Monday, January 5, 2015

Hindusthan is Hindurashtra!!

हिंदुस्थान हे हिंदूराष्ट्रच
हिंदू संकटात तर देश संकटात!
सरसंघचालक भागवत यांचा इशारा

हा देश परंपरेने हिंदूंचा देश आहे. त्यामुळे या देशाचे जे काही चांगले-वाईट होईल त्याची जबाबदारी हिंदूंचीच आहे.
अहमदाबाद, दि. ४ (वृत्तसंस्था) - हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, या देशातील हिंदू समाजावर संकट आले तर देशावरही संकट कोसळेल असा गंभीर इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला.
अहमदाबाद येथे संघाच्या कार्यकर्ता शिबिराच्या समारोपात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपल्या देशात विविधतेत एकता आहे. तेच आपले वैशिष्ट्य आहे. ती ओळख शाबूत ठेवण्यासाठी शिक्षणाबरोबर जागृती करायला हवी, असेही ते म्हणाले. उठा आणि एकजुटीने हिंदू धर्म, हिंदू समाज आणि देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही भागवत यांनी केली.
फक्त सरकारवर अवलंबून राहू नका
सरकार कितीही चांगले असो, केवळ सरकारवर अवलंबून राहू नका, असा सल्लाही भागवत यांनी दिला. ते म्हणाले, यापूर्वी मूठभर लोकांनी देशाला लुटले आणि आपल्यावर राज्य केले. पुन्हा तसे होऊ नये म्हणून जागे रहा!
जन्माला येणारे प्रत्येक मूल हे मुसलमानच
ओवेसींचे फूत्कार
हैदराबाद -
जन्माला येणारे प्रत्येक मूल हे मुसलमानच असते पण आईवडील त्याचे धर्मांतर करत असतात. त्या सगळ्यांना पुन्हा इस्लाममध्ये आणणे हीच खरी ‘घर वापसी’ ठरेल, असे फूत्कार ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज येथे सोडले. सर्वच धर्मांचे मूळ इस्लामच आहे, असा बेताल दावाही त्यांनी केला.
ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त ‘एमआयएम’चे मुख्यालय असलेल्या ‘दारुस्सलाम’ येथे आयोजित सभेत ओवेसी बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी तमाम हिंदुस्थानींना ‘इस्लाम’ची दावत दिली. हिंदुस्थान ही आमच्या पित्याचीच भूमी आहे असे सांगून ते म्हणाले की, येथील सर्व धर्माच्या लोकांनी इस्लाम स्वीकारावा असे माझे आवाहन आहे. आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही पण इस्लाममध्ये तुमचे कल्याण होईल याची खात्री देतो.

No comments:

Post a Comment