Thursday, December 4, 2014

Zivami.com Richa Kar

झिवामी'ची प्रफुल्ल प्रणेतीonline site Zivame.com  launched  for Women innerwear  saleदेशातल्या आघाडीच्या संस्थेतून इंजिनीअरिंगचे शिक्षण तिने घेतले. नंतर एमबीए केले. या कोर्सदरम्यान अभ्यास म्हणून केलेल्या मार्केट सव्‍‌र्हेदरम्यान लाँजरी सेक्टरमध्ये ग्राहकांची अनास्था, अवघडलेपण तिच्या लक्षात आले. या क्षेत्रातल्या अमर्याद संधीचीही जाणीव झाली. आयटी क्षेत्र सोडून महिलांच्या अंतर्वस्त्र विक्रीसाठी 'झिवामी' ही ऑनलाइन साइट सुरू करणाऱ्या तरुण उद्योजिकेची कथा.
हल्ली टी.व्ही.वर झळकणारी एक जाहिरात लक्ष वेधून घेत आहे. अंतर्वस्त्राच्या जाहिरातीत नेहमी दिसणाऱ्या उत्तान दृश्यांऐवजी अगदीच वेगळी. स्ट्रॅपलेस ब्रा, बॅकलेस ब्रा, स्पोर्ट्स ब्रा, टी शर्ट ब्रा.. टीनएजरपासून ते साठीकडे झुकलेल्या आजीपर्यंत विविध क्षेत्रांतील  स्त्रिया मोकळेपणाने त्या स्वत: कोणत्या प्रकारची ब्रा वापरतात हे सांगताना या जाहिरातीत दिसतात. 'झिवामी' या अंतर्वस्त्र विक्रीसाठी ऑनलाइन शॉिपग साईटची ही जाहिरात. अंतर्वस्त्रांसारखा नाजूक विषय आणि त्याची खरेदी याकडे स्त्रियांनी जाणीवपूर्वक नजरेने पाहायला हवे, हे या जाहिरातीतून जाणवते. झिवामी या ऑनलाइन लाँजरी सेलिंग साइटची कर्ती- रिचा कर जाणीवपूर्वक हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडते आहे.  
योग्य मापाची अंतर्वस्त्रे स्त्रीचे व्यक्तिमत्त्व खुलवण्यात मदत करतात. तिला आत्मविश्वासाने वावरण्याचे बळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे तज्ज्ञांचे मत आहे; पण नेमकी याच विषयाची आपल्याला अनास्था आहे. अंतर्वस्त्रांची खरेदी करताना स्त्रिया ऑकवर्ड होऊन जातात. काही दुकानांत सर्व मापांची अंतर्वस्त्रे असतातच असे नाही. लहान दुकानात बऱ्याचदा पुरुष विक्रेते असल्याने अंतर्वस्त्र खरेदी म्हणजे झटपट उरकून टाकायचे काम असे स्त्रियांना वाटते. या घाईगडबडीत योग्य माप आणि आकार याबाबतीत खरेदी करताना चूक होऊ शकते. अशातच विक्रेता आपल्याकडे पाहून तुम्हाला कोणते माप योग्य फिटिंगचे आहे हे सांगतो, तेव्हा तो आपली मापे काढतो आहे असे वाटून अनेक स्त्रियांना बेचन व्हायला होते.
भारतीय स्त्रियांच्या मानसिकतेचा, इथल्या परिस्थितीचा विचार करून रिचा कर या मूळच्या इंजिनीअर तरुणीने अंतर्वस्त्रांसाठी ऑनलाइन पर्याय खुला करायचा ठरवला  आणि  'झिवामी' या ऑनलाइन शॉपिंग साइटची निर्मिती केली. या शॉपिंग साइटवर केवळ स्त्रियांची अंतर्वस्त्रे विक्रीला असतात. रिचा करने बिट्स पिलानीमधून इंजिनीअरिंग केले. त्यानंतर आयटी क्षेत्रात काही वर्षे कामही केले. २००७ मध्ये नरसी मोनजी इन्स्टिटय़ूटमधून मॅनेजमेंटचा अभ्यास केला. ''याच दरम्यान लाँजरी मार्केटचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. अंतर्वस्त्र खरेदीच्या बाबतीतील स्त्रियांच्या समस्या तेव्हाच लक्षात आल्या आणि त्यातूनच झिवामी या साइटची निर्मिती झाली,'' झिवामीची सीईओ रिचा कर सांगते.
अंतर्वस्त्र खरेदीतला हा ऑकवर्डनेस कमी करण्यासाठी रिचाला ऑनलाइन खरेदी हा मार्ग सापडला. ''आमच्या साइटवर करेक्ट साइझ ब्रा कशी निवडावी, याबाबतही मार्गदर्शन केलेले आहे. भारतीय स्त्रियांना उत्तम अंतर्वस्त्र उपलब्ध व्हावीत हा झिवामीचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येकीच्या अंतर्वस्त्राविषयीच्या गरजा वेगळ्या असतात. त्यानुसार अंतर्वस्त्र खरेदीचा त्यांचा अनुभव हा त्यांना लाजिरवाणा न वाटता तो सुसहय़ व्हावा आणि स्त्रियांच्या बदलत्या गरजा आणि त्यांची विकसनशील जीवनशैली समजून घेऊन त्यानुसार त्यांना मोठय़ा प्रमाणात अंतर्वस्त्र निवडीसाठी वाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,'' असे रिचा म्हणाली.
वेगवेगळ्या स्टाइलची, योग्य मापाची आणि कम्फर्ट देणारी अंतर्वस्त्रे, नाइटवेअर, स्लिमवेअर, शेपवेअर या साइटवरून खरेदी करता येतात. लाँजरीजचे पन्नासहून जास्त ब्रॅण्ड या साइटवर उपलब्ध आहेत. आत्मविश्वास ही आजच्या काळाची गुरुकिल्ली आहे. अंतर्वस्त्र खरेदीसाठीचे स्वातंत्र्य आणि मोकळेपणा स्त्रियांना मिळावा या उद्देशाने आयटी क्षेत्रातले करिअर सोडून याकडे वळणारी रिचा कर म्हणूनच या काळाची खरी प्रतिनिधी वाटते.
viv04 भारतीय स्त्रियांना अंतर्वस्त्रांबाबत बोलते केले आणि त्यांच्या सर्वेक्षणातून असे पुढे आले की, दहापकी आठ स्त्रिया या चुकीच्या मापाची ब्रा वापरतात. ६ ते ७ वर्षे स्त्रिया एकाच मापाची ब्रा वापरत असतात. हे अत्यंत चुकीचे आहे. स्त्रीच्या आयुष्यात किमान ६ वेळा तिच्या स्तनाचा आकार बदलतोच. याची माहिती स्त्रियांना असणे आवश्यक आहे. तसेच वर्षांतून एकदा आपण योग्य माप वापरतो आहोत का याची खात्री करणे गरजेचे आहे. सहा महिन्यांहून जास्त काळ वापरल्यानंतर शक्यतो त्या ब्राचा वापर करू viv05नये.  भारतातील स्त्रियांना उत्तम फिटिंग आणि आरामदायी अशी अंतर्वस्त्रे हवी असतात; पण त्याविषयी माहिती नसते, असे सर्वेक्षणातून पुढे आले.
''झिवामी म्हणजे हिब्रू भाषेत उत्साही, प्रफुल्ल, तेजस्वी. आजच्या स्त्रीचं हेच खरं रूप आहे. ते आत्मविश्वासानं ठसवण्यासाठी ब्रँडचं नाव झिवामी ठेवले.''

No comments:

Post a Comment