Saturday, September 14, 2013

गृहकर्ज परतफेड करताना..

गृहकर्ज परतफेड करताना..


गृहकर्ज घेताना त्याचे हप्ते आपण कशा प्रकारे फेडू शकतो, त्यांचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, मुदतपूर्व परतफेडीची सुविधा आहे का, मुदतीआधी अधिक रक्कम भरली जाऊ शकते का, आदी सा-यांची माहिती करून घेतलेली कधीही चांगली.


घर खरेदी करताना आपण घराची प्रत्येक बाजूप्रत्येक कोपरा,प्रत्येक डिझाइन अगदी पाय-यांच्या टाइल्स कशा आहेत इथपासून ते नळ कसे आहेत इथपर्यंत सा-याच बारीकसारीक गोष्टी तपासून पाहतो. मात्र गृहकर्जाच्या बाबत तसं होत नाही. कर्ज मिळतेय या आनंदात आपण गृहकर्जातील बारकाव्यांचा विचारही करत नाही. इथेच भविष्यातील मनस्तापाची बीजे रोवली जातात. साधारण 15 ते 20 वर्ष कर्जाचे हप्ते फेडताना आपली फरपट होऊ नये म्हणून आतापासूनच त्याचे आर्थिक नियोजन केलेले कधीही चांगले. गृहकर्ज घेताना त्याचे हप्ते आपण कशा प्रकारे फेडू शकतोत्यांचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेतमुदतपूर्व परतफेडीची सुविधा आहे कामुदतीआधी अधिक रक्कम भरली जाऊ शकते काआदी सा-यांची माहिती करून घेतलेली कधीही चांगली.
  
मुदतपूर्व कर्जफेड
  नोकरी किंवा व्यवसाय करताना कधीतरी मधेच आपल्याला अधिक लाभ होतोबोनस मिळतो. ही रक्कम कधीकधी सहा आकडीही असू शकते. अशावेळी आपण कर्ज फेडण्याचाच अधिक विचार करतो. डोक्यावरचे कर्जाचं ओझं जितकं लवकर फेडता येईल तितकं चांगलं असं आपल्याला वाटत असतं. त्यासाठी आपल्यासमोर मुदतपूर्व कर्जफेडण्याचा पर्याय उपलब्ध असतो. मुदतपूर्व कर्ज फेडणं म्हणजे आपल्याला असं वाटतं की व्याजातून आपली सुटका होईल. पण प्रत्यक्षात त्यावर लावण्यात येणारं शुल्क हे व्याजाची रक्कम भरून काढण्यासाठीच असतं. मुदतपूर्व कर्ज फेडण्याचेही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अर्ध परतफेड आणि दुसरा प्रकार म्हणजे कर्जाची पूर्ण पतरफेड.
मुदतपूर्व अर्ध परतफेड
  
जेव्हा एखादा गृहकर्जदार कर्जाची संपूर्ण रक्कम मुदतपूर्व न फेडता काही मोठी रक्कम बँकेला देतोतेव्हा त्याला मुदतपूर्व अर्ध परतफेड म्हणतात. यामध्ये कर्जदार काही टक्के कर्ज फेडतो. जेवढी रक्कम शिल्लक राहिली असेल त्याच्या किमान पाच टक्के रक्कम एकाचवेळी फेडता येते. त्यावर कोणतेही शुल्क आकारलं जात नाही. मात्र जर ही रक्कम पाच टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर त्यावर तीन टक्के शुल्क आकारलं जातं.
 
पूर्ण परतफेड
 गृहकर्ज दुस-या बँकेत शिफ्ट केल्यानंतर कोणत्याही कर्जदारांना जुन्या बँकेकडून घेतलेल्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड एकगठ्ठा करता येते. अशावेळी बँकेला व्याजापोटी मिळणा-या उत्पन्नावर पाणी सोडावं लागण्याची शक्यता असते. त्यामुळे बँका काही प्रमाणात शुल्क वसूल करतात. ही रक्कम एकूण शिल्लक रक्कमेच्या 2 ते 3 टक्के असू शकते. मात्र प्रत्येकाला गृहकर्ज शिफ्ट करण्यासाठी अशी दुसरी बँक मिळेलच असं नाही.

No comments:

Post a Comment