Saturday, June 25, 2011

Jobs Available संधी रोजगाराची खात्री नोकरीची

औरंगाबादेतील वाल्मी संस्थेत सहयोगी प्राध्यापकाच्या ४ जागा
औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी) सहयोगी प्राध्यापक (४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात www.walmi.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पंजाब नॅशनल बँकेत ५८१ जागा
पंजाब नॅशनल बँकेत मुख्य व्यवस्थापक-माहिती तंत्रज्ञान (१ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक-विपणन (१० जागा), व्यवस्थापक-क्रेडिट (११५ जागा), व्यवस्थापक-सुरक्षा (२० जागा), व्यवस्थापक-विपणन (४७ जागा), व्यवस्थापक-अर्थ (४ जागा), उपव्यवस्थापक-माहिती तंत्रज्ञान (२०२ जागा), विपणन अधिकारी (१०४ जागा), अग्निशमन अधिकारी (२ जागा), मनुष्यबळ विकास अधिकारी (२० जागा), डाटा ॲनालिसिस (५ जागा), हिंदी अधिकारी (५१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०११ आहे. यासंबंधी सविस्तर माहिती व अर्ज www.pnbindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेडमध्ये ५८६ जागा
मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेडमध्ये विविध ट्रेडमधील कुशल -निमकुशल इंडस्ट्रियल ऑपरेटिव्हज (५८६ जागा) हे पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. ५ जुलै २०११ ते २१ जुलै २०११ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २३ जून २०११ या दिवशी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

चेन्नई येथील हेडक्वॉर्टर कोस्ट गार्ड रिजन (ईस्ट) मध्ये २३ जागा
चेन्नई येथील हेडक्वॉर्टर कोस्ट गार्ड रिजन (ईस्ट) मध्ये स्टोअर किपर (१ जागा), असिस्टंट स्टोअर किपर (३ जागा), इंजिन चालक (२ जागा), एमटी फिटर (२ जागा), आयसीई फिटर (६ जागा), इलेक्ट्रिकल फिटर (१ जागा), शिप फिटर (२ जागा), मेकॅनिस्ट (२ जागा), इन्स्ट्रुमेंट फिटर (२ जागा), वेल्डर (२ जागा) ही पदे भरण्यात येणार भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११-१७ जून २०११च्या अंकात आली आहे.


सशस्त्र सीमा दलाच्या पॅरा मेडिकल स्टाफमध्ये २३३ जागा
सशस्त्र सीमा दलाच्या पॅरा मेडिकल स्टाफमध्ये स्टाफ नर्स (४५ जागा), एएसआय-फार्मासिस्ट (२ जागा), एएसआय- फिजिओथेरपिस्ट (३ जागा), एएसआय-ऑपरेशन थेटर टेक्निशियन (३ जागा), एएसआय-डेंटल टेक्निशियन (३ जागा), हेडकॉन्स्टेबल-स्टुअर्ड (३ जागा), कॉन्स्टेबल-लॅब असिस्टंट (३६ जागा), कॉन्स्टेबल-नर्सिंग ऑर्डर्ली (१२० जागा), कॉन्स्टेबल- आया (९ जागा), कॉन्स्टेबल-मसाजची (६ जागा), कॉन्स्टेबल-टेबल बॉय (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख २० जुलै २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११-१७ जून २०११च्या अंकात आली आहे.

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठीच्या २१ जागा
यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (५५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०११ आहे. सविस्तर जाहिरात दै. देशोन्नतीमध्ये दि. १८ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. संबंधीची सविस्तर माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय जलसंपदा मंत्रालयात ८ जागा
केंद्रीय जलसंपदा मंत्रालयात ॲसेसोर (२ जागा), प्रधान खासगी सचिव (२ जागा), खासगी सचिव (१ जागा), सहायक (२ जागा), उच्चस्तर लिपिक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११-१७ जून २०११च्या अंकात आली आहे.

बेस्टमध्ये कनिष्ठ स्वच्छकच्या ३५७ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) कनिष्ठ स्वच्छक (३५७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १५ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये अभियंत्यासाठी ३६ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) उप अभियंता (१५), चार्ज अभियंता (२१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमपीएससीमार्फत कृषी सेवेतील ४०४ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत महाराष्ट्र कृषी सेवा गट अ (४० जागा), महाराष्ट्र कृषी सेवा गट ब (१२८ जागा), महाराष्ट्र कृषि सेवा गट ब-कनिष्ठ (२३६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १८ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व अधिक माहिती www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंत्याच्या ११४ जागा
रत्नागिरी जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता (११४ जागा) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १८ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात तलाठी पदाच्या ७ जागा
मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील तलाठी (७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सामनामध्ये दि. १८ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये ६५३ जागा
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल/पायोनियर (२०२ जागा), कॉन्स्टेबल-ट्रेडसमन (४५१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १० जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.itbp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात २१ जागा
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात कार्यकारी संचालक (१ जागा), संचालक-प्रशासन व वित्त (१ जागा), संचालक- विद्युत अभियांत्रिकी (१ जागा), संचालक-वीज दर (१ जागा), संचालक-विधी (१ जागा), उपसंचालक-प्रशासन व वित्त (४ जागा), उपसंचालक-तांत्रिक (८ जागा), उपसंचालक-विधी (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १ ऑगस्ट २०११ पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती www.mercindia.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकमत व लोकसत्तामध्ये दि. १५ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय तटरक्षक दलात नाविक पदाच्या ५२ जागा
भारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी (५२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.indiancoastguard.nic.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय तटरक्षक दलात सहायक कमांडंट पदासाठी भरती
भारतीय तटरक्षक दलात सहायक कमांडंट हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठीची थेट नोंदणी व प्राथमिक निवड देशातील मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, नोएडा या केंद्रांवर होणार आहे. ही नोंदणी व प्राथमिक निवड ही दि. २४ जून ते ६ जुलै २०११ या कालावधीत वरील केंद्रावर होणार आहे. अर्ज व अधिक माहिती www.indiancoastguard.nic.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये वाहनचालकांच्या १५१८ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) इतर मागासवर्गीयांसाठी विशेष भरती मोहिमेअंतर्गत कनिष्ठ बस चालक (१५१८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकमतमध्ये दि. १५ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कायदा अधिकारीच्या ४२ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कायदा अधिकारी (४२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. २८ जून २०११ ते १ जुलै २०११ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकमतमध्ये दि. १५ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या ४९८७ जागा
भारतीय स्टेट बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर केडरमध्ये व्यवस्थापक-विधी (१६ जागा), व्यवस्थापक-इकॉनॉमिस्ट (२ जागा), उपव्यवस्थापक-इकॉनॉमिस्ट (२ जागा), उपव्यवस्थापक-सुरक्षा (३० जागा), सहायक व्यवस्थापक-सिस्टिम (१०० जागा), सहायक व्यवस्थापक-विधी (१५ जागा जागा), स्थायी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (४१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०११ आहे. अधिक माहिती http://www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील गर्व्हनमेंट मिंटमध्ये ५० जागा
मुंबईतील गर्व्हनमेंट मिंटमध्ये फिटर (२९ जागा), इलेक्ट्रिशियन (१० जागा), टर्नर/मेकॅनिस्ट (६ जागा), पेंटर (१ जागा), सुतार (२ जागा), प्लंबर (१ जागा), वेल्डर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ४-१० जून २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ३२ जागा
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात वरिष्ठ संशोधन सहायक (२२ जागा), कार्यालय अधिक्षक (७ जागा), लघुलेखक उच्चश्रेणी-इंग्रजी (१ जागा), लघुलेखक उच्चश्रेणी-मराठी (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० जून २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.intranet.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये ७१ जागा
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदविकाधारक-मेकॅनिक (६० जागा), पदविकाधारक-इलेक्ट्रिकल (५ जागा), प्रशिक्षणार्थी फार्मासिस्ट (२ जागा), प्रशिक्षणार्थी नर्स (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत बॉयलर अटेंडंटच्या २ जागा
महाराष्ट्रातील वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत बॉयलर अटेंडंट (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये २८ मे - ३ जून २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या ४९८७ जागा
भारतीय स्टेट बँकेत तसेच त्याच्या सहयोगी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (४९८७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०११ आहे. अधिक माहिती http://www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळात ४५ जागा
भारत सरकारच्या भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळात उपमहाव्यवस्थापक-मार्केटिंग (१ जागा), व्यवस्थापक-तांत्रिक (३ जागा), उपव्यवस्थापक -पेपर (१ जागा), उपव्यवस्थापक -तांत्रिक (२ जागा), उप व्यवस्थापक-इंक फॅक्टरी (१ जागा), उपव्यवस्थापक-क्वॉलिटी एशुरन्स (२ जागा), उपव्यवस्थापक-एचआर (५ जागा), उपव्यवस्थापक-वित्त व लेखा (५ जागा), उपव्यवस्थापक-आयटी (२ जागा), उपव्यवस्थापक-मटेरियल (४ जागा), मटेरियल ऑफिसर (६ जागा), आयटी अधिकारी (८ जागा), एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (१ जागा), कनिष्ठ सेक्रेटरी (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. सविस्तर माहिती www.spmcil.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये २८ मे - ३ जून २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत १८८२ जागांसाठी भरती
भारत सरकारच्या कर्मचारी निवड समितीतर्फे (स्टाफ सिलेक्शन कमिशन) केंद्रीय पोलीस दलातील उपनिरीक्षक (११०४ जागा), सहायक उपनिरीक्षक (६७८ जागा), इंटलिजंट ऑफिसर (१०० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०११ आहे. सविस्तर माहिती http://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये २८ मे - ३ जून २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये २३ जागा
नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये सहायक कार्य अभियंता (९ जागा), सहायक पर्यवेक्षक (१४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये २८ मे - ३ जून २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेत संशोधन अधिकारीच्या १३ जागा
भारतीय रिझर्व्ह बँकेत संशोधन अधिकारी (१३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये २८ मे - ३ जून २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. या संबंधीची सविस्तर माहिती http://.onlinedr.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या पॅरा मेडिकल स्टाफमध्ये ११२ जागा
सीमा सुरक्षा दलात पॅरा मेडिकल स्टाफमध्ये उपनिरीक्षक-स्टाफ नर्स (१८ जागा), सहायक पोलीस उपनिरीक्षक-फार्मासिस्ट (३६ जागा), सहायक पोलीस उपनिरीक्षक-ओटी टेक्निशियन (९ जागा), सहायक पोलीस उपनिरीक्षक-फिजिओथेरपिस्ट (१ जागा), हेडकॉन्स्टेबल-स्टुअर्ड (३ जागा), हेडकॉन्स्टेबल-ज्यु. एक्स रे टेक्निशियन (१ जागा), हेडकॉन्स्टेबल-एएनएम नर्स (४ जागा), हेडकॉन्स्टेबल-पॅरामेडिक (१६ जागा), कॉन्स्टेबल-मसालची (१२ जागा), शिपाई (१ जागा), टेबल बॉय (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ४० दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये १४मे - २० मे २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील आरोहण मुख्यालयात ४७ जागा
मुंबईतील आरोहण मुख्यालयात स्टेनो (२ जागा), कनिष्ठस्तर लिपिक (२२ जागा), टेली क्लार्क (२० जागा), कुक (१ जागा), स्टोअर किपर (१ जागा), पेंटर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०११ पर्यंत आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. नवभारतमध्ये दि. २१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

No comments:

Post a Comment