Monday, November 7, 2016

Mukesh Ambani Hindi information



मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाशी संबंधित खास माहिती देत आहोत.

अंबानी फॅमिली आज देशासह विदेशातही लोकप्रिय आहे. मात्र, या फॅमिलीतील मोजक्याच चेहर्‍यावर मीडियाचा कॅमेरा असतो. मात्र, अंबानी कुटुंबातील इतर सदस्य कोण? ते कोणता व्यवसाय करतात? याविषयी फारच थोड्या लोकांना माहीत आहे.

मुंबईत रस्त्याने फळे विकायचे धीरुभाई अंबानी...
शिक्षण अर्धात सोडून धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका रिफायनरीत मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले. यमनहून मायदेशी परतल्यानंतर धीरुभाई यांनी चुलतभाऊ चंपकलाल दिमानी यांच्या मदतीने रिलायन्स कमर्शियल कॉरर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून धीरूभाई यांनी सुरुवातीला पश्चिमात्य देशात आलं (अदरक), हळद व इतर मसाल्यांची निर्यात केली.

दरम्यान, धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी यांचा यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 ला सौराष्ट्रातील जूनागड जिल्ह्यात झाला. धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूहाची स्थापना केली. 1977 मध्ये साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जावून 2007 साली अंबानी कुटुंबीयांची मालमत्ता 60 अब्ज डॉलर होती.

धीरूभाई यांनी बिझनेस सुरु केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती. तसेच त्यांच्या कुठलाही बॅंक बॅलेन्स नव्हता. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. धीरूभाई यांचे निधन 6 जुलै 2002 ला झाले. त्यांनी त्यांची मालमत्तेचा वाटणी करताना त्यांची पत्नी कोकिलाबेन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

धीरूभाई अंबानी व कोकिळाबेन यांना मुकेश, अनिल, नीना व दीप्ती अशी चार मुले आहेत.

मुकेश व नीता अंबानी
मुकेश अंबानी हे धीरूभाई व कोकिलाबेन यांचे थोरले चिरंजिव. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीचे चेयरमन व देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

मुकेश अंबानींनी 1981 मध्ये रिलायन्स उद्योग समुहाची जबाबदारी स्विकारली. रिलायन्स टेक्सटाइल व पॉलिएस्टर फायबर, पेट्रोकेमिकलचा बिझनेस विस्तारीत केला. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका व चेयरपर्सन आहेत. याशिवाय नीता या आयपीएलमधील संघा मुंबई इंडियन्सच्या मालकीण आहेत.
मुकेश व नीता यांना दोन मुले (आकाश व अनंत) व एक मुलगी (ईशा) आहे. सध्या आकाश व ईशा आपल्या वडिलांना बिझनेसमध्ये मदत करत आहे. अनंत सध्या शिक्षण घेत आहे.

अनिल व टीना अंबानी
अनिल अंबानी हे धीरुभाई यांचे धाकटे चिरंजिव. देशातील टॉप-10 श्रीमंतांमधील एक. अनिल यांचा विवाह टीना मुनीम यांच्याशी झाला आहे. टीना मुनीम या 80 च्या दशकात बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. जय अनमोल व जय अंशुल हे त्यांची मुले आहे.
अनिल हे रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स लिमिटेडचे चेयरमन आहेत. जय अनमोल सध्या वडिलांना बिझनेसमध्ये मदत करत आहे. जय अंशुल सध्या शिक्षण घेत आहे.

दीप्ति व दत्तराज सालगांवकर
दीप्ति सालगांवकर या धीरुभाई यांच्या व्दितीय कन्या. दीप्ति यांचा विवाह गोव्यातील प्रसिद्ध बिझनेसमन दत्तराज (राज) सालगांवकर यांच्याशी झाला आहे. राज यांचे वडील व्ही.एम. सालगांवकर व धीरूभाई हे दोघे चांगले मि‍त्र होते. राज यांचा गोव्यात मायनिंग व हॉस्पिटेलिटीचा बिझनेस आहे.
दीप्ति व राज यांना दोन मुले. (इशिता व विक्रम). विक्रमने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे. इशितानेही अमेरिकेतूनच शिक्षण घेतले आहे. इशिताने सॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीतून पॉलिटिकल सायन्समध्ये बीएची पदवी घेतली आहे. त्यानंतर कोलंबिया यूनिव्हर्सिटीतून जर्नलिझममध्ये एमएस्सीची पदवी घेतली आहे.

नीना व भद्र्श्याम कोठारी
धीरुभाई यांची कन्या नीना या 'कोठारी शुगर्स अॅण्ड केमिकल्स कंपनीच्या चेअरमन आहेत. पती भद्रश्याम कोठारी यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी कंपनीच्या चेअरमनपदाची सूत्रे स्विकारली. गेल्या फेब्रुवारीत भद्रश्याम कोठारी यांचे निधन झाले. चेन्नईतील प्रसिद्ध उद्योगपती एच.सी.कोठारी यांचे ते पुत्र होते.

नीना व श्याम यांना दोन मुले आहेत. अर्जुन सध्या वडिलांनी उभ्या केलेल्या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर आहे. कन्या नयनताराचा विवाह 2013 मध्ये शमित भरतिया यांच्याशी झाला. शमित हे एचटी मीडिया ग्रुपचे एडिटोरियल डायरेक्टर व चेयरपर्सन शोभना भरतिया यांचे चिरंजिव आहेत.

मुकेश अंबानी यांची थोरली कन्या ईशा अंबानी

मुकेश अंबानी यांची भगिणी नीना कोठारी यांची कन्या नयनतारा कोठारी

मुकेश अंबानी यांची भगिणी दीप्ति सालगांवकर यांची कन्या इशिता

मुकेश अंबानींची मुले. आकाश (उजवीकडून) व अनंत

अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल अंबानी

अंबानी फॅमिली (फाईल फोटो)







mukesh ambani marathi

anil ambani in hindi

mukesh ambani house history in hindi

mukesh ambani biography in marathi

history of mukesh ambani house

nita ambani mukesh ambani marriage

information about mukesh ambani in marathi

mukesh ambani life story

mukesh ambani story of success

mukesh ambani marathi information

history of mukesh ambani in hindi language

mukesh ambani house history in hindi

mukesh ambani biography in marathi

nita ambani mukesh ambani marriage

mukesh ambani life story

history of mukesh ambani house

mukesh ambani story of success

mukesh ambani hindi news

No comments:

Post a Comment