Tuesday, February 18, 2025

Jay Jayaji Ganpati

जय जयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती।

करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार॥

तुझे नाव मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती।

विष्णु शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी॥

तुझे नाव विनायक, गजवदना तू मंगलदायक।

सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती॥

मी तव चरणांचा अंकित, तव चरणामाजी प्रणिपात।

देवाधिदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी॥

माझा लाडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे।

संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी॥

गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती।

मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया॥

तूच माझा मायबाप, तूच माझा देवराय।

तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणपती॥

गजवदना श्री लंबोदरा, सिद्धीविनायका भालचंद्रा।

हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू॥

भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना।

परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती॥

विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा।

पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधु नमन माझे॥

नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता।

नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे॥

नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची।

सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली॥

मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण।

लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा॥

मतीमंद मी बालक, तूची सर्वांचा चालक।

भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी॥

मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी।

अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा॥

हे गणपतीस्तोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन।

विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान, सिंदुरवदन देईल पै॥

त्यासी पिशाच्च भूत प्रेत, न बाधिती कदाकाळात।

स्वामिची पूजा करोनी यथास्थित, स्तुतिस्तोत्र हे जपावे॥

होईल सिद्धी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता।

गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला॥

इति श्री गणपतीस्तोत्रं संपूर्णम्।

श्री गजाननार्पणमस्तु॥


Jay jayaji ganpati stotra pdf
Jay jayaji ganpati lyrics
Jay jayaji ganpati lyrics in marathi
Deepali Rane Jay Jayaji Ganpati Stotra lyrics
Ganesh Atharvashirsha
गणपती स्तोत्र मराठी pdf
Ganpati Stotra Marathi

No comments:

Post a Comment