियमितता आढळल्यास अधिक सतर्क राहिले पाहिजे.
यातील काही मुद्दे असे- २८ ते ३० दिवसांच्या कालावधीनंतर मासिक पाळी न येणे किंवा विलंब होणे, मासिक पाळीचा कालावधी अनियमित किंवा अपुरा रक्तस्राव होणे, वर्षातून बारापेक्षा कमी मासिक पाळी येणे.
अनेकदा काही अन्य घटकांमध्ये अशी समस्या निर्माण होऊ शकते. परंतु ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ ही समस्या सुरू राहिल्यास पॉलिसिस्टीक ओवरीयन सिंड्रोमची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. पौगंडावस्थेत अशी लक्षणे आढळून येत असतील तरी प्रौढ जीवनात ती विकोपाला जाऊ शकतात. किंवा सातत्याने असेच होत राहते. पुढील भागात या विकाराची लक्षणे व उपचारांची माहिती घेऊया..
=============
तमाम आई-वडिल, सासू-सासरे आणि आजी-आजोबा यांना विनंती की, त्यांनी आपल्या मुला-मुलींच्या, जावई-सूनेच्या कुटुंब मर्यादित ठेवण्याच्या इच्छेआड येऊ नये. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या.
*********************
झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचं संकट देशाच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरणार आणि त्यासाठी काही खंबीर पाऊलं आपण उचलली पाहिजे, हे र. धों. कवेर् यांच्यासारख्या जाणत्याच्या लक्षात स्वातंत्र्यपूर्व काळापासून आलं असलं तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे १९५२ सालापासून लोकसंख्या वाढीस नियंत्रण घालण्याच्या दृष्टीने राष्टीयस्तरावर या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली. गेल्या ५८ वर्षांपासून हा कार्यक्रम आपल्या देशात सातत्याने राबविण्यात येतो. हा कार्यक्रम अधिक लोकाभिमुख व्हावा यासाठी त्यात आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी बदल करण्यात आले. आपल्या देशाचे कोट्यवधी रुपये आतापर्यंत खर्च झाले तरी लोकसंख्या वाढीस आपण समाधानकारकरित्या आळा घालू शकलो नाही, हे उघड सत्य आहे. असं का झालं? कुणाचं चुकलं? राजकारणी लोकांचं? कार्यक्रम राबविणाऱ्या अधिकारी-कर्मचारी वर्गाचं? जनतेचं? का अजून कुणाचं? या आणि अशा प्रकारची प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे. पण त्याचवेळी वाचकांनाही आपलं काही चुकलं का, आपण लोकसंख्या नियंत्रणासाठी काय करू शकतो, आपलं दैनंदिन जीवन सांभाळून आपण या कार्यक्रमास कसा हातभार लावू शकतो याबाबतीत ऊहापोह व्हावा ही इच्छा आहे.
या संदर्भात खालील गोष्टी सुचवाव्याशा वाटतात.
१) कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी पाळणा लांबविण्याच्या साधनांचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे, ही बाब जरी खरी असली तरी या साधनांबद्दल गैरसमज अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात आहेत. साधनांचा वापर करीत असताना बऱ्याच लोकांना चांगले अनुभव आलेले आहेत, त्यांना फायदाच झालेला आहे. आपल्याला आलेला चांगला अनुभव केवळ आपल्यापुरता मर्यादित न ठेवता तो इतरांनाही सांगा.
२) क्वचित प्रसंगी चांगला अनुभव न आल्यास त्याची चर्चा न करता त्या बद्दलचा खुलासा तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घ्या.
२) आपण समाजातील कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणारी व्यक्ती असा, आपल्याला जर लोकसंख्या वाढीचा प्रश्न गंभीर आहे, देशाच्या विकासाच्या आड येत आहे असं मनोमन वाटत असेल तर या बाबतीत चिंतन करा. अगदी विद्याथीर् जीवनापासून म्हातारपणापर्यंत जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रसंग पाहून या प्रश्नाबद्दल सकारात्मक चर्चा घडवून आणा. चचेर्चं फलित अमलात आणण्याचा प्रयत्न करा.
४) विवाहपूर्व समुदपदेशनाचं महत्त्व जाणून घ्या. लग्न ठरल्यानंतर किंवा लग्नानंतर लगेच तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करा. नवविवाहित जोडप्यांनी इच्छा असेल तेव्हाच गर्भधारणा होऊ द्यावी आणि नको असल्यास ती कशी टाळावी याचं मार्गदर्शन घेऊनच कामजीवनास सुरुवात करावी.
५) खाजगी क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घेणं फार आवश्यक आहे. उदा. एखादा व्यापारी किंवा दुकानदार. आपल्या दुकानातील नोकरवर्गाच्या बाबतीत या संदर्भात चौकशी करून नोकरांना छोटे कुटुंब, पाळणा लांबविण्याची साधने याबद्दलची माहिती देऊन महत्त्व पटवून देण्यासाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. एवढंच नव्हे तर अधून मधून त्यांच्याशी याबाबतीत बोलून ते अंमलबजावणी करीत आहेत किंवा नाही हे पाहिलं पाहिजे. नसल्यास आपल्या एखाद्या डॉक्टर मित्रास फोन करणे, पत्र देऊन पाठविणे, याप्रकारे पाठपुरावा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळवून देणे. गरज आहे ती त्या व्यापाऱ्याच्या इच्छाशक्तीची.
६) आपल्याला किमान एक तरी मुलगा झाला पाहिजे ही समाजातील बऱ्याच लोकांच्या मनात असलेली भावना, लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमातील प्रमुख अडथळ्यांपैकी एक आहे. बाळ गर्भावस्थेत असतानाच सोनोग्राफीद्वारे मुलगा/ मुलगी तपासणी करणे आणि मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करणे भविष्याच्या दृष्टीने चूक आहे, बेकायदेशीर आहे, महिलेच्या प्रकृतीस घातक आहे या विचारांचा प्रचार करा. मुलगा/ मुलगी तपासणीची 'मागणी' डॉक्टरांकडे करू नका.
७) प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाने, महाविद्यालयाच्या प्राचार्याने, बँकेच्या मॅनेजरने, पोस्टमास्तर वगैरे कार्यालयातील प्रमुखाने एकदा गंभीरपणे बसून आपण आणि आपले कर्मचारी याबाबत काय करू शकतो याचा विचार करावा. यासंदर्भात निदान दरवषीर् ११ जुलै रोजी एक तरी बैठक घेऊन आढावा घेणे फार अवघड नाही. विविध कार्यालयात आपल्या कर्मचारी वर्गाच्या आरोग्यासाठी अधूनमधून हृदयरोग, मधुमेह, दमा, दंतरोग वगैरे आजाराच्या बाबतीत 'चेकअप' कॅम्पस आयोजित केले जातात मग लोकसंख्या नियंत्रण अथवा पाळणा लांबविण्याच्या साधनांच्या वापरासंबंधी एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरच्या उपस्थितीत बैठक किंवा चर्चा सत्राचे आयोजन का होऊ नये?
८) हा लेख वाचणाऱ्या तमाम आई-वडिल, सासू-सासरे आणि आजी-आजोबा यांना विनंती की त्यांनी आपल्या मुला-मुलींच्या, जावई-सूनेच्या कुटुंब मर्यादित ठेवण्याच्या इच्छेआड येऊ नये. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. अडचण असल्यास तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्या.
या सर्व सूचना संबंधितांनी ताबडतोब अमलात आणण्याजोग्या आहेत असं वाटतं. ज्यांना याचं महत्त्व पटलं आहे त्यांनी किमान एका जोडप्याला जरी मार्गदर्शन केलं तरी या देशकार्यास भरपूर हातभार लागेल.
==============
अलीकडेच मी माझी वीर्यतपासणी करून घेतली. माझ्या वीर्यामध्ये प्रती मिलिलिटरमध्ये सुमारे एक कोटी शुक्रजंतू आहेत असा रिपोर्ट आला. असं असूनही हे प्रमाण मूल होण्यासाठी कमी आहे, असं डॉक्टर म्हणतात. गर्भधारणा होण्यासाठी एक शुक्रजंतूही पुरेसा असतो. मग मला मूल का होत नाही?
एका वेळी होणा-या वीर्यस्खलनामध्ये साधारणपणे दोन ते पाच मिलिलिटर वीर्य बाहेर पडतं. एका वेळी निघणाऱ्या वीर्यामध्ये सुमारे दहा ते तीस कोटी शुक्रजंतू असतात. हे प्रमाण व्यक्तिगणिक तसंच वीर्यस्खलनागणिक वेगवेगळं असतं. गर्भधारणा होण्यासाठी केवळ एक सशक्त शुक्रजंतू आणि एक स्त्रीबीज यांचं मीलन होणं आवश्यक असतं. तरीही जोपर्यंत वीर्यामधलं शुक्रजंतूंचं प्रमाण किमान प्रत्येक मिलिलिटरमध्ये दोन कोटी असत नाही, तोपर्यंत गर्भधारणा होत नाही.
गर्भधारणेसाठी केवळ एकाच शुक्रजंतूची गरज असेल तर मग दोन कोटी/मिलिलिटर एवढ्या प्रमाणात शुक्रजंतू वीर्यामध्ये असण्याची गरज काय किंवा हे प्रमाण दोन कोटीपेक्षा कमी असल्यास गर्भधारणा का होत नाही, असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण या प्रश्नांची उत्तरं अजूनही विज्ञानाला मिळालेली नाहीत
=============
मानव जन्माशी संबंधित कालज्ञानाचा अभ्यास प्रस्तुत 'नाळब्रह्म' पुस्तकात मांडला आहे. याची सुरुवात फलज्योतिषातील 'आधान' पद्धतीने होते. आधान पद्धतीत जन्मवेळेवरून गर्भधारणेची वेळ ठरवली जाते. त्यानंतर या वेळेची ग्रहस्थिती पाहून बालकाच्या आरोग्याबाबत काही आडाखे बांधता येऊ शकतात. ही पद्धत प्राचीन असून वराहमिहीराने याचा उल्लेख बृहत्संहितेत केला आहे. वराहमिहीराने आधान पद्धतीचा वापर 'मेघगर्भ' रचनेचा काळ ठरविण्यासाठी केला आहे आणि त्यायोगे पाऊस केव्हा, कसा आणि किती पडेल याची सूत्रे मांडली आहेत.
प्रस्तुत पुस्तकात आधान पद्धतीचा एक निराळा पैलू डॉ. शुभदा शेळके यांनी समोर आणला आहे. यात स्त्रीच्या रजोदर्शनाच्या वेळेवरून तिचा ऋतुकाळ किती दिवस असेल आणि ऋतुकाळात गर्भधारणा केव्हा शक्य होईल या वेळांचे गणित सूर्य आणि चंद यांच्या आकाशस्थ स्थितीवर व गतीवर बसवले आहे. डॉ. शेळके म्हणतात, 'सूर्य आणि चंद यांच्या उष्ण व शीत संयोगाची वेळच गर्भधारणा निश्चित करत असते. सूर्य व चंद यांच्या स्थिती व गती स्त्री शरीरातल्या उष्ण आर्तव म्हणजे रक्त व शीत वीर्य यांच्या अंतर्गत रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण करीत असतात.' या सिद्धांताची तात्त्विक बैठक पुस्तकाच्या पहिल्या काही पानांमध्ये विस्तृतपणे दिली आहे. कालचक्राचा आयुष्यचक्राशी असणारा संबंध त्यांनी उलगडून दाखवला आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास करताना त्यांनी फलज्योतिषाची तत्त्वे बाजूला ठेवली आहेत आणि शुद्ध गणिताचा आधार घेतला आहे. विशिष्ट संख्येनेच का भागायचे? का गुणायचे? असे प्रश्न सोडवताना त्या संख्यांचा आयुष्यचक्राशी काही संबंध आहे का? याचा डॉ. शेळके यांनी विचार केला आहे तो स्तुत्यच आहे. पारंपरिक ज्योतिष ग्रंथात आधान पद्धतीचे वर्णन करताना यातील गणिताचा कार्यकारणभाव स्पष्ट केलेला नाही त्यामुळे विशिष्ट संख्या का वापरायच्या हे स्पष्ट होत नाही. त्यामागील तर्क स्पष्ट होत नाही. हा तर्क स्पष्ट करण्याचा प्रयत्न डॉ. शेळके यांनी पुस्तकात केला आहे.
पुस्तकात स्त्रीच्या रजोदर्शनापासून बालकाच्या जन्मापर्यंतचे गणित वेगवेगळ्या पायऱ्यांद्वारे कसे करता येईल हे दाखवले आहे. यासाठी आवश्यक परिभाषा आणि काही संज्ञांच्या व्याख्या परिशिष्टात समाविष्ट केल्या आहेत. गणिताची पद्धती मात्र जुन्या वळणाची आहे. त्यामुळे नवीन अभ्यासकांना ती समजून घेणे थोडे अवघड जाईल. जर थोडे बदल करून हेच गणित नवीन प्रकाराने केले तर सुलभ होईल, तसेच त्यासाठी संगणकाची मदत घेणे सोईचे ठरेल. यात प्रतिपादन केलेल्या पद्धतींचा संख्याशास्त्रीय अभ्यास फार मोलाचा ठरेल.
आधान पद्धतीच्या या अभ्यासाची सामाजिक उपयुक्ततादेखील आपण लक्षात घेतली पाहिजे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वंध्यत्व ही एक मोठी समस्या आहे. बरेचदा पती-पत्नी नॉर्मल असतानाही गर्भधारणा होत नाही असे का घडते याचे कारण प्रत्येक शरीराची एक स्वतंत्र कालगणना असते आणि ती निसर्गचक्राशी बांधलेली असते ती आपण समजून घेत नाही. आजचे तंत्रज्ञान अत्यंत विकसित आहे. स्त्रीच्या शरीराबाहेर कन्सेप्शन घडवून नंतर बीज गर्भाशयात स्थापन करणे आज विज्ञानाने शक्य आहे. ही पद्धत अत्यंत क्लिष्ट आणि खचिर्क आहे. यासाठी सर्व प्रकारची दक्षता डॉक्टर घेतात तरी या पद्धतींद्वारे संतती होण्याची शक्यता फक्त २० ते २५ टक्के असते. मग उरलेल्या ७५ टक्के केसेसमध्ये अपयश का येते? याची अनेक कारणे असतील, पण त्यात या कालगणनेचे महत्त्व मोठे आहे हे निश्चित. डॉ. शेळके यांनी पुस्तकात या तंत्रज्ञानास पूरक असा एक यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. मला वाटते ही फार उपयुक्त गोष्ट आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शरीरात घडणाऱ्या घटना आपण पाहू शकतो. जर या तंत्रज्ञानास या कालविज्ञानाची जोड दिली तर निश्चितच त्याचा फायदा समाजास मिळेल. डॉ. शुभदा शेळके यांचे हे पुस्तक या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. यातील पद्धतींचा संख्याशास्त्रीय अभ्यास करून त्याचे निष्कर्ष पुढील काळात आपल्यासमोर येतील असा विश्वास वाटतो.
नाळब्रह्म
शुभदा शेळके
प्रकाशक : अक्षर प्रकाशन, मुंबई
पृष्ठं : ११०
किंमत : १२० रु.
=======================
मागील लेखात आपण पीसीओडीची केस स्टडी अनुभवली. यालेखाद्वारे या आजाराबाबतच्या काही बाबी जाणून घेऊया. स्त्रियांच्या मासिक ऋतुचक्रात बाराव्या ते पंधराव्या दिवसांच्या दरम्यान अंड विमोचन होते यालाच 'ओव्हूल्यूशन' म्हणतात. हे अंड म्हणजेच स्त्रीबीज. याच बीजाचा प्रजोत्पादन करण्यात महत्त्वाचा सहभाग असतो. प्रजोत्पादनात स्त्रीबीजाचा पुरुषाकडून निर्माण होत असलेल्या शुक्राणूंशी संबंध झाल्यास आणि ते फलीत झाल्यास गर्भ धरण्यास सुरुवात होते. पीसीओडी विकारात गडबड होते ती अंड-विमोचन काळामध्ये. शरीरांतर्गत संप्रेरक असंतुलनात विशिष्टरित्या LH व FSH यांचे असंतुलन उदभवले की अंडविमोचन होत नाही. स्त्रीबीज जे यादरम्यान पूर्ण विकसित व्हावयास हवे ते होत नाही. ते अविकसित स्वरुपातील राहिलेले असल्याने सोनोग्राफीत सीस्ट स्वरुपात आढळते. त्याच्या अनेक 'पुट्ट्या' (सिस्ट) तयार होतात. म्हणूनच याला वैद्यकीय भाषेत 'पॉलिसिस्टीक ओव्हरी' असे म्हणतात. अंडविमोचन अडकल्याने पुढील ऋतुचक्रात होणारे आवश्यक बदल ढासळतात व याचाच परिणाम मासिक पाळी अनियमित होण्यावर होतो.
लक्षणे
प्रामुख्याने पीसीओडी PCOD त आढळणारी लक्षणे सर्वाधिक मासिक पाळीशी निगडीत असतात. त्यात मासिक पाळीतील अनियमितता हे प्रमुख लक्षण आहे. पाळीदरम्यानचा स्त्राव कमी होवू लागतो व कालांतराने पाळी येणेच बंद होते. बंद होण्यापूर्वीसुध्दा ती ठराविक काळात न येचा उशीरा येण्यास सुरुवात होते. दर महिन्याला पाळी न येता ती दोन महिन्यांनी, तीन महिन्यांनी येते. त्यालाच 'अमेनोऱ्हीया' असे म्हटले जाते. अनियमित मासिक पाळीचा परिणाम म्हणजे येणारे नापिकत्व किंवा वंध्यत्व. नव्याने लग्न झालेल्या जोडप्यात मातृत्त्वाची ओढ असते. पण पीसीओडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्या जोडप्याच्या पदरी निराशा पडते. परिणामी त्यांची मानसिकता ढासळते.
पीसीओडीमधील तिसरा परिणाम बाह्यांगावरदेखील दिसून येतो. अनपेक्षित ठिकाणी केसांची वाढ होवू लागते. याला 'हिरसुटीझम' म्हणतात. यात स्त्रीचा चेहरा पुरुषी दिसू लागतो. विशेषतः हनुवटीवर, गालावर, हातापायावर केसांची वाढ होते. ही केसांची वाढ तरुणी, महिलांना लाजिरवाणी व न्यूनगंड निर्माण करणारी असते.
स्थुलता हा आणखी एक परिणाम. खासकरुन हा लठ्ठपणा पोटावर जाणवतो. पोटाचा घेर वाढतो थोडक्यात 'पोट सुटते'. शरीरावर एकप्रकारची सूज दिसू लागते. मानेजवळील चरबी जाणवते. यातील महत्त्वाचे लक्षण असे की स्त्रियांच्या आवाजात बदल होतो. यात त्यांचा आवाज घोगरा होतो. थोडक्यात चेहऱ्यावरील केस व घोगरा आवाज यामुळे स्त्रियांना लाजिरवाणे होणे साहजिक आहे. परिणामांमध्ये आणकी एक भर पडते ती पुळ्यांची. यात चेहऱ्यावरील पिटिका वाढण्याची शक्यता असते.
होमिओपॅथीक चिकित्सापद्धती
समाजात पीसीओडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रत्येक स्त्रीवर्गाने या विकाराबाबत अधिक जागरुकता ठेवणे आवश्यक आहे. वंध्यत्वाची संभाव्यता ही यातील गंभीर बाब आहे.
यातील जमेची आणि आत्मविश्वास निर्माण करणारी बाजू म्हणजे योग्य चिकित्सकाकडून उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. यात आजाराचे संपूर्ण उच्चाटन होते. एक लक्षात ठेवले पाहिजे की हा आजार नेमक्या कुठल्या कारणाने होतो हे वैद्यकीय संदर्भातही ज्ञात नाही.शरीरात तयार होत असलेले हार्मोन्स मन आणि स्वभाव यांच्या उलथापालथीशी निगडीत आहेत. 'पाहे ते सौंदर्य' म्हणजेच सोंदर्य ही संकल्पना आहे त्याची ठराविक व्याख्या नाही. पण नैसर्गिकप्राप्त सौंदर्य अबाधित राखण्यासाठी रासायनिक प्रक्रियांचा मारा करुन आहे त्यात अनैसर्गिकरित्या बदल करण्याची असंतुष्ट प्रयत्नशिलता घातक ठरते हे कदापिही विसरु नका.
आरशात वारंवार पाहून पुरुषी चेहरा व पोटाचा घेर याविषयी वाटणारी खंत सोडून स्त्रियांनी जीवनशैली बदलली पाहिजे. आधुनिकता अवलंबली पाहिजे मात्र ऐषआराम सोडून आपले सौंदर्य आपल्या सात्विकतेने सिध्द केले पाहिजे. एक तज्ज्ञ होमिओपॅथ म्हणून आपणास विनंती करतो की स्त्रियांनी पीसीओडीसारख्या विकारांपासून दूर राहण्यासाठी सहजतेची व सात्विकतेची जीवनशैली अंगिकारली पाहिजे.
============
भारतीय महिलांचे गर्भाशय भाड्याने घेऊन गर्भधारणा करण्याला परदेशी जोडप्यांना बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. गर्भधारणा करू शकणाऱ्या महिलेच्या गर्भाशयात आपला गर्भ वाढविण्याचे (सरोगसी मदर) वैद्यकीय तंत्रज्ञान यशस्वी झाल्याने मूल न होणाऱ्या महिलांना एक वरदान मिळाले आहे. भारतीय महिलांच्या गर्भाशयात आपला गर्भ वाढविण्यासाठी परदेशांतील जोडपी मोठ्या प्रमाणावर भारतात येत असल्याने या क्षेत्रातील आर्थिक उलाढालही लक्षणीय वाढली आहे.
यासाठी देशभरात सुमारे तीन हजार वैद्यकीय केंद्रे असून, तेथे ४० कोटी डॉलरची उलाढाल होते. यामुळे भारताला भाडोत्री मातृत्वाची राजधानी असे स्वरूप आले आहे. उत्पन्नाचे साधने नसलेल्या महिला भाडोत्री मातृत्व स्वीकारण्यास तयार असतात. दुसऱ्या जोडप्याचा गर्भ आपल्या पोटात वाढवून घेण्यासाठी त्यांना रक्कम मिळते. अशा महिलांचे जाळेच संबंधित वैद्यकीय केंद्रांनी विणले आहे. भाडोत्री मातृत्वाच्या तंत्रज्ञानामुळे मूल न होणाऱ्या जोडप्यांना स्वतःचे मूल मिळते आणि संबंधित गरीब महिलांना पैसा मिळतो, असे सांगून याचे समर्थन केले जात असले, तरी या तंत्रज्ञानाच्या वापराला आता बाजारी स्वरूप आले आहे.
या महिलांची किरकोळ रक्कम देऊन बोळवण केली जात असल्याची उदाहरणेही आहेत. शिवाय, मूल पोटात वाढविताना त्या महिला वैद्यकीय जोखीम उचलत असतात. त्याचबरोबर मातृत्वाच्या कळा न सोसणाऱ्या श्रीमंत महिला या तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, कळीचे नैतिक प्रश्नही निर्माण होतात. या तंत्राच्या बाजारीकरणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात म्हणूनच याचिका आली असून, यावर बंदी घालण्याची याचकाची मागणी आहे आणि आता केंद्रही ती मान्य करण्याच्या स्थितीत आहे. आपल्या देशातील वंध्य जोडप्यांना मात्र हे तंत्रज्ञान उपलब्ध राहील, असे सरकारने म्हटले आहे. बाजारीकरणाच्या विरोधातील सरकारची भूमिका स्वागतार्ह असली, तरी याचे नियम बारकाईने तयार करावे लागतील.
मोठ्या रकमेची उलाढाल असलेल्या या बाजारात स्वार्थांधांची साखळी असून, ती बंदीच्या विरोधात प्रयत्न करेलच. माणसाला वाचविणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राचे पुरते बाजारीकरण झाल्याने त्यात अपप्रवृत्ती घुसल्या आहेत. त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय कोणतीही बंदी प्रत्यक्षात येणार नाही.
=============
पुरुषांच्या वंध्यत्वावर मात करणारं एक नवीन तंत्र मुंबईत दाखल झालंय. सदोष शुक्राणूंना हुडकून काढणाऱ्या या तंत्राने मूल नसणाऱ्या अनेक जोडप्यांना आशेचा किरण दाखवलाय.
........
पुरुषांच्या वंध्यत्वावर मात करण्याचा कारनामा एका मायक्रोस्कोपने शक्य करून दाखवलाय. पुरुषांच्या शुक्राणूला ७२०० पट मोठा करून दाखवणारा हा मायक्रोस्कोप तुम्हाला त्यातले दोष चटकन दाखवतो. यामुळे 'टेस्ट ट्यूब बेबी' तंत्राचा वापर करताना सुरक्षित गर्भधारणा होण्यास मदत होते. 'इण्ट्रा सायटोप्लास्मिक मॉफोर्लॉजिकली सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन' (इस्मी) असे या नव्या तंत्राचं नाव आहे.
करिअरच्या धकाधकीत अलिकडे उशीरा लग्न होतात. त्यामुळे पुरुषांमधल्या वंध्यत्वाचं प्रमाण वाढतंय. अर्थात अन्य काही समस्याही याला कारणीभूत आहेत. शंभरातल्या दहा जोडप्यांमध्ये मूल न होण्याची समस्या असते. निम्म्या वेळी त्यासाठी पुरुष जबाबदार असतात. वीर्याच्या एका थेंबात २० ते १४० लाख शुक्राणू असतात. वीर्यातले शुक्राणू पुरेशा संख्येने असण्याबरोबर यातले किमान १४ टक्के शुक्राणू निरोगी असणं गरजेचं असतं. अनेकदा संख्या पुरेशी असूनही दर्जा निकृष्ट असल्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही.'इस्मी' तंत्रात मायक्रोस्कोपच्या मदतीने शुक्राणूची प्रतिमा ७२०० पट मोठी करण्यात येते. सदोष शुक्राणूंना बाजूला करून डॉक्टर निरोगी शुक्राणूंची निवड करतात आणि यशस्वी गर्भधारणेचा मार्ग मोकळा होतो.
वीर्याच्या थेंबातल्या निरोगी शुक्राणूंचा स्त्री बीजांडाशी संयोग करण्यात येतो. यामुळे गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता वाढते. गर्भपाताचा धोका कमी होतो. पूवीर् वापरण्यात येणाऱ्या 'इण्ट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन' या तंत्राचं हे विकसित रूप. पूवीर् वापरण्यात येणाऱ्या या तंत्रापेक्षा 'इस्मी' तंत्रामुळे दिसणारी शुक्राणूंची प्रतिमा १६ पट मोठी असते. अर्थात यामुळे मिळणारी यशाची टक्केवारी जास्त आहे.
इस्त्रायलच्या बरलीन युनिव्हसिर्टीत बेंजामिन बर्ताव यांच्या मार्गदर्शनाखाली इस्मी तंत्राचा सर्वप्रथम वापर करण्यात आला. या तंत्रामुळे गर्भधारणा यशस्वी होण्याचं प्रमाण ३३ टक्क्यांवरून थेट ६६ टक्क्यांपर्यंत वाढल्याचं उघड झालं आहे. भारतात हे तंत्र नुकतंच रुजत असल्याची माहिती प्रसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट नंदिता पालशेतकर यांनी दिली. सध्या 'इस्मी' तंत्राद्वारे गर्भधारणा घडवून आणण्याची सुविधा मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहे. नुकताच एका अमेरिकी महिलेवर 'इस्मी' तंत्राचा वापर करण्यात आला. तिला यशस्वीरित्या गर्भधारणा झाली. 'इण्ट्रा सायकोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन' या जुन्या तंत्राने गर्भधारणेसाठी करण्यात आलेले दोन प्रयत्न फसलेल्या एका जोडप्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये 'इस्मी' तंत्राचा वापर करून यशस्वी गर्भधारणा करण्यात आली. पुरुषांच्या वंध्यत्वामुळे मूल न होणाऱ्या अनेक जोडप्यांसाठी हे नवे तंत्रज्ञान वरदान आहे.
==================
एक आटपाट नगर होतं. या नगराचा राजा निपुत्रिक होता. त्याला दोन राण्या होत्या. पुत्रप्राप्तीसाठी त्याने मोठा यज्ञ केला. तेव्हा देवाने प्रसन्न होऊन त्याला एक फळ दिले. त्या फळाचे सेवन केल्याने राण्यांना संतती प्राप्त झाली...
अशा तऱ्हेच्या अनेक कहाण्या आपण लहानपणी वाचलेल्या असतात. रामायण-महाभारतातही गर्भधारणा आणि संततीप्राप्तीसाठी अनेक प्रथा, उपाय यांचा उल्लेख आढळतो. म्हणजे गर्भधारणेसाठी केवळ निसर्गावर अवलंबून न राहता विविध उपचारपद्धतींचा विचार कल्पनेच्या पातळीवर का होईना खूप आधीपासून केला जातोय.
पूर्वी बालविवाह सर्रास केले जात असत. कोवळ्या वयात लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यामुळे अनेकदा मुलींच्या जिवाला धोका निर्माण होत असे. तेव्हा संमती वयाचा कायदा करण्यासाठी समाजसुधारकांनी बरेच प्रयत्न केले. सध्या मुलींना १८ वर्षांनंतर आणि मुलांना २१ वर्षांनंतरच लग्न करण्याची मुभा आपला कायदा देतो. खेडोपाडी अजूनही बालविवाहाच्या घटना घडत असताना शहरांत मात्र वेगळेच चित्र दिसू लागले आहे.
मुली शिक्षणाच्या बाबतीत जागृत झाल्या आहेत. आई-वडीलही मुलींचा सर्वांगीण उत्कर्ष व्हावा म्हणून प्रयत्नशील असतात. उच्चशिक्षणासाठी परगावी, परराज्यातच नव्हे तर परदेशीही मुली सर्रास वास्तव्य करतात. अर्थातच त्यांना बहुविध क्षेत्रांत उत्तम नोकऱ्या मिळतात. भराभर पदोन्नती मिळते. हा वैयक्तिक भरभराटीचा आलेख सतत उंचावला जात असल्यामुळे लग्न, गर्भारपण या स्त्रीत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची त्यांची इच्छाही नसते आणि वेळही नसतो. काही वेळा लग्न तिशीच्या आत केले तरी मुलांचे लोढणे गळ्यात घेण्यास उभयता तयार नसल्यामुळे गर्भधारणा टाळली जाते किंवा गर्भपात करून घेतला जातो. अशा डिंक (Double Income, No children) जोडप्यांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. लग्न न करताही एकत्र राहण्याचा (Living In Relationship) पर्यायही अनेकजण स्वीकारताना दिसतात; पण निसर्गचक्र मात्र कुणासाठी किंवा कशासाठीही थांबत नाही.
गर्भधारणेसाठी योग्य वय कोणते? २० ते ३० वयात गर्भधारणा होणे सुलभ होते. या वयात गर्भारपण, बाळंतपण यातील धोके खूपच कमी असतात. विशीआधी आणि विशेषतः पस्तिशीनंतर धोक्यांचे प्रमाण वाढते. वाढत्या वयानुसार स्त्री आणि पुरुषांची प्रजननशक्ती उतरणीला लागते. स्त्रीबीज आणि पुरुषबीजांची प्रतही खालावते. मग वंध्यत्वासाठी उपचार घेण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. वंध्यत्वावर अनेक नवनवीन जालीम औषधे आणि आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आहेत. त्यांना 'प्रजननासाठी साहाय्यक तंत्रे (Assisted Reproductive Techniques)' संबोधले जाते. 'नलिका अपत्य (Test tube Baby)'सारख्या उपचारांचा यात समावेश होतो.
१९७८ साली स्टेपटो आणि एडवर्ड यांना पहिले नलिका अपत्य जन्माला घालण्यात यश आले. आयव्हीएफ तंत्राप्रमाणेच GIFT, ZIFT, ICSI अशी अनेक तंत्रे विकसित झाली आहेत. स्त्रीबीज दाती (egg donor), पुरुषबीज दाता (sperm donor), हंगामी माता (surrogate mother), भाडोत्री गर्भाशय अशा उपाययोजना भारतातही उपलब्ध आहेत. परदेशी विकसित झालेले अत्याधुनिक तंत्रज्ञान मुंबईत लगोलग आयात केले जाते. यातच समावेश होतो-स्त्रीबीज शीतलीकरण/गोठवण (Egg Freezing), पुरुषबीज गोठवण (Sperm Freezing), भ्रूण गोठवण (Embryo Freezing) या तंत्रांचा.
करिअरमध्ये अडथळा येऊ नये म्हणून कित्येक कर्तबगार महिला विवाह, गर्भारपण पुढे ढकलतात. पण उचित कालावधी मुठीत धरलेल्या वाळूप्रमाणे गळून जात आहे, याची बोच तर मनात सतत असते. पुढे-मागे मातृत्व हवे अशी आसही जिवाला लागलेली असते. तेव्हा स्वतःची स्त्रीबीजे गोठवण्याचा निर्णय त्या घेतात. कार्यचतुर नोकरदार, व्यावसायिक महिला गमावण्याची भीती असल्याने गुगल, फेसबुक, अॅपल, सिटीग्रुप अशा नामांकित कंपन्यांनी यासाठी महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. Eggsurance.com सारखे मदतनीस उपलब्ध झाले आहेत. वीस हजार डॉलरपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते. साधारणपणे पाळीच्या दोन चक्रांमध्ये विशिष्ट इंजेक्शन्स देऊन स्त्रीचे बीजकोष उत्तेजित (Stimulate) केले जातात. सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली योनी मार्गातून ओटी पोटात विशिष्ट सुई घालून दोन्ही बीजकोषांतून शोषण क्रियेने परिपक्व स्त्रीबीजे काढून घेतली जातात. सोळा ते वीस स्त्रीबीजे अशा तऱ्हेने मिळवून ती गोठवली जातात. जणू फलनशक्तीच गोठवून ठेवली जाते. न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोसारख्या शहरांत एग फ्रीजिंग करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण एका वर्षातच दुप्पट झाले आहे. अशा तऱ्हेने स्त्रीबीजे शीतपेटीत बंदिस्त केल्यावर निर्धास्त होऊन स्त्रिया 'तन-मन-स्त्रीबीज' वेचून अविरत काम करण्यास स्वतःला जुंपून घेतात. याचा गर्भित (?) अर्थ असाही होऊ शकतो का? ... 'गर्भारपण, बालसंगोपन यांचा अडथळा कामाच्या जागी खपवून घेतला जाणार नाही. कामाला स्त्रीत्वापेक्षा जास्त प्राधान्य द्यावे लागेल. नाहीतर जास्त पैसा, वरचा हुद्दा मिळणार नाही.'
EggBanxxसारखी कंपनी स्त्रियांसाठी स्नेहसंमेलन आणि मेजवानी (Egg Freezing Parties) आयोजित करते. इथे वंध्यत्वावरील तज्ज्ञ जमलेल्या महिलांना या बहुहिताय कल्याणकारी उपक्रमाविषयी परिपूर्ण माहिती पुरवतात. याचे लोण अर्थातच भारतात विशेषतः मुंबईसारख्या शहरात पसरायला वेळ लागणार नाही. या नवीन वाऱ्यांचे स्वागत करायचे की इतर उपाय शोधायचे यावर विचारमंथन करण्याची वेळ मात्र नक्कीच आली आहे.
चाळिशीनंतर करिअर स्थिरावल्यानंतर आणि अनुरूप, अनुकूल जोडीदार मिळाल्यानंतर गोठवलेली स्त्रीबीजे पूर्वपदावर आणून जोडीदाराच्या शुक्राणूंबरोबर त्यांचे प्रयोगशाळेत मीलन घडवून Test tube baby (IVF) तंत्राच्या साहाय्याने स्त्रीच्या गर्भाशयात हे भ्रूण सोडले जातात. अर्थातच यशस्वीतेचा दर इतरही बऱ्याच बाबींवर अवलंबून असतो. काही वेळा जोडपी या गोठवलेल्या तंत्रांच्या मागे न जाता नैसर्गिकरीत्याच गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करतात.
समाजात दोन टोकाच्या प्रवृत्ती आढळून येतात. एका बाजूला आहेत पूर्णपणे तंत्रज्ञानावर विसंबून राहणारी विज्ञानप्रेमी, उच्चभ्रू जोडपी तर दुसऱ्या बाजूला आहेत तांत्रिक-मांत्रिक यांच्या आहारी गेलेली माणसे. या दोन टोकांच्या प्रवृत्ती टाळता येतील का? मध्यम-मार्ग अनुसरता येईल का? वेळच्या वेळी लग्न, गर्भारपण, बालसंगोपन करतानाही स्वतःचे उच्चशिक्षण, नोकरीतली प्रगती, करिअरचा चढता आलेख सांभाळता येईल का? एकत्र कुटुंबपद्धती, प्रशिक्षित दाया, सुरक्षित-स्वच्छ पाळणाघरे सर्वांसाठी उपलब्ध व्हायला हवीत. स्त्रियांना केवळ तीन ते सहा महिने बाळंतपणाची रजा न देता दोन ते तीन वर्षे तात्पुरता रजा घ्यायची परवानगी मिळायला हवी. नाहीतर घरूनच काम करण्याची मुभा मिळणे, कामाचे तास लवचिक करणे, नवऱ्याचा/जोडीदाराचा घरकाम आणि बालसंगोपन यातील सहभाग वाढवणे असे अनेक मार्ग चोखाळता येतील. जगण्यासाठी काम करायचे की काम करण्यासाठी जगायचे, याचे उत्तर प्रत्येकाने शोधून त्याप्रमाणे कृती करायला हवी!
===============
एक आटपाट नगर होतं. या नगराचा राजा निपुत्रिक होता. त्याला दोन राण्या होत्या. पुत्रप्राप्तीसाठी त्याने मोठा यज्ञ केला. तेव्हा देवाने प्रसन्न होऊन त्याला एक फळ दिले. त्या फळाचे सेवन केल्याने राण्यांना संतती प्राप्त झाली...
अशा तऱ्हेच्या अनेक कहाण्या आपण लहानपणी वाचलेल्या असतात. रामायण-महाभारतातही गर्भधारणा आणि संततीप्राप्तीसाठी अनेक प्रथा, उपाय यांचा उल्लेख आढळतो. म्हणजे गर्भधारणेसाठी केवळ निसर्गावर अवलंबून न राहता विविध उपचारपद्धतींचा विचार कल्पनेच्या पातळीवर का होईना खूप आधीपासून केला जातोय.
पूर्वी बालविवाह सर्रास केले जात असत. कोवळ्या वयात लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यामुळे अनेकदा मुलींच्या जिवाला धोका निर्माण होत असे. तेव्हा संमती वयाचा कायदा करण्यासाठी समाजसुधारकांनी बरेच प्रयत्न केले. सध्या मुलींना १८ वर्षांनंतर आणि मुलांना २१ वर्षांनंतरच लग्न करण्याची मुभा आपला कायदा देतो. खेडोपाडी अजूनही बालविवाहाच्या घटना घडत असताना शहरांत मात्र वेगळेच चित्र दिसू लागले आहे.
मुली शिक्षणाच्या बाबतीत जागृत झाल्या आहेत. आई-वडीलही मुलींचा सर्वांगीण उत्कर्ष व्हावा म्हणून प्रयत्नशील असतात. उच्चशिक्षणासाठी परगावी, परराज्यातच नव्हे तर परदेशीही मुली सर्रास वास्तव्य करतात. अर्थातच त्यांना बहुविध क्षेत्रांत उत्तम नोकऱ्या मिळतात. भराभर पदोन्नती मिळते. हा वैयक्तिक भरभराटीचा आलेख सतत उंचावला जात असल्यामुळे लग्न, गर्भारपण या स्त्रीत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची त्यांची इच्छाही नसते आणि वेळही नसतो. काही वेळा लग्न तिशीच्या आत केले तरी मुलांचे लोढणे गळ्यात घेण्यास उभयता तयार नसल्यामुळे गर्भधारणा टाळली जाते किंवा गर्भपात करून घेतला जातो. अशा डिंक (Double Income, No children) जोडप्यांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. लग्न न करताही एकत्र राहण्याचा (Living In Relationship) पर्यायही अनेकजण स्वीकारताना दिसतात; पण निसर्गचक्र मात्र कुणासाठी किंवा कशासाठीही थांबत नाही.
गर्भधारणेसाठी योग्य वय कोणते? २० ते ३० वयात गर्भधारणा होणे सुलभ होते. या वयात गर्भारपण, बाळंतपण यातील धोके खूपच कमी असतात. विशीआधी आणि विशेषतः पस्तिशीनंतर धोक्यांचे प्रमाण वाढते. वाढत्या वयानुसार स्त्री आणि पुरुषांची प्रजननशक्ती उतरणीला लागते. स्त्रीबीज आणि पुरुषबीजांची प्रतही खालावते. मग वंध्यत्वासाठी उपचार घेण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. वंध्यत्वावर अनेक नवनवीन जालीम औषधे आणि आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आहेत. त्यांना 'प्रजननासाठी साहाय्यक तंत्रे (Assisted Reproductive Techniques)' संबोधले जाते. 'नलिका अपत्य (Test tube Baby)'सारख्या उपचारांचा यात समावेश होतो.
१९७८ साली स्टेपटो आणि एडवर्ड यांना पहिले नलिका अपत्य जन्माला घालण्यात यश आले. आयव्हीएफ तंत्राप्रमाणेच GIFT, ZIFT, ICSI अशी अनेक तंत्रे विकसित झाली आहेत. स्त्रीबीज दाती (egg donor), पुरुषबीज दाता (sperm donor), हंगामी माता (surrogate mother), भाडोत्री गर्भाशय अशा उपाययोजना भारतातही उपलब्ध आहेत. परदेशी विकसित झालेले अत्याधुनिक तंत्रज्ञान मुंबईत लगोलग आयात केले जाते. यातच समावेश होतो-स्त्रीबीज शीतलीकरण/गोठवण (Egg Freezing), पुरुषबीज गोठवण (Sperm Freezing), भ्रूण गोठवण (Embryo Freezing) या तंत्रांचा.
करिअरमध्ये अडथळा येऊ नये म्हणून कित्येक कर्तबगार महिला विवाह, गर्भारपण पुढे ढकलतात. पण उचित कालावधी मुठीत धरलेल्या वाळूप्रमाणे गळून जात आहे, याची बोच तर मनात सतत असते. पुढे-मागे मातृत्व हवे अशी आसही जिवाला लागलेली असते. तेव्हा स्वतःची स्त्रीबीजे गोठवण्याचा निर्णय त्या घेतात. कार्यचतुर नोकरदार, व्यावसायिक महिला गमावण्याची भीती असल्याने गुगल, फेसबुक, अॅपल, सिटीग्रुप अशा नामांकित कंपन्यांनी यासाठी महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. Eggsurance.com सारखे मदतनीस उपलब्ध झाले आहेत. वीस हजार डॉलरपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते. साधारणपणे पाळीच्या दोन चक्रांमध्ये विशिष्ट इंजेक्शन्स देऊन स्त्रीचे बीजकोष उत्तेजित (Stimulate) केले जातात. सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली योनी मार्गातून ओटी पोटात विशिष्ट सुई घालून दोन्ही बीजकोषांतून शोषण क्रियेने परिपक्व स्त्रीबीजे काढून घेतली जातात. सोळा ते वीस स्त्रीबीजे अशा तऱ्हेने मिळवून ती गोठवली जातात. जणू फलनशक्तीच गोठवून ठेवली जाते. न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोसारख्या शहरांत एग फ्रीजिंग करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण एका वर्षातच दुप्पट झाले आहे. अशा तऱ्हेने स्त्रीबीजे शीतपेटीत बंदिस्त केल्यावर निर्धास्त होऊन स्त्रिया 'तन-मन-स्त्रीबीज' वेचून अविरत काम करण्यास स्वतःला जुंपून घेतात. याचा गर्भित (?) अर्थ असाही होऊ शकतो का? ... 'गर्भारपण, बालसंगोपन यांचा अडथळा कामाच्या जागी खपवून घेतला जाणार नाही. कामाला स्त्रीत्वापेक्षा जास्त प्राधान्य द्यावे लागेल. नाहीतर जास्त पैसा, वरचा हुद्दा मिळणार नाही.'
EggBanxxसारखी कंपनी स्त्रियांसाठी स्नेहसंमेलन आणि मेजवानी (Egg Freezing Parties) आयोजित करते. इथे वंध्यत्वावरील तज्ज्ञ जमलेल्या महिलांना या बहुहिताय कल्याणकारी उपक्रमाविषयी परिपूर्ण माहिती पुरवतात. याचे लोण अर्थातच भारतात विशेषतः मुंबईसारख्या शहरात पसरायला वेळ लागणार नाही. या नवीन वाऱ्यांचे स्वागत करायचे की इतर उपाय शोधायचे यावर विचारमंथन करण्याची वेळ मात्र नक्कीच आली आहे.
चाळिशीनंतर करिअर स्थिरावल्यानंतर आणि अनुरूप, अनुकूल जोडीदार मिळाल्यानंतर गोठवलेली स्त्रीबीजे पूर्वपदावर आणून जोडीदाराच्या शुक्राणूंबरोबर त्यांचे प्रयोगशाळेत मीलन घडवून Test tube baby (IVF) तंत्राच्या साहाय्याने स्त्रीच्या गर्भाशयात हे भ्रूण सोडले जातात. अर्थातच यशस्वीतेचा दर इतरही बऱ्याच बाबींवर अवलंबून असतो. काही वेळा जोडपी या गोठवलेल्या तंत्रांच्या मागे न जाता नैसर्गिकरीत्याच गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करतात.
समाजात दोन टोकाच्या प्रवृत्ती आढळून येतात. एका बाजूला आहेत पूर्णपणे तंत्रज्ञानावर विसंबून राहणारी विज्ञानप्रेमी, उच्चभ्रू जोडपी तर दुसऱ्या बाजूला आहेत तांत्रिक-मांत्रिक यांच्या आहारी गेलेली माणसे. या दोन टोकांच्या प्रवृत्ती टाळता येतील का? मध्यम-मार्ग अनुसरता येईल का? वेळच्या वेळी लग्न, गर्भारपण, बालसंगोपन करतानाही स्वतःचे उच्चशिक्षण, नोकरीतली प्रगती, करिअरचा चढता आलेख सांभाळता येईल का? एकत्र कुटुंबपद्धती, प्रशिक्षित दाया, सुरक्षित-स्वच्छ पाळणाघरे सर्वांसाठी उपलब्ध व्हायला हवीत. स्त्रियांना केवळ तीन ते सहा महिने बाळंतपणाची रजा न देता दोन ते तीन वर्षे तात्पुरता रजा घ्यायची परवानगी मिळायला हवी. नाहीतर घरूनच काम करण्याची मुभा मिळणे, कामाचे तास लवचिक करणे, नवऱ्याचा/जोडीदाराचा घरकाम आणि बालसंगोपन यातील सहभाग वाढवणे असे अनेक मार्ग चोखाळता येतील. जगण्यासाठी काम करायचे की काम करण्यासाठी जगायचे, याचे उत्तर प्रत्येकाने शोधून त्याप्रमाणे कृती करायला हवी!
=================
मी ३२ वर्षं असून आमच्या लग्नाला ७ वर्षं झाली आहेत. पण, अजूनही मला दिवस गेलेले नाहीत. डॉक्टरांकडून चेकअप केल्यावर माझ्या दोन्ही गर्भनलिका ब्लॉक असल्याचं दिसून आलं आहे. डॉक्टरांनी मला आयव्हीएफचा सल्ला दिला आहे. पण, आथिर्कदृष्ट्या मला ते शक्य नाही. मला गर्भधारणा व्हावा, यासाठी इतर काही उपाय आहे का?
तुमच्या लग्नाला ७ वर्षं झाली आहेत आणि तुमच्या दोन्ही गर्भनलिका ब्लॉक आहेत. यामुळे आता तुमच्यासाठी दोन पर्याय आहेत :
द्य ट्युबोप्लास्टी tuboplasty : यात ऑपरेशन करून गर्भनलिकेतील दोष दूर केला जातो. टेलीस्कोप (व्हिडीओ लॅप्रोस्कोप)च्या सहाय्याने हे ऑपरेशन केलं जातं. या शस्त्रक्रियेत कोणत्याही प्रकारे कट केलं जात नाही. दुसरं म्हणजे लॅप्रोटॉमी. यात उदराला छेद लिा जातो आणि मग शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली, तर पुढच्या सहा ते १२ महिन्यात गर्भधारणा होऊ शकते. पण, या प्रक्रियेत यश आलं नाही, तर आयव्हीएफचाच पर्याय आहे. अर्थात, यासाठी आधी तुमच्या पतीच्या वीर्याची तपासणी करण्यात येईल. या तपासणीचे रिझल्ट सामान्य आले तर नैसगिर्क पद्धतीने गर्भधारणा करता येईल.
द्य आयव्हीएफ IVF test tube: टेस्ट ट्यूब पद्धतीने यात गर्भधारणा केली जाते. यात तुमचं बीजांडं काढून घेतलं जातं आणि तुमच्या पतीच्या वीर्याशी त्याचा संयोग घडवून लॅबमध्ये त्यातून गर्भ तयार केला जातो आणि हा गर्भ मग तुमच्या उदरात सोडण्यात येतो. ज्या पुरुषांमध्ये काही कमतरता असते किंवा ३५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भधारणेस काही समस्या असेल, अशा व्यक्तींसाठी ही ट्रीटमेण्ट प्रीफर केली जाते.
हामोर्नल इंजेक्शन्स harmonal injections देऊन त्या स्त्रीचं बीजांडं तयार केलं जातं. या बीजांडाची वाढ कशी होतेय, यावर डॉक्टरांचं लक्ष असतं. यानंतर तो गर्भ त्या स्त्रीच्या उदरात सोडला जातो. ही केवळ १५ मिनिटांची प्रक्रिया असते. दोन तासांत ती स्त्री घरीही जाऊ शकते. त्यानंतर गर्भाची वाढ कशी होतेय, यावर डॉक्टर नियमितपणे लक्ष ठेवतात. या प्रक्रियेचा सक्सेस रेटही चांगला आहे. काही जणांमध्ये पहिल्याच फटक्यात ही प्रक्रिया यशस्वी होते, तर काही जणांमध्ये तीन चार वेळा प्रयत्न करावे लागतात.
ठ्ठ माझं वय ३० असून एका वर्षापूवीर् माझं लग्न झालं. आम्हाला मूल व्हावं अशी आमची इच्छा आहे. पण, गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून माझी मासिक पाळी आलेलीच नाही. माझे डॉक्टर ही ओवरियन फेल्युअरची समस्या असल्याचं सांगताहेत. कृपया मला मार्गदर्शन करा.
प्रजनन क्षमता वाढीस लागावी, यासाठी बाजारात काही औषधं उपलब्ध आहेत. पण, याचा फायदा प्रत्येकालाच होईल असं नाही. एग डोनेशन हा एक फायदेशीर पर्याय आहे. ही आटिर्फिशिअल रिप्रोडक्टिव्ह ट्रीटमेण्ट आहे. यात दुसऱ्या एखाद्या स्त्रीकडून बीजांडं घेतलं जाईल. या बीजांडाचा संयोग तुमच्या पतीच्या वीर्याबरोबर घडवण्यात येईल. फलित झालेलं हे बीजांड मग तुमच्या गर्भाशयात सोडण्यात येईल. ही प्रक्रिया करण्याआधी तीन ते चार महिने हामोर्न्सच्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे तुमची मासिक पाळी नियमित येऊन गर्भाशय सशक्त बनेल. ही प्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण ३५ ते ४५ टक्के आहे. आज विज्ञानाने प्रचंड प्रगीत केली आहे. त्यामुळे तुम्हाला मूल हवं तर यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
===========
गेल्या काही वर्षांत पॉलिसिस्टिक ओव्हरीजची Polysistic Overies समस्या घेऊन येणाऱ्या मुली आणि स्त्रियांच्या संख्येत खूपच वाढ झाली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि इतर शाखांचे डॉक्टरही यावर गांभीर्याने विचार करायला लागले आहेत.
सोनोग्राफीमध्ये स्त्रीबीजकोशात (ओव्हरीज) विशिष्ट तऱ्हेने माळेसारख्या फॉलिकल्स (पिटिका) आढळतात. त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतात. प्रत्येक महिन्याला तीन ते चार फॉलिकल्स तयार होतात. त्यातील एक फॉलिकल फुटून त्यातून स्त्रीबीज गर्भाशयात येते व इतर फॉलिकल्स नैसर्गिकरित्या विरघळून जातात. मात्र हार्मोन्सच्या असंतुलनामुळे फॉलिकल्स न फुटता तशीच स्त्रीबीजकोशात साठत जातात व माळेसारखा आकार तयार होतो. पॉलिसिस्टिक ओव्हरीजमुळे वंध्यत्वाची समस्या येऊ शकते. त्याशिवाय, पाळी अनियमित येणे, अधिक रक्तस्राव होणे अशा समस्याही दिसतात.
ज्या मुलींना मासिक पाळी अधिक कालावधीने (उदा. दीड ते तीन महिन्यांनी) येते, त्यांच्यापैकी अर्ध्याहून अधिक मुलींना पॉलिसिस्टिक ओव्हरीजची समस्या असल्याचे आढळून येतात. अनियमित पाळी येत असलेल्या २८ टक्के मुलींमध्ये ही समस्या दिसते. मात्र सगळ्याच मुलींना उपचारांची आवश्यकता नसते. वयानुसार ही समस्या आपोआप कमी होते. मात्र तरीही काहींमध्ये कमी-अधिक प्रमाणात ही समस्या आढळून येते. हल्ली मुली मासिके, इंटरनेटवरून पॉलिसिस्टिकविषयी योग्य/ अयोग्य माहिती मिळवून खूप काळजीत पडतात. मुलीला लग्नानंतर काही समस्या होतील का, कॅन्सर होईल का, अशा शंका घेऊन आईसह मुली येतात.
लक्षणे : पाळी उशिरा (दीड ते तीन महिन्यांनी) येणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर मुरुमे येणे, चेहऱ्यावर तसेच शरीरावर इतरत्रही लवेचे प्रमाण वाढणे, काही वेळा पाळी बंद होणे किंवा अतिरिक्त स्राव सुरू होणे.
कारणे : पॉलिसिस्टिकमागील कारणांबाबत एकवाक्यता नाही. अंतस्रावांमध्ये असंतुलन, शरीरातील पेशींमध्ये इन्शुलीनप्रति असहकार, पुरुषी अंतस्राव (अँड्रोजन) अधिक प्रमाणात स्रवणे, अनुवंशिकता, कुटुंबात मधुमेह यांपैकी एखाद्या कारणामुळे पॉलिसिस्टिकची समस्या निर्माण होते.
शरीरातील चयापचयाच्या क्रियांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, अतिरक्तदाब, स्थूलता, रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसरॉइड््सचे प्रमाण वाढणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. पॉलिसिस्टिक ओव्हरीज ही या बदलांपैकीच एक. गुणसूत्रांमधील फेरफार, बाह्य वातावरणाचा परिणाम, चिंता, ताणतणाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, स्पर्धात्मक जगातील दबाव, प्रदूषण अशा अनेक बाबींमुळेही पॉलिसिस्टिकची समस्या होऊ शकते.
उपाय : मासिक पाळी नियमित करण्यासाठी विशिष्ट औषधे दिली जातात. विशेषत: प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्यांचा विशिष्ट कोर्स दिला जातो. काही वेळा गर्भनिरोधक गोळ्यांचाही वापर केला जातो. या गोळ्यांमुळे FSH, IH हे अंतस्राव कमी होतात. स्त्रीबीजकोषांचे कार्य काही काळ थांबून त्यांना विश्रांती मिळते. डिसोजेस्ट्रेल किंवा सिप्रोटेरॉन अॅसिटेट असलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे मुरुमे, लव यांचे प्रमाण कमी होते. विवाहानंतर लवकर गर्भधारणा हवी असल्यास स्त्रीबीज गर्भाशयात येण्यासाठी मदत करणारी औषधे दिली जातात. वजन जास्त असल्यास तसेच इन्शुलिन रेझिस्टन्स असल्यास मेटफॉर्मिन या मधुमेहनिवारक गोळ्याही दिल्या जातात. औषधांसोबतच वजन कमी करणे, नियमित व्यायाम करणे, ताणतणाव कमी करणे, समुपदेशन घेणे, मुरुमे- लव यावर उपचार करणे अशा अनेक बाबींचा विचार केला जातो.
==================
गर्भधारणा होण्यासाठी काय करावे
गर्भधारणा लक्षणे
गर्भधारणा केव्हा होते
गर्भधारणा कशी होते
गर्भधारण कब होता है
गर्भधारण के उपाय
गर्भावस्था के लक्षण
गर्भधारणा कशी करायची
marathi website pregnancy
information about pregnancy week by week
information about pregnancy in marathi language
how to care in pregnancy in marathi
symptoms of pregnancy in marathi
pregnancy care tips marathi
pregnancy tips in marathi for fast get pregnant
pregnancy test marathi
information about pregnancy in marathi
pregnancy care in marathi book
symptoms of pregnancy in marathi
pregnancy week by week
pregnancy care in hindi
pregnancy care tips first 3 months in hindi
pregnancy tips for normal delivery in hindi
pregnancy tips in marathi language
symptoms of pregnancy in the first week
pregnancy symptoms before missed period
information about pregnancy in marathi
pregnancy symptoms in marathi language
pregnancy care tips marathi
symptoms of pregnancy in hindi
pregnancy marathi site
pregnancy test in marathi language
how to care in pregnancy in marathi
information about pregnancy week by week
symptoms of pregnancy in marathi
marathi website pregnancy
pregnancy information in hindi
information about pregnancy in marathi language
pregnancy care tips marathi
pregnancy tips in marathi for fast get pregnant
No comments:
Post a Comment