Diwali Faral
Click here for Maharashtrian Diwali Faral in Marathi
Made in Kalyan-Dombivali savoured in Kansas-London
Enterprising businessmen are exporting sweetmeats and other items so that NRIs can have a traditional celebration
It’s not only in Maharashtra that traditional Diwali sweets are being relished, but local sweet shops from Kalyan and Dombivli are ensuring that Indians living in Singapore, United States and United Arab Emirates get an opportunity to relish the traditional sweets despite living thousands of miles away from their homeland.
The sweets were prepared and shipped by Dombivali-based outlets namely Suras Foods and Kulkarni Brothers. More than 1,600 parcels have been shipped to Singapore, United Kingdom and the United States of America by the two outlets during in the past few days.
The sweets include Chivda, Shev, Shankarpale and Ladoos and other sweets. “This year we are sending packets weighing four kg each for a family. We hope that they will suffice for all the members,” said Sunil Shevade, manager of Suras Foods.
There are also assorted packets containing sweets, a lantern, utna (sandalwood), diyas (lamps) and other important traditional materials related to Diwali festivities. These packets weigh almost seven kg. Besides this, a provision will also be made for the home delivery of sweets. However the quality traditional food will come at a price. “Sharp rise in prices of the basic ingredients like dals and oil has led to an increase in rates of these sweets by 20% this year,” said Shripad Kulkarni, proprietor of Kulkarni Brothers.
Around 5,000 employees have been employed for this venture and have been making the sweets since Dussera. “This is a good idea, since Diwali sweets are not available abroad,” said Kiran Talegaonkar, resident of Dombivli.
If you wait a whole year to indulge your sweet tooth around Diwali, we’d suggest you check if your vision is 20/20. Make sure that you can see the Food and Drug Administration’s (FDA) certificate on display at the stores from where you buy your sweets.
According to the recently enforced Food Safety Act (FSA), any manufacturer, retailer, wholesaler or distributor of any perishable commodity needs to have a licence or has to be registered with the state wing of the FDA. And s/he will have to mandatorily display the FDA’s certificate for all consumers.
Warning against poor quality products, FDA commissioner Mahesh Zhagade said, “If the manufacturer, retailer or wholesaler has a business of more than Rs12 lakh per annum, he has to register himself with the state FDA. If the annual business is less than Rs12 lakh, then he has to register himself with us. Earlier, as per the Prevention of Food Adulteration Act, urban local bodies had the power to issue licences. Now, as per the FSA, only the state FDA can issue them.”
The state FDA, he added, is already in touch with various stakeholders involved in preventing food adulteration and contamination. The products on the radar include mawa, sweets, chocolates, ghee, refined oil, aata and maida. “We have also prepared an end-to-end checklist, which will be circulated, to ensure that there are no loopholes in the system, right from the time of manufacture till it reaches the consumer,” added Zhagade.
Senior FDA officials indicated that those manufacturing commodities, especially sweets, in unhygienic conditions have been identified. The FDA has also stepped up vigilance on landing sites, such as railway stations, ST depots and market yards, where the raw material is delivered.
“Even on district-levels, our officials will be checking vulnerable spots and sending us reports,” said Zhagade.
Officials, however, claimed that figuring out the purity of commodities like mawa can be difficult. “As per the standard, mawa needs to have 30% milk fats. However, it is difficult to just recognise pure mawa. It can be adulterated using sugar and even substances like starch. This is why the registration or licensing of mawa shops has been made mandatory,” added Zhagade.
Suras Foods contact address and phone number:
Business Name: Suras Foods, India Product / Services Upwas dishes, Sweets, Sugarfree Laddus. Special Offer Diwali Hampers, domestic as well as International Head Office Bibikar bldg.,Pandurang wadi, manpada rd., Dombivli(E) Contact Number 9869484075 | |
M/s Kulkarni Brothers contact address and phone number: Motimahal Society, G.Gupte Road City: Dombivli (West). 421 202 Dist: Thane State: Maharashtra Country: India Email: Sales@kulkarnibros.com Tel No: 0251 - 2481906 Cell No: +91 9821071225/9594071225 Shev, Chakli, Kadboli, Anarsa, Karanji, Poha Chiwda, Besan Ladu, Shankar Pala दिवाळीनिमित्त चिवडा, लाडू, करंज्या, शंकरपाळे.. नाव ऐकताच तोंडाला पाणी आणणाऱ्या या लज्जतदार पदार्थांना परदेशी भारतीयांकडून भरपूर मागणी असल्याने, या फराळाची गेल्या काही वर्षांपासून परदेशवारी घडू लागली आहे. या व्यवसायात असलेल्या डोंबिवलीकर उद्योजकांनी यंदा तब्बल चार हजार किलोंचा फराळ परदेशवारीसाठी तयार केला आहे. डोंबिवलीतील अनेक कुटुंबातील कुणी ना कुणी अमेरिका, लंडन, दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया अशा देशांत स्थलांतरीत झाले आहे. या मंडळींना त्यांच्या इथल्या कुटुंबियांकडून दिवाळीच्या फरळाची भेट नियमीतपणे पाठविली जाते. अशा ग्राहकांच्या सोयीसाठी भेटीची हॅम्पर्स पाठविण्यासाठी डोंबिवलीतील काही उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. त्यापैकी सुनील शेवडे, श्रीपाद कुलकर्णी यांनी यंदा ५ आणि ७ किलोचे पॅकेज तयार केले आहे. फराळासाठी लागणारे तेल, डाळ या सारख्या कच्च्या मालाचे दर वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे पॅकेज ५०० ते हजार रुपयांनी वाढल्याचे या उद्योजकांचे म्हणणे आहे. शास्त्री हॉलमध्ये फराळ विक्री करणारे मामा देवस्थळी हे परदेशात थेट फराळ पाठवत नसले तरी परदेशातील भारतीय त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने त्यांचा फराळ मागवून घेतात. या तिन्ही उद्योजकांचा मिळून सुमारे पाच हजार किलोंचा फराळ यंदा परदेशाला रवाना झाला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परदेशातून मागणी कमी झाल्याचे कुलकर्णी ब्रदर्सचे किरण कुलकर्णी यांनी सांगितले. फराळाची विक्री वाढवण्यासाठी उद्योजकही नवनवीन संकल्पना राबवताना दिसतात. सुनील शेवडे यांनी यंदा भारतात कुठेही फराळ देण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यांच्या या संकल्पनेला प्रतिसाद मिळत असुन हैद्राबाद, बेंगळुरु या शहरांपर्यंत शेवडे यांचा फराळ पोहोचला आहे. |
Contact:
Kulkarni Bros.
Motimahal Society,
G. Gupte Road
Dombivli, Maharashtra,
INDIA - 421202.
+91 98210 71225
sanjeev@sanmisha.com
Click here Diwali faral recipes in marathi
Kulkarni brothers shop |
कायमस्वरूपी नोकरी ही सुरक्षित आयुष्याची हमी असली तरी त्यातून मिळणारे यशही मर्यादित असते. त्यामुळे आयुष्यात प्रगतीचा फार मोठा पल्ला गाठायचा असेल तर काही प्रमाणात जोखीम ही पत्करावीच लागते. सर्वसाधारणपणे मराठी माणसे सहसा नोकरीची चाकोरी सोडताना दिसत नसली तरी त्याला काहीजण अपवाद ठरले. डोंबिवलीतील रामभाऊ कुळकर्णी त्यापैकी एक. मुंबईतील आरे दुग्धशाळेत अकाऊंटंट म्हणून कार्यरत असणाऱ्या रामभाऊंनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि फडके रोडवर साठ वर्षांपूर्वी, १९५५ मध्ये ‘कुळकर्णी ब्रदर्स’ नावाचे दुकान सुरू केले. मध्यमवर्गीय कुटुंबांना दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या लोणचे, पापड, श्रीखंड, मिठाई आदी पदार्थ त्यांनी विक्रीसाठी ठेवले. गावठाणाचे स्वरूप असलेल्या डोंबिवलीत तेव्हा हॉटेल संस्कृती फारशी रुजली नव्हती. त्यामुळे प्रसंगी बाहेर खावे लागणाऱ्यांची गैरसोय होत होती. रामभाऊ कुळकर्णीमधल्या व्यावसायिकाने ही संधी साधत दुकानासोबतच दत्त खानावळ सुरू केली. त्याद्वारे २५ पैशांत राईस प्लेट उपलब्ध करून दिली. सुरुवातीला नोकरी सांभाळून त्यांनी व्यवसायाचा हा गाडा ओढला आणि पुढे जम बसल्यावर नोकरी सोडून पूर्णपणे त्यात लक्ष घातले. त्या काळात डोंबिवलीत फक्त दोनच मिठाईची दुकाने होती. पहिले दुकान देवांचे आणि दुसरे कुळकर्णीचे. गेल्या सहा दशकांत मिठाई आणि मिष्ठान्न विक्री व्यवसायात आमूलाग्र बदल झाले. मात्र त्या बदलांना समर्थपणे तोंड देत, प्रसंगी काळानुरूप बदल करीत कुळकर्णी कुटुंबीयांनी रामभाऊंनी लावलेले हे व्यवसायाचे रोपटे अतिशय निष्ठेने वाढविले असून त्याची कीर्ती जगभरात नेली आहे. याच महिन्यात २४ डिसेंबरला (दत्त जयंती) कुळकर्णी परिवार आपल्या व्यवसायाची षष्टय़ब्दी साजरी करणार आहे. घरगुती पद्धतीने बनविलेले श्रीखंड, चक्का, केशरी पेढा, मोतीचुराचे लाडू, अनारसे ही कुळकर्णी बंधूंची खासियत. डोंबिवलीकर माहेरवाशिणी आणि कुटुंब विस्तारामुळे विभक्त होऊन इतर शहरांत स्थायिक झालेल्या कुटुंबांमुळे ती कीर्ती वाढली. अगदी मुंबई, नवी मुंबईतूनही मोतीचुराच्या लाडूसाठी खास वाट वाकडी करून लोक डोंबिवलीला कुळकर्णी ब्रदर्समध्ये येऊ लागले. ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक मोतीचूर लाडूंची विक्री ‘कुळकणी ब्रदर्स’ मध्ये होते. गेल्या चाळीस वर्षांत आमच्याकडच्या केशरी पेढय़ाची चव बदलली नाही, असे श्रीपाद कुळकर्णी अतिशय अभिमानाने सांगतात. डोंबिवलीतील स्वामी विवेकानंदच्या दहा शाळांना कुळकर्णी बंधूंकडून खाऊ पुरविला जातो. गावातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना कुळकर्णीचा केशर पेढा, पीयूष अथवा पन्हे असते. सणासुदीला पुरणपोळी आणि उकडीच्या मोदकांना खूप मागणी असते. शहरातील दोन-तीन महिला गटांकडून पदार्थ बनवून घेतले जातात. त्याद्वारे शंभरएक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कठोर मेहनतीने गुणवत्तेतील सातत्य राखले की हमखास यश मिळते, यावर रामभाऊ कुळकर्णी यांचा विश्वास होता. आपल्या दोन्ही मुलांच्या हाती व्यवसायाची सूत्रे सुपूर्द करण्याआधी त्यांनी त्यांचीही परीक्षा घेतली. एकतर पदवीधर झाल्यानंतरच त्यांनी त्यांना व्यवसायात घेतले. त्यातही सुरुवातीला अगदी प्राथमिक जबाबदाऱ्या सोपविल्या. १९८३ मध्ये थोरला मुलगा श्रीरंग तर १९८५ पासून धाकटा मुलगा श्रीपाद या रामभाऊंच्या दुसऱ्या पिढीने कुळकर्णी ब्रदर्सच्या कारभारात लक्ष घातले. ‘त्यावेळी बाबा आम्हाला आम्ही करीत असलेल्या कामापोटी दीडशे रुपये विद्यावेतन देत आणि ते कसे खर्च केले, त्याचा हिशेबही घेत असत,’ अशी आठवण श्रीपाद कुळकर्णी यांनी सांगितली. दुसरी पिढी व्यवसायात येण्याआधीच पश्चिम विभागात १९७२ गुप्ते रोडवर रामभाऊंनी दुसरे दुकान सुरू केले. पुढील काळात केवळ शहरातील पूर्व-पश्चिमच नव्हे तर जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत ‘कुळकर्णी ब्रदर्स’ची ख्याती पोहोचली. पूर्वेकडचे दुकान श्रीरंग तर पश्चिमेकडचे दुकान श्रीपाद सांभाळतात. या गोडाधोडाच्या व्यवसायाला कुळकर्णीच्या तिसऱ्या पिढीने ‘तंदूर एक्प्रेस’ हे मांसाहारी पदार्थाचे दुकान थाटून तिखट वळण दिले आहे. श्रीपाद यांचा मुलगा चिन्मय याने सुरू केलेल्या शाखेलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. काही उद्योजक आधी लोगो, ट्रेड मार्क वगैरे करून नंतर ब्रॅण्िंडग करतात. कुलकर्णी बंधूंबाबत उलटे झाले आहे. आपुलकीचा ओलावा चोख व्यावसायिकता आणि नावीन्याबरोबरच आपुलकी हे ‘कुळकर्णी ब्रदर्स’च्या यशाचे रहस्य आहे. त्याच स्नेहापोटी अमेरिकेत फराळ पाठविताना त्यासोबत कालनिर्णय, केरळचे उटणे, सुगंधी साबण या वस्तू ते भेट म्हणून पाठवितात. कंदिलाचे सुटे भाग पाठवितात. जेणेकरून ते जोडून तिथल्या मंडळींनी आकाशकंदील करावा. त्यातून केवळ ग्राहक नव्हे तर माणसे जोडली गेली. काही वर्षांपूर्वी त्यांनी चक्क अमेरिकेत फराळ फ्री सॅम्पल म्हणून पाठविला. केवळ दिवाळीच नव्हे तर मकर संक्रांतीला तीळगूळ, हलव्याचे दागिने, गूळपोळीसोबत खास अहमदाबादहून मागविलेली एक छान पतंग देतात. अमेरिकेत दिवाळी फराळ २०१० मध्ये कुलकर्णी बंधूंचा भाचा तेजस करंदीकर शिक्षणानिमित्ताने अमेरिकेत गेला. त्याला मामांनी दिवाळी भेट म्हणून चक्क घरगुती फराळ कुरिअरने पाठविला. त्या पाच किलो फराळाचा तेजसच्या मित्र परिवाराने अध्र्या तासात फडशा पाडला. मग तिथून अशा प्रकारे फराळ पाठविता येईल का, अशी विचारणा झाली. त्यासाठी लागणारे पैसे मोजायचीही त्यांची तयारी होती. पहिल्याच वर्षी लाडू, चकल्या, करंजा, शंकरपाळ्या, अनारसे असा जिन्नस असलेली फराळाची ४० पाकिटे अमेरिकेत रवाना झाली. परदेशात स्थायिक असलेल्या मुलांना सणासुदीला अगदी हटकून घरची आठवण येते. त्यांना शुभेच्छांबरोबरच फराळ मिळू लागला. साधारणपणे दर दिवाळीला कुलकर्णी बंधू अमेरिकेत प्रत्येकी पाच किलोची २०० पाकिटे पाठवितात. त्यात लाडू, करंजा, चकल्या, चिवडा, अनारशांसोबत खास त्या व्यक्तीच्या घरचा, आईने केलेला एखादा जिन्नस पाठविण्याचीही सोय असते. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. यंदा त्यांनी प्रथमच पुरणपोळ्याही पाठविल्या. घरगुती स्वरूपात पुरणपोळी अमेरिकेत पाठवली जातेच, मात्र ती व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थित पॅक करून ‘पिझ्झा’सारखी पाठवावी, असे कुलकर्णी बंधूंचे स्वप्न होते. यंदा अशा प्रकारे २०० पुरणपोळ्या त्यांनी अमेरिकेत पाठविल्या. अमेरिकेत तिसऱ्या दिवशी पार्सल पोहोचते आणि तिकडच्या हवामानात पुरण पोळी आठ दिवस टिकते. दूरवरचा प्रवास असल्याने साहजिकच फराळाचा खर्च ४० टक्के आणि पॅकेजिंग आणि कुरिअरचा खर्च ६० टक्के होतो. त्यामुळे तिकडच्या महाराष्ट्र मंडळांशी संपर्क साधून त्यांनी त्यांना एकत्रित ऑर्डर नोंदवून त्यातून वाचणारा खर्च त्या त्या मंडळांनी घ्यावा, असेही त्यांनी सुचविले आहे. इंटरनेटच्या महाजालात कुळकर्णी बंधूंचे स्वतंत्र संकेतस्थळही आहे. श्रीपाद कुळकर्णी यांच्या पत्नी गीता कुळकर्णी परदेशी फराळ विक्री व्यवस्थापनाचे काम पाहतात. व्यवसायापलीकडची ग्राहक सेवा हल्ली अनेकांना कोणत्या समारंभासाठी कोणता मेन्यू असावा, तेही नीट सांगता येत नाही. त्यामुळे अंदाज नसल्याने अनेकदा अन्न वाया जाण्याची अथवा पाहुणे उपाशी राहण्याचीही शक्यता असते. बारसे ते बारावे निरनिराळ्या समारंभात कोणकोणते पदार्थ हवेत, याचे काही ठोकताळे आहेत. ऋतुमानानुसारही त्यात बदल होतो. अर्थातच सर्वसामान्यांना ते माहिती नसते. मग आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. माव्याचे पदार्थ लवकरात लवकर खाऊन टाका. ते फ्रिजमध्ये ठेवून देऊ नका. ते खराब होतील, हे आम्ही त्यांना सांगतो. धार्मिक कार्यासाठी पुरोहित हवे असतील, तर ते सुचवितो. वर्षांनुवर्षे लाखो ग्राहकांनी विश्वास टाकल्यानेच कुळकर्णी बंधूंचे आता इतके नाव झाले आहे. ग्राहक हा देव आहे आणि व्यवसायाबरोबरच योग्य सल्ला देऊन त्याची सोय पाहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. – श्रीपाद कुळकर्णी
maharashtrian diwali faral
diwali faral maharashtrian recipes
diwali faral maharashtrian recipes marathi
diwali faral maharashtrian recipes karanji
diwali faral online
diwali faral recipe
No comments:
Post a Comment