घर खरेदी करताना भरावे लागणारे शुल्क
घर खरेदी
करताना त्यानंतर होणारे अनेक खर्च लक्षात घेतलेले नसतात. सामान्यत: घराचा
प्रति स्क्वेअर फूट भाव किती, एवढंच गृहित धरतो. त्यानुसार रक्कम जमवायच्या
कामाला लागतो. पण त्यानंतर भरावे लागणारे शुल्क असे प्रकार अनेक असतात,
ज्यांचा आपल्या एकूण बजेटवरच परिणाम होतो.
संबंधित लेख : गृहकर्ज घेताना बँकांमध्ये भरावे लागणारे शुल्क
संबंधित लेख : गृहकर्ज घेताना बँकांमध्ये भरावे लागणारे शुल्क
घर विक्री करताना
बिल्डरकडून जो भाव सांगितला जातो त्यात कोणत्याही शुल्कांचा समावेश नसतो.
तो केवळ घराचा एकूण दर असतो. समजा तुम्ही बिल्डरकडे गेलात आणि तुम्हाला
त्याने 500 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट दाखवला. त्याचा दर समजा प्रति स्क्वेअर
फूट 5,000 रुपये सांगितला असेल; तर फ्लॅटचा एकूण दर 25 लाख रुपये होईल.
मात्र हा दर सर्व कर वगळता असतो. तो घराचा मूळ भाव असतो. यात वेगवेगळ्या
प्रकारची शुल्क जोडली जातात. यामुळे घराच्या एकूण दरात किमान चार ते सहा
लाख रुपयांचा अधिक भार पडतो.
1. मुद्रांक आणि नोंदणी शुल्क
2. सेवाकर (सíव्हसटॅक्स)
3. मूल्यवर्धित कर (वॅट)
4. मीटरजोडणी
मुद्रांक आणि नोंदणी शुल्क
सरकाने मुद्रांक आणि
नोंदणी शुल्कात काही दिवसांपूर्वीच वाढ केली. पहिल्या पाच लाखांसाठी 7,500
रुपये आकारण्याऐवजी आता सरसकट पाच टक्के मुद्रांक शुल्क वसूल केले जात आहे.
पूर्वी 10 लाखांचा व्यवहार असेल तर पहिल्या पाच लाखांसाठी 7,600 रुपये आणि
पुढील पाच लाखांसाठी 25 हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारले जात होते.
त्यामुळे ग्राहकांना 32,600 रुपये अधिक एक टक्का नोंदणी शुल्क असे 42,600
रुपये भरावं लागायचं. मात्र, आता सरसकट पाच टक्के आकारणीमुळे याच
व्यवहारासाठी 50 हजार रुपये मुद्रांक शुल्क अधिक एका टक्क्याप्रमाणे नोंदणी
शुल्क असे 60 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. ग्रामीण भागात तर याचा
सर्वाधिक फटका बसणार आहे. पूर्वी ग्रामीण भागात टाऊन प्लॅनिग असल्यास दोन
टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. आता ते सरसकट पाच टक्के आकारलं
जाणार आहे. त्यामुळे 25 लाखांच्या घरासाठी पाच टक्के दराने एक लाख 25 हजार
मुद्रांक शुल्क आणि एक टक्का नोंदणी शुल्कानुसार 25 हजार रुपये म्हणजे एकूण
एक लाख 50 हजार रुपये केवळ नोंदणी आणि मुद्रांक शुल्कापोटी जाणार आहेत.
सेवाकर
यावर्षी सादर
झालेल्या अर्थसंकल्पात घर विक्रीवरील सेवाकरात दोन टक्के वाढ करण्यात आली
आहे. त्यामुळे आता घराच्या किमतीही वाढलेल्या दिसतात. हा कर 10
टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. हा कर भरावाच लागतो. कारण
तुमच्याकडून वसूल केलेला सेवाकर केंद्र सरकारला भरला जातो. सेवाकर भरल्याची
बिल्डरकडून पावती घ्यावी. हा कर गोळा करून बिल्डर एकत्रितपणे तो सरकारला
भरतो. त्यामुळे टी.डी.एस. सारखा या कराचा तुमच्या खात्यावर परिणाम दिसत
नाही.
मूल्यवर्धित कर (व्हॅट)
नोंदणी रकमेवर एक टक्का मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला जातो. म्हणजे 25 लाखांच्या घरावर 25 हजार व्हॅट लावला जातो.
मीटर जोडणीचा खर्च
मीटर जोडणीचा खर्च
साधारणपणे 18 हजार ते 20 हजारांच्या घरातच जातो. मात्र, बांधकाम
व्यवसायिकांकडून मीटरमागे सर्रास 50 ते 60 हजार रुपये घेतले जातात. ही
ग्राहकाची फसवणूक आहे. खर्चाबाबत ग्राहक बिल्डरकडे मीटर जोडणीच्या मूळ
पावतीची मागणी करून ही लूट थांबवू शकतो.
हे सर्व शुल्क जर
तुम्ही गृहित धरलं तर 25 लाखांचे घर घेताना तुम्हाला तीन ते चार लाख रुपये
अतिरिक्त लागतात. ही तयारी आपण अगोदरच करून ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा
ऐनवेळी तारांबळ उडू शकते.
No comments:
Post a Comment