Friday, September 16, 2016

काविळ रोग लक्षणे उपचार औषध आहार Kavil rog lakshane upchar aushadh aahar jaundice

 कावीळ हा अचानक उद्भवणारा आजार असल्याने त्याच्या लक्षणांची पूर्वसूचना मिळत नाही. हा आजार पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यामुळे होतो. लक्षणे, उपचार यांसह काविळीचे दुष्परिणाम समजून घ्यायला हवेत.

कारणे Reasons for Kavil

पिण्याच्या पाण्यातून काविळीच्या जंतूंचा संसर्ग होतो. उघड्यावरच्या अस्वच्छ पदार्थांमध्येही काविळीचा संसर्ग होण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, खूप कडक उपवास वा डायटिंग करण्यानेही यकृताचे कार्य मंदावते.

हिपॅटिक पेशींवरील परिणाम

काविळीच्या विषाणूंच्या संक्रमणामुळे मुख्यत: लिव्हरमधील 'हिपॅटिक' पेशींवर जलद परिणाम होतो. त्यामुळे अन्नातील प्रथिने व स्निग्ध पदार्थांचे पचन व्यवस्थित न होता विलीरुबीन आणि बिलीवर्डीन या यकृताच्या संप्रेरकांच्या स्रावावर परिणाम होतो. त्यामुळेच लघवीत पिवळेपणा येतो. अशा वेळी रक्त व लघवी तपासण्या तसेच शरीरावरील त्वचेच्या स्कीनफोल्ड मसल स्ट्रेन्थ तपासण्यांतूनही आजाराचे निदान केले जाते. शारीरिक विश्रांती, अतिरिक्त कॅलरीयुक्त आहार यामुळे शरीराची काविळीने झालेली झीज भरून निघते. तृणधान्य, सालीसहित डाळी, योग्य प्रमाणात दही-ताक यातून दुग्ध प्रथिने आणि जीवनसत्त्वांसाठी भरपूर भाज्या, फळांचे रस, उसाचा रस, मध असा आहार सहाय्यक ठरतो.

तांबड्या पेशीची विघटनात्मक कावीळ

तांबड्या पेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश झाल्यास रक्तातील पित्तारुणाचे प्रमाण वाढते. अॅनेमियाच्या काही प्रकारांत किंवा रक्तात संसर्ग झाल्यास किंवा रक्तदान करतेवेळी रक्तगट न जुळल्यासही अशा स्वरूपाची कावीळ होते.

यकृतजन्य कावीळ Liver Kavil

यकृताला हानी पोहोचल्यास यकृतजन्य कावीळ होते. विशेषतः हेपिटायटीस रोगाच्या विषाणूंचा संसर्ग, विषारी पदार्थ शरीरात जाणे किंवा यकृत रोगामुळे यकृताद्वारे पुरेसे पित्त स्रवले न जाणे यामुळे पित्तारुण साचून राहिल्याने यकृतजन्य कावीळ होते.

अर्भकांमधील कावीळ Children Kavil

नुकत्याच जन्मलेल्या काही अर्भकांमध्ये सौम्य प्रकारची कावीळ आढळते. अशा अर्भकांमध्ये पित्तारुण बाहेर टाकण्याची क्रिया विलंबाने सुरू होते, हे यामागील कारण आहे. अशी कावीळ एका आठवड्यात नाहीशी होते. अपुऱ्या दिवसात जन्मलेल्या बालकांमध्ये या काविळीचे प्रमाण जास्त असते. काही नवजात अर्भकांत एरिथ्रोब्लास्टोसीस फिटॅलीस हा काविळीचा एक गंभीर प्रकारही आढळतो. मातेचे रक्त व अर्भकाच्या रक्तातील आरएच घटक वेगळे असल्यास अर्भकाच्या रक्तात तांबड्या पेशी तयार करणाऱ्या पेशींची बेसुमार वाढ होते. मात्र वेळीच निदान झाल्यास ही कावीळ नियंत्रणात येते.

काविळीस प्रतिबंध करण्यासाठी आहार ः How to fight with Kavil

 1.  दिवसातून पाच ते सहा छोट्या जेवणांतून कॅलरीची गरज भरून निघेल, असा आहार असावा.
 2.  ज्वारी, नाचणी, राजगिरा, ओटस् या तृणधान्यांसोबत मुगडाळ, ताक अशी प्रथिने आहारात असावीत.
 3.  मसाले, मिरची, तेल, तूप, मासांहार टाळावा.
 4.  आहारात उसाचा रस, काकवी, मधाचा समावेश असावा
 5.  आहारात उकडलेल्या भाज्या, उकळून गार केलेले पाणी आणि फळांचा समावेश असावा.
==========

पावसाळ्यात गॅस्ट्रोइतकाच कावीळ होण्याचाही धोका असतो. पावसाळ्यात होणारी कावीळ ही 'हेपटायटिस-ए' किंवा सी या प्रकारची असते. अनेकदा डॅाक्टरांशी सल्लामसलत न करता गावठी औषधे परस्पर घेतली जातात. त्यामुळे, काविळीसारखा गंभीर आजार उलट बळावण्याचा धोका वाढतो...

दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याची शक्यता अधिक असते. किंबहुना, दूषित पाण्यामुळेच बहुतेकदा कावीळ होते. यात पहिल्या टप्प्यात रुग्णाला सतत ताप येतो. अशक्तपणा येतो. काही खाण्याची इच्छा होत नाही. जेवण घेतल्या घेतल्या उलटून ते बाहेर पडते. हे कावीळ झाल्याचे प्राथमिक टप्प्यातील लक्षण आहे. काहीवेळा रुग्ण आजार अंगावर काढतात आणि डॅाक्टरांकडे खूप उशिरा जातात. त्यामुळे कावीळ बळावते.

लक्षणे अन्नपचन न होणे सतत ताप येणे लिव्हरला सूज येणे पोट फुगणे सांधे दुखणे डोळे पिवळे होणे तापाची मुदत वाढणे अशक्तपणा येणे रक्तामध्ये संसर्ग होणे

तातडीने करावयाचे इलाज

काविळीच्या रूग्णाला उसाचा रस द्यावा, असे सुचवले जाते. तातडीने करण्यात येणारा हा उपाय उपयुक्त आहे. कारण उसाच्या रसातील सुक्रोझ हा घटक शरीराकडून थेट स्वीकारला जातो. आपण खातो त्या पदार्थांच्या पचनाची क्रिया आतड्यांमध्ये वेगवेगळ्या भागात रूपांतरित होते. उदाहरणच द्यायचे तर अन्नातील कार्बो-हायड्रेटसचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. त्याचप्रमाणे, प्रोटीन्सचे अमिनो अॅसिडमध्ये आणि फॅटचे फॅटी अॅसिडमध्ये रूपांतर होते. गरजेनुसार शरीरातील फॅट आणि प्रोटीन्सचे रूपांतर ग्लुकोजमध्ये पेशींच्या वापरासाठी केले जाते. काविळीच्या आजारात पचनाची ही क्षमता तुलनेने खूप कमी होते. ती उसाच्या रसामुळे त्वरित सावरण्यास मदत होते. त्यामुळे काविळीच्या विकारात उसाचे सेवन हे आरोग्यदायी ठरते. मात्र, हा उपाय डॅाक्टरांनी दिलेल्या औषधांसोबत त्यांच्या सल्लानेच घ्यावा. घरगुती अथवा ऐकीव माहितीच्या आधारे औषधे घेणे हितकारक नसते.

काय टाळावे

उघड्यावरचे पदार्थ खाणे

दूषित पाणी पिणे

साठवून ठेवलेले पाणी पिणे

ओल आलेल्या दमट भाज्या वा पदार्थांचे सेवन

साठवून वा अतिथंड केलेले फ्रीजमधील पदार्थ

तळलेले मात्र खूप काळ डबाबंद केलेले पदार्थ
===========
दूषित पाणी ही मुंबईत बारमाही समस्या आहे. पण, पावसाळ्यात हे प्रमाण वाढतं. पावसाळ्यात येणाऱ्या अनेक आजारांपैकी कावीळ हा तापदायक रोग. काविळीचा ताप किमान सहा आठवडे सहन करावा लागतो. भयंकर अशक्तपणा आणणारा हा आजार अनेकदा जीवघेणाही ठरू शकतो.

८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपल्याकडे काविळीचा एकमेव व्हायरस होता. आता ही संख्या वाढत चालली आहे. 'ए', 'बी', 'सी', 'डी' आणि 'ई' या व्हायरसमध्ये कावीळ होऊ शकते. प्रत्येक प्रकारच्या काविळीची तऱ्हा वेगळी आहे. मुंबईत 'ए' आणि 'ई' प्रकारच्या काविळीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या काविळीच्या व्हायरसचा पाण्यातून प्रसार होतो.

मानवी यकृतात काविळीचे व्हायरस आढळतात. यकृतातून पुढे ते आतड्यात आणि आतड्यातून मलाद्वारे शरीरातून बाहेर पडतात. हा मळ पिण्याच्या पाण्यात मिसळला, की अशा दूषित पाण्यातून काविळीचा प्रसार होतो. मुंबईत अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटक्या आणि गळक्या असल्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता खूप वाढते. पावसात हे प्रमाण खूप वाढतं.

खबरदारी काय घ्याल?

पावसाळ्यात उकळलेलं पाणी पिणं, हा कावीळ रोखण्याचा उत्तम उपाय! पण, पाणी उकळणं म्हणजे काय हे एकदा समजून घेण्याची गरज आहे. पाण्याला एखादी उकळी आली, की पाणी उकळलं असा अनेक जणांचा समज असतो. पण, हे काही खरं नसतं. पाण्याला उकळी आल्यानंतर पुढे ते किमान अर्धा तास उकळण्याची गरज असते. इतका वेळ उकळवल्यास ते खऱ्या अर्थाने निर्जंतूक होतं. अशा प्रकारे उकळवलेलं हे पाणी स्वच्छ भांड्यात साठवून ठेवणं गरजेचं. या पाण्याचं सेवन केल्यास काविळीची लागण होण्याची शक्यता कमी असते.

रक्तातून संसर्गाची शक्यता

इंजेक्शनची दूषित सीरिंज आणि दूषित रक्तातून हेपेटायटीस 'बी' आणि 'सी'च्या व्हायरसची लागण होण्याची शक्यता असते. अनेकदा रुग्णांना रक्तातल्या तांबड्या आणि पांढऱ्या पेशींची गरज लागते. कधी रक्तातला प्लास्मा देण्याची गरज असते. रक्तदात्यांकडून रक्त घेताना ते हेपोटायटीसमुक्त आहे, याची खातरजमा केली जाते. पण, अनेकदा काविळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात रक्ताची चाचणी करूनही या रोगाची लागण झाल्याचं लक्षात येत नाही. अशा लोकांच्या रक्तातून काविळीचा फैलाव होण्याची शक्यता असते.

लक्षणं :


हेपेटायटीस 'ए' आणि 'ई'मध्ये काविळीची लक्षणं अगदी ठसठशीतपणे दिसतात.

 •  दोन दिवस सदीर् होते.
 •  बारीक ताप येतो.
 •  लघवीचा रंग गडद होतो. हळदीसारखी लघवी होते.
 •  मलाचा रंग पांढरा होतो. कावीळ झालेल्या रुग्णाच्या यकृताला सूज आल्यामुळे यकृतातून शरीराला पोषक असलेले स्त्राव वाहणं बंद होते. या स्त्रावामुळे मलाला पिवळा रंग येतो. पण, यकृतातले हे स्त्राव बंद झाल्यामुळे मलाचा रंग पांढरा होतो.
 •  काहीही करायची इच्छा न होणं, हे काविळीचं महत्त्वाचं लक्षण.
 •  खूप अशक्तपणा असल्यामुळे काहीही करावंसं वाटत नाही.
 •  तंबाखू किंवा स्मोकिंगच्या वासाने उलटीची भावना होते. कधीकधी उलटीही होते. फोडणीच्या वासानेही अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो.
 •  अनेकदा रुग्ण बेशुद्ध होण्याची शक्यता असते.
 •  कधी कधी यकृत प्रमाणाच्या बाहेर खराब झालं असलं, तर या बेशुद्ध अवस्थेत मृत्यू येण्याची शक्यता असते.


हेपेटायटीस 'बी' आणि 'सी'चा


छुपा वार :

'बी' आणि 'सी' प्रकारच्या व्हायरसमुळे होणाऱ्या हेपेटायटीसची लक्षणं 'ए' आणि 'ई' प्रकारच्या काविळीप्रमाणे दिसत नाहीत. त्यामुळे हे प्रकार जास्त धोकादायक असतात. ही कावीळ झाल्याचं लक्षात येत नाही पण, यकृतावर याचा विपरीत परिणाम होत असतो. अनेकदा यकृतात बिघाड होऊन त्याचं पर्यावसन जलोदरसारख्या जीवघेण्या रोगात होण्याची शक्यता असते.

दारू टाळा :

कावीळ बरी झाल्यानंतरही काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं असतं. काविळीचा यकृतावर परिणाम होतो. दारुबाज लोकांनी कावीळ बरी झाल्यानंतर दारुपानाचे कार्यक्रम सुरू ठेवले, तर यकृताचा पार बोजवारा उडण्याची शक्यता असते.

उपाय :

आयुवेर्दात काविळीवर आरोग्यवधिर्नी, कुटकीचा वापर केला जातो. अनेकदा सुंठ, मिरी आणि पिंपळी, सैंधव, लिंबू यांच्या रसाचं मिश्रण रोग्याना दिलं जातं. पण, औषध आयुवेर्दिक असो किंवा अॅलोपॅथिक; ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणंच चांगलं!
============
जन्मदिनाचे औचित्य जागतिक किर्तीचे संशोधक डॉ. बरूच ब्लूमबर्ग यांनी 'हिपॅटायटिस ई' hepatitis e या विषाणूचा शोध लावला. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २८ जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा केला जातो.

हिपॅटायटिस hepatitis या आजाराला बोली भाषेत काविळ असे म्हणतात. संसर्गजन्य रोगांपैकी एचआयव्ही, टीबी, मलेरिया या रोगांची ज्याप्रमाणे जनजागृती झाली आहे, त्याच धर्तीवर हिपॅटायटिसबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभर दरवर्षी १४ लाख लोक हिपॅटायटिसमुळे मृत्युमुखी पडतात. भारतात आजच्या घडीला चार कोटी लोकांना हिपॅटायटिसची लागण झाल्याचे सांगण्यात येते.

हिपॅटायटिस ए hepatitis a दक्षिण पूर्व आशिया खंडात पावसाळ्यात या रोगाचे प्रमाण वाढते. इतर वेळेस या पेशंटची संख्या कमी असते. दाट लोकसंख्या, अस्वच्छता, पाण्याचे कृत्रिम साठे, दूषित अन्नपदार्थ, उघड्यावरील व कच्चे अन्न यांचे सेवन यामुळे याची प्रामुख्याने लागण होते. हा आजार सर्व वयोगटातील लोकांना होतो. पण लहान मुले व तरुण वर्गात याचे प्रमाण अधिक आहे. हा विषाणू आतड्यातील पेशींमध्ये प्राथमिक प्रजनन करतो व नंतर रक्ताद्वारे तो यकृतातील पेशींवर हल्ला करून दूषित करतो.

हिपॅटायटिस बी hepatitis b याचे संक्रमण प्रामुख्याने रक्ताचा रक्ताशी संपर्क आल्यामुळे होते. उदा. पेशंटला रक्त दिल्यामुळे व रक्तातील घटक दिल्यामुळे किंवा इंजेक्शन किंवा विविध प्रकारचे ऑपरेशन किंवा दातांवरील उपचार करताना याचे संक्रमण होऊ शकते. रक्ताशी संबंधित व्यसनाधीनता, शारीरिक संबंध आणि मातेकडून बाळालाही याची लागण होऊ शकते. या विषाणूमुळे यकृताचे विविध आजार भविष्यात होऊ शकतात. उदा. सिरॉसिस आणि कॅन्सर होऊ शकतो. हा रोग लसीकरणाद्वारे आटोक्यात आणला जातो. त्याची लसही बाजारात उपलब्ध आहेत.

हिपॅटायटिस सी hepatitis c या विषाणूचे संक्रमण 'बी'प्रमाणेच होते. या विषाणूची लागण झाली तरी रोगाची तीव्रता अत्यंत कमी प्रमाणात दिसून येते. कधीकधी १० ते २० वर्षे याची कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. पण २० किंवा ३० वर्षांनीही हा आजार समोर येतो. पेशंटला ताप येतो, जेवणाची इच्छा कमी होते. मळमळते, उलट्या होतात. छातीच्या उजव्या बाजूस यकृताच्या ठिकाणी तीव्र वेदना होणे अशी प्राथमिक लक्षणे आहे. मात्र अनेकदा ही सर्व लक्षणे दिसून येत नाहीत. पण त्वचेचा रंग पिवळा होतो. लघवी व नखे ‌पिवळी, डोळ्यातील बुब्बुळ पिवळसर दिसून येते. बहुतेक पेशंट चार ते सहा आठवड्यांत बरे होतात. पण लहान मुलांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक असते. पण मृत्यूचे प्रमाण प्रौढांमध्ये अधिक असते.

हिपॅटायटिस
hepatitis रोखण्यासाठी... 
 • > स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा 
 • > शिजवलेले ताजे अन्न खा 
 • > पाण्याच्या स्वच्छतेबाबत शंका असल्यास उकळलेले पाणी किंवा बाटलीबंद पाणी प्या 
 • > कच्च्या भाज्या धुतलेल्या व व्यवस्थित स्वच्छ केल्या असतील तरच कच्च्या खा 
 • > हिपॅटायटिसची साथ असलेल्या भागात जाणार असाल तर 'हिपॅटायटिस ए'ची लस घ्या 
 • > आपण जर रोगवाहक असल्यास आपल्या जोडीदाराला त्याची माहिती द्या 
 • > टूथब्रथ, रेझर किंवा मॅनिक्युअरची साधने सामूहिक पद्धतीने वापरू नका 
 • > मद्यपान पूर्णपणे टाळा

सर्व प्रकारच्या काविळीचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावीपणे माहिती व शिक्षण व सुसंवादाची गरज आहे. हिपॅटायटिसबद्दल शास्त्रीय माहिती जाणून घेऊन राहाणीमानात योग्य तो बदल केला पाहिजे. मुंबईतील आकडेवारीचे मूल्यमापन केले, तर मुंबईतील पेशंटचे प्रमाण व मृत्यू कमी झाल्याचे दिसून येते. योग्य काळजी व वेळेवर निदान केल्यास घाबरण्याचे कारण नाही. - डॉ. रमेश भारमल, नायर हॉस्पिटलचे डीन व हिपॅटायटिस - विषाणूंचे अभ्यासक

गावठी औषधांपासून दूर राहा सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे मुंबई व नवी मुंबईत हिपॅटायटिसचे अनेक पेशंट आढळून येत आहेत. त्यावर वेळीच उपाय न केल्यास पेशंट दगावू शकतो. पावसाळ्यात होणारी कावीळ ही हिपॅटायटिस ए किंवा सी या प्रकारातील असते. शहर व ग्रामीण भागातील पेशंट अनेकदा डॉक्टरशी सल्लामसलत न करता परस्पर गावठी औषधे घेतात. त्यामुळे कावीळ शरीरात पसरून पेशंट कॅन्सरला बळी पडू शकतो, असे मत स्टर्लिंग व्होकार्ड हॉस्पिटलमधील डॉ. अमित घरत व्यक्त करतात.

जगातील आठव्या क्रमांकाचा जीवघेणा आजार 
 •  हिपॅटायटिस बऱ्याच विषाणूमुळे होऊ शकतो. पण प्रामुख्याने सहा विषाणू असे आहेत की त्यांना हिपॅटायटिसचे विषाणू म्हणून ओळखले जाते. 
 •  हिपॅटायटीस ए , बी, सी, डी, ई, व जी असे सहा विषाणू आहेत. 
 •  या विषाणूंसह दुसरे विषाणूही हिपॅटायटिस होण्यास कारणीभूत. उदा. यलो फिव्हर विषाणू व इतर अनेक आहेत. 
=============

काविळ लक्षणे

काविळ उपचार

काविळ औषध

काविळ आहार

काविळ रोग

कावीळ

jaundice information in marathi

jaundice

kavil marathi word

kavil rog in marathi

kavil in english

kavil symptoms

hepatitis b meaning in marathi

kavil rog upchar

No comments:

Post a Comment