पाकिस्तानच्या जलद गोलंदाजाने केला लाजीरवाणा विक्रम
मुंबई : पाकिस्तानचा
जलद गोलंदाज बिलावल भट्टी याने असा रेकॉर्ड आपल्या नावावर केला जो दुसरा
कोणताही गोलंदाज आपल्या नावावर करू इच्छिणार नाही.
न्यूझीलंड विरुद्ध खेळण्यात आलेल्या वन डे सिरीजमधील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात या गोलंदाजाने खराब गोलंदाजी करीत हा रेकार्ड आपल्या नावावर केला आहे.
बिलावल भट्टी याने आपल्या १० ओव्हर्समध्ये ९३ रन्स देण्याचा अजब आणि लाजीरवाणा विक्रम केला आहे. यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. जुनैद खान जखमी झाल्यामुळे टीममध्ये घेतलेल्या बिलावल भट्टीला आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले.
त्याने वहाब रियाजच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. रियाजने २०१३मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये १० ओव्हर्समध्ये ९३ धावा देऊन दोन विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानकडून या यादीत तिसऱ्या क्रमांकावर नावेद अल हन याचे नाव आहे. त्यानेही सेंच्युरीयनमध्ये २००७ मध्ये ८ ओव्हर्समध्ये ९२ धावा दिल्या होत्या.
कोणत्याही वन डे मॅचमध्ये सर्वाधिक रन देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या मिक लुई याच्या नावावर आहे. त्याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जोहान्सबर्गमध्ये १० ओव्हर्समध्ये ११३ रन्स दिले होते.

No comments:
Post a Comment