Tuesday, December 16, 2014

parsik tunnel get slow - Kalwa kharegaon

पारसिक बोगद्यात संथगती

Parsik tunnel Kalwa Kharegaon



कितीही दिरंगाईने धावत असल्या, तरी मध्य रेल्वेच्या जलद गाडय़ांची मजा काही निराळीच असल्याचे अगदी पश्चिम रेल्वेचे प्रवासीही मान्य करतील. घाटकोपर-ठाणे किंवा ठाणे-डोंबिवली या स्थानकांदरम्यान धडधडत जाणाऱ्या या जलद गाडय़ांमुळे प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यातील किमान १५ मिनिटे सहज वाचतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून डीसी-एसी परिवर्तनाच्या कामामुळे पारसिक बोगदा आणि त्याच्या जवळच्या परिसरात जलद मार्गावर वेगमर्यादा घालण्यात आल्याने ठाणे-डोंबिवली या स्थानकांदरम्यानची जलद गाडय़ांची धडधड मंदावली आहे. ही वेगमर्यादा कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना पुन्हा तसाच 'धडधडीत' प्रवास अनुभवायला मिळण्याची शक्यता कमी आहे.
वेगमर्यादा कशामुळे?
डीसी-एसी परिवर्तनासाठी ओव्हरहेड वायरच्या वर काही अंतर असणे आवश्यक असते. हे अंतर नीट बाळगले नाही, तर त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर होऊ शकतो. पारसिक बोगद्यात रेल्वे रूळांपासूनचे छतापर्यंतचे अंतर पुरेसे नव्हते. त्यामुळे पारसिक बोगद्यात रेल्वे रूळ थोडे खाली घेण्यात आले होते. रविवार आणि रात्रीच्या मेगाब्लॉकमध्ये रेल्वेने हे काम पार पाडले. मात्र तरीही एसी विद्युतप्रवाहाच्या तारा आणि छत यांमधील अंतर काहीसे कमी आहे. हे रूळ खाली घेतल्याने आणि तारा व छत यांतील अंतर कमी असल्याने पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूंना आणि बोगद्यात ताशी
५० किमीची वेगमर्यादा घातली आहे.
परिणाम काय?
या वेगमर्यादेमुळे ठाण्याहून सुटलेल्या उपनगरीय जलद गाडय़ा आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा पारसिक बोगद्याजवळ येऊन मंदावतात. तसेच डोंबिवलीकडून येणाऱ्या गाडय़ा दिवा स्थानक गेल्यानंतर मुंब्रा स्थानकाजवळ वेग कमी करतात. पूर्ण पारसिक बोगदा आणि त्या पुढे थोडे अंतर हा वेग कमीच असतो. त्यामुळे आधी ठाणे-डोंबिवली हा प्रवास जलद गाडीने अवघ्या १३-१४ मिनिटांत पार पडत होता. मात्र आता या प्रवासासाठी १८ आणि कधी कधी २० मिनिटेही लागतात. त्यामुळे उपनगरीय गाडय़ांच्या एकंदरीत वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो.
उपाय काय?
ही वेगमर्यादा हटवण्यासाठी पारसिक बोगद्यात महत्त्वाची कामे होणे आवश्यक आहे. छताच्या डागडुजीपासून ते रेल्वे रूळांच्या देखभाल दुरुस्तीपर्यंत अनेक गोष्टी करणे गरजेचे आहे. मात्र सद्य:स्थितीत उपनगरीय रेल्वे वाहतूक थांबवून ही कामे करणे शक्य नाही. त्यामुळे ठाणे-दिवा या स्थानकांदरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर या कामाकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही पाचवी व सहावी मार्गिका पूर्ण झाल्यावर जलद मार्गावरील वाहतूक नव्या मार्गिकांवरून वळवण्यात येईल. त्यानंतर तीन महिने संपूर्ण पारसिक बोगदा आणि त्याच्या आसपासचे रेल्वे रूळ यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल. त्यानंतर ही वेगमर्यादा कालांतराने हटू शकते, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Any delay is running, but fun to be a very different result will be even faster by the Central Railway Railway pravasihi West. This Ghatkopar Thane Thane-Kalyan stations throbbing or easily read by at least 15 minutes daily life of passengers gadayammule or faster. However, in the last few days due to the DC-AC turn of the works PARSIK tunnel and station area quickly placed his hand on the way to speeding-Dombivali is slowed or sthanakandaramyanaci throbbing result quickly. The same is likely to be sustained in speeding up the passengers 'professedly' journey is less likely to experience.
What speeding?
It is necessary to have some distance to the overhead wire of the DC-AC Change. This difference did not properly, but the result can be the railway transport. PARSIK railway tunnel was not enough difference chataparyantace rulampasunace. So PARSIK tunnel railway line was taken down a little. This is done through the work of the railway line in Sunday night. However, it is somewhat reduced, but the difference between the AC electric wires and roof. The distance between the star and the low roof line down there and after being PARSIK both sides of the tunnel and the tunnel per hour
50 km is laid speeding.
What is the result?
The rapid suburban trains and long distance trains vegamaryademule Thane missed PARSIK bogadyajavala come mandavatata. And dombivalikaduna who trains at Mumbra reduce light station after station. Through the tunnel and they are less PARSIK at this little bit further. So just 13-14 minutes before the car was not fast travel there Thane-Kalyan. But now the journey takes about 20 to 18 and sometimes Minitel. The overall schedule is the result of suburban trains.
What's the solution?
This is important work to be bottomless PARSIK delete speeding. Repair of the roof from the many things that need to be taken care of railway rulam durustiparyanta. However, this stage can not be done to stop the suburban railway transport. Therefore, the light-Thane stations and the fifth, a senior official told the Central Railway's attention will be given after the completion of the work or task sixth Lane. The fifth and sixth after the completion of the transport route quickly be diverted to new line margikanvaruna. After three months, and will be cutting across PARSIK Maintenance and repairs of the railway line around. After this time, speeding can hatu, made it clear that official.

No comments:

Post a Comment