Saturday, December 6, 2014

Sai Baba, who was it?

साईबाबा खरंच कोण होते?


लोकांना खरा धर्म शिकवणाऱ्या हजारो संतांचा, सद्गुरूंचा प्रभाव हिंदू समाजातून कधीच नष्ट होणार नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की, ''माझी निंदा करणाऱ्यांना मी कळलो नाहीच, पण माझी स्तुती करणाऱ्यांनाही मी कळलो नाही.'' त्यामुळे साईबाबांची बाजू मांडायची तरी का, कुणासमोर आणि कशासाठी? खरं तर या घडामोडींना किंमतही देण्याची गरज नाही. तरीही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.
साईबाबा खरंच कोण होते? बाबा शिर्डीत आले तेव्हा एका मंदिरात बसले. पुजाऱ्यानं हाकललं तेव्हा (पुढे जिचं नामकरण बाबांनीच द्वारकामाई केलं त्या) मशिदीत बसले. गावातली मुलं त्यांच्यावर दगड मारत मागे धावत तेव्हा हसत हसत बाबा हा 'खेळ' खेळत. या कोणत्याही वेळी, 'अरे तुम्ही मला समजता काय, मी अवतार आहे, संत आहे, गुरू आहे', असं ते बोलले नाहीत. त्याच शिर्डीत चांदीची मूठ असलेली छत्री त्यांच्या डोईवर धरून त्यांची चावडी ते मशीद अशी मिरवणूक निघे तेव्हाही लोकांच्या आनंदात ते सहभागी होत. ना त्यांना दगडांचं दु:ख झालं ना छत्रचामरांचा आनंद झाला. तेव्हाची शिर्डी होती तरी कशी? खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यांनी खाँसाहेबांचं ९०० पानी चरित्र लिहिलं आहे. त्यात खाँसाहेब बाबांच्या दर्शनास गेले तेव्हाच्या शिर्डीचं वर्णन आहे. ते लिहितात, ''सर्वत्र दाट जंगल, रातकिडय़ांची किरकिर, रस्ते नाहीत, सापकिरडय़ाची भीती फार. शेतवडीमुळे चिखल भरलेला, अशा एका ठिकाणी एका चौकीत पेटत्या धुनीसमोर हातात चिलीम घेतलेली साईमहाराजांची मूर्ती बसलेली असे.'' म्हणजेच शिर्डी साधारण होती. तिथे बाबांमुळे हळूहळू उच्चशिक्षितांची ये-जा वाढली तरी बाबांची साधी गावठी राहणी, त्यांची लोकांशी असलेली वर्तणूक कधीच बदलली नाही. कुणी श्रीमंत आहे म्हणून ते कोणाशी सलगीने वागले नाहीत की गरीब आहे म्हणून कुणाला झिडकारले नाही. उलट कुणाला फटकारताना त्याच्या श्रीमंतीला त्यांनी काडीची किंमत दिली नाही. कोण कसं आहे, याच्याशी त्यांना काहीच देणंघेणं नव्हतं. माणसानं कसं झालं पाहिजे, हेच त्यांचं एकमेव उद्दिष्ट होतं. त्यांनी कुणाच्याच धर्मावर आक्रमण केलं नाही, उलट प्रत्येकाला धर्मरत व्हायला शिकवलं. 'अल्ला मालिक' हा मंत्र कायम त्यांच्या मुखी असे, अनेक फकीर आणि हाजीही त्यांच्या संगतीचा लाभ घेत. पण शेकडो हिंदूही त्यांचे निस्सीम भक्त होते. शिर्डीत रामनवमी त्यांनी सुरू केली. अनेकांना विष्णुसहस्रनाम म्हणायला लावले. मशिदीचे नाव 'द्वारकामाई' ठेवले! खरं तर धार्मिक सलोख्याचा किती मोठा सामाजिक प्रयोग बाबांनी सहजतेने साधला. हे ताकदीचं लोकोत्तर कार्य संतांचं नाही? लोकमान्य टिळकांचे सहकारी दादासाहेब खापर्डे अनेकवार साईचरणी जात. एकदा साईबाबा त्यांना म्हणाले, ''तुम्ही अन्य कुणापेक्षाही देवाचीच सेवा करा. परमेश्वर जे देतो ते कधीच संपत नाही आणि मनुष्य जे देतो ते कधीच चिरंतन टिकत नाही.'' खापर्डेचे तेव्हाचे सामाजिक स्थान पाहता, तुम्ही आता केवळ माझीच सेवा करा, हे सांगून शिष्यपरिवार वाढवत नेण्याचा मोह एखाद्या भोंदू बाबाला झाला नसता का? लोकमान्य टिळकांना साईबाबांनी सांगितले की, ''लोक वाईट आहेत, तुम्ही तुम्हाला तुमच्यासारखे ठेवा!'' अर्थात नेत्यानं लोकानुनयी होऊन तत्त्वाला मूठमाती देऊ नये, हा किती मोठा राजकीय बोध झाला. जिवाला सत्याकडे, स्वरूपाकडे वळवणं ही सद्गुरूत्वाची खूण नाही?
एकदा बाबांनी एक फळ उचलले आणि खापर्डेना विचारले, ''या फळात किती फळे निर्माण करण्याची क्षमता आहे?'' खापर्डे उत्तरले, '' फळात जेवढय़ा बिया असतील त्यांच्या हजारोपट.'' यावर हसून बाबा म्हणाले, ''या फळाने त्याचा नियम आणि गुणधर्म पाळलेला आहे.'' म्हणजे सृष्टीतील सर्वच वस्तुमात्रांनी त्यांचा त्यांचा गुणधर्म पाळला आहे, माणसानं मात्र तो पाळलेला नाही. माणुसकी हाच माणसाचा गुणधर्म असताना माणसानं पशूलाही लाज वाटेल इतकी हीन पातळी गाठली आहे. माणसाला त्याच्या मूळ गुणधर्माची आठवण करून द्यायला बाबा आले होते. खापर्डेची रोजनिशी, साईसच्चरित्रासह अनेकानेक पुस्तकांतील शेकडो प्रसंगांतून साईबाबांच्या कार्यावर आणि कळकळीवर प्रकाश पडतो. त्यातील कशाचाही आधार धर्मसंसदेने घेतला नाही, हे उघड आहे.
भगवंत गीतेत सांगतात, 'अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।' म्हणजे मी मनुष्य रूपात अवतरित होतो, तेव्हा मूढ लोक मला जाणत नाहीत, माझं खरं स्वरूप जाणत नाहीत! मग साईबाबा कोण होते, हे आपण कसं जाणणार? साईबाबांना जे आवडतं ते आपल्या जगण्यात जितकं उतरेल तितके साईबाबा खरे कोण होते, हे जाणवू लागेल.
मग साईबाबा होते कोण? निस्संशय ते सद्गुरूच होते. संकुचित जिवाला व्यापक करीत परमतत्त्वात विलीन करणं, हे सद्गुरूंचं एक कार्य सांगता येईल. ते बाबांनी अहोरात्र केलं. भगवान शंकरांनी पार्वतीमातेला सांगितलेल्या 'गुरुगीते'च्या प्रत्येक श्लोकाचा दाखला देत साईबाबांचे सद्गुरूरूप उकलता येईल. या 'गुरुगीते'त पार्वतीमाता विचारते, 'केन मार्गेण भो स्वामिन् देहि ब्रह्ममयो भवेत?' देहात जन्मलेला जीव ब्रह्ममय कसा होईल? त्यावर शिवजी सांगतात की, देवी जीव ब्रह्ममय कसा होईल, हे पाहण्यापूर्वी ब्रह्म म्हणजे काय, हे पाहिलं पाहिजे. मग ब्रह्म काय आहे? तर सद्गुरूच ब्रह्म आहे, हे शिवजी त्रिवार सांगतात. जीव गुरुमय होत नाही तोवर तो ब्रह्ममय होऊच शकत नाही, हेही सांगतात. आता कुणाला वाटेल की अमक्या शास्त्रात तर असं म्हटलं आहे, तमक्या पुराणात तर तमुकच देवाला श्रेष्ठ मानलं आहे. त्यावर शिवजी स्पष्ट सांगतात, ''वेदशास्त्रपुराणानि इतिहासादिकानिच। मंत्रयंत्रादिविद्याश्च स्मृतिरूच्चाटनादिकम्। शैवशाक्तगमादिनि अन्यानि विविधानि च। अपभ्रंशकराणिह जीवानां भ्रांतचेतसाम्।।'' वेद, शास्त्र, पुराणे, इतिहास, यंत्रतंत्रादि विद्या, स्मृती, शैव, शाक्त, आगमनिगमादि अनेक ग्रंथ हे आधीच भ्रमित असलेल्या जिवाला आणखीनच भ्रांतीत टाकून भटकवणारे आहेत! ज्या वेदांना हिंदू तत्त्वज्ञान उच्चस्थानी मानते त्यांच्यापासूनच सुरुवात करून शिवजींनी समस्त ग्रंथ-पंथांना भटकंती वाढवणारे ठरवले आहे.
Sai Baba, who was it?

Saints thousands of people sikavanarya true religion, strange composition effect will not be destroyed, nor Hindu community. Srigondavalekara Maharaj says, '' I am not sure kalalo those who slander me, but my thanks to those who have not kalalo. '' So when posing side of the temple, kunasamora and why? In fact, these developments do not need to sell. Still have to think about some things.
Sai Baba, who was it? When Baba of Shirdi was sitting in a temple. Pujaryanam wanted then (before naming jicam they did DwarkaMai arms) sat mosque. Children smile and discuss the dad who ran behind them stone 'game playing. Or at any time, 'Hey, you know what I am, I am the incarnation, the saints, the Guru is that they did not say. Shirdi get hold of the same umbrella with silver handle on their part, they are happy when people say that their Print procession to the mosque. Neither of them dagadancam regret was not chatracamaranca was very happy. How, though, came to Shirdi was? Disciple of Abdul Karim Khan Balkrishnabua kapilesvari khamsaheba by khamsahebancam 900 water history is written. It is described sirdicam khamsaheba when they darshan of Baba. They write, '' everywhere dense jungle, ratakidayanci whine, no roads, sapakiradayaci very afraid. Setavadimule full of mud, a place such as sitting idol saimaharajanci hand dhunisamora petatya post one by Chile. '' That was simple Shirdi. Although much simpler gavathi living there babammule be increased gradually uccasiksitanci come, that their behavior does not change, never the people. Who would not be as rich as it is the poor that they do not have someone who intimately. But the price is not someone to be rich, they stick his phatakaratana. Who is how, with whom did denanghenam nothing. Manasanam how we should be, that they had their only goal. He did not attack religion kunacyaca, but everyone dharmarata be taught. "Allah Malik" is the mantra that their permanent house, taking advantage of the many stereotypes and Haji gave you directions to them. But hundreds of devout Hindus had their devotees. Shirdi Ramnavmi started. Many did say visnusahasranama. Masjid name DwarkaMai 'put! In fact led to a much bigger social experiment smoothly Baba religious cordial. It is not unusual santancam work in the towel? Lokmanya Tilak being co-Dadasaheb Khaparde inculcated saicarani. Once Sai Baba said, '' Do you serve other kunapeksahi God. God never fails to give that man does not endure forever, and never to give. '' Khapardece then see the social space, you now only my service, it would not have had the temptation to take a simple Baba was extended sisyaparivara? Lokmanya Tilak's temple, he said, '' they are bad, you keep with you, you! '' Of course not bury principle and netyanam dogs, there was a sense of how large state. Soul to the truth, do not sign this form valavanam sadgurutvaci?
Once Baba picked up a fruit and khapardena said, '' or phalata has the potential to produce much fruit? '' Khaparde answered, '' phalata can revive the seeds are hajaropata them. '' And a good dad said, '' or phalane its rules and quality pet is. '' it is all kept the quality of their vastumatranni industry, but it is not manasanam pet. Humanity has reached a level so low that the man be ashamed, when the animal manasanam properties. Baba was to remind him of his original feature. Khapardeci journal, saisaccaritrasaha several books under the light and warmth of the work of hundreds of prasangantuna Sai Baba of Shirdi. And whatever reason did not dharmasansadene, is evident.
Gita, God says, 'avajananti mother mudha manusim tanumasritam. I was incarnate as a man, then fool the people do not know me, I do not know the nature! Sai Baba, who was then, this one knows how? Shirdi Saibaba who love it, who was the right time when they will come down to your living, it will feel.
And who were his disciples? Sure it was that. Dissolve paramatattvata not limited to extensive soul, this work will be concluded with a sadguruncam. Baba did it day and night. God sankaranni parvatimatela words' gurugite of the certificate will be ukalata sadgururupa Shirdi each verse. Or 'gurugiteta parvatimata asks, "Ken margena bho svamin dehi brahmamayo bhaveta? How will the countryside life brahmamaya born? Shiva says that the Goddess would be how life brahmamaya, what is Brahman can view, this should be looked at. What is Brahman? If sadguruca Brahma is, says the Shiva Congrats. Life is not as long as he can not talk brahmamaya gurumaya also speak. Now it is said that if someone feels that amakya written, tamakya mythology is the god of the best if tamukaca God. Shiva says clearly that, '' vedasastrapuranani itihasadikanica. Mantrayantradividyasca smrtiruccatanadikam. Saivasaktagamadini anyani vividhani f. Apabhransakaraniha jivanam bhrantacetasam .. '' Veda, science, mythology, history, yantratantradi learning, memory, Shaiva, Schachl, agamanigamadi many books are bhatakavanare cast bhrantita something that already confused soul! Vedanta Hindu philosophy is the high regard in which sivajinni start tyancyapasunaca decided to increase research-all book Sects.

No comments:

Post a Comment