ज्या धर्तीवर आयर्लंडमध्ये होमरूल चळवळ home rule movement जोरात होती तशी ती भारतात का करू नये अशी कल्पना १९१५ साली काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. अॅनी बेझंट यांनी मांडली. त्या स्वत: आयर्लंडमधीलच होत्या. ज्या प्रमाणे त्या काळी ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, कॅनडा, दक्षिण आफ्रिका हे देश ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वायत्तता उपभोगत होते तशी ती भारतालाही लागू करावी ही मागणी होती.
पायाभरणी
महायुद्धात भारताने ब्रिटनला मोठी मदत केली व त्याबदल्यात स्वशासन मिळावे अशी अपेक्षा ठेवली. पण, लोकमान्य टिळकांसारख्या वास्तववादी नेत्याला घरी बसून काहीच मिळणार नाही याची खात्री होती. तेव्हा ब्रिटिशांच्या युद्धप्रयत्नांना सहकार्य करतानाच होमरूल लीगच्या माध्यमातून भारतीयांना जागृत करून स्वशासन बजावून घेणे आवश्यक वाटले. टिळक व बेझंट यांची दिशा एकच असल्याने त्यांनी भागीदारी केली. पहिली होमरूल लीग टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली तर त्याच वर्षी (१९१६) अड्यार (मद्रास) येथे बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. दोघांनी ही चळवळ स्वतंत्रपणे चालवण्याचे ठरवले. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड होते. उर्वरित भारत डॉ. बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला.
रणनीती
ब्रिटिशांनी त्यांना भाषणे करायची परवानगी दिली होती. त्याचा फायदा घेत त्यांनी भारत पालथा घातला व लोकांना हलवून हलवून जागे केले (बेझंट यांचे भाषण- वेक अप इंडिया) त्यांनी भारताच्या भविष्याचे रेखाचित्र भाषणातून रेखाटले. (बेझंट यांचे भाषण- इंडिया दॅट शॅल बी) त्यांनी भाषावार प्रांत रचनेची मागणी केली. टिळक तरुणांमध्ये लोकप्रिय होतेच, डॉ. बेझंट यांच्यामुळे स्त्रियादेखील भाग घेऊ लागल्या. तरुण वर्गाला प्रचाराचा केंद्रबिंदू ठेवले. अनेक तरुणांनी आपली राजकीय कारकीर्द होमरूलमधून सुरू केली. सर्वात चांगले उदाहरण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. चर्चा, कार्यशाळा, पोस्टर, नाटक, गाणी यातून प्रचाराची होड लावण्यात आली.
टिळकांची भरारी
मंडालेहून परतलेले लोकमान्य टिळक संपलेले असतील असे अनेकांना वाटले होते. पण पुनश्च हरि ओम म्हणत कर्मयोगी टिळकांनी पुन्हा एकदा भरारी घेतली. आपल्या सिंहगर्जनेने कानाकोपरा भारून टाकला. या चळवळीत टिळकांना त्यांचे सहकारी काका बाप्टिष्टा यांनी मोठी साथ दिली. काकांनी अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथेही होमरूलची शाखा चालू केली.
सरकारची प्रतिक्रिया
सुरुवातीला सावधपणे पाहणारे ब्रिटिश सरकार लवकरच अस्वस्थ झाले व त्यांनी दडपशाहीचा वरवंटा फिरवला. टिळकांना दिल्ली व पंजाबमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली तर डॉ. बेझंट व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. या अटकेचा निषेध म्हणून जी. सुब्रमण्यम अय्यर यांनी आपली 'सर' पदवी सरकारला परत केली. टिळकांनी 'निष्क्रिय प्रतिकाराची' घोषणा केली. दडपशाहीने उलट निश्चय बळकट झाला. शेवटी डॉ. बेझंट यांची सुटका करण्यात आली.
होमरूलचे home rule movement विश्लेषण
होमरूल चळवळ ही भारतातली पहिली अखिल भारतीय चळवळ ठरली. या चळवळीने नेमास्तांचा अर्ज, विनंत्यांचा मार्ग कायमचा सोडून दिला. यापुढे ब्रिटिशांची कृपा, मर्जी यावर अवलंबून न राहता जनसामान्यांच्या इच्छाशक्तीवर होमरूल आणले जाईल असा आत्मविश्वास दाखवला. (वृतपत्र : कॉमनवील) पहिल्यांदाच देशाबाहेरून मदत घ्यायचा प्रयत्न केला. डॉ. बेझंट यांनी अमेरिकेत न्यूयॉर्क येथे शाखा उघडली. ब्रिटिशांना माघार घेत क्रमाक्रमाने स्वशासन देऊ अशी घोषणा ब्रिटिश संसदेत करावी लागली. या चळवळीने निर्माण केलेली उर्जा राष्ट्रवादाला पोषक ठरली. या चळवळीने येणाऱ्या गांधी युगाचा मार्ग प्रशस्त केला.
home rule movement pdf
history home rule movement
home rule movement was started by
home rule movement in hindi
home rule movement gktoday
home rule movement annie besant
home rule movement maulana azad
home rule movement leaders

No comments:
Post a Comment