Wednesday, February 4, 2015

विनामूल्य व मुक्तपणे उपलब्ध असलेली सॉफ्टवेअर्स व्हिडीओच्या माध्यमातून शिकता येतात


आज संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक ई-बुक्स आणि कोस्रेस इंटरनेटवर उपलब्ध आहेत. परंतु बहुतांशी हे कोस्रेस इंग्रजी भाषेत असतात. अनेकदा त्यात बोजड शब्दांचा वापर केलेला असतो आणि शब्दोच्चारदेखील समजण्यास कठीण असतात. म्हणूनच विविध सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स आणि प्रोग्रॅिमग लँग्वेजेस भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येकाला सोप्या शब्दात आणि मातृभाषेत शिकता याव्यात या हेतूने आयआयटी मुंबई, स्पोकन टय़ुटोरियल हा प्रकल्प राबवीत आहे. ह्याला केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अर्थसाहाय्य लाभले आहे.
ttp://spoken-tutorial.org/ ह्या वेबसाइटवरून  Liber office, Linux, C/C++, JAVA, Scilab, Latex, PHP MYSQL, Python, Firefox यांसारखी विनामूल्य व मुक्तपणे उपलब्ध असलेली सॉफ्टवेअर्स व्हिडीओच्या माध्यमातून शिकता येतात. येथे अभ्यासासाठी पन्नासहून जास्त कोस्रेस २० पेक्षा जास्त भारतीय भाषांमधे उपलब्ध आहेत.
उदाहरणार्थ, दररोज वापरला जाणारा फायरफॉक्स ब्राऊजर इन्स्टॉल करण्यापासून त्याची वेगवेगळ्या प्रकारची सेटिंग्ज कशी करायची हे यात शिकवले जाते. तसेच संगणकाला िपट्रर जोडणे, रेल्वेचे ऑनलाइन तिकीट काढण्याठी अकाउंट उघडणे, तिकिटाचे बुकिंग, पॅनकार्डसाठी अर्ज करणे व त्याचे स्टेटस तपासणे, जीमेलवर अकाऊंट उघडणे, ई-मेल पाठवणे असेही विषय येथे हाताळले गेले आहेत.
प्रत्येक विषय समजावण्यासाठी त्याचे छोटे भाग केले आहेत. उदाहरणादाखल सध्या फायरफॉक्स ह्या विषयावरील १० टय़ुटोरियल्स मराठी भाषेत उपलब्ध आहेत. म्हणजे फायरफॉक्स हा विषय १० भागांत विभागला आहे. सर्वसाधारणपणे एक टय़ुटोरियल म्हणजे १० ते १२ मिनिटांचा व्हिडीओ असून शेवटी सरावासाठी काही असाइनमेंट्स दिलेल्या असतात. हे व्हिडीओ डाऊनलोडदेखील करता येतात. आजमितीस इंग्रजीत सर्वात जास्त म्हणजे ६२१ आणि त्याखालोखाल मराठीत ४२१ टय़ुटोरियल्स आहेत.
ह्या संस्थेद्वारे शाळा, कॉलेजेस तसेच सामाजिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी वरील विषयांच्या ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केल्या जातात. कार्यशाळांमधे परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रसुद्धा दिले जाते.

No comments:

Post a Comment