Wednesday, March 22, 2017

लिव्हर रोग

काविळीमुळे होणारा लिव्हर कॅन्सर हा दुर्धर आजार नसून तो योग्य उपाचाराने बरा होऊ शकत असल्याचे निदर्शनास येत आहे. कॅन्सरग्रस्तांसाठी ही बाब दिलासादायक असून या आजाराने ग्रस्त नाशकातील एक पेशंट पूर्णपणे बरा झाला आहे.

कावीळ अर्थात हेपिटाइटिस बीचे प्रमाण ते टक्क्यांपर्यंत वाढत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आज . कोटी जणांना हेपिटाइटिस बी असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. भारतातील सर्व मेट्रो सिटीमध्ये सर्वात जास्त लिव्हर कॅन्सरचे प्रमाण मुंबईत आहे. हेपिटाइटिस हा लिव्हर- यकृतामधील संसर्गामुळे होतो. भारतात लिव्हर कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असून हेपिटाइटिस बी या संसर्गामुळे होणारा लिव्हर कॅन्सर हा सर्वांमध्ये आढळून येणारा आणि जीवघेणा रोग आहे. हेपिटाइटिस बी या संसर्गामुळे होणारा कॅन्सर महिलांपेक्षा पुरुषांमध्ये सर्वात जास्त आढळून येतो. तंबाखू खाणे, अति मद्य सेवन, पोटाचे विकार, अतिऔषधांचे सेवन, सिगारेट ओढणे आदींमुळे लिव्हर कॅन्सर होतो.

मेडिकल विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळेच लिव्हर कॅन्सरवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. एचसीजी आणि क्युरी मानवता कॅन्सर सेंटर यांच्यावतीने सटाणा तालुक्यातील एका पेशंटवर उपचार करण्यात आले. जून २०११मध्ये त्या पेशंटला काविळीसोबत लिव्हर कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर डॉ. राज नगरकर यांच्यासह इतर डॉक्टरांच्या पथकाने उपचार केले. त्यामुळेच पेशंट आज सुदृढ जीवन जगत असल्याचे डॉ. नगरकर यांनी सांगितले.


उपचार उपलब्ध

अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल अन्कॉलॉजी यांनी केलेल्या एका संशोधनानुसार लिव्हर कॅन्सरग्रस्त शेवटच्या टप्प्यातील ४२ पेशंटना योग्य निरीक्षण, तपासणी औषधोपचाराच्या साह्याने बरे करण्यात यश मिळवले. २००७ ते २०११ मध्ये अशा पेशंटना आर्टिरिअल, केमोएम्बोलायजेशन, केमोथेरपी गोळ्यांच्या स्वरुपात तोंडावाटे देण्यात येणारी केमोथेरपी यांच्या सहाय्याने पूर्णपणे बरे करण्यात यश मिळाले. भारतात आणि नाशकातही हे उपचार उपलब्ध झाल्याचे डॉ. नगरकर यांनी स्पष्ट केले.

 लिव्हर रोग

गैर अल्कोहल वसायुक्त रोग के लक्षण

लीवर रोग के लक्षण

यकृत रोग

लीवर कैंसर के लक्षण

लीवर सिरोसिस के लक्षण

लिवर की गर्मी

लीवर की देखभाल

लीवर की गर्मी

No comments:

Post a Comment