Thursday, December 4, 2014

Shape Wearलाँजरी सेक्शनमध्ये एक उपयुक्त प्रकार दिसतो तो, फाउंडेशन वेअरचा. म्हणजे सोप्या शब्दात- शेपवेअर. शेपवेअर घालायचं कशासाठी? आणि कुणी? शेपवेअर घातलं जातं फिगर व्यवस्थित दिसण्यासाठी. कुठल्याही तरुण मुलीला आकर्षक फिगर हवी, असं वाटणं साहजिक आहे. काहींना याची नैसर्गिक देणगी असते, तर काहींना त्यासाठी मेहनत करावी लागते. पण आहे त्या फिगरमध्येही बॉडी हगिंग टॉप्स किंवा ड्रेसेस घालायचे असतील तर? ..तर शेपवेअरला पर्याय नाही. म्हणजेच आपलं पुढे आलेलं पोट, कमरेचा भाग बॉडी हगिंग ड्रेसमधून अगदी खराब दिसतो. आपणदेखील त्यामुळे असे कपडे घालायला संकोचतो. अशा ड्रेससाठी शेपवेअर वापरणं एक वरदान ठरतं.
फॅशन म्हटलं की स्त्री वर्गाचा विक पॉइंट असतो आणि हीच फॅशन करण्यासाठी हवी असते एक परफेक्ट फिगर आणि ती मेंटेन करण्यास मदत करतात हे शेपवेअर्स.
शेपवेअरमध्येही प्रकार असतात- बॉडी लाइनर्स किंवा बॉडीसूट, कॅमिसोल्स आणि लिओटार्ड्स. कित्येकदा पोश्चर व्यवस्थित राहण्यासाठी शेपवेअर्स वापरण्याचा सल्ला दिला जातो. अनेक वैद्यकीय व्यावसायिक हा सल्ला देतात. स्लिप डिस्क किंवा मणक्याच्या आजारांची ट्रीटमेंट घेताना कमरेचा पट्टा वापरण्याचा सल्ला दिला जातो, आता हा कंबरेचा पट्टा म्हणजेच एक प्रकारचा शेपवेअरचाच प्रकार. आपलं शरीरसौष्ठव आकर्षक दिसण्यासाठी शेपवेअरचा खुबीने वापर करता यायला हवा.

No comments:

Post a Comment