Wednesday, January 14, 2015

कपिल शर्मा प्रियांकावर भडकला, माईक आणि ईअरफोन आपटून निघून गेला

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. मात्र कपिल फारच तापट आहे, हे फार कमी जणांना माहित असेल. त्याच्या संतापाचा किस्सा मुंबईत झालेल्या एका अॅवॉर्ड शोदरम्यान पाहायला मिळाला.

यावेळी कपिल शर्मा बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रावर भलताच भडकला. कपिलला प्रियांकाचा इतका राग आला की शो दरम्यान तो माईक आणि ईअरफोन आपटून निघून गेला.

मुंबईतील एका अॅवॉर्ड शोचं सूत्रसंचालन प्रियांका आणि कपिल करत होते. पण प्रियांकाच्या उशिरा येण्यामुळे कपिल शर्मा संतापला. त्यानंतर तो माईक आपटून तिथून निघून गेला.

या दरम्यान प्रियांका मेकअप रुममध्ये गेली आणि तीन तासांनी बाहेर आली. कपिल प्रियांकाची वाट पाहत संतापला. प्रियांका तीन तासांनंतर स्टेजवर आली आणि 'मी अजूनही तयार नाही,' असं तिने म्हटलं.

बस्स..प्रियांकाच्या या वाक्याने कपिलचा राग आणखीच वाढला आणि तो माईक-ईअरफोन स्टेजवरच आपटून निघून गेला. 'महिलांचा हाच प्रॉब्लेम आहे. मॅडम अजूनही तयार नाही,' असं तो जाताना म्हणाला. मात्र हा कपिल शर्माचा पंचही असू शकतो, ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यात अभिनेत्री कंगना राणावतलाही अशाप्रकारे कपिल शर्माची वाट पाहावी लागली होती. कंगना 'कॉमेडी नाईट्स विद कपिल'च्या सेटवर आली असताना तिला बराच वेळ कपिलची वाट पाहावी लागली होती. त्यामुळे वाट पाहणं काय असतं, याची जाणीव कपिललाही झाली असावी.

No comments:

Post a Comment