'रेड मी नोट ४जी'च्या वैशिष्टय़ांवर नजर टाकल्यास कोणत्याही चाणाक्ष
ग्राहकाच्या या स्मार्टफोनवर उडय़ा पडतील. १३ मेगापिक्सेल कॅमेरा, अँड्रॉइड
किटकॅट, २ जीबी रॅम, ६४ जीबीपर्यंत वाढवता येणारी एक्स्टर्नल स्टोअरेज
क्षमता अशी वैशिष्टय़े असलेला प्रचलित कंपनीचा स्मार्टफोन २० हजार
रुपयांपेक्षा अधिक किमतीतच मिळू शकेल. त्यामुळे किमतीच्या बाबतीत
'रेड मी नोट ४जी' नक्कीच बाजी मारतो. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करण्याचे ठरवण्यापूर्वी त्याच्या 'स्पेसिफिकेशन्स'चे विस्तृत विश्लेषण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
हल्ली स्मार्टफोनच्या बाजारात स्वस्त फोनचा सुळसुळाट झाला आहे. दर दिवसाला नवनवीन आणि कमी किमतीचे स्मार्टफोन बाजारात येत असतात. त्यामुळे अगदी सामान्य ग्राहकांनाही खिशाला अधिक कात्री न लावता 'स्मार्ट' जग अनुभवणे शक्य झाले आहे. मायक्रोमॅक्स, कार्बन, जिओनी अशा ब्रॅण्ड्सनी उच्च श्रेणीतील ग्राहकांना लक्ष्य करून मोठमोठय़ा स्मार्टफोन कंपन्यांच्या स्पर्धेत उतरण्यापेक्षा कमी किमतीमध्ये भरपूर वैशिष्टय़े असलेले स्मार्टफोन्स निर्माण करून निम्न किंमत श्रेणीतील ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वीच शॉवमी या बॅ्रण्डचा प्रवेश झाला. फ्लिपकार्टवरून उपलब्ध झालेल्या या ब्रॅण्डच्या स्मार्टफोननी पहिल्याच एंट्रीत ग्राहकांना आकर्षित केले. पुढे या स्मार्टफोनद्वारे भारतीयांचा डाटा चोरला जात असल्याची ओरड झाल्याने हे फोन वादातही सापडले. याबाबतचे सर्व प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे. पण यादरम्यानच 'शॉवमी'ने भारतात '४जी' तंत्रज्ञानावर चालणारे 'रेड मी नोट' बाजारात दाखल केले आहेत. सध्या केवळ एअरटेलच्या माध्यमातून हे 'नोट' ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. 'शॉवमी'च्या आधीच्या स्मार्टफोनप्रमाणेच हा स्मार्टफोनही स्वस्त दरात आकर्षक सुविधा देणारा आहे. बंगळूरू, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या शहरांतील १३३ एअरटेल स्टोअर्समधून या स्मार्टफोनची विक्री सुरू आहे. या अंतर्गत ग्राहकांना नोटसोबत एअरटेलचे फोरची सिमकार्ड पुरवलं जात आहे. त्यामुळे ९९९९ रुपये किमतीच्या या स्मार्टफोनमधील दर्जेदार सुविधांसोबत अति वेगवान इंटरनेटचा अनुभवही ग्राहकांना घेता येणार आहे.
आकार
१५.४ सेंमी लांब आणि ७.८७ सेंमी रुंद असलेला 'रेडमी नोट'चा आकार सामान्य फोनपेक्षा किंचित मोठा आहे. मात्र याची जाडी ९ एमएम इतकीच असल्याने फोन हातात सहज सामावतो. अर्थात मोठय़ा फोनच्या बाबतीत येणारी सहज हाताळणीची अडचण या फोनबाबतही जाणवू शकते. मात्र, सवयीने ही अडचण जाणवणार नाही.
डिस्प्ले
५.५ इंची आणि ७२० पिक्सेल्सचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले असलेला 'रेड मी' नोट दृश्य़ात्मकतेच्या बाबतीत कमी पडत नाही. या फोनचे रेझोल्युशन १२८० बाय ७२० इतके आहे. त्यामुळे आकाराने मोठा आणि स्पष्ट दृश्य असलेला डिस्प्ले सुखावह आहे. एचडी दर्जातील व्हीडिओ अतिशय स्पष्ट दिसतो. रंग भडक नसले तरी अतिशय सपकही नाहीत. कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन असलेल्या फोनमध्ये 'मल्टीटच' सुविधाही पुरवण्यात आली आहे. मात्र, हा फोन हाताळताना काही वेळा 'टचस्क्रीन'बाबत काही समस्या जाणवल्या. अशा वेळी टच करूनही फोन त्वरित आज्ञापालन करत नाही. मात्र, ही समस्या खूपच कमी वेळा आणि काही विशिष्ट अॅप्सबद्दलच जाणवली. त्यामुळे हा फोनमधील दोष आहे की अॅप्लिकेशनमधील हे निश्चित सांगणे कठीण आहे.
कार्यक्षमता
'रेड मी नो ४जी'मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४०० एमएसएम ८९२८ हा सीपीयू पुरवण्यात आला आहे. तर याचा प्रोसेसर क्वाड कोअर १.६ गिगाहार्ट्झ इतका आहे. त्यामुळे फोन वेगात काम करतो.
यामध्ये अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिम असल्याने कार्यक्षमता वाढल्याचे जाणवते. या फोनमध्ये २ जीबी रॅम पुरवण्यात आली असून हा या स्मार्टफोनचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. अलीकडे बाजारात मोठय़ा संख्येने स्वस्त टॅब
किंवा मोठय़ा आकाराचे स्मार्टफोन येत आहेत. पण यापैकी अनेक स्मार्टफोनचे 'रॅम' कमी असल्याने ग्राहकांना अपेक्षित वेग आणि कार्यक्षमता मिळत
नाही. 'रेड मी नोट' त्याबाबतीत उजवा म्हणावा लागेल. यामध्ये आठ जीबी फ्लॅश मेमरी पुरवण्यात आली असून स्टोअरेज क्षमता ६४ जीबीपर्यंत वाढवता येते. शिवाय यात क्लाउडची सुविधाही पुरवण्यात आली असल्याने स्टोअरेजची समस्या आणि पर्यायाने त्याचा फोनच्या वेगावर होणारा परिणाम जाणवत नाही.
कॅमेरा
दहा हजार रुपयांच्या किमतीच्या फोनमध्ये १३ मेगापिक्सेल बॅक आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. मात्र, दोन्ही कॅमेऱ्यांतील छायाचित्रे अपेक्षित प्रभाव पाडत नाहीत. १३ मेगापिक्सेलच्या बॅक कॅमेऱ्यातून लांबवरची छायाचित्रे काढता येतात. मात्र, ती थोडी 'झूम' केली तरी धूसर होतात. जवळच्या वस्तूंची छायाचित्रे मात्र सुस्पष्ट येतात. दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये प्रकाशाचीही अडचण जाणवते. थेट प्रकाशातच छायाचित्रे व्यवस्थित निघतात.
कनेक्टिव्हिटी
'४जी' नेटवर्कवर चालणाऱ्या या फोनवर इंटरनेट अधिक वेगवान असेल, यात शंका नाही. मात्र, ३ जी नेटवर्कवरही तो व्यवस्थित काम करतो. विशेष म्हणजे, अगदी 'टू जी' नेटवर्कमध्येही इंटरनेट अपेक्षेप्रमाणे काम करते.
बॅटरी
या फोनमध्ये ३१०० एमएमएचची बॅटरी पुरवण्यात आली आहे. फोनच्या अन्य सुविधांच्या तुलनेत बॅटरी अधिक असायला हवी होती. मात्र, स्टँडबाय अवस्थेत बॅटरी दीर्घकाळ चालू शकते. व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा गेम्सचा वापर जास्त असेल तर मात्र 'चार्जिग'ची वारंवार गरज भासू शकते. अर्थात ही समस्या अनेक मोठय़ा कंपन्यांच्या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनमध्येही जाणवते.
रेड मी ४जीची वैशिष्टय़े
3 क्वाड कोअर १.६ गिगाहार्टझ प्रोसेसर
3 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन सीपीयू
3 अँड्रॉइड ४.४ आपॅरेटिंग सिस्टिम (व्हर्जन ५सह)
3 २ जीबी रॅम
3 ८ जीबी फ्लॅश मेमरी
3 १३ एमपी बॅक व ५ एमपी फ्रंट कॅमेरा
3 ५.५ इंची डिस्प्ले
3 किंमत ९९९९ रुपये(एअरटेल स्टोअर्समध्ये)

No comments:
Post a Comment