Wednesday, September 21, 2016

Kareena Kapoor eats Toop in her pregnancy


Kareena Kapoor eats Toop in her pregnancy



ऋजुता दिवेकर
ऋजुता दिवेकर

Kareena Kapoor eats Toop in her pregnancy





करीना कपूर आई होणार असल्याचं समजल्यापासून तिच्या डाएट ते डोहाळ्यांपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा आहे. तिच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारं तेज याचं एक साधंसोपं गुपित आहे. ते तिनं शेअर केलं एका चॅटशोमध्ये.

करीना कपूर-खानचा आज हॅपीवाला बर्थ डे आहे. या फॅशन आयकॉनकडे इंडस्ट्रतली सगळ्यात फिट व्यक्ती म्हणून बघितलं जातं. नुकतंच तिचं रॅम्पवर चालणंही गाजलं. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरसोबत रंगलेल्या एका चॅटशोमध्ये करीनानं तिचं खाण्यावरचं प्रेम, भारतीय खाद्यपदार्थांचं तिचं डाएट, आगामी पुस्तकाचं लेखन अशा अनेक गोष्टींवर दिलखुलास गप्पा मारल्या.

तेज कशामुळे?

आपल्या सौंदर्याचं श्रेय बरंचसं श्रेय करीना तुपाला देते. 'तूप खाऊन आनंदी राहत असल्यानं कदाचित माझ्या चेहऱ्यावर तेज येत असावं. आणि मला हे गाल माझ्या आजीकडून मिळाले आहेत. तिचं वय ८६ असलं तरी तीसुद्धा लहानपणापासून तूप खात आली आहे', असं तिनं सांगितलं.

कारल्याचे डोहाळे

करीनाने यावेळी कडू कारल्याचे गुणगान गायले. 'आजकाल मला कारलं खावंसं वाटतं. कारल्याची कडू चव घालवण्यासाठी काही लोक मला त्यात साखर घालायला सांगतात. पण मला कारल्याची ती तुरट-कडू चव मला खूप आवडते. सध्या मला त्याचेच डोहाळे लागलेत. तसंच हल्ली अनेकदा मला बीटही खायची इच्छा होते, असं ती म्हणाली. वाढदिवसाच्या दिवशी ती पेस्ट्री, चॉकलेट, केकपेक्षा बेसन लाडू, पिन्नी लाडू, सुजी पेढा अशा भारतीय मिठायांवर ताव मारणार आहे.

इटिंग राइट, लूकिंग गूड

आई बनणार असल्याचं कळल्यापासून ती घरी बनवलेले पदार्थ खातेय. 'सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मी पराठा, शहाळं, पोळी-भाजी, फळं, चीज टोस्ट, खिचडी कढी असं थोडं-थोडं खात असते. मखाना, भात, खिचडी, पालक पनीर, ज्वारीची भाकरी, लोणचं या गोष्टींचाही माझ्या आहारात समावेश आहे. तसंच वरणावर घी का तडका हवाच. प्रेग्नंट आहे म्हणून डाएटमध्ये फारसा फरक झालेला नाही. आता तर मी एखादा पराठाचा जास्तच खाते', असं करीनाने सांगितलं.

करीनाची 'माएस्ट्रो'
करीनाच्या हिट आणि हॉट दिसण्यामागे आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी डाएटबाबत तिला केलेलं मार्गदर्शन याचा महत्त्वाचा वाटा आहे. करीना तिला प्रेमानं 'माएस्ट्रो' म्हणते. म्हणूनच आयुष्याच्या या टप्प्यावर फूड, फिटनेस आणि प्रेग्नन्सी या विषयावर करीनानं तीन भागांची टॉक सीरिज करण्याचा निर्णय घेतला. याचा पहिला भाग अलीकडेच झाला. यात करीनाच्या हस्ते 'मेंटल मील मॅप'चं अनावरण करण्यात आलं. नेमकं किती खावं या प्रश्नाचं उत्तर यात मिळू शकतं. मिळतं. यापुढचे भाग १४ नोव्हेंबर आणि १४ फेब्रुवारीला असतील.

ऋजुताचं नवं पुस्तक


'डोन्ट लूज युअर माईंड, लूज युअर वेट', 'इंडियन सुपरफूड्स' यांसारखी बेस्टसेलिंग पुस्तक लिहिणाऱ्या ऋजुता आता गर्भवती महिलांसाठी नवीन पुस्तक लिहिणार आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर कसा आहार असावा या विषयावर हे पुस्तक असून करीनानं याच्या सहलेखनाची जबाबदारी घेतली आहे.

No comments:

Post a Comment