Wednesday, February 4, 2015

कर्जमुक्त व्हा, बचत करा!

आज मुंबईतील अशोक मधुकर कांबळे (वय ३७) यांचे नियोजन जाणून घेऊ. ते देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या खाजगी बँकेत नोकरी करतात. त्यांच्या कुटुंबात ते स्वत:, पत्नी, आई - वडील व मुलगी असे पाच सदस्य आहेत. अशोक यांना ३५,५०० रुपये करपश्चात वेतन मिळते. सर्व खर्च वजा जाता अशोक यांच्या हातात ५,४०० रुपये बचत म्हणून शिल्लक राहतात. या बचतीचे नियोजन करण्याची विनंती अशोक यांनी केली आहे.
अशोक यांच्या जमा - खर्चाचा तपशील पाहता सर्वात आधी जाणवणारी गोष्ट म्हणजे अशोक हे ९,७०० रुपयांच्या हप्त्याची वैयक्तिक कर्जाची फेड करत आहेत. अशोक यांनी पाठविलेल्या मेलमध्ये अनेक त्रुटी जाणवल्या. उदाहरणार्थ - या कर्जाचा तपशील उपलब्ध झाला नाही. अशोक यांच्या बाबत सांगायचे झाले तर त्यांच्या विमा योजनेचा तपशील - वैयक्तिक कर्ज कोणाकडून घेतले, व्याजाचा दर काय, किती वर्षांसाठी हे कर्ज घेतले आहे हा तपशील नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वैयक्तिक कर्जाच्या व्याजाचा दर हा नेहमीच जास्त असतो. परंतु अशोक यांना हे कर्ज त्यांच्या बँकेने दिले असेल तर व्याजाचा दर कमी असेल. या कारणाने सर्व प्रथम कर्ज मुक्त होणे हा अशोक यांना सल्ला आहे.

कर्जमुक्त झाल्यावर बचतीचा विचार करावा. परंतु अनेकांना कर्जाचा हप्ता वाढविला तर रोकड सुलभता आटण्याची भीती असते. तशी अशोक यांना ही कदाचीत असावी. म्हणून अशोक यांच्या बचतीचे नियोजन करतांना मुलीच्या शिक्षणासाठी व अशोक यांच्या निवृती पश्चात खर्चाची तरतूद अशी दोन उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. अशोक यांनी कमी हप्ता असलेला व केवळ अपघाती मृत्यू झाल्यास (नसíगक मृत्यू नव्हे) कुटुंबाला संरक्षण देणारी विमा योजनेची खरेदी करावी.
मर्यादित खर्चात मर्यादित संरक्षण या प्रकारची ही पॉलिसी आहे. एसबीआय जनरल इन्शुरन्सची वार्षकि १,००० रुपये हप्ता भरून ही पॉलिसी स्टेट बँकेच्या कुठल्याही शाखेत उपलब्ध आहे. अथवा तुम्ही ज्या बँकेत नोकरी करता त्या समूहाच्या सर्वसाधारण विमा कंपनीची पॉलिसी तुम्ही खरेदी करू शकता.
तुमच्या बँकेत एक पीपीएफ खाते उघडून दरमहा २,००० रुपये जमा करावे. उर्वरीत रक्कम एक लार्ज कॅप, एक मिडकॅप व एक बॅलेन्स्ड फंडात प्रत्येकी १,००० रुपये गुंतवावेत. या तीन एसआयपी व पीपीएफ २० वष्रे सुरू राहाव्यात अशी अपेक्षा आहे. वर्षांतून एकदा आपल्या बचतीचा आढावा घेणे गरजेचे आहे.



आजचा अर्थबोध:
खाजगी बँकांकडून उपलब्ध असलेले वैयक्तिक कर्ज सहज उपलब्ध असले तरी या कर्जावरील व्याजाचा दर सर्वात जास्त असतो. म्हणून हे कर्ज घेऊ नये. तातडीची गरज म्हणून घेतलेच तर अल्पावधीत फेडणे हिताचे असते.

No comments:

Post a Comment