Saturday, September 24, 2016

Chakli चकली recipe in marathiदिवाळीचा फराळ म्हटले की पहिल्यांदा आठवते ती खमंग, खुसखुशीत काटेदार चकली. पण ही चकली बनवणे काही सोपी गोष्ट नाही.

नारळाच्या दुधातील चकल्या Chakli Recipe


साहित्य : दीड किलो तांदूळ, १ किलो हरभरा डाळ, १ किलो उडीद डाळ, अर्धी वाटी जिरे, १ चमचा मेथी, तीळ, तेल, मीठ.

कृती : तांदूळ, हरभरा डाळ दोन्ही वेगवेगळे धुवून वेगवेगळं भाजावं. त्यानंतर जिरं आणि मेथी भाजून घ्यावी. वरील सर्व साहित्य एकत्र करून दळून आणावं. नारळाचं दूध काढून घ्यावं. दूध १ माप असल्यास २ माप मीठ घ्यावं. नारळाचं दूध उकळत ठेवावं. त्यात जिरं, मीठ आणि तीळ घालावं. उकळी आल्यावर त्यात वर दळून आणलेलं पीठ घालून एक वाफ आणावी. गार झाल्यावर चकलीपात्रानं चकल्या करून तेलात तळाव्यात. ही चकली इतर चकल्यांपेक्षा वेगळी लागते.

पालक लसूण बटर चकली Chakli Recipe


साहित्य - दोन वाट्या तांदूळ, एक वाटी हरभरा डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी पोहे, अर्धा वाटी साबुदाणा, सर्व भाजून दळून घेणे. अर्धा वाटा लोणी, तिखट दोन चमचे, मीठ चवीप्रमाणे, तीळ एक चमचा, लसूण पेस्ट एक चमचा, ओवा एक चमचा, धणे व जिरे पावडर दोन चमचे, पालक पेस्ट (उकडून घेतलेले) चार चमचे. तळण्यासाठी तेल, दोन चिमूट हिरवा रंग.

कृती - वरील भाजणीचे पीठ दोन वाटी घेऊन दिलेले सर्व पदार्थ त्यात मिक्स करून मळून घेणे. नंतर ते पीठ चकली साचामध्ये घालून चकली गाळणे. नंतर गॅस मोठा करून मग बारीक गॅसवर मंद आचेवर तळा. सर्व्ह करा. खमंग, रूचकर, हिरवीगार अशी पालक लसूण बटर चकली Batar Chakali तयार होईल.

गव्हाच्या पीठाची चकली Wheat floor Chakli Recipe


साहित्य : चार वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी चणाडाळ, तीळ, ओवा, तिखट, मीठ, हळद, तेल

कृती : गव्हाचं पीठ कापडात घट्ट बांधून १५ मिनिटं वाफवून घ्यावं (कुकर लावल्यास ७/८ शिट्या कराव्यात. चणाडाळ चांगली शिजवून मिक्सरला लावावी. पीटाचा गोळा बारीक करून मिक्सरला लावावा. एक छोटी वाटी तेल गरम करून पीठावर ओतून एकजीव करून घ्यावं. नंतर चणाडाळ, तीळ, ओवा, तिखट, मीठ,हळद, सर्व साहित्य एकत्र करून पीठ भिजवून चकली करावीत.

मायक्रोवेव्हमध्ये चकली Chakli Recipe

    
    साहित्य - 4 वाटय़ा चकलीची भाजणी, अर्धी वाटी कडकडीत तेल, चिमूटभर खायचा सोडा, तिखट, मीठ, तीळ, हिंग आणि ओवा.
    कृती - सर्व साहित्य एकत्र करून उकळत्या पाण्यानं पीठ भिजवावं. नॉनस्टिक बेकिंग ट्रेमधेच चकल्या पाडून एकेरी ठेवाव्या.
    बेकिंग - कन्व्हेक्शन 200 डिग्री सेल्सिअसवर प्री-हीट करून चकल्या मायक्रोव्हेवमधे 5-6 मिनिटं ठेवाव्यात.
    टीप - चकलीप्रमाणो मायक्रोव्हेवमधे कडबोळीदेखील करता येतात. चकली कडबोळी गरम असताना मऊ वाटतील पण गार झाल्यावर ती खुसखुशीत झालेली असतात. जास्त भाजल्यास कडक होतात.
चिरोटे chirote

साहित्य - पाव वाटी रवा, तीन वाट्या मैदा, पाव वाटी तूप, दोन चमचे तांदळाचे पीठ, दोन चमचे कॉर्नफ्लावर, चवीपुरते मीठ, मळण्यासाठी कच्चे दूध अर्धा लिटर, पिठी साखर अर्धी वाटी, रिफाईंड तेल तळणीसाठी. तीन दिवस धुवून वाळवलेल्या तांदळाचे पीठ, पाव वाटी तूप.

कृती - प्रथम वाटीभर दुधात रवा भिजत टाकणे. एक तासभर भिजवणे. नंतर त्यातच मीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर घालणे व एकजीव करणे. त्यात मैदा, पाव वाटी तूप घालून दूध लागेल तसे घेऊन घट्ट मळावे. तीन तासांनी पीठ चांगले कुटून घ्यावे. दोन मोठ्ठे गोळे घेऊन माल्या लाटणे. (साठ्यासाठी धुतलेल्या तांदळाचे पीठ आणि तूप घालून फेटणे. खूप वेळ फेटल्यावर लोण्यासारखे होते.) तयार साठा पहिल्या मालीला तीन ते चार चमचे लावणे. माली मोठ्ठी लाटणे. नंतर दुसरी माली पहिल्या साठा लावलेल्या मालीवर टाकणे व दुसऱ्या मालीला पण साठा लावणे. नंतर दोन बोटा एवढी घडी घालत मालीचे घट्ट सुरळी करणे. सुरीने आडवे कापणे. एक एक लाटणे व नंतर रिफाईंडमध्ये मंद आचेवर तळणे. गरम असताना पिठीसाखर पेरणे.

चौडे chaude

साहित्य - एक लहान वाटी रवा. तांदळाचे पीठ दोन चमचे, मैदा तीन वाट्या, चवीपुरते मीठ, मोहन पाव वाटी, तूप, मळण्यासाठी कच्चे दूध अर्धा लिटर, तळण्यासाठी रिफाईंड तेल.

सारण साहित्य - खिसलेले सुके खोबरे अर्धा वाटी (जरासे भाजून), दोन चमचे तीळ, दोन चमचे खसखस भाजून घेणे, पिठी साखर दोन वाटी, २० ग्रॅम काजू, २० ग्रॅम बदाम, २० ग्रॅम पिस्ता, २० ग्रॅम बेदाणे अर्धी वाटी खारिक पूड, वेलची पूड एक चमचा, जायफळ पूड चिमूटभर.

सारण कृती - पिठी साखरेत खोबरे सुके, तीळ, खसखस, काजू, बदाम, पिस्ता पावडर करून (फार बारीक नको), बेदाणे, वेलची पूड, खारिक पूड, जायफळ पूड सर्व एकत्र कालवणे.

कृती - एका भांड्यात रवा कच्च्या दुधात भिजत टाकणे. एक तासांनी त्यातच मोहन, तूप, मीठ, तांदळाचे पीठ, मैदा घालून कच्च्या दुधात घट्ट मळणे. तीन, चार तासांनी मिक्सरमधून पीठ फिरवून घेणे. मोठ्या पुरीसारखी माली लाटून रिफाईंड तेलात तळणे, गरम असतानाच माली ताटावर घेऊन माली वरून दोन बोट दुमडणे. उरलेल्या मालीवर सारण दोन चमचे घालणे, गोल पसरवणे नंतर मालीच्या उजव्या बाजूने दुमडणे. दोन्ही कडा दाबणे. गार करत ठेवणे.

टीप - माली तेलात टाकताना प्रथम गॅस फुल करणे, नंतर बारीक करणे. माली फार कुरकुरीत तळू नये. चिमट्यांनी माली तेलात झाडून घेणे. हा बेळगावचा खास पदार्थ आहे.

कर्रमकुर्रम karram kurram

साहित्य - दोन वाटी मैदा, एक वाटी कडीपत्त्याची पाने, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार, चाट मसाला, तळण्यासाठी तेल.

कृती - सर्वप्रथम कडीपत्याची पाने धुवून, पुसून मिक्सरमध्ये घालावीत. त्यातच हिरव्या मिरच्या व थोडे मीठ घालून जाडसर वाटून घ्यावे. नंतर एका परातीत मैदा व वरील कडीपत्त्याचे मिश्रण चवीपुरते मीठ घालून पीठ पाण्याने घट्ट मळून घ्यावे. अर्ध्या तासानंतर पीठ एकसारखे करून त्याचे चार गोळे करावेत. नंतर हे गोळे पाटावर पातळ लाटावेत. एका कढईत तेल चांगले तापवून घ्यावे व लाटलेल्या पोळीचे चिरण्याने किंवा कात्रीने पातळ पातळ काप करावेत. तापलेल्या तेलात हे काप खमंग तळून घ्यावेत व वरून चाट मसाला भुरभुरावा. गार झाल्यानंतर एअर टाईट कंटेनरमध्ये भरून घ्यावे. मजेदार कर्रमकुर्रम तयार.

टीप - कुरकुरे व बिंगो ह्या सारख्या बाजार पदार्थांना हा उत्तम घरगुती पर्याय ठरू शकतो. कडीपत्त्यामुळे भरपूर कॅल्शियम मिळते आणि लहान व मोठे सर्वांना खूप आवडेल.

खजूर... कुकी डिलाईट Khajur cookie delite

साहित्य - उत्तम प्रतीची काळी मऊ खजूर २० ते २२ नग, वेलची पूड पाव चमचा, कोको पावडर अर्धा चमचा, तूप अर्धा चमचा, बदाम पूड एक चमचा, मारी बिस्किट ४ नग.

कृती - खजुराच्या बी काढून एक मिनिट हायवर मायक्रोवेव्ह करावे. नंतर बाहेर काढून त्यामध्ये कोको, तूप, वेलची, बदाम पूड घालून पुन्हा दहा सेकंद मायक्रो करावे. पुन्हा बाहेर काढून मिश्रण खूप मळून एकजीव करावे. खजूर मिश्रणाच्या मारी बिस्किटाच्या आकाराच्या पाच पुऱ्या आणि दोन मोठ्या अशा एकूण सात पुऱ्या करणे. रोल बनवताना एक मारी बिस्कीट घ्यावे. त्यावर खजूर पुरी परत मारी बिस्कीट त्यावर खजूर पुरी लावून पूर्ण रोल तयार करावा. मोठ्या पुऱ्यांनी साईड कव्हर करून घ्यावा. हा रोल फॉईलमध्ये ठेवून दोन तास फ्रिजमध्ये ठेवावा. त्यानंतर रोलचे उभे कट मारावे. चार तुकडे करावे.

टीप - खजूर कुकी डिलाईट फ्रीजमध्येच ठेवावे. डायबेटिक व्यक्तींसाठी मस्त स्वीट आहे.

बेळगावी कडबोळी Begagavi kadboli

साहित्य - धुतलेल्या तांदळाचे ताजे बारीक दळलेले पीठ सहा वाट्या, एक वाटी लोणी, अर्धा चमचा मिरपूड (हवी असेल तर), कच्चे दूध अर्धालिटर मळण्यासाठी, तळण्यासाठी तूप, अर्धा चमचा मीठ.

कृती - सहा वाट्या पिठात एक वाटी लोणी, मीठ, मिरपूड घालून कच्च्या दुधात मळून घ्यावे. मनगटाने खूप वेळ (दहा ते पंधरा मिनिटे) पीठ मळणे. पोलपाटावर गोळा घेऊन घोळून कडबोळे तयार करणे. तूप तापत ठेवणे. प्रथम तूप चांगले गरम करणे. पाच मिनिटे मोठ्या आचेवर व नंतर बारीक आचेवर कडबोळे तळून घ्यावेत. एका वेळेच पाच ते सहा कडबोळे तळता येतात. खमंग खरपूस भाजून घ्यावेत.

इमृती (तोड्याची जिलेबी) Todyachi Jilebi

साहित्य - एक वाटी उडदाची डाळ, चार चमचे मैदा, दोन वाटी साखर, केशर चार ते पाच काड्या, तळण्यासाठी तूप.

कृती - चार ते पाच तास डाळ भिजत घालावी. नंतर उपसून मिक्सरवर वाटून गाळण्याने गाळून घ्यावी. चार चमचे मैदा एकसारखा गुठळी न होऊ देता कालवावा. एका पातेल्यात साखरेचा दीड तारी पाक करावा. त्यातच केशर घालावे. नंतर इमृती करण्याकरता हे पीठ सॉस बॉटलमध्ये भरून तापलेल्या तुपावर प्रथम बांगडी एवढा गोल घालून कडेने बारीक गोल पाडत जावे. तळून झाल्यावर पाकात सोडावी. पाकातून काढून ताटात सजवावी. या साहित्यात २० ते २२ इमृती होतात.

टीप - हा पदार्थ करायला किचकट वाटत असला तरी सरावाने जमू शकतो आणि उडदाच्या डाळीचे पौष्टिक गुणधर्म शरीराला पोषक असतात. ही इमृती तळण्यासाठी पसरट तवा किंवा फ्राईंग पॅन वापरावा.

शाही बेसन मावा ड्रायफ्रुट करंजी Karanji


साहित्य - कणकेसाठी दीड वाटी बेसन, अर्धा वाटी मैदा, पाव चमचा मीठ, मोहनसाठी दोन चमचे साजूक तूप व कणिक भिजवण्यासाठी दूध.

सारणासाठी - अर्धा वाटी तीळ, १०० ग्रॅम मावा, एक वाटी वाळलेल्या खोबऱ्याचा खिस, बदाम, काजू, पिस्ता, आक्रोड २५ ग्रॅम प्रत्येकी, ५० ग्रॅम बेदाणे, एक वाटी खिसलेला गूळ, चार चमचे गव्हाचे पीठ, अर्धा चमचा वेलची पावडर, दोन चमचे खसखस आणि तळण्यासाठी खमंग साजूक तूप

कृती - प्रथम मैदा व बेसन चाळून घ्यावे. त्यात मीठ व तुपाचे मोहन घालून कणिक दूध घालून भिजवून घ्यावे. (चपातीच्या कणकेप्रमाणे). खोबरे, तीळ व खसखस मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे नंतर खसखस, तीळ मिक्सरमधून बारीक करून घेणे, ड्रायफूटस् बदाम, काजू, पिस्ता, आक्रोड खिसून घेणे. मावा मंद आचेवर थोडा भाजून घेणे. तसेच गव्हाचे तूप घालून खमंग भाजून घेणे.

सारणाचे सर्व साहित्य एका बाऊलमध्ये एकत्र करून घेणे व त्यात गूळ, वेलची पावडर, बेदाणे घालून सर्व एकसारखे मिसळून घेणे. नंतर तयार केलेल्या कणकेचे छोटे, छोटे गोळे बनवून त्या गोळ्याची छोटी पाटी लाटून त्यात सारण भरून दोन्ही काठ दुमडून करंजी बंद करून घेणे. सदरची करंजी चिरण्याने चिरण्याचे नाही. सर्व करंज्या झाल्यानंतर साजूक तुपात मंद आचेवर सोनेरी रंगावर खमंग तळून घेणे.
=========

पाऊस कोसळू लागला की गरमागरम कांदाभजी आणि आल्याचा वाफाळता चहा असा बेत एकदा तरी झालाच पाहिजे. पण चवीने खाणाऱ्यांचं समाधान एवढ्यावरच कुठे होतं? म्हणूनच भजी-बटाटेवडे यांच्यापलिकडे जाऊन, पावसात ताव मारण्यासाठी आणखी काही टेस्टी पदार्थांचा शोध आम्ही घेतला. तुमच्या 'टमी'ला खूश करण्यासाठी हे काही चमचमीत, खुसखुशीत, चटपटीत पर्याय. मग कधी जमवताय फक्कडपैकी बेत?

ओव्हन बिघडला अन्...

पावसाळ्यात गरमागरम भजी आणि आल्याचा चहा या गोष्टींची कितीही ओढ वाटली तरीही ते कधीतरी ठिक असतं. शेवटी त्याला पौष्टिक आहाराची जोड ही हवीच. असाच एक पौष्टिक पदार्थ मी सुचवतोय, तो आहे पालक ब्रेड. या पदार्थाची गंमत सांगायची म्हणजे खरंतर तो ठरवून नाही तर अचानकच तयार झाला आणि तोही एका कुकरी शोच्या सेटवर. आम्हाला जे करायचं होतं ते करताना थोडी गडबड झाली आणि त्यातून जन्माला आला, खामेरी पालक पकोडा. त्याचं झालं असं की, पालकची प्युरी, त्यात घातलेली कणीक असा सगळा जामानिमा सेटवर तयार होता. मात्र ऐनवेळी सेटवरच्या ओव्हनची गडबड झाली. मग बिघडू घातलेल्या या पदार्थात ऐनवेळी थोडे मसाले घालून आम्ही हे खामेरी पालक पकोडे तयार केले. ह्या पदार्थात यीस्टचा वापर करून तो आंबवल्याने त्याला खामेरी (आंबवलेले) असं नाव दिलेलं आहे.
-शेफ विष्णू मनोहर


खामेरी पालक पकोडे Pakode

साहित्य : पालकची प्युरी - १ वाटी, तीळ, आलं-लसूण पेस्ट( प्रत्येकी अर्धा चमचा), मिक्स्ड सॉस, कणीक, चवीपुरती आमचूर पावडर आणि मीठ, चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा फुलवलेलं यीस्ट.

कृती : प्रथम पालक प्युरीमध्ये कणीक वगळता यीस्ट आणि सर्व मसाले घालून घ्यावेत. आता या मिश्रणात मावेल इतकी कणीक घालून सर्व मिश्रण भाज्यांच्या पिठापेक्षा सैलसर होईल इतपत मळून घ्यावं. याचे छोटे छोटे पकोडे तेलात तळून घ्यावेत आणि गरमागरम सर्व्ह करावेत. झटपट तयार होणारी ही रेसिपी पौष्टीक आहे आणि पावसाळ्यात सगळ्यांनाच आवडेल अशीही आहे.

२६ जुलैचा पाऊस आणि पकोडे

माझ्या सासूबाई भाताचं थालीपीठ नेहमी बनवायच्या. माझ्या मिस्टरांना आणि मुलांना ते फार आवडायचं. थालीपीठ तसा पारंपरिक पदार्थ, म्हणून मी त्यात थोडं आलं-लसूण मिरची पेस्ट मिसळून काहीतरी वेगळं करायचा एक प्रयत्न केला. आणि हा राईस पकोडा तयार झाला. आणि पहिल्याच प्रयत्नात तो सगळ्यांना आवडलाही. तेव्हापासून गेली दहा-बारा वर्ष हा पकोडा मी बनवतेय. या पदार्थाबद्दलची एक खास आठवण माझ्याकडे आहे. ज्या वर्षी २६ जुलैला मुंबईत अतिवृष्टी झाली, तेव्हा हा पदार्थ मी बनवण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. फक्त माझे मिस्टर आणि मुलं घरी यायचा अवकाश होता. घरी येताच मी त्यांना गरमा गरम राईस पकोडे करून देणार होते. मी एकटीच घरी त्यांची वाट बघत होते. घरातली सगळी मंडळी मात्र बाहेर कुठे ना कुठे अडकली होती. कुणाशीच धड संपर्क होत नव्हता. बाहेर पाऊस वाढत होता आणि इथे माझं टेन्शन वाढत होतं. राईस पकोड्यांचा बेत तसाच राहिला. होता. शेवटी दुसऱ्या दिवशी पाऊस ओसरला. आणि सकाळी सगळेजण थकूनभागून घरी आले. प्रत्येकाला कडकडून भूक लागली होती. मी लगेचच गरमा गरम राईस पकोडे ‌बनवून त्यांना खाऊ घातले. आजही तो दिवस आणि पकोड्यांची ती चव स्मरणात राहिली आहे.
-नम्रता नितीन दिवेकर

राईस पकोडा Rice Pakoda

साहित्य : २ वाट्या शिजवलेला भात, अर्धी वाटी बेसन, एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, चवीनुसार आल लसूण मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.

कृती : २ वाट्या शिजवलेला भात मिक्सरमधून बारीक करून घ्यावा. भाताचं मिश्रण प्लेटमध्ये काढून त्यात अर्धी वाटी बेसन, एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, चवीनुसार आल लसूण मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आदी साहित्य नीट एकत्र करावं. हाताला पाणी लावून लहान लहान गोळे करावेत. कढईत तेल गरम करून हे तयार झालेले गोळे तांबूस तळून घ्यावेत. आणि गरमा गरम राईस पकोडे प्लेटमधून सर्व्ह करावेत. सोबत टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी असेल तर बघायलाच नको.

प्रयोगांतून सुचले पॅटिस patice

मला मुळात स्वयंपाकाची खूप आवड आहे. त्यामुळे किचन ही माझी प्रयोगशाळाच आहे म्हणा ना. त्यात माझे खूप प्रयोग सुरू असतात. पावसाळ्याच्या दिवसांत सगळ्यांना काहीतरी चमचमीत पदार्थ खायला आवडतात. पण त्याहून वेगळं काय करता येईल याचा विचार कायम डोक्यात सुरू असतो. असंच एकदा वेगवेगळी स्टफिंग्ज करून बघत होते. त्यातच मक्याचे दाणे घेऊन काही रेसिपी करता येईल का असा विचार डोक्यात आला आणि हे पॅटिस करून बघितले. पहिल्यांदा केले आणि सगळ्यांना इतके आवडले की आता प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी या पॅटिसची फर्माइश होतेच.
-तृप्ती नेरुरकर

कॅबेज कॉर्न पॅटिस

साहित्य - वाफवून अर्धवट क्रश केलेला मका दोन वाट्या, एक वाटी बेसन, एक वाटी बारीक चिरलेला कोबी, एक टीस्पून आले-लसूण पेस्ट प्रत्येकी, एक टीस्पून जिरा पावडर, एक टीस्पून मीट, एक टीस्पून वाटलेली मिरची किंवा ती जर ज्या प्रमाणात हवी असेल त्या अंदाजाने मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल तळणासाठी ब्रेडचा चुरा किंवा बारीक रवा (पॅटिस घोळण्यासाठी)

कृती - प्रथम एका ताटात वरील सर्व साहित्य घ्यावं, अर्धवट क्रश केलेल्या मक्यात तेल सोडून बाकी सर्व साहित्य घालून चांगलं एकत्रित करावं. हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून मग त्याचे लिंबाएवढे गोळे करून पॅटिससारखा गोल आकार द्यावा. पॅटिस, ब्रेडचा चुरा किंवा बारीक रव्यात घोळवून रिफाइन्ड तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे. गरम असतानाच सॉससोबत सर्व्ह करावे.

लसणाचा मस्त झणका

बाहेर जोरदार पाऊस पडत असला की काहीतरी चमचमीत खायची इच्छा होणं स्वाभाविक आहे. अशावेळी बाहेरचं तेलकट काही खाण्याला पर्याय म्हणून मला हा पदार्थ सुचला. घरामध्ये असलेल्या अगदी थोड्या साहित्यापासून झटपट होणारी ही रेसिपी म्हणजे हा कॉर्न लसुणी पुलाव! भजी, वड्यांचा कंटाळा आलाय आणि काहीतरी वेगळं हवंय अशी मागणी घरातून होत होती. काय करावं हा प्रश्न पडला होता. त्यातच पावसाळ्यामध्ये पोटासाठी लसूण चांगला हे माहित होतं. मग लसूणचा वापर करून मी एखादी रेसिपी बनवायचं ठरवलं. त्यातून हा पुलाव बनवण्याची कल्पना सुचली. शिवाय यात मक्याच्या दाणे वापरायचेही ठरवले. त्यामुळे त्याला एक वेगळी छानशी चव येते. या पुलावला स्वतःची अशी चव असल्यामुळे त्याच्या बरोबर खाण्यासाठी वेगळी काही करी बनवायची गरज नाही. एखादा पापड भाजून, लोणच्याबरोबरही या पुलावाचा आस्वाद घेत येतो. पूर्वतयारी करून झाल्यानंतर मोजून ५ ते ७ मिनिटांत हा पुलाव तयार होतो.
-मनीषा तुळपुळे

कॉर्न लसुणी पुलाव

साहित्य : १ वाटी शिजवलेला भात, बारीक चिरलेला लसूण, एका कांद्याचे उभे काप, एका टोमॅटोचे उभे काप, हिरव्या मिरचीचे उभे काप, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, खडा मसाला, बडी इलायची, गरम मसाला, हळद पावडर, तिखट, तेल आणि चवीपुरतं मीठ.

कृती : सर्वप्रथम तांदळाचा मोकळा भात शिजवून घ्या. रात्री पुलाव करायचा असल्यास सकाळी भात शिजून घेतला तरी चालतो. भात शिजवतानाच त्यात मीठ आणि बडी इलायची घाला. कढईत थोडं तेल घालून ते गरम होण्यापूर्वीच त्यात खडा मसाला घाला. तेल थोडं तापल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण, जिरे, मिरचीचे उभे काप, उभा चिरलेला कांदा, किंचित लाल तिखट आणि हळद घालून मिश्रण चांगलं परतवा. त्यात टोमॅटो, मक्याचे दाणे आणि गरम मसाला घालून ते चांगलं परतवा. त्यात शेवटी लिंबाचा रस चवीपुरता घालून शिजवलेला भात घाला. चांगला परतून एक वाफ आली की गॅस बंद करा. वरून कोथिंबीर आणि मक्याच्या दाण्यांनी गार्निश करता येईल.

दिवाळीतच नव्हे पावसाळ्यातही

नेहमी वेगवेगळे पदार्थ करून पाहण्याची मला आवड आहे. दिवाळीला चकल्या नेहमीच होतात. पण एकदा भर पावसात मस्तपैकी खुसखुशीत चकली करून पाहिली तर? कल्पना डोक्यात आली आणि लगेच कामाला लागले. त्यातूनच ही गव्हाच्या पीठाची चकली तयार झाली. भाजणीची चकली आपण नेहमी करतो पण त्यात थोडं जरी काही कमी-जास्त झालं तर ती चकली फसते. म्हणून ही जरा वेगळी चकली करून पाहायची ठरवलं. आपण मैद्याच्या चकल्या जशा करतो तशा गव्हाच्या पीठाची करून पाहावी असं मी आणि माझ्या बहिणीने सुचवलं आणि आम्ही खाली दिलेली कृती प्रत्यक्षात उतरवली. आमचा प्रयोग यशस्वी झाला आणि छान खुसखुशीत चकली जमून आली.

१. दिवाळी दिव्याचा सण आहे आणि त्याचे अनेक पैलू आहेत. त्यात फक्त खाणं हा एकच पैलू असू शकत नाही, त्यामुळे खवय्यांनी केवळ खाण्याकडेच लक्ष न देता दिवाळीचे इतर अनेक पैलू आहेत, जसं की किल्ला बनवणं, रांगोळी काढणं, घर आवरणं आणि खरेदी करणं याकडे लक्ष केंद्रित करावं.
२. खुशखुशीत चकली, चवीष्ट लाडू मस्तच लागतात; पण सावधान! जीभेची मर्जी ठीक आहे. बाकी आरोग्याचं काय? यासाठीच प्रमाणातच हे पदार्थ खा आणि प्रमाणातच बनवा.
३. बरेचदा हे पदार्थ घरी केले जातात. त्यावेळी आपल्याला त्यात थोडा फार बदल करण्याची सुवर्णसंधी असते, ज्यामुळे दिवाळीचे पदार्थ आपण थोडे हेल्दी बनवू शकतो. जसं, की चकलीच्या भाजणीत सोयाचं पीठ घालणं, मैद्याऐवजी कणिक वापरणं, साखरेऐवजी गूळ वापरणं किंवा तळण्याऐवजी पदार्थ बेक करणं.
४. सर्वांनाच पदार्थ घरी करणं जमतंच असं नाही. बाहेरचे तयार पदार्थ आणताना ते चांगल्या तेलात बनवले आहेत ना, याची खात्री करून घ्यावी. कृत्रिम रंग टाकलेले आणि चांदीचा वर्ख लावलेली मिठाई टाळावी. हे पदार्थ आपल्या आणि विशेष करून मुलांच्या आरोग्याला हानीकारक असतात.
५. या दिवसात जिमला जाणं शक्य नसेल, तर सकाळी लवकर उठून चालायला किंवा जॉगिंगला जाता येईल. त्यामुळे दिवसभर उत्साही वाटेल आणि खाण्यावरही सकारात्मक दृष्टीकोन राहील; कारण व्यायाम केला, तर आपण आहारही सांभाळण्याची शक्यता जास्त असते आणि नाहीच सांभाळता आला, तर कमीत कमी कॅलरी तरी खर्च झालेल्या असतात.
६. आपण जेव्हा आपल्या परिचितांकडे जाऊ, त्यावेळी मिठाई नेण्यापेक्षा फळं किंवा सुकामेवा नेऊन खऱ्या अर्थानं त्यांचं आरोग्य चिंतून त्यांचे शुभचिंतक बनू शकतो.
७. गोड पदार्थ दूर ठेवणं अवघड असतं; पण भारतीयांत मधुमेह होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, हे लक्षात असावं. यासाठी गोड पदार्थ प्रमाणातच खावेत. बाजारात शुगर फ्री मिठाईही मिळते. ज्यात बरेचदा साखरेऐवजी खजूर किंवा अंजीर गोडपणासाठी वापरलेली असतात. पांढरी साखर खाण्यापेक्षा आपल्यासाठी खजूर-अंजीर असलेली मिठाई अनेक लोहासारखे उत्तम क्षार देते; परंतु मधुमेहींना ती रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरते.
८. दिवाळीत भेट म्हणून सुका मेवा किंवा चॉकलेट्स आले, की ते न फोडता किंवा हवाबंद डब्यात घालून कुठं तरी कपाटात किंवा फ्रीजमध्ये मागं ठेवून द्या. ते नंतर खाता येतील किंवा नंतर कुणाला तरी शेअर करता येतील. उगीच आले आहेत म्हणून संपवण्याची घाई नकोच.
९. जास्त फळे आणि भाज्या खाण्यावर भर द्या. त्यामुळे पोट साफ राहील आणि त्यातील सी जीवनसत्त्वामुळे फटाक्यांच्या धुराच्या हवेतील प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम काहीसे कमी होतील.

==========

मायक्रोवेव्हमध्ये फराळाचे पदार्थ कसे करतात?

    दिवाळीच्या फराळाची केवढी तयारी करावी लागते. कितीही तयारी करून ठेवली तरी  प्रत्यक्ष फराळ बनवताना जेवढा वेळ लागायचा तितका लागतोच. विकतच्या फराळाचे कितीही पर्याय बाजारात असले तरी किमान चार दोन पदार्थ तरी हातचे हवेत असा बायकांचा आग्रह असतोच. आणि त्यामुळेच वेळ नसतानाही फराळ बनवण्याचा आटापिटा केला जातो.
    दिवाळीचा फराळ आणि स्वयंपाकघरातला मायक्रोव्हेव यांची नीट सांगड घालून दिली तर वेळ वाचतो, दगदग होत नाही, चिडचिड होत नाही. आणि चविष्ट फराळ बनवल्याचं समाधानही मिळतं.
    अनेकजणी मोठय़ा हौशीनं मायक्रोवेव्ह घेतात. पण त्यात अन्न गरम करणं आणि चार दोन पदार्थ करण्याखेरीज फारशी मजल जात नाही. पण मायक्रोवेव्हचा जर उत्तम उपयोग करायचा ठरवला तर दिवाळीचा उत्तम फराळही मायक्रोव्हेवमधे आपण सहज करू शकतो.
    
    ओल्या नारळाच्या करंज्या Karanjya
    

    साहित्य -  सारण - 4 वाटय़ा ओलं खोबरं, 3 वाटी पिठी साखर आणि वेलची पावडर.
       कृती - सर्व साहित्य काचेच्या भांडय़ात घ्यावं.  मायक्रोव्हेवमधे हायवर 2 मिनिटं शिजवावं. शेवटी वेलची पूड घालून मिश्रण एकसारखं करावं. 
    पारी - 3 वाटी मैदा किंवा कणीक, 1 चमचा मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोर,  1  चमचा रवा आणि अर्धा वाटी तूप एकत्र करून गार दुधानं किंवा पाण्यानं पीठ भिजवावं. थोडय़ा वेळानं छोटय़ा पु:या लाटून सारण भरून करंज्या कराव्यात. आणि नॉनस्टिक बेकिंग ट्रेमधे एकेरी मांडाव्यात.  करंज्यांचा ट्रे लो रॅकवर ठेवावा.
    बेकिंग - कन्व्हेक्शन 200 डिग्री सेल्सिअसवर प्रिहीट करून त्यात 7-8 मिनिटं ठेवून हलक्या सोनेरी रंगावर भाजाव्या. दुसरी बाजू झालेली नसल्यास उलटून 2-3 मिनिटं परत भाजाव्या.
    टीप - सारणासाठी साखरेऐवजी गूळ वापरू शकता. तसेच मटार, मका इत्यादि तिखट करंज्यादेखील  वरीलप्रमाणो करू शकता.
    
    शंकरपाळे Shankarpale
    
    साहित्य - 2 वाटी मैदा, 3/4 वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी तूप एकत्र मिसळून गार दुधानं मैदा भिजवावा. पीठ फार मळू नये. जाड पोळी लाटून घ्यावी. ती बेकिंगच्या नॉनस्टिक ट्रेमधे ठेवावी. सुरीनं किंवा पिझाकटरनं शंकरपाळ्याच्या आकाराच्या चिरा वरच्यावर द्याव्यात. माइक्रोवेव्हमधे ट्रे लो रॅकवर ठेवावा.
    बेकिंग - कन्व्हेक्शन 200 डिग्री सेल्सिअसवर प्री-हिट करून शंकरपाळी 7-8 मिनिटं  ठेवून हलक्या गुलाबी रंगावर भाजावी.
    
   
    
    भाजक्या पोह्यांचा चिवडा chivada
    
    साहित्य - 250 ग्रॅम भाजके पोहे, अर्धा वाटी तेल, मोहरी, कढीपत्ता, बडीशेप, हिंग, शेंगदाणो, खोब:याचे काप, मीठ, तिखट आणि चिवडा मसाला.
    कृती - काचेच्या ट्रेमधे अर्धी वाटी तेल टाकून त्यात मोहरी, कढीपत्ता, बडीशेप, हिंग टाकून मायक्राव्हेवमधे  कोणत्याही काँबिनेशनमधे एक मिनिट ठेवून मग त्या फोडणीत दाणो-खोब:याचे काप, भाजके पोहे, मीठ, तिखट आणि चिवडा मसाला सर्व एकत्र करावं. ट्रे हाय रॅकवर ठेवावा. कोणत्याही कॉम्बिनेशनमधे चिवडा 6-7 मिनिटं ठेवावा. दर दोन मिनिटांनी ट्रे बाहेर काढून चिवडा हलवावा. शेवटच्या दोन मिनिटाआधी ट्रे बाहेर काढावा. चिवडय़ात डाळ्या व तळलेला कांदा मिसळावा. बाहेर काढल्यावर त्यात पिठीसाखर घालावी.
    टीप - याच प्रकारे चुरमु:यांचा, गव्हाचा, मक्याच्या पातळ पोह्यांचा चिवडा बनवता येतो.
    
    खजुराच्या लहान साटो:या satorya
    
    साहित्य - सारण - 200 ग्रॅम बिनबियांचे खजूर, 50 ग्रॅम काजूची जाडसर भरड, 2 चमचे पिठीसाखर घ्यावी. हे सर्व साहित्य नीट एकत्र करून घ्यावं.
    पारी - 3 वाटी मैदा किंवा कणीक, अर्धी वाटी तूप, 2 टे.स्पू. कॉर्नफ्लोर, चिमूटभर मीठ एकत्र करून मिसळा. पीठ गार दुधानं भिजवा, पिठाचे लहान गोळे बनवा, त्याचा उंडा बनवून खजुराच्या मिश्रणाची गोळी घालून उंडा बंद करा. तळहातांनी दापून साटोरी चपटी करा (लाटू नका). बंद केलेली बाजू वर करून नॉनस्टिक ट्रेमधे एकेरी ठेवा. ट्रे लो रॅकवर ठेवा.
    बेकिंग - कन्व्हेक्शन 200 डिग्री सेल्सिअसवर मायक्रोव्हेव प्री-हीट करून घ्या. त्यात साटो:या 7-8 मिनिटं भाजाव्या. उलटून गरजेप्रमाणो आणखी 1-2 मिनिटं भाजाव्या. नॉनस्टीकमधे ब:याच वेळा दोन्ही बाजू एकदम भाजल्या जातात. अॅल्युमिनियम ट्रेमधले पदार्थ मात्र उलटून पुन्हा भाजावे लागतात.
    
    

    
    चकली, चिवडा, करंज्यांचं गुपित

    
     करंजीच्या पारीसाठी आवडीनुसार रवा-मैदा किंवा नुसता रवा किंवा नुसता मैदा वापरतात. रवा, मैदा फ्रीजमधे ठेवलेला असल्यास करंज्या जास्त छान होतात. मोहनासाठी तूप परातीत फेसून वापरावं.
     चकलीच्या भाजणीसाठी धान्य भाजताना मंद आचेवर भाजावे. फार लाल भाजू नये. भाजणी ज्वारी किंवा हरभरा डाळीनंतर दळायला सांगावी. भाजणी एकदम बारीक दळलेली हवी.
     चिवडा करताना फोडणीसाठी थोडं कमी तेल घ्यावं. जर कमी वाटलं तर वरून परत गरम तेल गार करून घालावं.
     करंजी, शंकरपाळी, चिरोटे हे खुसखुशीत होण्यासाठी तेलाऐवजी तुपाचं मोहन वापरावं.

चकली रेसिपी मराठी chakli recipe marathi

भाजणीची चकली Bhajanichi Chakali

दिवाळी फराळ रेसिपी Diwali faral recipe

चकली कशी करावी chakali kashi karavi

चकली बनाने की विधि chakali banane ki vidhi

चकली मसाला chakli masala

चकली रेसिपी chakli recipe

चकली ब्लॉग chakli blog

No comments:

Post a Comment